Increase In Rate of Sewing Washing Allowance for Uniforms of Class 4 Employees
राज्य शासकीय चतुर्थश्रेणी संवर्गामधील कर्मचाऱ्यांच्या गणवेशाच्या शिलाई भत्ता दरात व धुलाई भत्ता दरात सुधारणा करणेबाबत.
दिनांक: १० ऑक्टोबर, २०२४.
प्रस्तावना :- राज्य शासकीय चतुर्थश्रेणी संवर्गातील कर्मचाऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या गणवेशाच्या विविध बाबींमध्ये म्हणजेच शिलाई दरात सुधारणा करणे, महिला कर्मचाऱ्यांच्या ब्लाऊजचे शिलाई दर वाढविणे, गणवेश धुलाई भत्ता दरात सुधारणा करणे तसेच गरम कपड्याच्या गणवेशाच्या शिलाई दरात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
राज्य शासकीय चतुर्थश्रेणी संवर्गातील कर्मचाऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या गणवेशाच्या विविध बाबींमध्ये म्हणजेच शिलाई दरात सुधारणा करणे, महिला कर्मचाऱ्यांच्या ब्लाऊजचे शिलाई दर वाढविणे, गणवेश धुलाई भत्ता दरात सुधारणा करणे तसेच गरम कपड्याच्या गणवेशाच्या शिलाई दरात खालीलप्रमाणे वाढ करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
३. वरीलप्रमाणे दर सुधारीत केल्यामुळे येणारा वाढीव खर्च संबंधित विभाग / कार्यालयाने त्यांच्या मंजूर अनुदानातून मागवावा.
६. उपरोक्त विवरणपत्रातील दरास खालील अटींच्या अधीन मान्यता देण्यात येत आहे.
। राज्य शासकीय चतुर्थश्रेणी संवर्गातील गणवेशपात्र कर्मचाऱ्यांना गणवेश शिलाई व घुलाई भत्ता अनुज्ञेय करताना, या कर्मचाऱ्यांकडून कार्यालयीन वेळेत नियमितरित्या गणवेश परिधान करण्यात येत असल्याची तपासणी करण्याची लक्ष ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत प्रशासकीय / नियंत्रण अधिकारी यांची राहील.
॥ गणवेश शिलाई व धुलाई भत्त्याची देयके चतुर्थश्रेणी संवर्गातील गणवेशपात्र कर्मचाऱ्यांकडून संबंधित कार्यासनास विहित कालावधीत सादर करण्यात येत असल्याची खातरजमा करण्याची सर्वस्वी जबाबदारी विभागाची राहील. तसेच या कर्मचाऱ्यांना गणवेश शिलाई दराची व धुलाई भत्त्याची रक्कम प्रदान करताना सा.प्र.वि. शासन निर्णय दि. २६/०३/२००८ च्या परिच्छेद ५ नुसार कार्यवाही करण्याची दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित विभागांची राहील.
बाह्ययंत्रणेने भरण्यात येणाऱ्या चतुर्थश्रेणी पदांना प्रस्तावित गणवेश शिलाईभत्ता, धुलाईभत्ता अनुज्ञेय असणार नाही, याची दक्षता घेण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहील,
iv विभागातील तसेच मंत्रालयीन अन्य विभागातील चतुर्थश्रेणी संवर्गातील गणवेशपात्र कर्मचाऱ्यांच्या संख्येची खातरजमा करण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहील.
✓ सुधारीत दरामुळे येणारा वाढीव खर्च विहित लेखाशिर्षांतर्गत मंजूर अनुदानातून भागविण्याची दक्षता
घेण्याची जबाबदारी संबंधित विभागांची / नियंत्रण अधिकारी यांची राहील.
सदर शासन निर्णयानुसार ज्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना शिलाई भत्ता, धुलाई भत्ता इत्यादी देण्यात येणार आहे, त्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या व त्यांच्यावर होणाऱ्या आर्थिक भाराची गणना सर्व मंत्रालयीन विभागांनी त्यांच्या खुद्द आस्थापनेवरील व त्यांच्या अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांची एकत्रित माहिती या विभागास एका महिन्यात सादर करावी.
७. दि . ३०.०९.२०२४ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.
वरील शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने व त्यांच्या अनौ. संदर्भ क्रमांक ५५५७/ व्यय-४
८. करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४१०१०११५३०१५५०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
(सु. मो. महाडिक)
सह सचिव, सामान्य प्रशासन विभाग
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. : गणवेश-२०२४/प्र.क्र.६७/ जपुक (२९) मुंबई
पहा:
१) शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक सीएलओ १०७०, एक्सएल, दिनांक ९ ऑक्टोबर, १९७०,
२) शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक सीएलओ १०८१/१६४५/५-८१/२९, दिनांक १ सप्टेंबर, १९८२
३) शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक सीएलओ १०८३/२५१४/२९, दिनांक १९ सप्टेंबर, १९९०, .
४) शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक पोशाख-१०८५/८९-८५/२९, दिनांक १५ एप्रिल, १९९१
५) शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक गधुम-३५९४/प्र.क्र.३१/९५/२९, दिनांक ८ फेब्रुवारी, १९९६.
६) शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक गणवेष-३४०३/प्र.क्र.१२६/२००४/२९, दिनांक २६ मार्च, २००८.
७) शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक गणवेष ३४०३/प्र.क्र.१२६/२००४/२९, दिनांक ८ एप्रिल, २००८.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon