Implementation of Basic Literacy and Numeracy Mission
National Initiative For Proficiency In Reading With Understanding and Numeracy (NIPUN BHARAT)
विषय : भारत सरकारच्या National Initiative for Proficiency in Reading with Understanding and Numeracy (NIPUN BHARAT) अंतर्गत " मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान" ची अंमलबजावणी करणेबाबत.
जा.क्र.मप्राशिप/सशि/FLN/२०२४-२५/०४/०-३००७
दि. 08 OCT 2024
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन २०२० नुसार, प्राथमिक स्तरावर सन २०२६-२७ पर्यंत मुलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. यात प्राथमिक पातळीवरील अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त केले नाही, असे ठळकपणे नमूद आहे. वय वर्षे ३ ते ९ वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना मुलभूत साक्षरता व संख्या धान प्राप्त करण्यासाठी त्वरीत एक राष्ट्रीय अभियान राबवून त्याची राज्यामध्ये अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. सदर अभियानात विद्यार्थी, पालक, शाळा, शिक्षक व समाज या सर्वांनी सर्वंकष पुढाकार घेऊन राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणाचा पाया मजबूत करणे गरजेचे आहे.
त्यासाठी भारत सरकारने "समग्र शिक्षा" मध्ये निपुण भारत (National Initiative for Proficiency In Reading with Understanding and Numeracy) अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांने इयत्ता ३री पर्यंत मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान सन २०२६-२७ पर्यंत प्राप्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. याकरिता कृती आराखडा तयार करणे, विषयसूची व प्राधान्यक्रम ठरविण्याची गरज आहे. यासाठी जिज्ञासूपणास वाव देणारा अभ्यासक्रम व शैक्षणिक साहित्य (ऑफलाईन व ऑनलाईन) निश्चित क्षमता विधाने (learning Competencies) व अध्ययन निष्पत्ती (Learning Outcomes), शिक्षक सक्षमीकरण, मूल्यमापनाची तंत्रे इत्यादी विकसित करणे आवश्यक आहे.
मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्हा प्रकल्प सनियंत्रण कक्ष कार्यरत राहील.
केंद्र शासनाच्या सन २०२४-२५ करिता प्रकल्प मान्यता मंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त या कार्यालयास दि. ०५/०३/२०२४ रोजी या कार्यालयास प्राप्त झालेले आहे. जिल्हा प्रकल्प सनियंत्रण कक्षास प्रत्येकी ०१.०० लाख याप्रमाणे ३५ जिल्हयांकरीता ३५.०० लाख तरतूद मंजूर आहे.
जिल्हा प्रकल्प सनियंत्रण कक्ष (PMU)
अतिरिक्त आयुक्त महानगरपालिका, मुंबई / शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग / मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद हे संबंधित कार्यक्षेत्रासाठी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाचे त्या स्तरावर अभियान संचालक असतील. जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / शिक्षण निरीक्षक, मुंबई हे या अभियानाचे उप प्रकल्प संचालक असतील. गट व शहर साधन केंद्र स्तरावर कार्यरत सहा विषय साधन व्यक्तींपैकी एका साधन व्यक्तीची पूर्ण वेळ नोडल व्यक्ती म्हणून ते नियुक्ती करतील. जिल्हास्तरीय कक्षासाठी गरजेनुसार समग्र शिक्षा अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावरील संगणक प्रोगामर/MIS Coordinator/Data Entry Operator तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील विषयतज्ज्ञ / साधनव्यक्ती (समावेशित शिक्षण) यांच्या सेवा मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान या अभियानाचे संचालक यांना उपलब्ध करून घेता येतील.
जिल्हा प्रकल्प सनियंत्रण कक्ष (PMU) संरचना)
अ.क्र. नाव पदनाम
१ अतिरिक्त आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका / मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद / सहाय्यक शिक्षण संचालक, मुंबई विभाग - अध्यक्ष तथा अभियान संचालक
२ आयुक्त, महानगरपालिका (संबधित जिल्हयातील) -सदस्य
३ उपायुक्त / प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास विभाग - सदस्य
४ संचालक, विभागीय विद्याप्राधिकरण मुंबई / प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सदस्य
५ उपआयुक्त महिला व बाल विकास / उपमुख्य कार्यकारी अधिकारी एकात्मिक बाल विकास - सदस्य
६ उपआयुक्त / जिल्हा समाज कल्याण अधिकारी सदस्य
७ जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद - सदस्य
८ शिक्षण अधिकारी / प्रशासन अधिकारी महानगरपालिका - सदस्य
९ प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था / जिल्हा शिक्षण अधिकारी (जिल्हा सुकाणू समितीने मान्य केलेले) - सदस्य सचिव
जिल्हा सनियंत्रण कक्षाच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे आहेत.
जिल्हास्तरीय अंमलबजावणी करणाऱ्या सर्व यंत्रणामध्ये समन्वय निर्माण करणे.
अध्ययन अध्यापन साहित्य विकसित करणे, शिक्षकांचे प्रशिक्षण यासाठी मदत करणे.
या अभियानाची अंमलबजावणी सुलभरित्या व्हावी यासाठी संबंधितांकडून वेळोवेळी आढावा बैठका आयोजित करणे.
जिल्हा स्तरावर FLN व LEP संदर्भात आयोजित उपक्रमाच्या कार्यकृतीचा अहवाल राज्य कार्यालयास सादर करणे.
माहितीवर आधारित डॅशबोर्ड तयार करणे, निर्णय प्रक्रियेला व अध्ययन-अध्यापनात सुधार होण्यासाठी या माहितीचा उपयोग करणे.
मंजूर तरतूद
Major Component - Quality Interventions
Sub Component -Nipun Mission Bharat Mission
Activity Formation
Sub Activity District level
R/NR - R
PHY QTY - 35
Unit Cost -1.00000
Amount in lakh - 35,00000
(आर. विमला भा.प्र.से.)
राज्य प्रकल्प संचालक,
म.प्रा.शि.प., मुंबई.
प्रति,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.
GOVERNMENT OF MAHARASHTRA SCHOOL EDUCATION AND SPORTS DEPARTMENT SAMAGRA SHIKSHAN MAHARASHTRA PRATHAMIK SHIKSHAN PARISHAD
संदर्भ
१) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्रमांक संकीर्ण - २०२१/प्र.क्र.१७९/एसडी-६, दि. २७/१०/२०२१
२) केंद्रशासनाच्या प्रकल्प मान्यता मंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त दि. ०५/०३/२०२४
भारत सरकारच्या National Initiative For Proficiency In Reading With Understanding and Numeracy (NIPUN BHARAT) अंतर्गत "मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान" ची अंमलबजावणी करणेबाबत.
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०२१/प्र.क्र.१७९/एसडी-६,
मुंबई
दिनांक : २७ ऑक्टोबर, २०२१.
वाचा:-
१. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९
२. महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, २०११.
३. समावेशित शिक्षण शासन निर्णय २०१७ (११८/१७) एस.डी.६, दि.१६/१०/२०१८.
४. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१९/प्र.क्र.७६/एसडी-६, दि.३०/०७/२०१९
५. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२०.
६. भारत सरकारच्या निपुण भारत FLN Mission मार्गदर्शक सूचना, दि.०६/०७/२०२१.
प्रस्तावना:-
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन २०२० नुसार, प्राथमिक स्तरावर सन २०२६-२७ पर्यंत मुलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. यात प्राथमिक पातळीवरील अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त केले नाही, असे ठळकपणे नमूद आहे. वय वर्षे ३ ते ९ वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी त्वरीत एक राष्ट्रीय अभियान राबवून त्याची राज्यामध्ये अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. सदर अभियानात विद्यार्थी, पालक, शाळा, शिक्षक व समाज या सर्वांनी सर्वकष पुढाकार घेऊन राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणाचा पाया मजबूत करणे गरजेचे आहे.त्यासाठी भारत सरकारने "समग्र शिक्षा" मध्ये निपुण भारत (National Initiative For Proficiency In Reading With Understanding and Numeracy) अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता ३ री पर्यंत मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान सन २०२६-२७ पर्यंत प्राप्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. याकरिता कृती आराखडा तयार करणे, विषयसूची व प्राधान्यक्रम ठरविण्याची गरज आहे. यासाठी जिज्ञासूपणास वाव देणारा अभ्यासक्रम व शैक्षणिक साहित्य (ऑफलाईन व ऑनलाईन), निश्चित क्षमता विधाने (Learning Competencies) व अध्ययन निष्पत्ती (Learning Outcomes), शिक्षक सक्षमीकरण, मूल्यमापनाची तंत्रे इत्यादी विकसित करणे आवश्यक आहे. सध्या इयत्ता ४ थी व ५ वी मधील ज्या विद्यार्थ्यांनी मुलभूत कौशल्ये प्राप्त केली नाहीत, त्यानांही आवश्यक नैपुण्य प्राप्त करण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन, समवयस्क विद्यार्थ्यांसोबत गटकार्य व वयानुरूप पूरक अध्ययन साहित्य (छापील व डिजिटल स्वरूपात) उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon