Ghar Ghar Sanvidhan karykram GR
संविधान अमृत महोत्सव २०२४-२५ "घर घर संविधान" हा कार्यक्रम २६ नोव्हेंबर, २०२४ पासून साजरा करावा
भारतीय संविधानास ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ पासून "घर घर संविधान" कार्यक्रम साजरा करणेबाबत
--------------------------------------------------------------------------------------------------------
संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ पासून *घर घर संविधान* कार्यक्रम साजरा करणेबाबत.
तदनुषंगाने शालेय स्तरावर उपक्रमांचे आयोजन दि.२६ नोव्हेंबर, २०२४ ते दि.२६ जानेवारी, २०२५ या कालावधीत करण्याचे नियोजित आहे. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांच्याकडून पोर्टलवर प्रश्नमंजुषा अपलोड करण्यात आली आहे. सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक व पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व अधिकारी यांनी MyGov पोर्टलवर लॉग इन LINK करावे व नंतर LINK या लिंकचा वापर करून सदर प्रश्नमंजुषा शुक्रवार दि.०६ डिसेंबर २०२४ पर्यंत सोडवावी. तसेच सदर उपक्रमांतर्गत विविध कृती व उपक्रम वेळच्या वेळी पूर्ण करण्यात यावेत.
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व
--------------------------------------------------------------------------------------------------------
दिनांक: १० ऑक्टोबर, २०२४
प्रस्तावना :-
दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी आपण संविधान स्वीकृत करुन दिनांक २६ जानेवारी, १९५० पासून संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली. संविधानाचे महत्व अनेक स्तरांवर असुन भारतीय संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा विचार केलेला आहे. संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहे जे देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्वपूर्ण भूमिका बजावते.
संविधान दिना निमित्त प्रश्न मंजुषा 03 सोडवण्यासाठी
⏬
⏬
संविधान दिना निमित्त प्रश्न मंजुषा 01 सोडवण्यासाठी
⏬
संविधान दिना निमित्त प्रश्न मंजुषा 02 सोडवण्यासाठी
⏬
⏬
२. भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता, तसेच संविधानाची मुल्ये शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच देशाचे भावी नागरिक यांच्यापर्यंत पोहचावीत यासाठी राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक / बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित/ विनाअनुदानित/ स्वयं अर्थसहाय्यित शाळा/ आश्रमशाळा व वसतिगृहे तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था, महाराष्ट्र विधानपरिषद/विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय संविधानास ७५ वर्ष पुर्ण झाल्याानिमित्त सन २०२४-२५ या अमृतमहोत्सवी वर्षात संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ "घर घर संविधान" साजरा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
🤣 हेही वाचायला आवडेल नक्की वाचाल 😃
शासन निर्णयः-
राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक/बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित/ विनाअनुदानित/ स्वयंअर्थसहाय्यित शाळा / आश्रमशाळा व वसतिगृहे, ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था तसेच महाराष्ट्र विधानपरिषद/विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता, तसेच घटनात्मक अधिकार व कर्तव्यांबदल सर्व नागरिकांमध्ये जागरुकता वाढविण्यासाठी संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ "घर घर संविधान" साजरा करण्याचा उद्देश खालीलप्रमाणे आहे:-
१. संविधानाची जागरूकताः-
संविधानाचे महत्व, त्यातील मूल्ये आणि त्याची अंमलबजावणी याबाबत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तसेच भावी नागरिकांमध्ये जागरूकता वाढवणे.२. शिक्षण:-
संविधानातील मूलभूत हक्क, कर्तव्ये, आणि विविध तरतुदींचे शिक्षण देणे, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक न्यायाची भावना रुजवणे.
३. मूल्यसंस्कारः-
भारतीय संविधानातील समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही मूल्यांचा प्रचार व प्रसार करणे, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विविधतेतून एकता आणि समता या संकल्पनांचा विकास होईल.
४. सक्रिय सहभागः-
विद्यार्थ्यांना संविधानाच्या अध्ययनामुळे आणि चर्चेद्वारे त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अधिकारांची जाणीव करून देणे आणि त्यांच्या जबाबदा-यांचे पालन करण्यासाठी प्रेरित करणे.
५. राष्ट्रीय एकात्मताः-
व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा प्रचार व प्रसार करणे, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना बळकट होईल.
२. राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक / बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय व अनुदानित वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित/ विनाअनुदानित/ स्वयंअर्थसहाय्यित शाळा/ आश्रमशाळा व वसतिगृहे ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था व महाराष्ट्र विधानपरिषद/विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता, तसेच उपेक्षित समुदायांमध्ये घटनात्मक अधिकार व कर्तव्यांबदल जागरुकता वाढविण्यासाठी संविधान अमृत महोत्सव २०२४-२५ "घर घर संविधान" साजरा करण्याच्या अनुषंगाने खालील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
संविधान अमृत महोत्सव २०२४-२५ "घर घर संविधान" अंतर्गत घ्यावयाचे स्पर्धा / उपक्रम :-
क्रमांक
अ उपक्रम संबंधित यंत्रणा संबंधित सर्व विभाग
प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक / बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित/ विनाअनुदानित/ स्वयंअर्थसहाय्यित शाळा/ आश्रमशाळा व वसतिगृहे.
१. शाळा/महाविद्यालय / वसतिगृहे यांच्या दर्शनी भागात संविधानाची उद्देशिका लावणे
२. शालेय परिपाठात तसेच वसतिगृह प्रार्थनेत दररोज संविधान प्रास्ताविका/उद्देशिकचे वाचन विद्यार्थ्यांकडून करवून घेणे.
३. शालेय वाचनालयात संविधानाच्या किमान पाच प्रती विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करवून देणे .
४ भारतीय संविधान बाबत सर्वसाधारण माहिती देणे जसे, निर्मिती, निर्मिती समिती, अनुच्छेद, विशेषता, कर्तव्ये यावर व्याख्यान (किमान ६० ते ९० मिनिटे)
५. विद्यार्थ्यांना भारतीय संविधानातील प्रमुख प्रकरणे, हक्क, आणि कर्तव्ये यांवर मार्गदर्शन करणे
६. कार्यशाळांद्वारे विद्यार्थ्यांना संविधानाचे तत्त्वज्ञान आणि मूल्ये समजावून सांगणे.
७. संविधान मुल्ये यावर पथनाट्य तयार करणे
८. शाळा/महाविद्यालयात संविधानाच्या विविध मुद्यांवर फलक, पोस्टर, आणि प्रदर्शन आयोजित करणे
९. संविधान दिन कार्यक्रम आयोजित करणे, ज्यात पथनाट्य आणि पोस्टर प्रदर्शन याचा समावेश करावा.
१०. संविधानावर आधारित निबंध लेखन, भाषण, वादविवाद, चित्रकला स्पर्धा इत्यादी उपक्रमांचे आयोजन करणे.
११. प्रजासत्ताक दिनी संविधानातील मुल्यांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन व सादरीकरण. (जसे देशभक्तिपर गाणी, नाटक, आणि नृत्य)
ब ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था
ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्थाच्या वेळोवेळी होणाऱ्या वार्षिक ग्राम सर्वसाधारण सभा, मासिक सभा, ग्रामसभा इत्यादी सभांची सुरूवात भारतीय संविधान प्रास्ताविकेच्या वाचनाने करावी. ग्राम विकास / नगर विकास विभाग विभाग
क महाराष्ट्र विधानपरिषद/ विधानसभा
महाराष्ट्र विधानपरिषद विधानसभा यांच्या सत्रांची सुरूवात भारतीय संविधान प्रास्ताविकेच्या वाचनाने करावी यासंदर्भात संसदीय कार्ये विभागाने मार्गदर्शक सूचना निर्गमित कराव्यात. - संसदीय कार्ये विभाग
ड संविधान संमेलन
राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये संविधानाचे प्रबोधन होण्याकरिता संविधान संमेलनाचे आयोजन करावे. - संबंधित सर्व जिल्हाधिकारी
३. राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक / बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित/ विनाअनुदानित/ स्वयंअर्थसहाय्यित शाळा/ आश्रमशाळा व वसतिगृहे तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था, महाराष्ट्र विधानपरिषद/विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता निर्माण व्हावी. तसेच भारतीय संविधानाच्या मुलभुत तत्वांची माहिती समाजातील उपेक्षित घटकास व्हावी यासाठी सदर कार्यक्रमाची रुपरेषा निश्चित करुन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन व सल्ला देण्याच्या अनुषंगाने मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे राज्यस्तरीय घर घर संविधान समिती स्थापन करण्यात येत आहे.
अ.क्र. पदनाम विभाग पदनाम
१. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य - अध्यक्ष
२. प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग -सदस्य
३. प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग - सदस्य
४. प्रधान सचिव, इतर मागास व बहुजन कल्याण विभाग -सदस्य
५. प्रधान सचिव, ग्रामविकास विभाग -सदस्य
६ प्रधान सचिव, नगरविकास विभाग सदस्य
७. सचिव, आदिवासी विकास विभाग -सदस्य
८.सचिव, दिव्यांग कल्याण विभाग - सदस्य
९.सचिव, महिला व बालविकास विभाग - सदस्य
१०. सचिव, अल्पसंख्यांक विकास विभाग - सदस्य
११. सचिव, संसदीय कार्य विभाग - सदस्य
१२. सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग - सदस्य सचिव
उपरोक्त गठीत राज्यस्तर घर घर संविधान समितीमार्फत जिल्हास्तरावरील समित्यांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या संविधान कायक्रमांबाबत नियमितपणे आढावा घेण्यात येईल.
४. घर घर संविधान कार्यक्रम जिल्हास्तरावर राबविण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात येत आहे:-
अ.क्र. पदनाम विभाग पदनाम
१. जिल्हाधिकारी - अध्यक्ष
२. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद - सदस्य
३. सर्व मुख्याधिकारी, नगरपंचायत/नगरपरिषद/ नगरपालिका - सदस्य
४. शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद - सदस्य
५. महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा परिषद - सदस्य
६ सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, - सदस्य
७.निवासी उपजिल्हाधिकारी, - सदस्य सचिव
जिल्हास्तरीय समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या घर घर संविधान या कार्यक्रमांची अंमलबजावणी, देखरेख व संनियंत्रण करण्यासाठी जिल्ह्यातील इतर आवश्यक अधिकारी यांचा समितीमधील सदस्य प्रतिनिधी म्हणून समावेश संबंधित जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावर करावा.
- जिल्हास्तरीय समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे राहील:-
- संविधान मंचाच्या कार्याची वार्षिक योजना तयार करणे, ज्यामध्ये विविध उपक्रम,कार्यक्रम, चर्चा सत्रे, आणि स्पर्धा आयोजित करण्याचे नियोजन करणे.
- संविधान दिन (२६ नोव्हेंबर) आणि प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) यासारख्या महत्वाच्या तारखावर तसेच महिनावार वेळापत्रक आखून विशेष कार्यक्रम आयोजित करणे.
- सदर समितीने उपरोक्त मार्गदर्शक सूचनांव्यतिरिक्त आपल्या स्तरावरून नावीन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश करून अधिक चांगल्या रीतीने कार्यक्रमांची अंमलबजावणी करावी.
- संविधान अमृत महोत्सव २०२४-२५ "घर घर संविधान" हा कार्यक्रम २६ नोव्हेंबर, २०२४ पासून साजरा करावा.
५. संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ "घर घर संविधान" हा कार्यक्रम दि.२६ नोव्हेंबर, २०२४ पासून पुढील प्रत्येक वर्षी सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्याकरिता संबंधित जिल्हाधिकारी यांनी सदर कार्यक्रमाचे वार्षिक वेळापत्रक तयार करून अंमलबजावणी करावी. तसेच संबंधित जिल्ह्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची खात्री व सनियंत्रण संबंधित विभागीय आयुक्त यांनी करावे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुल्यमापन करून त्याबाबतची नोंद संबंधित जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व विभागीय आयुक्त, यांच्या वार्षिक मुल्यांकन अहवालात घेण्यात यावी
६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या 🌐 👉 www.maharashtra.gov.in 👈 या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेतांक २०२४१०१०१९०८११९३२४ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकीत करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
GR pdf Copy Link
(विजय वाघमारे)
सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांकः बीसीएच-२०.क्र.प्र/२४२५९२-शिक्षण/ मंत्रालय विस्तार, मुंबई
Indian Constitution Amrit Mahotsav 2024-25 "Ghar Ghar Constitution" Program
Regarding the celebration of Constitution Amrit Mahotsav from the year 2024-25 on the occasion of the completion of 75 years of the Constitution of India "Ghar Ghar Constitution" Program
Ghar Ghar Constitution Program Indian Constitution Amrit Mahotsav
Sanvidhan Amrit mahotsav Ghar Ghar sanvidhan karykram
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon