DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Class 5th 8th Annual Examination 2023 24

Class 5th 8th Annual Examination 2023 24  

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे
सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे
जा.क्र. राशैसंप्रपम/इयत्ता ५ वी व ८ वी वार्षिक परीक्षा/मूल्यमापन/२०२३-२४/१०५४ 


इयत्ता ५ वी ८ वी नवीन नियमावली

शासन निर्णय २९ मे २०२३ 

शासन निर्णय ७ डिसेंबर २०२३

> इ. ५ वी ८ वी प्रथम सत्र व दुतीय सत्र सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन.

> द्वितीय सत्र परीक्षा संकलित मूल्यमापन. वार्षिक परीक्षा द्वितीय सत्र अभ्यासक्रमावर आधारित.

> इ. ५ वी मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित व परिसर अभ्यास १-२ लेखी परीक्षा ४० गुण तोंडी परीक्षा १० गुण एकूण ५० गुण

> इ.८ वी मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र लेखी परीक्षा ५० गुण तोंडी १० गुण एकूण ६० गुण

> इयत्ता ५ वी व ८ वी कार्यानुभव, चित्रकला, शारीरिक शिक्षण प्रचलित सर्वकाश मूल्यमापन श्रेणी देणे

> इयत्ता ५ वी सर्व विषय ५० प्रमाणे एकूण २५० गुण. 

> उत्तीर्ण गुण प्रत्येक विषय ३५% प्रमाणे १८ गुण.

> सवलतीचे गुण १० तीन विषयात सवलत. ५ गुण जास्तीत जास्त एका विषयात

> इ. ८ वी सर्व विषय मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान समाजशास्त्र

> एकूण गुण ६x६ = ३६०

> सवलतीचे गुण १० तीन विषयात ५ गुण जास्तीत जास्त एका विषयात

> प्रगती पुस्तक नाही- कार्ड देणे

> वर्णनात्मक नोंदी करू नये.

> शेरे- उत्तीर्ण / उत्तारीत / अनुत्तीर्ण / पुनर्रपरीक्षेक पात्र.

> परीक्षेस गैरहजर विद्यार्थी अनुत्तीर्ण समजण्यात येईल.

> पुनर्रपरीक्षा अनुत्तीर्ण विषयाची पुनर्रपरीक्षा कार्या, शा. शि, चित्रकला पुनर्रपरीक्षा नाही. पुनर्रपरीक्षा निकाल नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी ३ दिवस आधी जाहीर करणे. पुनर्रपरीक्षेस सवलतीचे गुण ग्राह्य धरणे. फेरपरीक्षेक गैरहजर विद्यार्थी अनुत्तीर्ण समजण्यास येईल.


 
दि.२९/०२/२०२४

प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व),.
२) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व).
३) शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई.
४) शिक्षणाधिकारी, प्राथमिक/माध्यमिक जि.प. (सर्व),
५) शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण, उत्तर), मुंबई.
६) प्रशासनाधिकारी, मनपा/नपा, (सर्व).
 
विषय :- इयत्ता पाचवी व आठवी साठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करणेबाबत शासन निर्णय दि. ०७ डिसेंबर २०२३ नुसार अंमलबजावणी करणेबाबत...
 
संदर्भ :-१. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९
२. शासन निर्णय क्र. पीआरई/२०१०/(१३६) १०/प्राशि- ५, दि. २० ऑगस्ट २०१०
३. महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम २०११ दि २०११ ऑक्टोबर ११.
४. शासन निर्णय क्र ६. डी.एस/१७/११८/२०१७/ संकीर्ण. दि १६ ऑक्टोबर २०१८
५. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम) सुधारणा, २०१९ दि. ११ जानेवारी २०१९
६. महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम २०२३ (सुधारणा) दि २०२३मे २९.
७. शासन निर्णय क्र/२७६प्रक्र / २०२२ - आरटी ई. एस दि १.डी.०७ डिसेंबर २०२३ ८
. या कार्यालयाचे पत्र क्र. जा.क्र. राशैसंप्रपम / मूल्यमापन पाचवी आठवी / परीक्षासचूना -२०२३/ २४/०६२९७ दि. २८ डिसेंबर २०२३
९. या कार्यालयाचे पत्र क्र.जा.क्र.रा. शै.सं.प्र.प.म./वि. वाटप / आस्था - १/२/२०२३/०८९७ दि. २०.०२.२०२४
 
          उपरोक्त संदर्भीय विषयांन्वये, महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार हक्क नियम २०२३ (सुधारणा) अधिसूचनेनुसार इयत्ता ५ वी व ८ वी साठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन पद्धती २०२३-२४ पासून लागू करणेबाबत संदर्भ क्र. ७ नुसार निश्चित करणेत आलेली आहे. सदर शासन निर्णयानुसार अंमलबजावणी संदर्भात नियोजन करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने संदर्भ क्र. ७ मध्ये नमूद केल्यानुसार राज्य नियंत्रण समिती गठीत करणेत आलेली आहे. संदर्भ क्रमांक ८ अन्वये आपणास सनियंत्रण समितीच्या बैठकीचे इतिवृत्त मधील सूचना व संदर्भ क्र.७ च्या शासन निर्णयानुसार कार्यवाहीची अंमलबजावणीकरणेबाबत कळविण्यात आले होते. संदर्भ क्रमांक ८ अन्वये शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांना इयत्ता ५ वी व ८ वीच्या वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका राज्यस्तरावरून पुरविण्यात येतील असेही कळविण्यात आले होते. तथापि संदर्भ क्र. ७ व ९ अन्वये शासन निर्णयानुसार सदर प्रश्नपत्रिका ह्या शाळास्तरावर तयार करणेत याव्यात असे नमूद केलेले असल्याने इयत्ता ५ वी व ८ वीच्या वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका शाळास्तरावर तयार करणेबाबत आपल्या अधिनिस्त सर्व शाळांना अवगत करावे. इयत्ता ५ वी व ८ वी च्या विद्यार्थ्यांचा अधिकचा सराव होणेकरिता परिषदेच्या वेबसाईटवर नमुना सराव प्रश्नपत्रिका व संविधान तक्ते अपलोड केलेले आहेत. वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या प्रश्नपत्रिकांचा आधार घेऊन सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी त्यांचे स्तरावर प्रश्नपत्रिका तयार करणे तसेच संदर्भ क्र. ७ अन्वये शासन निर्णयानुसार इयत्ता ५ वी व ८ वी च्या वार्षिक परीक्षेबाबत कार्यवाही करणेबाबत सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांना अवगत करावे.

इयत्ता पाचवी व आठवी साठी वार्षिक परीक्षापुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करणेबाबत शासन निर्णय दि. ०७ डिसेंबर २०२३ नुसार अंमलबजावणी करणेबाबत...

दि.२९/०२/२०२४

परिपत्रक पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी
मित्रांनो  Click to Download वर टिचकी मारा

सोबत :- शासन निर्णय दिनांक ०७ डिसेंबर २०२४ चा पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी

(राहूल रेखाबार, भा.प्र.से.)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,
महाराष्ट्र,
पुणे




Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon