Iytta Pachvi Aathvi Pariksha Fertapasni
Class 5th and 8th Question Papers Answer Sheets Will Be Preserved Rechecking By Diet And EO SCERT Guidelinses
Std 5th 8th Exam Rechecking By Diet And EO
Class 5th and 8th Question Papers, Answer Sheets Will Be Preserved Rechecking By Diet And EO SCERT Guidelinses
Rechecking Re-evaluation By Diet And Education Officer
• वर्ग पाचवी आणि आठवीच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका होणार जतन
• 'डायट' आणि शिक्षणाधिकाऱ्यांकडून फेरतपासणी
• 'एससीईआरटी'कडून शाळांना आदेश
इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याची पद्धत आत्ता बदलली आहे. वाचा इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करणे बंद झाले आहे. सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा पारदर्शकपणे घेतली का?, उत्तरपत्रिकांची तपासणी व गुणदान बिनचूक आहे की नाही?, याची पडताळणी आता 'डायट'चे अधिकारी व शिक्षणाधिकारी करणार आहेत. त्यासाठी सर्व शाळांना पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका वर्षभर जतन करून ठेवाव्या लागणार आहेत.
राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून आता पाचवी व आठवीच्या परीक्षांवर लक्ष ठेवले जाणारआहे. प्रत्येक जिल्ह्यातील शाळांमधील या इयत्तेतील विद्याथ्यांची पारदर्शकपणे परीक्षा घेतली जाते का?, याची पडताळणी प्राथमिक शिक्षणाधिकारी व जिल्हा शैक्षणिक प्रशिक्षण संस्थेच्या (डायट) माध्यमातून होणार आहे. काही दिवसांपूर्वी पाच ते १६ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्याच्या गुणवत्ते संदर्भातला अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे, त्यात इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थाना बेरिज वजाबाकी, भागाकार देखील येत त्याची बाब समोर आली आहे अनेकांना वाचता देखील जमत नसल्याचे उघड झाले. दुसरीकडे सरकारी शाळांमधील प्रवेश देखील गुणवत्तेच्या कारणामुळे घटल्याची बाब स्पष्ट झाली आहे या पार्श्वभूमीवर आता परीक्षा पारदर्शकपणे घेण्याचे नियोजन एससीईआरटी कडून करण्यात आले आहे.
• अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी दोन संधी
इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना स्वतंत्र प्रश्नपत्रिका तयार करून दिल्या जातात. प्रश्न पत्रिका पीडीएफमध्ये उपलब्ध फक्त या ओळीला स्पर्श करा एप्रिल मध्ये या विद्यार्थ्यांची परीक्षा होईल. त्यात अनुत्तीर्ण झालेल्यांची पुढे मे-जून महिन्यात फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. याही परीक्षेत अनुत्तीर्ण झालेला विद्यार्थी त्याच वर्षात राहणार असून त्याला पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार नाही. त्यांची परीक्षा पारदर्शकपने घेण्यात आली की नाही, याची पडताळणी प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकांच्या आधारे केली जाणार आहे.
" इपता पाचवी व आठवीच्या विद्याप्यर्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा प्रकार आता बंद झाला आहे. मागच्या वर्षी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्याप्यांची संख्या दोनअंकी आहे. आता इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा झाल्यावर त्यांची प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका शाळांनी जतन करून ठेवणे बंधनकारक आहे. त्या उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिकांची फेरतपासणी शिक्षणाधिकारी व जिल्हा शैक्षणिक प्रशिक्षण संस्थेचे (डाएट) अधिकारी करतील. तसे आदेश त्यांना दिले आहेत."- राहुल रेखावार, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon