DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Inclusion of Acute Optic Neuritis as a Sudden Illness

Inclusion of Acute Optic Neuritis as a Sudden Illness


आकस्मिक आजारांच्या यादीतील अ.क्र.३० वर "Acute Optic neuritis" या आजाराचा आकस्मिक आजार म्हणून समावेश करण्यास मान्यता 

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक १९ मार्च, २००५ च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या आकस्मिक आजारांच्या यादीमध्ये "Acute Optic Neuritis" या आजाराचा समावेश करणेबाबत.

दिनांक : ९ ऑगस्ट, २०२४.


प्रस्तावना :-

शासकीय कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी आकस्मिक निकडीच्या प्रसंगी खाजगी

रुग्णालयातील घेतलेल्या उपचाराच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीकरीता आकस्मिक तसेच गंभीर आजारांची यादी संदर्भीय दिनांक १९ मार्च, २००५ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेली आहे. सदर यादीतील गंभीर आजारांमध्ये संदर्भीय दिनांक २७ मार्च, २०२० च्या शासन निर्णयान्वये सहा गंभीर आजारांचा समावेश करण्यात आला असून, संदर्भीय अ.क्र. ३ व ५ च्या शासन निर्णयान्वये आकस्मिक आजारांमध्ये अनुक्रमे "कोविड-१९" व "म्युकर मायकोसीस" या नवीन आजाराचा समावेश करण्यात आलेला आहे. आता, गृह विभागाने सादर केलेल्या व आरोग्य सेवा आयुक्तालयाने शिफारस केल्याप्रमाणे सदर यादीतील आकस्मिक आजारांमध्ये "Acute Optic neuritis" या आकस्मिक आजाराचा नव्याने समावेश करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होली.

शासन निर्णय क्र. वैखप्र-२०२४/प्र.क्र.५८/राकावि.२

शासन निर्णय :-

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संदर्भीय दिनांक १९ मार्च, २००५ च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या आकस्मिक आजारांच्या यादीतील अ.क्र.३० वर "Acute Optic neuritis" या आजाराचा आकस्मिक आजार म्हणून समावेश करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२. सदर आदेश हे संदर्भीय दिनांक २१ मे, २०२० रोजी निर्गमित केलेल्या अधिसूचनेच्या दिनांका पासून लागू राहतील.

३. हे आदेश वित्त विभागाच्या संदर्भ क्र.१३७४, दिनांक ५ ऑगस्ट, २०२४ अन्वये दिलेल्या मान्यतेस अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहेत.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळा वर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०८०९१४११२२२९१८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

🌐👉 सदर शासन निर्णय पीडीएफ मध्ये हवा असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करून डाऊनलोड करू शकता 👈

(चंद्रकांत ह. वडे)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांकः वैखप्र-२०२४/प्र.क्र.५८/राकावि-२ मंत्रालय, मुंबई 

दिनांक : ९ ऑगस्ट, २०२४.

वाचा :-
१) सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र. एमएजी-२००५/९/प्र.क्र.१/आरोग्य-३, दिनांक १९ मार्च, २००५.
२) सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र. वैखप्र-२०१९/प्र.क्र.२३६/राकावि-२, दिनांक २७ मार्च, २०२०.
३) शासन अधिसूचना क्र. कोरोना-२०२०/प्र.क्र.९७/आरोग्य-५, दि.२१ मे,२०२०
४) सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र. वैखप्र-२०२०/प्र.क्र.६६/राकावि-२, दिनांक १७ डिसेंबर, २०२०,
५) सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन शुध्दीपत्रक क्र. वैखप्र-२०२०/प्र.क्र.६६/राकावि-२, दिनांक ३० एप्रिल, २०२१.
६) सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र. वैखप्र-२०२०/प्र.क्र.६६/राकावि-२, दिनांक ०५ जानेवारी, २०२३.
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon