DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Revolutionary Shaheed Bhagat Singh

Revolutionary, Shaheed Bhagat Singh
क्रांतिकारक, शहीद कॉम्रेड भगतसिंग 

शहीद भगत सिंह : प्रश्नमंजुषा Bhagat Singh Quiz
Shaheed Bhagat Singh Indian revolutionary freedom fighter

 प्रश्न मंजुषा  शेवटी दिली आहे सोडवा 

आयुष्य बदलून टाकणारा मार्गदर्शक, कायम ऊर्जा देणारा क्रांतिकारी, महान देशभक्त, महानायक, महान क्रांतिकारक, शहीद कॉम्रेड भगतसिंग यांची आज जयंती.
भगतसिंग यांचे संपुर्ण आयुष्य आगामी कित्येक पिढ्यांसाठी दिपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन !
    वयाच्या अवघ्या तेवीसाव्या वर्षी राष्ट्रासाठी हसत हसत मृत्युला सामोरा जाणा-या शहीद-ए-आलम भगतसिंग यांना जयंती दिनी कोटी कोटी सलाम 
भगतसिंग-
जन्म: सप्टेंबर २७, १९०७ -ल्यालपूर, पंजाब, ब्रिटिश भारत
हौतात्म्य: मार्च २३, १९३१ -लाहोर, पंजाब, ब्रिटिश भारत
    भगतसिंग लाहोरच्या तुरुंगात हसत हसत फासावर गेले. फाशी जाताना त्यांचे वय अवघे २३ वर्षांचे होते. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेकांनी हौतात्म्य पत्करले. अनेक वीर शहीद झाले. त्या सर्वांनाच इतिहासात एक मानाचे स्थान आहे. पण त्या सशस्त्र क्रांतिकारकांतही भगतसिंग यांचे स्थान अद्वितीय आहे. म्हणूनच त्यांना ’शहीद-ए-आलम’ असा किताब दिला जातो.

Lal Bal Pal Lala Lajpat Rai, Bal Gangadhar Tilak, and Bipin Chandra Pal 


    एक लेखक, एक पत्रकार, एक काव्यरसिक, एक प्रतिभावंत, एक समाजवेत्ता, एक क्रांतिकारक, एक परखड तत्त्वज्ञानी, एक सहिष्णू विचारवंत, एक द्रष्टा, एक निग्रही देशभक्त अशी अनेक रुपे या महायोग्याचे जीवनचरित्र वाचताना दिसून येतात. अत्यंत ज्वालाग्राही पण अत्यंत शांत. अत्यंत निग्रही पण तितकेच हळवे. अत्यंत तडफदार पण उतावळे नाहीत. अत्यंत कणखर पण तरीही विनम्र. स्वातंत्र्य देवतेला सर्वस्वाचा नैवेद्य दाखवूनही निरीश्वरवादी राहिलेले. पुनर्जन्मावर विश्वास नसलेले पण तरीही पुन्हा याच देशात जन्माला येण्यास उत्सुक असलेले.जगात सर्वांत घोर पाप असेल तर ते म्हणजे गुलामी व दारिद्र्य असे ठामपणे सांगत देवाला साकडे घालण्यापेक्षा स्वतः:ला सक्षम करण्याचा व त्यागावाचून आणि साहसावाचून उद्धार नसल्याचा संदेश देणारे. आपल्याच आदरस्थानी मानलेल्या नेत्यांनी निर्भत्सना केल्यावरही विचलित वा क्षुब्ध न होता वा त्यांना कसलेही दूषण न देता आपले कार्य तितक्याच निष्ठेने सुरू ठेवणारे हे एक अलौकिक व्यक्तिमत्त्व.
    जिवंतपनी इंग्रजांना भिती घालणारे आनेक जन होते, पण ज्यांच्या मृत्यू नंतर सुध्दा इंग्रजांना धडकी भरवणारे व क्रांतीचा सैलाब आणणारे मृतदेह हे फक्त शहीद-ए-आजम  भगतसिंग,  राजगुरू,  सुखदेव यांचेच होते
    भगतसिंग हे आजच्या पिढीतील तरुणांसाठी एक सर्वात मोठा आदर्श व प्रेरणास्थान आहे..ज्या वयामध्ये तारूण्याची स्वप्न पाहिली जातात त्याच वयात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे स्वप्न भगतसिंग यांनी पाहिलं आणि याच वयातील युवा पिढीला इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी प्रोत्साहित केले. त्या काळातील देशातील महान क्रांतिकारकांमध्ये भगतसिंग हे सर्वात लहान वयाचे क्रांतिकारक होते. लहान वयातच त्यांना देशप्रेम जाणवले आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध आवाज उठवला 
    हुतात्मा भगतसिंग यांच्या चरित्राचा अभ्यास केला असता आपल्याला समजते की त्यांनी ऐन तारूण्यात केलेले बलिदान हे भावनेच्या आहारी जाऊन वा कसल्यातरी प्राप्तीसाठी केले नसून ते अत्यंत सुनियोजित, एखादया ध्येयाने प्रेरित असे होते.आपण राहणार नाही, पण आपण लावलेल्या क्रांतिवृक्षाच्या सर्व फांद्या भले शत्रूने छाटून टाकल्या तरी पाळेमुळे घट्ट रुजून राहतील हा त्यांचा दृढ विश्वास होता. 
    दिल्ली असेंब्लीत बॉम्ब टाकण्यासाठी जाताना भगतसिंगना माहीत होते की, आपण आता परत येणार नाही. तेव्हा त्यांनी आपले नवे बूट भेट म्हणून आपले सहकारी जयदेव कपूर यांना दिले होते आणि त्याची जुनी पादत्राणे स्वत: घातली होती.
    भगतसिंग यांनी ऐन तारुण्यात स्वतःच्या जीवाची भीती न बाळगता वयाच्या 23 व्या वर्षी आनंदाने स्वातंत्र्यासाठी हसत हसत फाशीची शिक्षा स्वीकारली . 
फाशीच्या जवळपास दोन 2 तास अगोदर वकिलाला भगतसिंग यांना भेटण्याची परवानगी मिळाली, वकिलांनी भगतसिंगांना विचारले “तुला कशा ची इच्छा आहे का ??” आणि भगतसिंग म्हणाले “मी या देशात पुन्हा जन्म घेऊ इच्छितो
    जगातला सर्वात तरुण देश म्हणून ,युवकांचा देश म्हणून आज आपल्या देशाकडे पाहिलं जातं भगत सिंह आणि त्यांच्या स्वप्नातील जो भारत बघितला होता तो आजही आपण बनवू शकलो नाही ही आपली शोकांतिका आहे.भगतसिंग यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी भारतातील प्रत्येक युवकाने परिश्रम केले पाहिजे ।
कल भी छल था आज भी छल है
छल में हर मनुष्य निर्बल है
उस छल का बल कम करना है
हर एक युवा में भगतसिंग जिंदा होना है......
 विनम्र अभिवादन !

आयुष्य हे स्वतःच्या हिमतीवर , कर्तृत्वावर जगलं जात
दुसऱ्याच्या खांद्यावर फक्त प्रेत यात्रा उठतात"  - शहीद भगतसिंग 

वयाच्या 23 वर्षी स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर 
जाणा-या शहिद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 
शहीद भगतसिंग यांच्या विचारांचा जागर व्हावा हीच एकमेव इच्छा !

शहीद भगतसिंग यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारी प्रश्न मंजुषा नक्की सोडवा आणि आपल्या ज्ञानात भर घाला सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या व सर्व इयत्तांच्या विद्यार्थ्या करीता उपयुक्त प्रश्न मंजुषा 
प्रश्न मंजुषा सोडविण्या साठी खालील     CLICK HERE  ला स्पर्श / टिचकी मारा 


   CLICK HERE  
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon