Stamp Paper Is Not Required For Affidavit
जात प्रमाणपत्र /उत्पन्न प्रमाणपत्र/वास्तव्य प्रमाणपत्र / राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तसेच शासकीय कार्यालये व न्यायालये याचेसमोर दाखल करावयाच्या इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर, आकारणीयोग्य असलेले मुद्रांक शुल्क माफ करीत आहे.
परिपत्रक
संदर्भ:- १) महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांकः मुद्रांक २०१५/प्र.क्र.१११/म-१. दिनांक:-१२ मे, २०१५.
२) नियोजन विभागाचे पत्र क्र. संकीर्ण-१०१५/प्र.क्र.२१८/का-१४२६, दिनांक :-०७ सप्टेंबर, २०१५.
महसूल व वन विभागाच्या उपरोक्त विषयांकित संदर्भ क्र.१ च्या परिपत्रकाची प्रत व महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग चार-ब अधिसुचना दि.०१/०७/२००४ माहिती तथा योग्य त्या कार्यवाहीसाठी. www.mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ठेवण्यात आलेली आहे, त्याची नोंद घेण्यात येऊन योग्य ती कार्यवाही करावी.
Circular pdf Copy LINK
(प्र.मो. पोहरे)
उप संचालक (प्रशासन), अर्थ व सांख्यिकी संचालनालय,मुंबई
शासकीय कार्यालये व न्यायालय यांच्यासमोर दाखल करावयाच्या व इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर असलेले मुद्रांक शुल्क माफ करणेबाबत.
महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
शासन परिपत्रक क्रमांक-मुद्रांक २०१५/प्र.क्र.१११/म-१
दिनांक १२ मे, २०१५
संदर्भ:- महसूल व वन विभाग शासन आदेश क्र. मुद्रांक-२००४/१६३६/प्र.क्र.४३६/म-१, दि.०१ जुलै, २००४.
B
शासन परिपत्रक
शासनाने संदर्भाधिन आदेशान्वये जात प्रमाणपत्र / उत्पन्न प्रमाणपत्र / वास्तव्य प्रमाणपत्र / राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तसेच शासकीय कार्यालये व न्यायालये यांचेसमोर दाखल करावयाच्या इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर मुंबई मुद्रांक अधिनियमातील तरतूदीनुसार देय असलेले मुद्रांक शुल्क माफ केले आहे. आदेशाची प्रत नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, पुणे यांच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या आदेशांचे शासकीय कार्यालयांमधून व अधिका-यांकडून काटेकोरपणे पालन होणे अपेक्षित आहे.सामान्य नागरिक/विद्यार्थी वर नमूद केलेल्या कारणांकरिता प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी जेव्हा शासकीय कार्यालयात जातो किंवा अधिका-यांकडे जातो तेव्हा त्यांचेकडून सदर प्रतिज्ञापत्र स्टैंप पेपरवर करून आणण्याचा आग्रह धरला जातो, अशी बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. लोकहितास्तव शासनाने वरील प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांवर मुद्रांक शुल्क माफ केलेले असल्याने, शासकीय अधिका-यांनी प्रतिज्ञापत्र स्टैंप पेपरवर करून आणण्याची आग्रही भूमिका न घेता प्रतिज्ञापत्र सादर करून घेणे बंधनकारक आहे. तरी, मंत्रालयीन विभागांनी त्यांच्या अधिपत्यांखालील सर्व कार्यालये व अधिकारी/ कर्मचारी यांना सदर आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सुचना द्याव्यात.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,
Circular pdf Copy LINK
(श्री. श्यामसुंदर पाटील)उपसचिव
अस्रा. क्र. १५४
रजिस्टर्ड नं. टीईसीएच/४७-३०३/एमबीआय /२००३-०५
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण प्राधिकृत प्रकाशन
गुरुवार, जुलै १, २००४/आषाढ १०, शके १९२६
स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग चार-ब
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल * यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
महसूल व वन विभाग मंत्रालय, मुंबई
दिनाक १ जुलै २००४
मुंबई मुद्रांक अधिनियम, १९५८.
आदेश
क्रमांक मुद्रांक. २००४/१६३६/प्र. क्र. ४३६/१-१. मुंबई मुद्रांक अधिनियम, १९५८ (१९५८ चा मुंबई ६०) याच्या कलम ९ च्या खंड (अ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून लोकहितास्तव तसे करणे आवश्यक आहे अशी खात्री पटल्यामुळे महाराष्ट्र शासन याद्वारे जात प्रमाणपत्र /उत्पन्न प्रमाणपत्र/वास्तव्य प्रमाणपत्र / राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तसेच शासकीय कार्यालये व न्यायालये याचेसमोर दाखल करावयाच्या इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर, उक्त अधिनियमाच्या अनुसूची १ मधील अनुच्छेद ४ अन्वये आकारणीयोग्य असलेले मुद्रांक शुल्क माफ करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल याच्या आदेशानुसार व नावाने
भा. सु. तायडे,
शासनाचे अवर सचिव,
भाग चार-(५२४)
५२५ महाराष्ट्र शासन राजपत्र, असा., जुलै १, २००४/आपाढ १०, शके १९२६ [भाभचार-ब
REVENUE AND FORESTS DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated the 1st July 2004
Order
BOMBAY STAMP ACT, 1958.
No. Mudrank. 2004/1636/C.R.-436/M-1. In exercise of the powers conferred by clause (a) of section 9 of the Bombay Stamp Act, 1958 (Bom. LX of 1958), the Government of Maharashtra having satisfied that it is necessary to do so in the public interest, hereby remits the stamp duty chargeable under article 4 of the Schedule I appended to the said Act, on the instruments of affidavit or declaration made for obtaining Caste Certificate/Income Certificate/Domicile Certificate/Nationality Certificate or for any other purpose of being filed or used before any Government Authority or in any Court or before the officer of any Court.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
Circular pdf Copy LINK
B. S. TAYADE,
Under Secretary to Government.
प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपर आवश्यक नाही
क्रमांक- संकिर्ण/२०१५/प्रशा-३/२/७०४ अर्थ व सांख्यिकी संचालनालय, महाराष्ट्र शासन, प्रशासकीय इमारत, ८ वा मजला, शासकीय वसाहत, मुंबई उपनगर जिल्हा, वांद्रे (पूर्व), मुंबई
दिनांक :- २१/९/२०१५
क्रमांक- संकिर्ण/२०१५/प्रशा-३/२/७०४ अर्थ व सांख्यिकी संचालनालय, महाराष्ट्र शासन, प्रशासकीय इमारत, ८ वा मजला, शासकीय वसाहत, मुंबई उपनगर जिल्हा, वांद्रे (पूर्व), मुंबई
दिनांक :- २१/९/२०१५
परिपत्रक
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon