DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Holiday for voters to vote on polling day मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी


विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-२०२४ करिता सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, शासन परिपत्रक क्रमांक-मतदान २०२४/प्र.क्र.२१९/कामगार-९
मंत्रालय, मुंबई

दिनांक : ०७ नोव्हेंबर, २०२४

संदर्भः - १) भारत निवडणूक आयोग यांचे क्र. ECI/PN/१४९/२०२४, दि.१५ ऑक्टोबर, २०२४ रोजीचे

 प्रसिध्दीपत्रक

२) भारत निवडणूक आयोग यांचे क्रमांक ७८/EPS/२०२४, दि.१६ ऑक्टोबर, २०२४ रोजीचे पत्र.
शासन परिपत्रकः-
आपल्या देशातील लोकशाही पध्दतीनुसार असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये १०० टक्के मतदान करणे अपेक्षित आहे. ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ (भाग-२) मधील नियम १३५ (ब) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये असे दिसून आले आहे की, संस्था/आस्थापना इ. भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नाहीत. यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित रहावे लागते, जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे.
👇
ही वाचाल 
मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मतदानाचे कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना सुट्टी 
👆
२. भारत निवडणूक आयोगाने दि. १५ ऑक्टोबर, २०२४ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे महाराष्ट्र राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. सदर निवडणूकीचे मतदान दि. २० नोव्हेंबर, २०२४ रोजी होणार आहे.
३. भारत निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रितीने बजावता यावा यासाठी खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहेत:-
1) निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.
II) सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने
इत्यादींना लागू राहील. (उदा. खाजगी कंपन्या या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाटयगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ.)
III) अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी संबंधित जिल्हा निवडणुक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणेआवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची भरपगारी सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.
IV) वर नमूद केल्यानुसार उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यार्दीच्या मालकांनी/व्यवस्थापनाने वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुध्द योग्य कारवाई करण्यात येईल.
४. सदर परिपत्रक भारत निवडणूक आयोग यांचे क्र.ECI/PN/१४९/२०२४, दि.१५ ऑक्टोबर, २०२४ रोजीचे प्रसिध्दीपत्रक आणि भारत निवडणूक आयोग यांचे क्रमांक ७८/EPS/२०२४, दि.१६ ऑक्टोबर, २०२४ रोजीचे पत्रास अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.
५. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४११०७१५०६१८८११० असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(स्वप्निल कापडणीस)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

Also Read -

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करीता सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याबाबत.


दिनांक: २४ ऑक्टोबर, २०२४.


        शासन परिपत्रक

आपल्या देशाने लोकशाही पद्धती स्वीकारली असून १८ वर्षांवरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणूकीमध्ये मतदान करणे अपेक्षित आहे. ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ मधील कलम १३५ (ब) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र गेल्या काही निवडणूकांमध्ये असे दिसून आले आहे की, संस्था/आस्थापना इ. भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नाहीत. त्यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित रहावे लागते, जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे.
२. भारत निवडणूक आयोगाने दि.१५ ऑक्टोबर, २०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाव्दारे महाराष्ट्र राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. सदर निवडणूकीचे मतदान दि.२० नोव्हेंबर, २०२४ रोजी होणार आहे.
३. भारत निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा यासाठी लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ मधील कलम १३५ (ब) नुसार खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहेत :-
1. निवडणूक होणा-या मतदान क्षेत्रातील कोणत्याही व्यवसायात, व्यापारात, औद्योगिक उपक्रमात किंवा इतर कोणत्याही आस्थापनेमध्ये कार्यरत असलेल्या आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला, मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल. सदर सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणा-या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहील.
॥. पोटकलम (1) नुसार मंजूर झालेल्या सुट्टीच्या कारणास्तव अशा कोणत्याही व्यक्तीच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही आणि जर अशा व्यक्तीला अशा दिवसासाठी सामान्यतः वेतन मिळणार नाही या आधारावर कामावर ठेवले असेल, तरीही त्या दिवशी त्याला सुट्टी दिली नसती तर त्याने काढले असते असे वेतन त्याला अशा दिवसासाठी दिले जाईल.
॥. जर एखाद्या नियोक्त्याने उप-कलम (1) किंवा उप-कलम (1) च्या तरतुदींचे उल्लंघन केले, तर असा नियोक्ता निवडणूक आयोगाच्या नियमानुसार शिक्षेस पात्र असेल.
IV. हे कलम अशा कोणत्याही मतदाराला लागू होणार नाही ज्यांच्या अनुपस्थितीमुळे तो ज्या
रोजगारामध्ये गुंतला आहे त्या रोजगाराच्या संदर्भात धोका किंवा मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.
V. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहिल.
VI. वर नमूद केल्यानुसार उद्योग विभागांतर्गत येणा-या सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांनी वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी, मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येईल.
३. सदर परिपत्रक भारत निवडणूक आयोग यांचे क्रमांक क्रमांक ECI/PN/१४९/२०२४, दि.१५ ऑक्टोबर, २०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकास आणि भारत निवडणूक आयोग यांचे क्रमांक ७८/EPS/२०२४ दि.१६ ऑक्टोबर, २०२४ रोजीचे पत्र यांस अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.
४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध
करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४१०२४१५२८००५५१० असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.
महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, शासन परिपत्रक क्र. विसानि-२०२४/प्र.क्र.९७/उद्योग-६,
मंत्रालय, मुंबई-३२

संदर्भ :- १. भारत निवडणूक आयोग यांचे क्रमांक ECI/PN/१४९/२०२४, दि.१५ ऑक्टोबर, २०२४
रोजीचे प्रसिद्धीपत्रक,
२. भारत निवडणूक आयोग यांचे क्रमांक ७८/EPS/२०२४ दि.१६ ऑक्टोबर, २०२४ रोजीचे पत्र.

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon