DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Salary

एप्रिल २०२४ महिन्याचे वेतन

एप्रिल पेड इन मे चे वेतन e Kuber ई कुबेर प्रणाली द्वारे directly शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वैयक्तिक बँक खात्यात जमा केला जाणार आहे.

त्या अनुषंगाने वाशिम वेतन पथक कार्यालयाची  तयारी सुरू झाली आहे.  सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी मा वेतन अधीक्षक माध्यमिक वाशिम  कार्यालय सुचनेनुसार, आपल्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक बँक खाते डिटेल्स पुन्हा तपासून verify करावीत.

एप्रिल महिन्याचे वेतन ई कुबेर द्वारे होणार असल्याने प्रत्येक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक बँक खाते verify करून घेणे आवश्यक आहे. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक बँक खाते पडताळणी बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 


एप्रिल महिन्याच्या वेतन बिलासोबत वैयक्तिक बँक खाते verify केल्याबाबत प्रमाणपत्र शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना द्यावे लागणार आहे.

तरी वरील प्रमाणे कार्यवाही सर्वांनी करावी, ही विनंती.
ई कुबेर प्रणाली मध्ये चुकीला माफी नाही हे सर्वानी लक्षात घ्यावे
सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात एप्रिल महिन्याचे वेतन ऐक तारखेला जमा करून घेण्याचा  प्रयत्न आहे .🙏धन्यवाद

Also Read -
👇
शालार्थ  वेतन महत्त्वाचे

माहे एप्रिल 2024 वेतन सूचना

प्रति,     
    १) गट शिक्षणाधिकारी
        पंचायत समिती(सर्व)
    २) मुख्याध्यापक जि.प.हायस्कुल ,….(सर्व)
    ३) मुख्याध्यापक जि.प. प्राथमिक/उच्च प्राथमिक शाळा ,………….(सर्व).
अंतर्गत जिल्हा परिषद,यवतमाळ

विषय – माहे एप्रिल 2024 चे शालार्थ  वेतन देयके सादर करतांना करावयाची कार्यवाही बाबत.

संदर्भ :-  १) शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मंत्रालय मुंबई.शासन निर्णय क्र.वेतन-१२२१/प्र.क्र.३५टिएनटी-३
                  दि.०४/०१/२०२४
    २) या कार्यालयाचे पत्र क्र.यजिप/शिवि/प्राथ.लेखा/१९/२०२४ दि.०५/०२/२०२४
   ३) शिक्षण संचालनालय पुणे यांचे पत्र क्र.शिसंमा/टि-७/शालार्थ/अशासकीय कपाती/७९५  
           दि.९ फेब्रुवारी २०२४
                         
    पुढील अद्यावत माहितीसाठी आपल्या समुहात सामील व्हा 


एप्रिल  २०२४ शालार्थ वेळापत्रक

DDO-1 (मुख्याध्यापक) यांनी DDO-2 कडे देयक फॉरवर्ड करणे –  १५ एप्रिल २०२४

DDO-2 ने शालार्थ प्रणालीतून देयक DDO-3 कडे फॉरवर्ड करणे – १८ एप्रिल २०२४

      एप्रिल २०२४  चे देयक करतांना खालील बाबी प्राधान्याने कराव्या.

उपरोक्त संदर्भ-१  शासन निर्णय नुसार जिल्हा परिषद  शिक्षकांचे  चे वेतन सीएमपी/ई कुबेर प्रणाली करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. शासन निर्णय नुसार सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या अधिनस्त शिक्षकांचे वेतनाचे  खाते व अशासकीय कपाती करिता संदर्भ पत्र क्र.१ नुसार जि.प.प्राथमिक शाळेकरिता  गट शिक्षणाधिकारी यांचे  यांचे खाते क्रमांक व IFSC कोड शालार्थ प्रणाली योग्य असल्याबाबत खात्री करावी.तसेच संदर्भ क्र.३ नुसार जि.प.माध्यमिक व उच्च माध्यमिक मध्ये कार्यरत शिक्षकांच्या वेतनातील अशासकीय कपाती सबंधित मुख्याद्यापक यांचे खाते नोंदविण्यात यावे.  त्यानंतच एप्रिल  २०२४    देयके शालार्थ प्रणाली मध्ये तयार करण्यात यावे. चुकीचे खाते क्रमांक मॅप झाल्यामुळे रक्कम इतरत्र गेल्यास सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक यांची राहील याची नोंद घ्यावी.

मा.शिक्षण संचालक म रा पुणे यांच्या निर्देशानुसार माहे एप्रिल 24 चे वेतन ई कुबेर  मार्फत करण्याचे निर्देश असल्याने सर्व खाते योग्य असल्याबाबत खात्री करण्यात यावी.

आर्थिक वर्ष २०२३-२४ या वर्षात माहे ऑक्टोबर ते फेब्रुवारी २०२४ पर्यंतचे प्रलंबित GPF Shedule दि.१२ एप्रिल  २०२४  ला प्रत्यक्ष सादर करण्यात यावे.

एकुण वार्षिक उत्पन्न च्या आधारे आयकर परिगनना करुण आयकर कपात झाल्याबाबत खात्री पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी यानी करावी. जादा आयकर आकारणी झाली असल्यास तसेच शालार्थ प्रणाली अंतर्गत थकबाकी अदा झाली असल्यास सबंधित शिक्षक यांचे कडुन सदर थकबाकी वरिल आयकर चा भरणा चलान द्वारे करण्यात यावा. सबंधित शिक्षकाने आयकर भरणा केल्याशिवाय माहे मार्च २०२४ चे शालार्थ प्रणाली मध्ये वेतन देयक जनरेट करण्यात येवु नये. कार्यालयाच्या अधिनस्त सर्व शिक्षकांच्या वार्षिक उत्पन्ननुसार आयकर कपात करण्यात आली असल्याबाबत प्रमाणपत्र शिक्षण विभाग जि.प. यवतमाळ येथे सादर करण्यात यावे.

Income Tax TDS कपात ही नियमाप्रमाणे कपात करण्यात यावी. (सन 2023-24 मध्ये कर्मचाऱ्यास पडलेला एकूण आयकर (TDS वजा जाता) / 10 याला 100 च्या पटीत ) अशा प्रकारे कपात करण्यात यावी. या कार्यालयाचे असे निदर्शनास आले आहे की बऱ्याच कर्मचाऱ्यांचे नियमानुसार TDS कपात न केल्याने फेब्रुवारी  मध्ये वेतनापेक्षा जास्त आयकर भरावा लागतो यापुढे असे होणार नाही याची दक्षता घ्यावी.

सर्व शिक्षकांची GPF  कपात ही  वित्तीय नियमानुसार एकुण वित्तलब्दी च्या किमान ६% असणे आवश्यक आहे. याबाबत कपात नियमानुसार असल्याबाबत खात्री पंचायत समितीचे  गट शिक्षणाधिकारी यानी करावी.
 
ज्या कर्मच्याऱ्यांना PRAN Number मिळालेले आहेत त्यांची माहे एप्रिल २०२४ चे वेतनामधून   नियमीत NPS कपात करण्यात यावी.

जे NPS कर्मचारी या महिन्यात सेवानिवृत्त होत असतील त्यांचे NPS वर्गणी व शासनहिस्सा कपात करण्यात येऊ नये.

ज्या शिक्षक  यांची GPF  कपात आहे ते सेवानिवृत्त होत असल्यास 3 महिने आधी  GPF कपात बंद करण्यात यावी

ज्या कर्मचाऱ्यांना वित्त विभाग जि.प.यवतमाळ कडून GPF क्रमांक मिळालेला नाही त्यांचे GPF कपात करण्यात येऊ नये.

मुख्याध्यापकांनी आपले शाळेवर कार्यरत प्रत्येक  शिक्षकांचे वेतनाचे खाते हे शालार्थ प्रणालीमधील bank statement यावरून पुन्हा एकदा तपासून घ्यावेत. एखाद शिक्षकांचे वेतन हे दुसऱ्याच एखाद शिक्षकांचे / मयत शिक्षकांचे / सेवानिवृत्त शिक्षकांचे किंवा इतर एखाद वेगळ्याच खातेवर तर वर्ग होत नाही ना! याबाबत स्वत: खात्री करावी.

देयक Forward केल्यानंतर एकाही  शिक्षकांनी वेतन अदा होईपर्यंत आपले शाखा बदल करू नये याबाबत अधिनस्त सर्व शिक्षकांना आपले स्तरावरून सुचित करण्यात यावे.वारंवार सुचना देऊनसुद्धा शिक्षक आपले शाखा बदल करत आहेत व त्यामुळे वेतन जमा होण्यास अडचणी होत आहेत.

शालार्थ प्रणालीमध्ये झालेल्या नवीन बदलानुसार यानंतर BASIC, 7PCDA, HRA, TA व NPS ALLOW या व्यतीरीक्त सर्व Tab या बंद करण्यात आलेल्या आहेत.

शिक्षकांच्या वेतनातील कपातीच्या रकमा ह्या सबंधित वित्तीय संस्था यांना तात्काळ वितरित करण्यात याव्यात. तसेच सबंधित संस्थेने दिलेल्या कपात विवरण नुसारच कपात होत असल्याबाबत खात्री सबंधित गटशिक्षणाधिकारी यांनी करावी.

Non Govt Deduction हे शालार्थ प्रणाली मध्ये कपात करावे. या महिन्यापासून Income Tax , Co-op Bank , Credit Society , Other Deduction , RD यामध्ये कपात करण्यात आलेली रक्कम एकत्रित करून गट शिक्षणाधिकारी / हायस्कूल मुख्याध्यापक यांचे खातेवर व  निव्वळ रक्कम शिक्षकांचे खातेवर जिल्हा स्तरावरून  वर्ग करण्यात येईल. Shalarth मधील Bank Account Number व IFSC Code बरोबर असल्याबाबत दक्षता घ्यावी. प्राथमिक शिक्षकांच्या बाबतीत अशासकीय कपाती गट शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयानुसार कपात करण्यात याव्यात. कपाती योग्य असल्याबाबत सबंधित गटशिक्षणाधिकारी यानी दक्षता घेण्यात यावी.

प्राथमिक शिक्षक यांचे DDO 2 (गटशिक्षणाधिकारी) यांचे लॉगीन ला आलेली ऑनलाईन देयकांचा Detail Abstract Report पंचायत समिती स्तरावर तयार असलेल्या मूळ देयकावरून ( Excel file ) तपासून तालुक्याचा लेखाशिर्षनिहाय संकलीत नमुना-२६  तयार करावा. देयकाच्या हार्ड कॉपी मध्ये , संकलीत नमुना-Detail Abstract Report ची प्रिंट , GPF Shedule याप्रमाणे तयार करून  पंचायत समिती स.ले.अ. यांची प्रतिस्वाक्षरीसह शिक्षण विभाग जि.प.लेखा विभागास १९ एप्रिल २०२४ ला सकाळी ११ ते दु. २ या वेळेत प्रत्यक्ष सादर करावे. ज्यांची हार्ड कॉपी सादर केली  जाणार नाही त्यांची देयके संकलित करण्यात येणार नाही.


जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक लेखाशिर्ष २२०२-०५५८,२२०२-०५३१,२२०२-०५४९ च्या शालार्थ देयकाच्या सर्व रिपोर्ट प्रिंट मुख्याद्यापक यांच्या स्वाक्षरी सह १९ एप्रिल २०२४ ला दु. २ ते ५ या वेळेत प्रत्यक्ष सादर करण्यात यावे. ज्यांची हार्ड कॉपी सादर केली  जाणार नाही त्यांची देयके संकलित करण्यात येणार नाही.


सर्व शाळांची DDO 2 (गटशिक्षणाधिकारी) यांचे लॉगीन ला आलेली ऑनलाईन देयके दिनांक १८ एप्रिल २०२४ ला सकाळी ११. ००  वाजेपर्यंत DDO 3 ( शिक्षणाधिकारी ) यांचे लॉगीन ला ऑनलाईन फॉरवर्ड करावी.

१८ एप्रिल २०२४ ला ज्यांची  देयके जिल्हा स्तरावर प्राप्त होतील व १९ एप्रिल 2024 ज्यांची हार्ड कॉपी प्राप्त होतील केवळ त्यांचीच देयके संकलीत करण्यात येतील. अनुदान कमी असल्याने प्रथम देयक सादर करणाऱ्या पंचायत समितीस प्राधान्य देण्यात येईल तसेच विलंबाने प्राप्त होणाऱ्या पं.समिती चे वेतनास विलंब झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत DDO- 1 व DDO- 2 यांची राहील.


                                                                                                   मा.शिक्षणाधिकारी (प्राथ.)
जिल्हा परिषद , यवतमाळ
 यांच्या सूचनेनुसार



Also Read - 

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, मध्यवती इमारत, डॉ. अॅनी बेझंट मार्ग, 
पुणे ४११ ००१

दूरध्वनी क्र.: ०२०-२६१२०१४१

ई-मेल: educommelfice@gmail.com

क्रमांक : शिआका/२०२४/मा.आ.पत्रव्यवहार/आस्था क माध्य/ 2220

दिनांक: २७.०३.२०२४
27 MAR 2024

प्रति,

१) मा. शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

२) मा. शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

विषय : रमजान ईद व डॉ. आंबेडकर जयंती निमित्त्य मार्च २०२४ चे नियमित पगार दि.५ एप्रिल २०२४ पर्यंत करणेबाबत निवेदन

संदर्भ: मा. श्री. श्रीकांत गोविंदराव देशपांडे, माजी विधान परिषद सदस्य यांचे दि.२०.०३.२०२४ चे निवेदन

महोदय,

उपरोक्त विषयी संदर्भाधीन निवेदन कृपया अवलोकन व्हावे (सोबत प्रत संलग्न)

सदर विषयांकीत प्रकरणी निवेदनामध्ये नमूद केल्यानुसार रमजान ईद व डॉ. आंबेडकर जयंती निमित्य नियमित पगार दि.५ एप्रिल २०२४ पर्यंत करण्याबाबत क्षेत्रिय स्तरावर निर्देश देण्याबाबत तसेच ज्या जिल्हयाचे पगार वेळवर होणार नाहीत तेथील अधिक्षक, वेतन पथक यांचेवर कार्यवाही करण्याचे आदेश सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना होणेबाबतच्या मागणीच्या अनुषंगाने यथानियम कार्यवाही करावी व संबंधितांना कळविण्यात यावे ही विनंती.

(रजनी रावडे) प्रशासन अधिकारी (आस्थापना) शिक्षण आयुक्तालय, पुणे

प्रत: मा. श्री. श्रीकांत गोविंदराव देशपांडे, माजी विधान परिषद सदस्य, व्दारा तंत्र शिक्षण विद्यालय, वॉलकट कंपाऊंड, अमरावती


महाराष्ट्र शासन 
शिक्षण आयुक्तालय, म
हाराष्ट्र राज्य, मध्यवती इमारत, 
डॉ. अॅनी बेझंट मार्ग, 
पुणे ४११ ००१

दूरध्वनी क्र.: ०२०-२६१२०१४१
ई-मेल: educommoffice@gmail.com

क्रमांक: शिआका/२०२४/संघटना निवेदने/आस्था क माध्य/ 2020

दिनांक : १९.०३.२०२४
19 MAR 2024

प्रति,
१) मा. शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

२) मा. शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

विषय : रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त्य माहे मार्च २०२४ चा वेतन सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करणेबाबत

संदर्भ : श्री. साजिद निसार अहमद, संस्थापक, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ, मालेगाव यांचे क्र. अभाऊशिस/रा का/२०२४/१३१०/ ईद पूर्वी वेतन, दि.१८.०३.२०२४ चे निवेदन

महोदय,

उपरोक्त विषयी संदर्भाधीन निवेदन कृपया अवलोकन व्हावे (सोबत प्रत संलग्न)

सदर विषयांकीत प्रकरणी निवेदनामध्ये नमूद केलेल्या मागणीच्या अनुषंगाने तसेच आगामी रमजान ईद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त्य माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी व संबंधितांना कळविण्यात यावे ही विनंती.

(रजनी रावडे)

प्रशासन अधिकारी (आस्थापना) 
शिक्षण आयुक्तालय, पुणे


प्रत: श्री. साजिद निसार अहमद, संस्थापक, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ, मुस्लिमपुरा, मालेगाव, जि. नाशिक




वेतन देयक सूचना माहे फेब्रुवारी 2024 चे वेतन देयक सादर करण्याबाबतची सूचना

१. मा. शिक्षण आयुक्त पुणे, यांच्या वेळोवेळी प्राप्त झालेल्या आदेशानुसार मुख्याध्यापक / प्राचार्य यांना खालील सूचनांचे पालन करुन दिनांक पर्यंत वेतन देयके .......... अधिक माहिती जाणून घेण्यासाठी


CLICK HERE 👇




Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon