महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र ७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे-४११०३०.
जा.क. राशैसंप्रपन /५ वी ८ वी परीक्षा व PAT-३ / प्रेस नोट प्रसिद्धी / २०२३-२४/११७९ दि.०७/०३/२०२४
प्रति,
मा. संपादक महोदय,
सर्व वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्या.
विषय आपल्या लोकप्रिय दैनिकात बातमी प्रसिद्ध करणे बाबत
महोदय,
आपल्या लोकप्रिय दैनिकात खालील प्रेस नोट प्रमाणे बातमी प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती.
सोबत प्रेस नोट
आपली विश्वासु
डॉ. कमलादेवी आवटे
उपसंचालक (समन्वय) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे
प्रेस नोट
५ वी, ८ वी वार्षिक परीक्षा व नियतकालिक मूल्यांकन चाचणी-३ एप्रिल २०२४
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक डिसेंबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयाने शैक्षणिक वर्ष २०२३-२०४० पासून इयचा ५ जी आणि ८ वी साठी वार्षिक परीक्षा घेण्याचे निकित केले आहे. या शासन निर्णयानुसार राज्यातील राज्य मंडळाचा अभ्यासक्रम असणाऱ्या सर्व मान्यताप्राप्त शाळांच्या इयत्ता ५ वी आणि ८ वी साधी एप्रिल महिन्यात वार्षिक परीक्षा घेण्यात यावी असे निर्देश आहेत. सदर शासन निर्णय हा सर्व व्यवस्थापनाया, सर्व माध्यमाच्या शाळांसाठी लागू करणेत आला आहे. या शासन निर्णयानुसार इयत्ता ८ वी वार्षिक परीक्षा ही द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमावर आधारीत असणार आहे. या वार्षिक परीक्षासाठी इयता भी ला प्रथम भागा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, व परिसर अभ्यास हे विषय असतील तर इयत्ता ८ वी ला प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, विज्ञान व सामाजिक शास्र हे विषय असतील तसेच इयत्ता ५ वी आणि ८ वी साठी सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन योजनेतील संकलित मूल्यमापन २ म्हणजेच वार्षिक परीक्षा असणार आहे. सदन परीक्षेकरिता प्रत्येक शाळांनी शाळास्तरावर प्रश्रपत्रिका तयार करून परीक्षा घेण्यात यावी. शाळांनी प्रश्रपत्रिका विकसन करताना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी त्यांच्या maa.ac.in संकेतस्थळावर इयत्ता पाचवी आणि आठवी वार्षिक परीक्षेसाठी नमुना प्रश्नपत्रिका तसेच संविधान तक्ते उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचा उपयोग करून प्रश्नपत्रिका तयार कराव्यात असे आवाहन परिषदेच्या वतीने करण्यात देव आहे.
इयत्ता पाचवी व आठवीच्या वार्षिक परीक्षेत विद्यार्थी ज्या विषयात उत्तीर्ण होऊ शकणार नाहीत शाळेमार्फत त्या विषयासाठी अतिरिक्त पूरक मार्गदर्शन प्रदान करून वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्याच्या आत पुनर्परीक्षा देण्याची संधी देण्यात येईल पुनर्परीक्षाचे आयोजन देखील उपरोल्लेखित शासन निर्णयाप्रमाणे संबंधित शाळांनी करावयाचे आहे. पुनर्परीक्षा घेताना शाळांनी कोणती दक्षता घ्यावयाची याबाबतचे निर्देश संबंधित शासन निर्णयात दिलेले आहेत.
नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या वर्षात राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील इयत्ता ३ री ते ८ वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रथम माषा, गणित व तृतीय भाषा (एकूण १० माध्यम) करिता तीन नियतकालिक मूल्यांकन (PAT) चाचण्यांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यापैकी आतापर्यंत पायाभूत चाचणी व संकलित मूल्यमापन १ थे आयोजन करण्यात आले असून संकलित मूल्यमापन २ चे आयोजन दिनांक २, ३ व ४ एप्रिल २०२४ या कालावधीमध्ये राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानित शाळांमध्ये एकाच वेळी करण्यात येणार आहे.
इयत्ता ३ री, ४ थी, ६ वी, ७ वी करिता प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा या तीन विषयांकरिता नियतकालीक मुल्यांकन चाचणी हीच संकलित मूल्यमापन २ असेल त्यामुळे या विषयांसाठी स्वतंत्रपणे संकलित मूल्यमापन -२ घेण्यात येणार नाही व उर्वरित विषयांचे संकलित मूल्यमापन २ शाळांनी त्यांच्या स्तरावर प्रश्नपत्रिका विकसित करून घ्यावयाचे आहे.
इयता ५ वी व ८ वी साठी मात्र नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) ही संकलित मूल्यमापन २ असणार नाही. या दोन इयत्तांसाठी वार्षिक परीक्षा ही स्वतंत्रपणे घेण्यात येईल त्यामुळे शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांनी दिनांक २.३ व ४ एप्रिल २०२४ या कालावधीत नियतकालिक मूल्यांकन चाचणीचे आयोजन निश्चित केले असल्यामुळे सदर चाचणी नंतरम वार्षिक परीक्षेचे आयोजन शाळांनी करावे, असे परिषदेच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे. सर्व शाळांनी वरील सूचनांप्रमाणे आपल्या स्तरावर इयत्ता ५ वी व ८ वी च्या वार्षिक परीक्षा शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे अंमलबजावणी करून यशस्वीपणे परीक्षा पार पाडाव्यात. यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी असे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे मार्फत करण्यात येत आहे.
Director
State Council For Educational Research And Training, Maharashtra
इयत्ता पाचवी आणि आठवी वार्षिक परीक्षा २०२४ साठी मराठी ,इंग्रजी, उर्दू, गणित ,विज्ञान, परिसर अभ्यास व सामाजिक शास्त्रे या विषयांच्या नमुना प्रश्नपत्रिका व संविधान तक्ते सरावासाठी व संदर्भासाठी परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत राज्यातील सर्व शाळांनी या प्रश्नपत्रिका व संविधान तक्ते याप्रमाणे आपापल्या स्तरावर वार्षिक परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकांचे विकसन करून वार्षिक परीक्षांचे
दि.७/१२/२३ च्या शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे आयोजन करावे सदर शासन निर्णय व राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांचे परिपत्रक व पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
इयत्ता 5 वी:- नमुना सराव प्रश्नपत्रिका 2024
इयत्ता 8 वी:- नमुना सराव प्रश्नपत्रिका 2024
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon