DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Right to Information Act Quiz माहिती अधिकार प्रश्नमंजुषा

Right to Information Act Quiz



महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे

जा.क्र/प्राशिसं/८०२/संकीर्ण/२०२६-२७/२२०

दिनांक २४/०९/२०२६

प्रति,

१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग,

२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व.

       विषय :- दिनांक २८ सप्टेंबर, २०२६ रोजी "माहिती अधिकार दिन साजरा करण्याबाबत.

संदर्भ :- १. सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय दि. २०.०९.२००८.

२. सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र दि. २१.०९.२०२६.

३. कक्ष अधिकारी, एसडी-४, यांचे पत्र क्र. संकीर्ण-२०२६/प्र.क्र.२२०/ई-१८६२४८१/एस.डी.४, दि. २४.०९.२०२६.

उपरोक्त विषय व संदर्भीय पत्रान्वये माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ बाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून दिनांक २८ सप्टेंबर २०२६ रोजी "माहिती अधिकार दिन" साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

त्या अनुषंगाने आपल्या अधिनस्त सर्व शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये दिनांक २८ सप्टेंबर, २०२६ रोजी "माहिती अधिकार दिन" प्रभावीपणे साजरा करण्यात यावा.

सदर दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये माहितीचा अधिकार अधिनियमाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रश्नमंजुषा, निबंध, वक्तृत्व, चित्रकला इत्यादी स्पर्धांचे आयोजन, तसेच चर्चासत्रे, व्याख्याने व इतर जनजागृतीपर उपक्रम आयोजित करण्यात यावेत. तसेच, सदर उपक्रमांच्या आयोजनासाठी आवश्यकतेनुसार संबंधित शासकीय कार्यालये व स्थानिक सामाजिक संस्थांचे सहकार्य घेण्यात यावे. आपल्या स्तरावरून अधिनस्त सर्व संबंधितांना आवश्यक त्या सूचना देऊन उपक्रमांचे नियोजन व प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी.

दिनांक २८ सप्टेंबर, २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमांचा संक्षिप्त अहवाल, उपक्रमांची छायाचित्रे व सहभागींची माहिती आपल्या स्तरावर संकलित करून या कार्यालयास सादर करण्यात यावी. सदर प्रकरणी तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.

(शरद गोसावी) शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१

प्रत माहितीस्तव सादर.

१. मा. आयुक्त, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे-०१

२. संजय जगताप, कक्ष अधिकारी, एसडी-४, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२



माहिती अधिकार प्रश्नमंजुषा

माहिती अधिकार प्रश्नमंजुषा सोडवा

           महाराष्ट्र शासनाने राज्य माहिती अधिकार दिन हा २८ सप्टेंबर रोजी घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस पाळला केला जातो.

            हा कायदा १५ जून, २००५ रोजी तयार झाल्यापासून १२० व्या दिवशी, म्हणजे १२ ऑक्टोबर २००५ रोजी अंमलात आला. मात्र या कायद्यातील काही तरतुदी ताबडतोब अंमलात आणण्यात आल्या. उदा. सार्वजनिक प्राधिकरणांच्या (सरकारी कार्यालये) जबाबदाऱ्या [कलम . ४(१)], जनमाहिती अधिकारी व सहाय्यक जनमाहिती अधिकारी यांची पदे [कलम ५(१) व कलम ५(२)], केंद्रिय माहिती आयोगाची स्थापना (कलम . १२ व १३), राज्य माहिती आयोगाची स्थापना (कलम १५ व १६), कायद्यातून गुप्तचर आणि सुरक्षा संस्थांना वगळणे (कलम. २४) आणि कायद्यातील तरतुदी अंमलात आणण्यासाठी नियम बनविण्याचा अधिकार (कलम. २७ व २८).
माहितीचा अर्थ
     माहितीचा अर्थ हा कोणत्याही स्वरूपातील कोणतेही साहित्य असा असून त्यामध्ये, अभिलेख, दस्तऐवज, ज्ञापने, ई-मेल, अभिप्राय, सूचना, प्रसिद्धीपत्रके, परिपत्रके, आदेश, रोजवह्या, संविधा, अहवाल, कागदपत्रे, नमुने, प्रतिमाने (मॉडेल), कोणत्याही इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील आधारसामग्री, फायलींवरचे अधिकाऱ्यांचे अथवा मंत्र्यांचे अभिप्राय हे सर्व होय. ही माहिती त्याकाळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यान्वये सार्वजनिक प्राधिकरणाकडून मिळविता येईल.

कायद्याचा इतिहास

हा कायदा सर्वप्रथम स्वीडनमधे इ.स. १७६६मध्ये लागू झाला. भारत हा अशा प्रकारचा कायदा करणारा जगातला ५४वा देश आहे.

माहिती अधिकारावर प्रकाश टाकणारी प्रश्न मंजुषा नक्की सोडवा आणि आपल्या ज्ञानात भर घाला सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या व सर्व इयत्तांच्या विद्यार्थ्या करीता उपयुक्त प्रश्न मंजुषा 
प्रश्न मंजुषा सोडविण्या साठी खालील     CLICK HERE  ला स्पर्श / टिचकी मारा 

   CLICK HERE  
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon