Tukdoji Maharaj Manikdev Banduji Ingale, or Tukdoji Maharaj was a spiritual saint from Maharashtra India
तुकडोजी महाराज माणिकदेव बंडूजी इंगळे, किंवा तुकडोजी महाराज हे महाराष्ट्रातील आध्यात्मिक संत होते.
तुकडोजी महाराज माणिकदेव बंडूजी इंगळे, किंवा तुकडोजी महाराज हे महाराष्ट्रातील आध्यात्मिक संत होते.
आपल्या विचारांतून, भजन-किर्तनातून राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव व
बंधुत्वाचा संदेश देणारे मानवतेचे थोर उपासक,अंधश्रद्धा व जातीभेद
यांसारख्या समाजविघातक प्रथांवर आसूड ओढणारे समाज सुधारक,ग्रामोद्धारातून
प्रगतीचा मार्ग दाखवणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना विनम्र अभिवादन.
जन्म - ३० एप्रिल १९०९ (यावली,अमरावती)
स्मृती - १० नोव्हेंबर १९६८
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म यावली जि.अमरावती येथे झाला. माणिक बंडोजी ठाकूर हे त्यांचे नाव. अंगभूत गुणांमुळे आणि विवेकनिष्ठ जीवनदृष्टीमुळे ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’ या नावाने ओळखले जाणारे गेल्या शतकातले ते महान प्रबोधनकार होते. त्यांच्या ठाकूर घराण्याचे कुलदैवत पंढरपूरचा विठोबा असल्याने लहानपणापासूनच त्यांना ध्यान, भजन, पुजन या गोष्टींची आवड निर्माण झाली. मराठी तिसरी पर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी शाळा सोडली. वरखेडला (जि.अमरावती) आजोळी असताना आडकूजी महाराजांना त्यांनी गुरू केले. पुढे किर्तन, भजनासाठी ते स्वतःच कविता रचू लागले. एके दिवशी गुरूमहाराजांनी माणिकला ‘तुकड्या’ म्हणून हाक मारली व म्हटले, की ‘तुका म्हणे’ असे किती दिवस म्हणशील? ‘तुकड्या म्हणे’ असे म्हणत जा. ‘तुकड्या म्हणे’ या वाक्याने संपणारे असंख्य अभंग त्यांनी लिहिले. यामुळे ते तुकडोजी महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले. ईश्वरभक्ती, सद्गुणांचा उपदेश, सामाजिक जागृती इ. विषय त्यांनी आपल्या कीर्तनांतून हाताळले, म्हणूनच त्यांना जनतेने ‘राष्ट्रसंत’ अशी उपाधी देऊन गौरविले. ते गांधी आणि विनोबांचे शिष्य होते. त्यांनी खंजिरी घेऊन भजन करत देशभर हिंडून आध्यात्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रबोधन केलं. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. स्त्रीचं स्थान हे कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था आणि राष्ट्रव्यवस्थे मध्ये महत्त्वाचं आहे, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिलं. स्त्रीला अज्ञानात आणि बंधनात ठेवणं कसं अन्यायकारक आहे हे त्यांनी प्रभावीपणे पटवून दिलं. ईश्वरभक्ती करतानाच दुबळ्यांचीही सेवा करा, असं ते नेहमी सांगत. ‘ग्रामगीता’ हा त्यांचा ग्रामविकासावरचा ग्रंथ प्रसिद्ध आहे.
संदर्भ : इंटरनेट
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जिवनावर आधारित प्रश्नमंजुषा
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon