DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Income Tax

₹ INCOME TAX 202 - 23  

सन 2023 - 24 या आर्थिक वर्षांच्या उत्पन्नावर देय असणान्या आयकर वसूल करण्याच्या सदर्भात खालील प्रमाणे सुचना देण्यात येत आहेत.

उत्पन्नाचा तपशील यामध्ये खालील बाबींचा समावेश असेल,

०१) यामध्ये माहे मार्च 2023 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत मिळणारी एकूण वित्तलब्धी

०२) माहे एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीत मिळालेले / मिळणारे साप्ताहीक सुट्टी, वैद्यकीय प्रतीपूर्ती, रजेचे रोखीकरणाद्वारे मिळालेले उत्पन्न

०३) ठराविक मुदतीसाठी गुंतविलेल्या रकमेवर मिळालेले व्याज, इतर मार्गाने मिळालेले सर्व उत्पन्न F.Y. 2023 2024

केंद्रिय अर्थसंकल्प २०२३ मधील पगारदार व्यक्तीसाठी आयकर कायद्यातील नियम व तरतुदी

आकारणी वर्ष २०२४-२५ (३१.०३.२०२४)

मा. अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आपल्या २०२३ मधील अर्थसंकल्पात जुन्या स्किममध्ये आयकराच्या करमाफ उत्पन्न मर्यादित व आयकर दरात काहीही बदल केला नसून आर्थिक वर्ष २०२३ - २४ करीता करदात्यासाठी आयकराची मर्यादा व दर खालील प्रमाणे आहेत. तसेच नवीन स्किममध्ये यावर्षी आयकरामध्ये बऱ्यापैकी सूट दिली आहे.

आयकर दर :-

Specifications

Old Tax Scheme

Income Tax Rate

Investment Benefit

Total Income (Rs)

Up to 2,50,000

Nil

From 2,50,001 to Rs 5,00,000

5%

From 5,00,001 to Rs 7,50,000

20%

From 7,50,001 to Rs 10,00,000

20%

From 10,00,001 to Rs 12,50,000

30%

From 12,50,001 to Rs 15,00,000

30%

Above 15,00,000

30%

80C, 80D, 80DD, 80U, 80E, BOG, 80CCD1B, HRA Benefit फायदा मिळेल

 


आधार कार्ड आणि प्यान कार्ड लिंक आहे का नाही तपासा 

Specifications

New Tax Scheme

Income Tax Rate

Investment Benefit

Total Income (Rs)

Up to 3,00,000

Nil

From 3,00,001 to Rs 6,00,000

5%

From 6,00,001 to Rs 9,00,000

10%

From 9,00,001 to Rs 12,00,000

15%

From 12,00,001 to Rs 15,00,000

20%

Above 15,00,000

30%

फक्त 80CCD2 (NPS) गुतवणूकीचा फायदा मिळेल, इतर गुतवणूकीवर मिळणार नाही. 

Standard Deduction (प्रमाणित वजावट) नोकरदार व्यक्तींना Old New या दोन्ही Tax Scheme मध्ये रु. 50.000/- प्रमाणित वजावट मिळेल.प्रमाणित वजावट : कलम १६ : प्रमाणित वजावट ५०,०००/- किंवा मिळालेला पगार यापैकी कमी असलेली रक्कम स्टॅण्डर्ड डिडक्शन म्हणून दोन्ही स्किममध्ये बजावटीस पात्र आहे.

सन 2023-24 साठी नमूद खालील आयकर वजावटीचा फायदा फक्त Old Tax Scheme साठी ग्राह्य धरण्यात येईल, या गुंतवणूकीचा फायदा New Tax Scheme साठी मिळणार नाही.

सन 2023-24 साठी स्वास्थ्य व शैक्षणिक सेस देय आयकरावर 4% आहे.

कलम 87A

1) Old Scheme प्रमाणे करदात्याचे एकूण करपात्र उत्पन्न 5.00,000 पर्यंत करमुक्त होईल ज्या व्यक्तीचे करपात्र उत्पन्न (Taxable Income) 5,00,000 पेक्षा जास्त असेल त्यांना रु. 2.50,000 पासून आयकर आकारण्यात येईल.

2) New Scheme प्रमाणे करदात्याचे एकूण करपात्र उत्पन्न 200.000 पर्यंत करमुक्त होईल ज्या व्यक्तीचे करपात्र उत्पन्न (Taxable Income) 200,000 पेक्षा जास्त असेल त्यांना रु. 300.000 पासून आयकर आकारण्यात येईल. त्याचप्रमाणे रु. 2.27.778 पर्यंत Marginal Relief चा फायदा मिळेल,

आयकर कलमानुसार मिळणाऱ्या वजावटी खालील प्रमाणे.

०१) गृह कर्ज :- (Housing Loan कलम 24 B) गृहकर्जावरील व्याजाची कमाल रक्कम मर्यादा 2.00.000/-रु. आहे.

घरबांधणी/खरेदीसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज : कलम २४ (१) (vi) : बँका / को-ऑप. बँका यांचेकडून घेतलेल्या दोन घरासाठीच्या गृहकर्जावरील व्याजाला २ लाखांची वजावट मिळेल. तसेच घरदुरुस्तीसाठी किंवा टॉपअप कर्ज घरासाठी घेतले असल्यास ३०,०००/- ची वजावट मिळेल.

०२) आयकर कलम 80 सी (a) G.P.E.. b) LI.C. c) PRE. d) PLL ) सुकन्या समृद्धी योजना, 1 G.L.S. g) म्युच्यूल फंड, b) Housing Loan Principal (गृहकर्ज मुद्दल) 1) ट्युशन फी. 1) Fixed Deposit बैंक किंवा पोस्ट ऑफीसमधील मुदत बंद ठेव (मुदत 5 वर्षावरील) योजनेतील रक्कम जास्तीत जास्त 1.50,000/- रू. ग्राह्य धरण्यात येईल. वरील सर्वांमधील एकत्रित गुंतवणूक

गुंतवणूकीवरील वजावट (कलम ८० सी) प्रॉ. फंड, कर बचत म्युच्युअल फंड, विमा हप्ता, पी.पी.एफ., एन.एस.सी., पायाभूत उद्योगाचे बाँड, नाबार्ड बाँड, शैक्षणिक फिज्, पेन्शन फंडात केलेली गुंतवणूक, सुकन्या समृद्धी योजना, घरासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड, शेड्यूल्ड / नॅशनल बँकेत ५ वर्षांकरिता केलेली मुदत ठेव. इ. मध्ये गुंतवणूक / खर्च केल्यास त्याची उत्पन्नातून वजावट मिळते. ही मर्यादा र १.५ लाख आहे. गोंधळ कमी करण्यासाठी विशिष्ट योजनेत विशिष्ट गुंतवणूक करता येईल अशी मर्यादा काढून टाकली असून एका किंवा त्यापेक्षा जास्त योजनांमध्ये र १.५ लाखांपर्यंत गुंतवणूक/खर्च करुन वजावट मिळवता येईल.

०५अ) (कलम ८० सीसीडी) : कलम ८० सीसीडी (२) मध्ये राष्ट्रीय निवृत्ती वेतन खात्यातील केंद्र अथवा राज्य सरकारने भरलेल्या १४% अंशदान उत्पन्नाचे निर्धारण करताना संपूर्णपणे वजावटीस पात्र आहे. तसेच कर्मचाऱ्याचे स्वतःचे १०% अंशदान हे कलम ८० सी अंतर्गत वजावटीस पात्र आहे.

नॅशनल पेन्शन स्कीम कलम ८० सीसीडी (आयबी) : या कलमाखाली कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून त्या खात्यामध्ये भरलेल्या ५०,०००/- पर्यंतच्या रकमेला सुट मिळेल.

०३) आयकर कलम 80 सीसीडी 1 बी नमूद आयकर कलमानुसार करदात्यास राष्ट्रीय पेन्शन योजनेअंर्तगत NPS (National Pension Scheme) रूपये 50,000/- इतकी अतिरिक्त सूट मिळेल.

०४) आयकर कलम 80 डी - वैद्यकीय विम्याच्या (Mediclaim Insurance Premium) हप्त्याची रक्कम कमाल मर्यादा रुपये 25,000/- इतकी आहे. (Rs.5.000/- for Preventive Health Check Up).

वैद्यकीय विमा योजना (कलम ८०डी) या योजनेअंतर्गत वैद्यकीय खर्चाची भरपाई मिळण्यासाठी असणारी 'मेडिक्लेम पॉलिसी' आणि वैद्यकीय तपासणीसाठी केलेला खर्च ( ,०००/-) स्वतः, स्वतःच्या पती / पत्नी / मुले/ आई / वडिलांसाठी केलेली असेल तर २५,०००/- ची सुट मिळेल. तसेच या योजनेअंतर्गत जर करपात्र व्यक्तींचे आई वडील हे ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांच्या वैद्यकीय विमा व वैद्यकीय खर्चावर र ५०,०००/- ची वजावट मिळेल. वरील दोन्ही प्रकारातील खर्च/ हप्ते हे बँकेतून झालेले पाहिजेत.

60 वर्षावरील आई-वडीलांचा वैद्यकीय विमा घेतल्यास रु. 50000/- अतिरिक्त ची सूट मिळेल. दोन्ही मिळून 25000 + 50,000 = 75.000 ची सूट मिळेल.

०५) आयकर कलम 80 डी डी :- करदात्यावर अवलंबून असलेल्या अंध / मुकबधीर व्यक्तींवर केलेला वैद्यकीय खर्च, अपंगांसाठी विमा कंपनीच्या जीवन योजनेत गुंतविलेली रक्कम, तसेच LL.C. UTI IRDA ची मान्यता प्राप्त असणान्या विमा कंपनी मधील गुंतवणूक ग्राह्य धरण्यात येईल.

उदा. अपंगत्व 40% वरील खर्चासाठी रु.25,000/- आणि 80% वरील खर्चासाठी रु.1.25,000/- बजावट आहे.

०६) आयकर कलम 80. यू. करदाता स्वतः अपंग असेल तर त्यासाठी येणारा वैद्यकीय खर्च उदा. अपंगत्व 40% वरील खर्चासाठी रु.75.000/- आणि 80% वरील खर्चासाठी रु.1.25000/- वजावट आहे

०७) आयकर कलम 80 डी डी बी : नमूद आयकर कलम अंतर्गत एड्स, कॅन्सर, रिनल फेल्युअर इ. आजारांवर वैद्यकीय उपचार घेतले असल्यास आयकर सूट मिळेल, करदाता व त्यावर अवलंबून असलेली व्यक्ती 60 वर्षांखालील असल्यास रु40,000/- तसेच 60 वर्षावरील अवलंबून असलेल्या आई-वडीलांवर उपचार केले असल्यास रु. 100,000/- इतकी सूट मिळेल.

०८) आयकर कलम 80 करदात्याच्या स्वतःच्या उच्च शिक्षणावरील कर्जाचे व्याज तसेच अवलंबून असणान्या मुला / मुलींच्या उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज सूट असून त्यास कोणतीही मर्यादा नाही.

सदर कर्जावरील व्याजाची सूट कर्ज घेतल्यापासून जास्तीत जास्त वर्षांसाठी घेता येईल,

०९) आयकर कलम 80 इ. इ. बी. - इलेक्ट्रीक वाहनाच्या कर्जावरील व्याजासाठी रु. 150.000/- पर्यंत सूट मिळेल.

१०) आयकर कलम 80 जी नमुद आयकर कलमानुसार देणगी दिली असल्यास सदर देणगी, तसेच पावतीवर आयकर कायदा कलम 80 जी अन्वये सूट आहे असे नमुद असल्यास आयकरामध्ये सूट मिळेल. (स. 2.000/- वरील रक्कम ही धनादेशाद्वारे (चेक). D.D. R.T.G.S आवश्यक. अन्यथा सूट मिळणार नाही.)

(100% Donation P.M. Relief Fund, National Fund, Swatchh Bharat Kosh. Clean Ganga Fund ) ( 50% Donation - Any Charitable/ Religious Institutions, PM Drought Relief Fund )

११) घरभाडे भत्ता देय आयकर असणाऱ्या करदात्यांना खालीलप्रमाणे उत्पन्नात वजावट मिळेल. a) प्रत्यक्षात मिळालेले घरभाडे भत्ता b) प्रत्यक्षात अदा केलेली घरभाडे भत्ता बजा वेतनाच्या 10% रक्कम (वेतन य महागाई भत्ता मिळून) c) मिळालेल्या वेतनाची 40% किंवा 50% रक्कम (वेतन व महागाई भत्ता मिळून) यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम आयकरामध्ये बजावट होईल.घरभाडे भत्ता : कलम १० ( १३ ए ) : स्वतःच्या मालकीचे राहते घर नसलेल्या व एकूण वार्षिक पगाराच्या १०% पेक्षा जास्त घरभाडे देणाऱ्या कर्मचाऱ्याचा घरभाडे भत्ता जास्तीतजास्त मिळणाऱ्या घरभाडे भत्त्याइतका कमी होऊ शकतो. त्यासाठी भाडे पावती लागेल. तसेच घरमालकाचे पॅन क्रमांक ही द्यावा लागेल.[Section 10 (13A) & Rule 2A House Rent Allowance (HRA)]

घरभाडे करारपत्र 100/- रु. स्टॅम्पवरती आवश्यक आहे.

१२) व्यवसाय कर : कलम १६ (ii) प्रत्यक्ष भरलेल्या व्यवसाय कराची संपूर्ण वजावट या कलमाखाली मिळेल.

०८) उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजावर सुट (कलम ८० ई) स्वतःच्या पती/पत्नी/मुलांच्या उच्च शिक्षणाकरिता घेतलेल्या कर्जावरील भरलेल्या पूर्ण व्याजाची सुट या कलमान्वये मिळेल.

०९) अवलंबून असणाऱ्या अपंग व्यक्तीसाठी केलेला वैद्यकीय खर्च व गुंतवणूक : (कलम ८० डीडी) : या अशा अवलंबून असणाऱ्या व्यक्तीसाठी केलेल्या खर्चाची किंवा गुंतवणूकीची वजावटीची मर्यादा र ७५,०००/- पर्यंत वाढविणेत आली आहे. अपंगत्व हे जर गंभीर स्वरुपाचे (८०% किंवा जास्ती) असेल तर र १,२५,०००/- एवढी सुट मिळेल.

१०) अपंगत्व : (कलम ८० यु) करदाता स्वतः ४०% पेक्षा जास्त अपंग असेल तर या कलमान्वये सुट ७५,०००/- एवढी आहे.

वरील कलमांतर्गत अपंगत्व हे जर गंभीर स्वरुपाचे (८०% किंवा जास्ती) असेल तर ७५,०००/- चे ऐवजी र १,२५,०००/- एवढी सुट मिळेल.

११) दीर्घ औषधोपचार लागणाऱ्या रोगाच्या उपचारासाठी वजावट (कलम ८० डी.डी.बी.) : काही ठराविक रोगाच्या (मेंदूचे आजार, कैंसर, एडस्, हिमोफिलीया इ.) उपचारासाठी / पुनर्वसनासाठी करदात्याच्या उत्पन्नातून झालेला प्रत्यक्ष खर्च किंवा ४०,०००/- यापैकी जी रकम कमी असेल ती वजावटीस पात्र राहिल व ही सवलत मिळणेसाठी सरकारी दवाखान्यात काम करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांचे सर्टिफिकेट व खर्चाचे पुरावे दरवर्षी द्यावे लागतील. विम्यापोटी किंवा मालकाकडून औषधोपचाराच्या खर्चापोटी काही रकम भरपाई म्हणून मिळाली असेल तर तेवढ्याने ह्या कलमाखालील वजावट कमी होईल. आजारी व्यक्ती ६० वर्षावरील असेल तर र १,००,०००/- वजावट मिळेल.

१२) देणगीवरील सुट : (कलम ८० जी) मान्यताप्राप्त सार्वजनिक / सामाजिक संस्था अथवा संघटना यांना दिलेल्या देणगीच्या ५०% रक्कम वजावटीस पात्र राहिल. देणगी एकूण पगाराचे (गुंतवणूक वजा जाता १०% पर्यंतच ग्राह्य धरली जाईल. तसेच र २,००० /- वरील देणगी ही रोखीने दिलेली असल्यास मान्य होणार नाही.

१३) विजेवर चालणाऱ्या ४ चाकी वाहनांवर मिळणारी सुट (८० इ.इ.बी.) विजेवर चालणाऱ्या ४ चाकी वाहनांसाठी करपात्र व्यक्तीनी राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज घेतले असल्यास त्या व्यक्तीस आयकरात त्याने भरलेल्या व्याजाची २१,५०,०००/- पर्यंत सुट मिळेल. (कर्ज हे १/४/२०१९ ते ३१/३/२०२३ या कालावधीत घेतलेले असावे.)

१४) बँक व्याज : (कलम ८० टी.टी.ए.) सर्व बँकेतील बचत खातेवरील करदात्याला मिळणारे व्याज १०,०००/- पर्यंत : करमाफ केले असून १०,०००/- पेक्षा जास्त मिळणारे असे व्याज व सर्व बँकामधील ठेवींवर मिळणारे सर्व व्याज पगारात मिसळून आयकर गणना करावी लागणार आहे. १.४.२०२० पासून बँका/कंपन्यांकडून मिळणारा लाभांश (डिव्हीडंड) करपात्र करणेत आला आहे. (बँकेतील ठेवींवरील व्याज हे आपले पॅनवर ऑनलाईन दिसत आहे)

१५) (कलम ८७ ए) : नवीन स्किममध्ये करपात्र उत्पन्न ७,००,०००/- चे आत असेल तर बसणारा आयकर किंवा २५,०००/- यापैकी कमी असलेली रक्कम सुट मिळेल. तसेच जुन्या स्किममध्ये करपात्र उत्पन्न ५,००,०००/- चे आत असेल तर १२,५००/- पर्यंत आयकरामध्ये सूट मिळेल.

१६) वेतन थकबाकी (Arrears) मिळाली असेल तर सुट (Relief) : कलम ८९ (१) : फॉर्म १० ई भरुन वरील कलमाखाली आयकर कमी होऊ शकतो.

१७) आयकर कायम खाते क्रमांक (PAN) (कलम १३९ ए) सुधारीत आयकर कायद्याप्रमाणे एकूण मासिक पगार २०,८३३/- किंवा अधिक असेल व आयकर क्रमांक (पॅन) घेतला नसेल तर आयकर क्रमांक (पॅन) घ्यावा लागेल. सदरचे सर्व काम आता युनिट ट्रस्ट / एन. एस. डी. एल. या खाजगी संस्थेकडे दिले असून त्यासाठी आता रंगीत फोटो २, आधार कार्ड व इतर माहिती लागेल.

१८) विवरण पत्र दाखल करणे बाबत कलम १३९ ए (१ ए) आकारणी वर्ष २०२४-२५ ( आर्थिक वर्ष २०२३ / २४) या वर्षाकरिता ,५०,०००/- पेक्षा जास्ती उत्पन्न असणाऱ्या सर्व व्यक्तींना (आयकर कपात असो वा नसो) विवरणपत्र आय. टी.आर.- १ फॉर्म मध्ये ३१ जुलै पर्यंत सादर करावे लागेल. उशीरा विवरणपत्र दाखल केलेस (39 जुलै नंतर) दंड २ ५००० /- पर्यंत लागू शकतो. ५ लाखाचे वर उत्पन्न असाणाऱ्यांना विवरणपत्र ऑनलाईन (E-Filling) भरणे सक्तीचे केले आहे.

१९) उद्गम कर कपात कलम १९२ : सदर कलमान्वये मालकाने (Employer) प्रत्येक करपात्र व्यक्तीला वार्षिक आयकर किती बसतो ते काढून सदर बसलेला आयकर हा दरमहा सरासरीने १२ महिन्यामध्ये कपात करुन पगार झालेवर ७ दिवसांचे आत बँकेत चलनाने भरणेचा आहे. न भरलेस किंवा कमी भरणा झालेस उशीरासाठी दरमहा १.२५% व्याज भरावे लागेल. तसेच दरवर्षी अखेरीस एकूण कापलेल्या करासंबंधीचे प्रमाणपत्र फॉर्म नं १६ मध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ऑनलाईनवर काढून प्रत्येक कर्मचाऱ्यास द्यावयाचे आहे.

२०) तिमाही वेतन विवरणपत्र (फॉर्म नं. २४ क्यू): पगारातून कपात केलेल्या आयकर कपातीचे विवरणपत्र त्रैमासिक करण्यात आलेले असून दर तिमाही विवरणपत्र फॉर्म नं. २४ क्यू मध्ये तिमाही संपल्यावर 30 दिवसांचे आत म्हणजे दरवर्षी ३१ जुलै, 39 ऑक्टोबर व 39 जानेवारी पर्यंत दाखल करावे लागेल व शेवटचे तिमाही विवरणपत्र दाखल करणेसाठी अंतीम मुदत ३१ मे पर्यंतच राहिल. वरील सर्व विवरणपत्र दाखल करणेस उशीर झालेस विवरणपत्र दाखल करेपर्यंत कलमं २७२ ए प्रमाणे प्रतिदिन १२०० /- प्रमाणे फी भरुन विवरणपत्र सादर करावे लागेल.

२१) शेअर्स व म्युच्युअल फंड यांच्या विक्रीवरील भांडवली नफा हा आर्थिक वर्ष २०२०-२१ पासून करपात्र केलेला असून असे झालेले सर्व व्यवहार आपल्या पॅनवर ऑनलाईन दिसत आहेत.

वरील प्रमाणे आर्थिक वर्ष २०२३ २४ करिता पगारदारांकरीता आयकराचे सर्वसाधारण नियम आहेत. वरील नियमांचा विचार करून नियोजनबद्ध गुंतवणूक आताच केली तर बचत होऊन प्राप्तिकरही वाचेल व पुढे ऐनवेळेस होणारी धावपळही कमी होईल.

२०२३-२४  या आर्थिक वर्षात तुम्हाला INCOME TAX किती बसेल हे तपासा/पहा एका क्लिकवर
करनिर्धारण वर्ष  सन २०२४ - २०२५


आता कोणत्याही वर्षाचा Income Tax Refund एका क्लिकवर फक्त PAN नंबरची आवश्यकता

CLICK HERE

● या आणि आशा प्रकारच्या रंजक प्रश्नोत्तरासाठी ●
आपल्या संकेतस्थळाला नियमित भेट द्या 
आपल्या YouTube चॅनलला  Subscribe करा

हेही वाचा 

आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी सरकारने दिली पुन्हा एकदा मुदतवाढ. 

                   आता ३० जूनपर्यंत लिंक करणे अनिवार्य आहे.शिवाय ही शेवटची मुदतवाढ असेल. आधार पॅन लिंक केले नाही तर पॅन कार्ड निष्क्रिय होऊन बॅंक व्यवहार करण्यास अडचण येईल. शिवाय दंडही भरावा लागेल.अधिकृत वेबसाईटवरुन करा लिंक 


           आपल्याला इनकम टॅक्सची अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल. लिंक ओपन झाल्यानंतर तुम्हाला दोन बॉक्स दिसतील.यापैकी एका बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल. दुसर्‍या बॉक्समध्ये पॅन क्रमांक टाका. त्यानंतर व्ह्यू लिंकआधार स्टेटस वर क्लिक करा. त्यावर क्लिक करून, जर तुमचे आधार कार्ड पॅन क्रमांकाशी जोडलेले असेल तर तुम्हाला सक्सेसचा संदेश मिळेल.जर आधार आणि पॅनचा संबंध नसेल तर त्यांची स्थिती कळवली जाईल. यामुळे आपण आधार पॅनशी का जोडलेले नाही हे जाणून घेऊ शकता.

 एसएमएसद्वारे करु शकता लिंक 

             जर पॅन आणि आधार जोडलेले नसेल तर आपण पुन्हा लिंक करण्याचा प्रयत्न करू शकता. यासाठी आपण इनकम टॅक्सच्या वेबसाईटवर जाऊ शकता. एसएमएसद्वारे पॅन आणि आधारला जोडण्यासाठी, UIDPAN <12-digit aadhaar=""> <10-digit pan=""> टाईप करून 567678 किंवा 561561 वर संदेश पाठवा. ज्यांनी आपले आधार कार्ड आणि पॅन लिंक केलेले नाहीत, त्यांना आज शेवटच्या तारखेनंतर लिंक केल्यास त्यांना एक हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. याशिवाय पॅन अकार्यक्षम ठरू शकते आणि बँकेची अनेक कामेही अडकू शकतात. असे करा ऑफलाईन लिंक पॅन सेवा प्रदाता, NSDL या UTIITSLच्या सर्विस सेंटरवर जाऊन पॅन आणि आधार लिंक केले जाऊ शकते. त्यासाठी ‘Annexure-I’ फॉर्म भरावा लागेल आणि पॅन कार्ड आणि आधार कार्डची प्रत सोबत घ्यावी लागेल. ही प्रक्रिया विनामूल्य नाही. यासाठी तुम्हाला निश्चित फी भरावी लागेल. लिंक करताना पॅन किंवा आधार तपशिलात सुधारणा करण्यात आली की नाही यावर ही फी अवलंबून असेल. Is your PAN linked to Aadhaar or not, Check the status

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon