DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Training Induction Program For Teachers

Training Induction Program For Newly Appointed Teachers


महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे 

जा.क. राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (SBTE) /२०२४-२५/ ०५३५७

दिनांक: ०८/११/२०२४

प्रति,
प्राचार्य,
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व

विषय : नवनियुक्त शिक्षकांसाठी सेवा प्रवेशोत्तर प्रेरण कार्यक्रम (Induction Programme ) अंतर्गत प्रशिक्षणाबाबत

संदर्भ : 
१) प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जा. क्र. राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (SBTE)/ २०२४-२४/०५०७० दिनांक १७/११/२००४

२) MAH- TET परीक्षा नोव्हेंबर-२०२४

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, संदर्भ क्रमांक ०१ अन्वये राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० मधील मुद्दा क्रमांक ५.१५ ते ५.२१ मध्ये नवनियुक्त शिक्षकांसाठी प्रेरण कार्यक्रमाचे आयोजन करणेच्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्ह्यातील नवनियुक्त शिक्षकांसाठी एकाच वेळी जिल्हास्तरावर ०७ दिवसीय (५० तासांचे) प्रशिक्षण दिनांक ०४/११/२०२४ ते दिनांक ११/११/२०२४ कालावधीत आयोजित करण्यात आलेले आहे.

तथापि MAII-TET परीक्षा नोव्हेंबर-२०२४ चे आयोजन रविवार दिनांक १०/११/२०२४ रोजी करण्यात आले आहे. या परीक्षेत काही नवनियुक्त प्रशिक्षणार्थी शिक्षक परीक्षा देणार आहेत. राज्यस्तरावरून प्रशिक्षण कालावधीच्या पूर्व नियोजनामध्ये दिनांक १०/११/२०२४ रोजी रविवार असल्यामुळे सुट्टी गृहीत धरण्यात आलेली आहे. नवनियुक्त प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी TET परीक्षेकरता आपले मूळ गाव/जिल्ह्याची निवड केली असल्यामुळे परीक्षेच्या आधीचा दिवस दिनांक ०९/११/२०२४ व परीक्षेनंतरचा दुसरा दिवस दिनांक ११/११/२०२४ या दोन दिवशी प्रवासाकरिता काही नवनियुक्त प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी सुट्टी देण्याची विनंती केली आहे.
हेही वाचाल 👇 
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषदे अंतर्गत करावयाच्या पदभरती संदर्भात रिक्त पदे निश्चित करण्याबाबत व नियुक्त शिक्षकांच्या बदली बाबत सुधारीत अटी लागू करणेबाबत. संपूर्ण शासन निर्णय वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 


उपरोक्त बाबीच्या अनुषंगाने TET परीक्षेसाठी ज्या नवनियुक्त शिक्षक प्रशिक्षणार्थ्यांनी सुट्टीची मागणी केली त्यांना परीक्षेच्या आधीच्या दिवशी दिनांक ०९/११/२०२४ व परीक्षे नंतरच्या दुसऱ्या दिवशी दिनांक ११/११/२०२४ रोजी सुट्टी द्यावी. अशा नवनियुक्त शिक्षक प्रशिक्षणार्थ्यांचे दोन दिवसांच्या कालावधीत होऊ न शकणारे प्रशिक्षण, नियोजित प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यावर लगतच्या सलग दोन दिवसात पूर्ण करून घ्यावे. तसेच उर्वरित प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होईल याची दक्षता घेण्यात यावी ( माननीय संचालक महोदय यांच्या मान्यतेने)

डॉ. माधुरी सावरकर
उपसंचालक,
सेवापूर्व शिक्षण विभाग,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे-३०

प्रत माहिती र्यवाहीस्तव

१. विभागीय शिक्षण उपसंचालक ( सर्व)



हे ही वाचाल 

दिनांक : १७/१०/२०२४

विषय :- नवनियुक्त शिक्षकांसाठी सेवा प्रवेशोत्तर प्रेरण कार्यक्रम (Induction Program) अंतर्गत प्रशिक्षणाबाबत...

उपरोक्त विषयान्वये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मधील मुद्दा क्रमांक ५.१५ ते ५.२१ मध्ये नवनियुक्त शिक्षकांसाठी प्रेरण कार्यक्रमाचे आयोजन करणे अपेक्षित आहे. आपल्या जिल्ह्यातील नवनियुक्त शिक्षकांसाठी जिल्हास्तरावर ०७ दिवस, (५० तासांचे) प्रशिक्षण दिवाळीच्या सुट्टीच्या कालावधीत दि.०४.११.२०२४ ते १०.११.२०२४ या कालावधीत आयोजित करावयाचे आहे.

जिल्हास्तरावरील सूचना पुढीलप्रमाणे

१) इयत्ता १ली ते ८वी व इयत्ता ९ वी ते १२ वी साठी नवनियुक्त शिक्षकांचे ०७ दिवसांचे प्रशिक्षण सोबत दिलेल्या वेळापत्रक व प्रशिक्षण घटकसंचाप्रमाणे आयोजित करण्यात यावे.
२) पहिले ६ दिवस इयत्ता १ ते ८ व इयत्ता ९ ते १२ वी ला शिकविणा-या शिक्षकांचे समान घटकांचे एकत्रित प्रशिक्षण घ्यावयाचे आहे. सातवा दिवस हा स्वतंत्र घटकांसाठी असेल.
३) वेळापत्रकांची Soft Copy या पत्रासोबत पाठविण्यात येत आहे.
४) प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शक पुस्तिका उपलब्ध करून देण्यात यावी. त्याचप्रमाणे प्रशिक्षणाचे नियोजन करावे.
५) आपल्या स्तरावर वर्ग संख्येनुसार आवश्यक सुलभकांची निवड करावी व त्यांना प्रशिक्षण घटक संचातील समाविष्ट घटकांची माहिती करून द्यावी.
६) सुलभकांना संदर्भ साहित्याचे वाचन करण्यास सांगावे.
७) सदर प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपात द्यावयाचे असून सलग ०७ दिवसांचे राहील. प्रशिक्षण कालावधीत कोणत्याही प्रकारची रजा अनुज्ञेय राहणार नाही (रविवार वगळून). 
८) सदर प्रशिक्षणासाठी होणाऱ्या खर्चात दोन वेळचा चहा, कर्तव्य भोजन याचा. समावेश करता येईल. सदरचा खर्च समग्र TE Program Activity या लेखाशीर्षाखाली भागविण्यात यावा.
९) राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्था शाळांतील सर्व नवनियुक्त शिक्षकांना हे प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य राहील.
१०) आपल्या जिल्ह्यातील १००% नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण होईल याची जबाबदारी संबंधित जिल्ह्यातील प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांची राहील. त्याअनुषंगाने आवश्यक ते समन्वय ठेवून यादी प्राप्त करून घ्यावी.
११) आपल्या मागणीप्रमाणे मार्गदर्शक पुस्तिका SCERT मार्फत संबंधित जिलागच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतील. संस्था 
१२) घटकसंचाची वाहतूक १८.१०.२०२४ पासून सुरु होईल व दिनांक २६.१०.२०२४ पर्यंत सर्व साहित्य संबंधित जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या ठिकाणी पोहोच होईल.

संलग्न - वेळापत्रक

राहूल रेखावार (भा.प्र. से)
संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे
नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण इयत्ता १ ली ते १२वी
👇👇👇👇👇




55
55
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, 
महाराष्ट्र पुणे

जा.क्र. राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (SBTE)/२०२४-२८

दिनांक : १७/१०/२०२४

प्रति,
प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon