DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Maharashtra Dushkal Ghoshit Madat Yadi

Maharashtra Dushkal Ghoshit Madat Yadi
GR


राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील १०२१ महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन निर्णय क्रमांक : एससीवाय- २०२३/प्र.क्र.३७/म-७ मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : १० नोव्हेंबर, २०२३.

 👁👁
सन २०२३ च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करणेबाबत .....

महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग,

शासन निर्णय, क्रमांक:- एससीवाय-२०२३/प्र.क्र.३७/म-७, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई- ४०००३२ दिनांक :- ३१ ऑक्टोबर, २०२३

वाचा:-

१) शासन निर्णय, क्रमांक: संकिर्ण-२०१७/प्र.क्र.१७३/२०१७/म-७, दि. ०७ ऑक्टोबर, २०१७

२) शासन निर्णय. क्रमांक: संकिर्ण-२०१७/प्र.क्र.१७३/२०१७/म-७, दि. २८ जून, २०१८ ३) शासन पत्र क्रमांक: एससीवाय-२०२१/प्र.क्र.१००/म-७, दि. १८ ऑक्टोबर, २०२१

४) आयुक्त (कृषी), महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र क्रमांक जा. क्र. कृआ/नेसआ/ख. दुष्काळ-२३/ ३३९७२, दिनांक २० ऑक्टोबर, २०२३ अन्वये प्राप्त राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीच्या बैठकीचे इतिवृत्त.

प्रस्तावना :

दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मुल्यांकन करण्याबाबत संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक १ व २ अन्वये सविस्तर कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे. संदर्भाधीन शासन निर्णय व दुष्काळ व्यवस्थापन संहितेमध्ये विहित केलेल्या निकषानुसार खरीप २०२३ च्या हंगामातील परिस्थितीच्या आधारे राज्यातील ४३ तालुक्यांमध्ये दुष्काळाची दुसरी कळ लागू झाली. दुष्काळाची दुसरी कळ लागू झालेल्या ४३ तालुक्यांपैकी उल्हासनगर या तालुक्यात पेरणीचे क्षेत्र निरंक असल्याने सदर तालुक्यात दुष्काळ घोषित करण्याचा प्रश्न उदभवत नाही. उर्वरित ४२ तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष पिकांचे नुकसानीचे सर्वेक्षण (Ground Truthing) करण्यात आले असून त्या आधारे राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार राज्यातील तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

राज्यातील तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पीकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकांनी प्रभावित झालेल्या तालुक्यांमध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेवून राज्य शासन याशासननिर्णया सोबतच्या परिशिष्ट - "अ" मध्ये दर्शविल्यानुसार १५ जिल्ह्यातील २४ तालुक्यामध्ये गंभीर तर १६ तालुक्यामध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करीत आहे.

२. दुष्काळ घोषित करण्यात येत असलेल्या ४० तालुक्यामध्ये खालील सवलती लागू करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे:-
१) जमीन महसूलात सूट.

२) पिक कर्जाचे पुनर्गठन.

३) शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती.

४) कृषी पंपाच्या चालू विजबिलात ३३.५% सूट.

५) शालेय/ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी.
६) रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता.

७) आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर.

८) टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे.

३. या आदेशान्वये देण्यात येणाऱ्या विविध सवलती पोटीचा आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभागांनी उचलावा व त्यासाठी वित्त विभागाने आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा. त्यानुसार या प्रकरणी पुढील उचित कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल या विभागास सादर करण्यात यावा.

४. सदर तालुक्यातील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान अनुज्ञेय राहील. सदर निविष्ठा अनुदान हे कोरडवाहू पिक उत्पादित केलेल्या व ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या खातेदारांना अनुज्ञेय राहील. निविष्ठा अनुदान देण्यासाठी लाभार्थ्यांची निवड करताना शासन निर्णय महसूल व वन विभाग, दिनांक १८.१०.२०२३ मधील तरतूदी मध्ये विहित केलेली कार्यपध्दती अवलंबिण्यात यावी. निविष्ठा अनुदानाचे दर व इतर अटी व शर्ती या शासन निर्णय, महसूल व वन विभाग, क्रमांक: सीएलएस-२०२२/प्र.क्र.३४९/म-३, दिनांक २७ मार्च, २०२३ मध्ये नमूद केल्यानुसार राहतील. तसेच निविष्ठा अनुदान दक्षता घ्यावी. हे नुकसान झालेल्या प्रत्यक्ष पीक पेरणी केलेल्या क्षेत्रापुरतेच मर्यादित राहील याची
५. सदर मदतीचे वाटप सन २०२३ च्या खरीप हंगामातील ७/१२ मधील पिकांच्या नोंदीच्या आधारे करण्यात यावे.
६. हंगामातील अंतिम पैसेवारीसाठी करण्यात आलेल्या पिक कापणी प्रयोगाअंती आलेल्या पिक निहाय पैसेवारीच्या आधारे कोरडवाहू पीकांचे ३३ टक्के नुकसान ठरविण्यात यावे. प्रमुख पिक नसलेल्या व पिक कापणी प्रयोग न केलेल्या कोरडवाहू पिकांना सुध्दा मदत अनुज्ञेय राहील.
७. बहुवार्षिक फळपिके व बागायती पिके यांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाल्याची शहानिशा शेतीनिहाय पंचनामे करून करण्यात यावी.
८. बहुवार्षिक फळपिके व बागायती पिकांचे नुकसान ठरविण्याचा निकष ७/१२ मधील नोंद हा असेल. नुकसानीची तीव्रता ठरविण्यासाठी पंचनामा हा निकष असेल. बहुवार्षिक फळपिके व बागायती पिकांचे नुकसान ठरविण्यासाठी त्याची नोंद ७/१२ मध्ये असणे आवश्यक आहे.
९. सन २०२३ च्या खरीप हंगामातील पिक पाहणी मधील पिकांच्या ७/१२ मधील उताऱ्यातील नोंदीबाबत कोणताही आक्षेप उद्भवल्यास त्याचे निराकरण महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमधील तरतूदीनुसार करण्यात यावे.
१०. दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या तालुक्यामधील शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना दिर्घ सुट्टीच्या कालावधीत देखील राबविण्यात यावी. तसेच मध्यान्ह भोजन योजना व एकात्मिक बालविकास योजनेतंर्गत (ICDS) मुलांना पौष्टीक अन्न देण्यात यावे.
११. सदरहू आदेश हे प्रशासकीय मान्यतेचे असून निधी वितरणाबाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी संबंधित क्षेत्रीय यंत्रणांना आवश्यक ते आदेश तातडीने निर्गमित करावेत,
१२. दुष्काळ घोषित केल्याचे आदेश या आदेशाच्या दिनांकापासून अंमलात येतील व शासनाने हे आदेश रद्द न केल्यास पुढील ६ महिन्यांच्या कालावधी पर्यंत लागू राहतील. संबंधित जिल्हाधिकारी यांनी या आदेशास जिल्हयामध्ये प्रसिध्दी द्यावी. तसेच संबंधित जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांना दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यामध्ये आवश्यक उपाययोजना अंमलात आणण्यास प्राधिकृत करण्यात येत आहे. त्यांनी तातडीने आवश्यक उपाययोजना अंमलात आणाव्यात.
१३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३१०३११५४५०५३४१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

दुष्काळी तालुके

शासन निर्णय, क्रमांक:- एससीवाय-२०२३/प्र.क्र.३७/म-७, दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२३ चे परिशिष्ट- "अ" सन २०२३ खरीप हंगामातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी

अ.क्र.

जिल्हा

गंभीर स्वरुपाचा दुष्काळ असणारे तालुके

संख्या

 

मध्यम स्वरुपाचा दुष्काळ असणारे तालुके

संख्या

नंदूरबार

नंदूरबार

 

 

धुळे

 

 

सिंदखेडा

जळगाव

चाळीसगाव

 

 

बुलढाणा

 

 

बुलढाणा

लोणार

जालना

भोकरदन

 

 

 

 

जालना

 

 

 

 

बदनापूर

 

 

 

 

अंबड

 

 

 

 

मंठा

 

 

छत्रपती

संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर

 

 

 

 

 

सोयगाव

 

 

नाशिक

मालेगाव

 

 

 

 

सिन्नर

 

 

 

 

येवला

 

 

पुणे

पुरंदर सासवड

शिरुर घोडनदी

 

बारामती

दौड

 

 

 

इंदापूर

बीड

वडवनी

 

 

 

 

धारूर

 

 

 

 

अंबेजोगाई

 

 

१०

लातूर

रेणापूर

 

 

११

धाराशिव

वाशी

 

 

 

 

धाराशिव

 

 

 

 

 

लोहारा

 

 

 

१२

सोलापूर

बार्शी

करमाळा

 

 

माळशीरस

माढा

 

 

सांगोला

 

१३

सातारा

 

 

वाई

 

 

 

 

खंडाळा

१४

कोल्हापूर

 

 

 

हातकणंगले

गडहिंग्लज

१५

सांगली

 

 

शिराळा

 

 

 

 

कडेगाव

 

 

 

 

खानापूर विटा

 

 

 

 

मिरज

 

एकूण जिल्हे-१५

गंभीर दुष्काळा तालुके

२४

मध्यम दुष्काळाचे तालुके

१६

www.dnyanyatritantrasnehi.com

Disclaimer warning

लेखकाकडून आंतरजालाच्या क्लिष्ट प्रणाली मुळे वरील माहितीत मुद्रण दोष होऊ शकतो असू शकतो त्यामुळे खालील दुव्यावरून अधिकृत शासन निर्णय पहावा संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात वाचण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर टिचकी माराPrevious
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon