GPF Share Income Tax Limit Circular
महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांची भविष्य निर्वाह निधीची वार्षिक मर्यादा एका वित्तीय वर्षांत आयकर नियमावली, १९६२ च्या नियम ९(घ), उप नियम (२) च्या खाली दिलेल्या स्पष्टीकरणाच्या खंड (ग) च्या उप खंड (1) मध्ये दिलेल्या मर्यादेत (सद्यस्थितीत रु. पाच लाख) सिमित ठेवण्याबाबत...
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग
परिपत्रक क्रमांक : भनिनि ११२३/६६/प्र.क्र.१८/सेवा-४ (का.१३-अ) मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : २ एप्रिल, २०२४.
वाचा :
१) भारत सरकार, कार्मिक, लोक शिकायत आणि पेन्शन मंत्रालय (पेन्शन आणि पेन्शन भोगी कल्याण विभाग), नवी दिल्ली, अधिसूचना क्रमांकः जीएसआर ९६, दिनांक १५/६/२०२२
२) भारत सरकार, कार्मिक, लोक शिकायत आणि पेन्शन मंत्रालय (पेन्शन आणि पेन्शन भोगी कल्याण विभाग), नवी दिल्ली, कार्यालयीन आदेश (Office Memorandum), क्रमांक: F.No.३/ ६/२०२१-P&PW (F), दिनांक ११ ऑक्टोबर, २०२२
३) सामान्य प्रशासन विभाग, अधिसूचना क्रमांक: भनिनि ११२३/६६/प्र.क्र.१८/का.१३-अ,
दिनांक: १८ एप्रिल, २०२३ ४) सामान्य प्रशासन विभाग, परिपत्रक क्रमांक: भनिनि ११२३/६६/प्र.क्र.१८/सेवा-४ (का.१३-अ), दिनांक: १ डिसेंबर, २०२३.
-: परिपत्रक :-
भारत सरकार, कार्मिक, लोक शिकायत आणि पेन्शन मंत्रालय (पेन्शन आणि पेन्शन भोगी कल्याण विभाग) यांच्या संदर्भाकित क्रमांक १ येथील दिनांक १५/६/२०२२ च्या अधिसूचनेच्या धर्तीवर, महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, १९९८ मधील नियम क्रमांक ८ मध्ये, "वित्तीय वर्षातील नियमित वर्गणी व थकबाकी मिळून येणारी रक्कम आयकर नियमावली, १९६२ च्या नियम ९(घ), उप नियम (२) च्या खाली दिलेल्या स्पष्टीकरणाच्या खंड (ग) च्या उप खंड (1) मध्ये दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक नसेल, अशी सुधारणा तसेच अनुषंगिक नियम क्रमांक ७ व नियम क्रमांक ११ मध्ये सुधारणा संदर्भाकित क्रमांक ३ येथील दिनांक १८/०४/२०२३ च्या अधिसूचनेन्वये करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी संदर्भाकित क्रमांक ४ येथील दिनांक १/१२/२०२३ च्या परिपत्रकान्वये सविस्तर सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना सूचित करण्यात येते की, सदर परिपत्रकात दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याची दक्षता घेण्याबाबत सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना सूचित करण्यात यावे.
२. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या
संकेतस्थळावर उपलब्ध असून आपल्याला सदर परिपत्रक पीडीएफ मध्ये डाऊनलोड करावयाचे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा
या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेतांक २०२४०४०२१७५०२८३१०७ असा आहे. हे आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
प्रति,
१. राज्यपालांचे सचिव, राजभवन, मंबई,
(प्रशांत साजणीकर) सह सचिव, महाराष्ट्र शासन
हेही वाचाल
महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांची भविष्य निर्वाह निधीची वार्षिक मर्यादा एका वित्तीय वर्षांत आयकर नियमावली, १९६२ च्या नियम ९(घ), उप नियम (२) च्या खाली दिलेल्या स्पष्टीकरणाच्या खंड (ग) च्या उप खंड () मध्ये दिलेल्या मर्यादेत (सद्यस्थितीत रु. पाच लाख) सिमित ठेवण्याबाबत...
महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
परिपत्रक क्रमांक : भनिनि ११२३/६६/प्र.क्र.१८/सेवा-४ (का. १३-अ) मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : १ डिसेंबर, २०२३.
वाचा :
9) २) भारत सरकार, कार्मिक, लोक शिकायत आणि पेन्शन मंत्रालय (पेन्शन आणि पेन्शन भोगी कल्याण विभाग), नवी दिल्ली, अधिसूचना क्रमांक: जीएसआर ९६, दिनांक १५/६/२०२२ भारत सरकार, कार्मिक, लोक शिकायत आणि पेन्शन मंत्रालय (पेन्शन आणि पेन्शन भोगी कल्याण विभाग), नवी दिल्ली, कार्यालयीन आदेश (Office Memorandum), क्रमांक: F.No.३/६/ २०२१ - P&PW (F), दिनांक ११ ऑक्टोबर, २०२२
३) सामान्य प्रशासन विभाग, अधिसूचना क्रमांक : भनिनि ११२३/६६/प्र.क्र.१८/का.१३-अ, दिनांक: १८ एप्रिल २०२३.
-: परिपत्रक :-
भारत सरकार, कार्मिक, लोक शिकायत आणि पेन्शन मंत्रालय (पेन्शन आणि पेन्शन भोगी कल्याण विभाग) यांच्या संदर्भाकित क्रमांक १ येथील दिनांक १५/६/२०२२ च्या अधिसूचनेन्वये, सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी (केंद्रीय सेवा) १९६० मधील नियम क्रमांक 19 ,< overline 4 १० मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने, केंद्र शासनाच्या धर्तीवर, महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, १९९८ मधील नियम क्रमांक ८ मध्ये, “वित्तीय वर्षातील नियमित वर्गणी व थकबाकी मिळून येणारी रक्कम आयकर नियमावली, १९६२ च्या नियम ९(घ), उप नियम (२) च्या खाली दिलेल्या स्पष्टीकरणाच्या खंड (ग) च्या उप खंड (i) मध्ये दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक नसेल", अशी सुधारणा तसेच अनुषंगिक नियम क्रमांक ७ व नियम क्रमांक ११ मध्ये सुधारणा संदर्भाकित क्रमांक ३ येथील दिनांक १८/०४/२०२३ च्या अधिसूचनेन्वये करण्यात आली आहे.
२. केंद्र शासनाने संदर्भाकित क्रमांक २ येथील दिनांक ११/१०/२०२२ च्या कार्यालयीन आदेशान्वये, “भविष्य निर्वाह निधी वर्गणीदाराची वित्तीय वर्षातील मासिक वर्गणी व त्या वित्तीय वर्षातील थकबाकीसह येणारी रक्कम आयकर नियमावली, १९६२ च्या नियम ९(घ), उप नियम (२) च्या खाली दिलेल्या स्पष्टीकरणाच्या खंड (ग) च्या उप खंड (i) मध्ये दिलेल्या मर्यादेपेक्षा ( सद्यस्थितीत रु. पाच लाख) अधिक नसावी याबाबत अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व मंत्रालय/विभागांना त्यांच्या अधिनस्त कार्यालयांच्या तसेच सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणण्याबाबत देण्यात आल्या आहेत.
3. महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, १९९८ मध्ये अधिसूचना दिनांक १८/०४/२०२३ नुसार सुधारणा केल्यावर केंद्र शासनाने दिलेल्या सूचनांच्या धर्तीवर पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.
(अ) भविष्य निर्वाह निधी वर्गणीदाराची वित्तीय वर्षातील मासिक वर्गणी व त्या वित्तीय वर्षातील
थकबाकीसह येणारी रक्कम आयकर नियमावली, १९६२ च्या नियम ९(घ), उप नियम (२) च्या खाली दिलेल्या स्पष्टीकरणाच्या खंड (ग) च्या उप खंड (i) मध्ये दिलेल्या मर्यादेपेक्षा (सद्यस्थितीत रु. पाच लाख) अधिक नसावी.
(ब) वर्गणीदाराची महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीची वर्गणी जर रु.पाच लाखापेक्षा (नियमित वर्गणी + थकबाकी रक्कम मिळून) कमी जमा झालेली असेल तर त्या वित्तिय वर्षासाठी अशा वर्गणीदाराच्या बाबतीत उर्वरित महिन्यांसाठी वर्गणी जमा करताना एकूण वर्गणी रु.पाच लाखाच्या मर्यादेतच जमा करावी.
(क) तसेच उर्वरित महिन्यांसाठी कमीत कमी ६% प्रमाणे वर्गणी जमा केल्यानंतर, सदर वर्गणीची रक्कम रु. पाच लाखापेक्षा जास्त होत असेल तर, उर्वरित महिन्यांची वर्गणी जमा करणे थांबवावे. अशा वर्गणीदारासाठी उर्वरित महिन्यांसाठी कमीत कमी ६ % वर्गणी वजा करावयाची अट शिथिल करण्यात यावी.
३. सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच त्यांच्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख, प्रादेशिक विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख यांनी उपरोक्त सूचना त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या तसेच भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांच्या निदर्शनास आणावी.
४. हे परिपत्रक वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक २५८/२३/कोप्र.५, दिनांक २०/११/२०२३ अन्वये दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहेत.
५. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या
या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेतांक २०२३१२०११५३८११४५०७ असा आहे. हे आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon