Right to Information Act
उत्सव आजादी का
ज्ञानयात्री तंत्रस्नेहीचा उपक्रम
संपूर्ण वर्षभर दि.१५ ऑगस्ट २०२१ ते १५ ऑगस्ट २०२२
माहिती अधिकार प्रश्नमंजुषा सोडवा
महाराष्ट्र शासनाने राज्य माहिती अधिकार दिन हा २८ सप्टेंबर रोजी घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस पाळला केला जातो.
हा कायदा १५ जून, २००५ रोजी तयार झाल्यापासून १२० व्या दिवशी, म्हणजे १२ ऑक्टोबर २००५ रोजी अंमलात आला. मात्र या कायद्यातील काही तरतुदी ताबडतोब अंमलात आणण्यात आल्या. उदा. सार्वजनिक प्राधिकरणांच्या (सरकारी कार्यालये) जबाबदाऱ्या [कलम . ४(१)], जनमाहिती अधिकारी व सहाय्यक जनमाहिती अधिकारी यांची पदे [कलम ५(१) व कलम ५(२)], केंद्रिय माहिती आयोगाची स्थापना (कलम . १२ व १३), राज्य माहिती आयोगाची स्थापना (कलम १५ व १६), कायद्यातून गुप्तचर आणि सुरक्षा संस्थांना वगळणे (कलम. २४) आणि कायद्यातील तरतुदी अंमलात आणण्यासाठी नियम बनविण्याचा अधिकार (कलम. २७ व २८).
माहितीचा अर्थ
माहितीचा अर्थ हा कोणत्याही स्वरूपातील कोणतेही साहित्य असा असून त्यामध्ये, अभिलेख, दस्तऐवज, ज्ञापने, ई-मेल, अभिप्राय, सूचना, प्रसिद्धीपत्रके, परिपत्रके, आदेश, रोजवह्या, संविधा, अहवाल, कागदपत्रे, नमुने, प्रतिमाने (मॉडेल), कोणत्याही इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील आधारसामग्री, फायलींवरचे अधिकाऱ्यांचे अथवा मंत्र्यांचे अभिप्राय हे सर्व होय. ही माहिती त्याकाळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यान्वये सार्वजनिक प्राधिकरणाकडून मिळविता येईल.
कायद्याचा इतिहास
हा कायदा सर्वप्रथम स्वीडनमधे इ.स. १७६६मध्ये लागू झाला. भारत हा अशा प्रकारचा कायदा करणारा जगातला ५४वा देश आहे.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon