DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Pre Primary to 12th APAAR ID Compulsory यु डायस प्लस प्रणालीमधून पूर्व प्राथमिक इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत विद्यार्थ्यांचे APAAR आयडी तयार करणेबाबत मार्गदर्शक सूचना

Pre Primary to 12th APAAR ID Compulsory



Guidelines for generation of APAAR ID of students from Pre-Primary, Class 1st to 12th through U-DICE Plus System.

शालेय शिक्षणानाग सथात्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद,  मुंबई

जा.क्र.मप्राशिप/सशि/यु-डायस/संगणक /२०२४-२५/3154
दिनांक: 23 OCT 2024



विषयः यु-डायस प्लस प्रणालीमधून पूर्व प्राथमिक, इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत विद्यार्थ्यांचे APAAR आयडी तयार करणेबाबत मार्गदर्शक सूचना.

असा बनवा विद्यार्थ्यांचा अपार आय डी मार्गदर्शक व्हिडिओ पहा 


    उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये केंद्र शासनाकडून देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांला APAAR आयडी उपलब्ध करून देण्याचा राष्ट्रीय उपक्रम सुरु केला आहे. संदर्भिय पत्र क्र. १ व २ नुसार राज्यातील प्रथम प्राधान्याने यु-डायस प्रणालीमधून इयत्ता ९वी ते १२वी च्या विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देण्याकरिता संदर्भिय पत्रात नमूद आहे.
वाचा 
मार्गदर्शक सूचना या ओळीला स्पर्श करून

संदर्भिय क्र. ३ नुसार केंद्र शासनाकडून राज्यातील सर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे APAAR आयडी तयार करण्यासाठी कळविण्यात आले असून यु-डायस सॉफ्टवेअरमध्ये सुविधा उपलब्ध करून दिली आहे. APAAR आयडी उपलब्ध करुन देण्यासाठी संदर्भिय क्र. १ व २ नुसार मार्गदर्शक सूचना उपलब्ध करून दिल्या आहे. त्या मार्गदर्शक
सूचनांच्या आधारे सर्व विद्यार्थ्यांचे APAAR आयडी तयार करण्याची कार्यवाही पूर्ण करून घेण्यात यावी.
APAAR आयडी तयार करण्याच्या अनुषंगाने शाळेच्या मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देताना 

पुढील मुद्यांच्या प्रामुख्यांने समावेश करण्यात यावा :-

APAAR आयडी तयार करण्याच्या अनुषंगाने संदर्भिय पत्र क्र.०१ व ०२ नुसार केंद्रशासनाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचना व या कार्यालयाकडून मार्गदर्शक सूचना व प्रशिक्षण जिल्हयाचे सर्व संगणक प्रोग्रामर व तालुक्याचे MIS Coordinator यांना देण्यात आले असून शाळेच्या मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देण्याकरीता कळविण्यात आले आहे.

APAAR आयडी तयार करण्याच्या अनुषंगाने Parent Teacher Meeting (PTMs) शाळास्तरावर आयोजित करुन पालकांकडून ना-हरकत प्रमाणपत्र (consent form) भरुन घेण्यात यावे.

APAAR आयडी तयार करण्याच्या अनुषंगाने सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना प्रशिक्षण गट स्तरावरुन प्रशिक्षण देण्यात यावे व दररोज आढावा घेण्यात यावा.

APAAR आयडी तयार करण्याचा राज्यस्तरावरुन दररोज आढावा घेण्यात येईल तसेच, विद्या समिक्षा केंद्रामार्फत त्याचा आढावा घेण्यात येईल. याचप्रमाणे, जिल्हा व तालुका स्तरावरुन APAAR आयडी तयार करण्याबाबत दररोज आढावा घेण्यात यावा व सदर अहवाल विभागीय उपसंचालक, शिक्षण संचालक,आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालयास पाठविण्यात यावा.
APAAR आयडी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिल्यानंतर सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना सदर आयडी हा विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर प्रिंट करण्यासाठी कळविण्यात यावे.

वाचा 
मार्गदर्शक सूचना या ओळीला स्पर्श करून

शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रत्येक आठवड्याला आढावा घेऊन ज्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना APAAR आयडी तयार करुन का दिले नाहीत याबाबत आढावा घ्यावा व त्याबाबतचा अहवाल आयुक्त कार्यालयास व या कार्यालयास पाठविण्यात यावा.शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांनी जिल्हयातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्याने दि.२०/११/२०२४ पर्यंत APAAR आयडी उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने जिल्हयातील सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना आपल्या स्तरावरुन कळविण्यात यावे.

सोबत : केंद्र शासनाकडून प्राप्त झालेले संदर्भिय पत्र.

Circular Copy pdf LINK

(आर. विमला, भा.प्र.से.) 
राज्य प्रकल्प संचालक, म.प्रा.शि.प., मुंबई.

प्रति,
१) आयुक्त, महानगरपालिका, सर्व.
२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.
संदर्भ : १) भारत सरकार, शिक्षा मंत्रालय यांचे पत्र क्र. D.O.No.१- २७/२०२३-DIGED-Part (१) दि. ०२/०९/२०२४ रोजीचे पत्र.
२) कार्यालयाचे जा.क्र.मप्राशिप/सशि/यु-डायस/संगणक/ २०२४-२५/२८८१ दि. २५/०९/२०२४ रोजीचे पत्र.
३) भारत सरकार, शिक्षा मंत्रालय यांचे पत्र क्र. F.No.१-२७/ २०२३-DIGED-Part (१) दि. २१/१०/२०२४ रोजीचे पत्र.
यु-डायस प्लस प्रणालीमधून पूर्व प्राथमिक, इयत्ता १ली ते १२ वी पर्यंत विद्यार्थ्यांचे APAAR आयडी तयार करणेबाबत मार्गदर्शक सूचना.
Guidelines for generation of APAAR ID of students from Pre-Primary, Class 1st to 12th through U-DICE Plus System.
AUTOMATED PERMANENT ACADEMIC ACCOUNT REGISTRY
One Nation, One Student ID
U-Dise Plus मध्ये विद्यार्थ्याचा APAAR ID तयार करा मराठी मध्ये मार्गदर्शक व्हिडिओ Generate Apaar Id
यु डायस प्लस प्रणालीमधून विद्यार्थ्यांचे APAAR ID आयडी तयार करणेबाबत मार्गदर्शक सूचना U Dise Plus APAAR
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon