Students Exam Fees Waived
Students' examination fees waived
dushkalgrast bhagatil vidyarthyanche pariksha shulk maaf karanebabat
तातडीचे/महत्वाचे
क्र.रा.मं/लेखा/दुष्काळग्रत फी माफी/२६-२७/४०४४
दिनांकः २९/०९/२०२६
विषयः दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करणेबाबत.
संदर्भः
१. या कार्यालयाचे क्र.रा.मं./परीक्ष-३/३४५४, दिनांकः १३/०८/२०२६ रोजीचे पत्र.
२. या कार्यालयाचे क्र.रा.मं./परीक्ष-३/३५०७, दिनांकः १८/०८/२०२६ रोजीचे पत्र.
३. मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय, यांचा शासन निर्णय क्रमांकः समिती २०२६/प्र.क्र./८२/मदत-२, दिनांक २५ सप्टेंबर, २०२६
४. राज्य मंडळाचे क्र.रा.मं./ लेखा/दुष्काळग्रस्त फी माफी-प्रतिपुर्ती २६-२७/४०३०, दिनांक २८/०९/२०२६ चे पत्र.
महोदय,
उपरोक्त संदर्भीय पत्र क्र. १ व २ अन्वये फेब्रुवारी-मार्च २०२७ मधील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इ.१० व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ.१२ वी परीक्षेस प्रविष्ट होवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षांची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने भरून घेण्याबाबत सविस्तर सुचना निर्गमित केलेल्या आहेत.
तथापी, शासन निर्णय दिनांक २५ सप्टेंबर, २०२६ अन्वये महाराष्ट्र राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे राज्य शासनाने २६५ तालुक्यांमध्ये विशेष बाब म्हणून उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी देण्याबाबत नमूद केलेले आहे.
त्यास अनुसरून शासन निर्णयानुसार फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये आयोजित इ.१०वी व इ.१२ वी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यार्थ्यांकडून पुढील आदेश येईपर्यंत परीक्षा शुल्क न घेता आवेदनपत्रे भरून घेण्याची कार्यवाही करण्यात यावी. याबाबत राज्य मंडळामार्फत पुढील सविस्तर सुचना यथाशिघ्र निर्गमित करण्यात येतील. तरी आपणामार्फत विभागातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना तशा तात्काळ सूचना देण्यात याव्यात. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळास तातडीने सादर करावा.
(मा. अध्यक्ष, यांचे मान्यतेने)
सचिव, राज्य मंडळ, पुणे



Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon