Madhyamik Uccha Madhyamik Vidyarthi Kala Utsav Aayojan
दि. ११/०९/२०२४
विषयः माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी कला- उत्सव आयोजित करणेबाबत...
संदर्भः एन. सी. ई. आर. टी. नवी दिल्ली कार्यालयाकडील कला उत्सव २०२४-२५ मार्गदर्शक सूचना
उपरोक्त विषय व संदर्भीय पत्रानुसार, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्या मधील कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामार्फत सन २०१५- १६ पासून कला उत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये देशातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेश आपला सहभाग नोंदवितात. सन २०२४-२५ मध्ये केंद्र शासनाने कला उत्सवाच्या आयोजनामध्ये पुढील ६ कला प्रकारांचा समावेश केलेला आहे. ज्यापैकी कोणत्याही एका कलेच्या उपप्रकारात विद्यार्थी सहभाग नोंदवू शकतात.
१. गायन - शास्त्रीय संगीत एकल/समूह, पारंपारिक लोकसंगीत / भक्तीगीत एकल, किंवा समूह गायन, पारंपारिक लोकसंगीत / भक्तीगीत समूह, देशभक्ती समूह
२. वादन - शास्त्रीय स्वर वाद्य एकल / शास्त्रीय तालवाद्य एकल किंवा वाद्यवृंद शास्त्रीय/ लोकसंगीत
३. नृत्य-शास्त्रीय नृत्य एकल किंवा प्रादेशिक लोकनृत्य समूह /आदिवासी नृत्य किंवा समकालीन नृत्यरचना समूह (गैर फिल्मी)
४. नाट्य- एकपात्री अभिनय / नकला किंवा मूकाभिनय समूह, नाटक समूह
५. दृश्यकला - द्विमित चित्र, त्रिमित चित्र किंवा स्वदेशी खेळणी तयार करणे किंवा स्थानिक शिल्पकला एकल
६. पारंपारिक गोष्ट वाचन / कथावाचन (१ किंवा २ विद्यार्थी)
सन २०२४-२५ मध्ये राज्याच्या ६ कला प्रकारांतून प्रत्येकी १ विद्यार्थी / विद्यार्थीनी / संघ अशा जास्तीत जास्त २३ विद्यार्थ्यांचा संघ राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या कला उत्सवासाठी अंदाजे १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत नामनिर्देशित करावयाचा आहे. राज्याच्या संघ निवडीसाठी वर नमूद कला प्रकारांमध्ये प्रत्यक्ष स्वरूपात स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
कला उत्सवामध्ये राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील ९ वी ते १२ वी मध्ये शिकणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. सर्व कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांचा वैयक्तिक (Solo) किंवा समूहाने सहभाग असणार आहे. प्रथम प्राचार्य, सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि मुंबईसाठी प्राचार्य, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई यांनी शिक्षणाधिकारी माध्यमिक व शिक्षण निरीक्षक यांचे सहकार्याने त्यांच्या जिल्ह्यात जिल्हास्तर स्पर्धेचे प्रत्यक्ष स्वरूपात आयोजन करावयाचे आहे. कला उत्सव स्पर्धेचे निकष सोबत जोडण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी या स्पर्धेबाबतच्या मार्गदर्शक सूचना
या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
विद्यार्थ्यांसाठी सूचनाः
• एक विद्यार्थी केवळ एका कला प्रकारातच सहभाग घेऊ शकतो.
सहभागी स्पर्धकांनी सोबत जोडलेल्या निकषांचे वाचन करावे.
कोणत्याही कला प्रकारच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयारी केलेली असावी. व्यावसायिक कलाकारांचा सहभाग अथवा त्यांची मदत घेता येणार नाही, असे निदर्शनास आल्यास सदरील प्रवेशिका रद्द केली जाईल.
निकषात नमूद केल्यानुसार ४ ते ६ मिनिटांचे सादरीकरण असावे.
एका विद्यार्थ्याला एका वेळी एकाच स्पर्धेत भाग घेता येईल. कला उत्सव स्पर्धेमध्ये राष्ट्रीय
स्तरावर प्रथम द्वितीय अथवा तृतीय क्रमांकापर्यंत पोहोचलेल्या विद्यार्थ्याला परत भाग घेता येणार नाही.
आपल्या सादरीकरणाची पूर्ण जबाबदारी स्पर्धकाची असेल.
विद्यार्थ्यांच्या / पाल्याच्या सादरीकरणामध्ये कोणताही चुकीचा आशय/आक्षेपार्ह विधान केले जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्यासाठी सूचनाः
जिल्ह्यातील सर्व पात्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी कला उत्सवामध्ये सहभागी व्हावे यासाठी प्राचार्य, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था व शिक्षणाधिकारी (माध्य.) यानी शाळा मुख्याध्यापकांसाठी संयुक्त सहीचे एक परिपत्रक निर्गमित करुन कला उत्सवाबाबतची माहिती आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना द्यावी.
जास्तीत जास्त दिव्यांग विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावेत यासाठी कार्यवाही करावी.
तसेच नामनिर्देशन करताना मुलांचे व मुलींचे समप्रमाण असावे.
प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी जिल्ह्यातील प्रत्येक कलाप्रकाराच्या स्पर्धेतून योग्य विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी प्रत्येक कलाप्रकारनिहाय दोन परीक्षकांची एक निवड समिती जिल्हास्तरावर स्थापन करावी. (एकूण ६ कला प्रकार)
दि.६ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत जिल्हास्तर प्रत्यक्ष स्वरूपात स्पर्धा आयोजित कराव्यात. सदर स्पर्धांचे परीक्षण करून परीक्षकांनी जिल्हास्तरावर प्रत्येक कला प्रकारात सर्वोत्कृष्ट १ विद्यार्थी/विद्यार्थिनी/१ संघ (२ ते ५ विद्यार्थी) अशा ६ कला प्रकारात जास्तीत जास्त १२ ते १५ विद्यार्थ्यांची निवड ठरवून दिलेल्या निकषानुसार गुणदान करून करावी. (सोबत कला प्रकार निहाय निकष व गुणदान तक्ते जोडले आहेत.)
जिल्हास्तरावरील कलाप्रकार निहाय सर्वोत्कृष्ट म्हणून निवडलेल्या मुलांची नावे या कार्यालयास दि. २७ सप्टेंबर २०२४ रोजी संध्या. ५.०० पर्यंत सोबत दिलेल्या एक्सेल शीट (PDF फाईल नको) इंग्रजी भाषेमध्येच कळवावीत. विद्यार्थ्यांची नामांकने पाठविताना फक्त उत्कृष्ठ विद्यार्थ्यांचीच नामांकने पाठवावीत. (१५ विद्यार्थी ही जास्तीत जास्त संख्या आहे.)
मुंबई शहर व उपनगरामधील विद्यार्थी निवडीची प्रक्रिया प्राचार्य, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई यांनी करावी.
जिल्हास्तरावरील परीक्षकांना मानधन प्रत्येकी रु.५००/- प्रतिदिन प्रस्तावित आहे. तसेच साउंड सिस्टीम, स्टेशनरी व इतर अनुषंगिक खर्चासाठी साठी रु.६००० /- प्रस्तावित आहेत.
जिल्हास्तरीय कला महोत्सवाच्या आयोजनासाठी प्रती जिल्हा रुपये १२,०००/- एवढ्या मर्यादेमध्ये रक्कम प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल. सदरील रक्कम परीक्षकांचे मानधन व अनुषंगिक खर्चासाठी असेल.
जिल्हास्तरीय स्पर्धा संपन्न झाल्यावर प्राचार्य, डाएट यांनी स्पर्धांचा अहवाल, सहभागी विद्यार्थ्यांची सोबतच्या एक्सेल शीट (PDF फाईल नको) इंग्रजी भाषेमध्येच,
सांख्यिकी महिती मराठी भाषेत, आणि खर्चाची मागणी हे दि. २७ सप्टेंबर २०२४ पर्यंत कलाक्रीडा विभागास पाठवावे. खर्चाची मागणी केल्याशिवाय रक्कम अदा केली जाणार नाही.
जिल्हास्तर स्पर्धेसाठीचे विद्यार्थ्यांचे उपस्थितीपत्रक आणि खर्चाच्या पावती जतन करून ठेवावे. सदर उपस्थितीपत्रक सोबत जोडलेल्या एक्सेल शीट नमुन्यामध्येच करावे.
तसेच अहवाल पाठविताना सोबत जोडलेल्या अहवालाच्या एक्सेल शीट (PDF फाईल नको) मध्येच महिती पाठवावी.
राज्य स्तरीय कला उत्सवाचे आयोजन :
प्रत्येक जिल्ह्याकडून प्राप्त ६ कला प्रकारांमध्ये (१ विद्यार्थी / विद्यार्थिनी / संघ) अशी एकूण १५ (जास्तीत जास्त) नामनिर्देशने राज्यस्तरावर संकलित करण्यात येतील.
राज्यस्तरीय स्पर्धा ऑक्टोबर २०२४ मध्ये पुणे येथे आयोजित केल्या जातील. स्पर्धेचे ठिकाण व वेळापत्रक स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल.
जिल्हास्तरावरून नामांकने प्राप्त विद्यार्थ्यांचे कलाप्रकारानुसार निश्चित केलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष सादरीकरण होईल. त्याच वेळी राज्यस्तरीय परीक्षण समिती प्रत्येक कलाप्रकारासाठी परीक्षण करून गुणानुक्रमे प्रथम १ विद्यार्थी / विद्यार्थिनी / संघ अशा ६ कलाप्रकारांमध्ये राज्यस्तरावर एकूण २३ विद्यार्थ्यांची निवड करतील.
यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत प्रत्येक कला प्रकारानुसार तज्ज्ञ परीक्षकांची परीक्षण समिती तयार करण्यात येईल.
राज्यस्तरावर निवड केलेल्या २३ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर नामनिर्देशने पाठविण्यात येतील.
राष्ट्रीय स्तर कला उत्सवः
राज्यस्तरावर निवड केलेल्या विद्यार्थ्यामधून ६ कलाप्रकारानिहाय प्रथम क्रमांकाच्या २३ विद्यार्थ्यांची नामनिर्देशने राष्ट्रीय स्तरावर दिलेल्या मुदतीपर्यंत पाठविण्यात येतील.
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा प्रत्यक्ष होणार आहेत. याबाबत राष्ट्रीय स्तरावरून सूचना प्राप्त झाल्यानंतर याबाबतची माहिती नामनिर्देशीत २३ विद्यार्थ्यांना कळविण्यात येईल.
राष्ट्रीय स्तरावर स्पर्धेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे रेल्वे आरक्षण व प्रवासातील भोजन खर्च परिषदेमार्फत केला जाईल.
अधिक माहितीसाठी श्रीमती संघाप्रिया वाघमारे, अधिव्याख्याता मो.क्र. ९५२७०७९९८१ व श्रीम. पद्मजा लामरुड, विषय सहायक, मो.क्र. ९८२२०९६१०७ या क्रमांकावर संपर्क साधावा.
🎭 विद्यार्थ्यांसाठी कला उत्सवाचे आयोजन SCERT मार्गदर्शक सूचना
(डॉ. माधुरी सावरकर)
उपसंचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र ,पुणे
जा.क्र. राशैसंप्रपम/कलाक्रीडा/कला उत्सव/२०२४-२५/०४२८४
प्रति,
१. प्राचार्य, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई
२. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
३. शिक्षणाधिकारी (माध्य.) सर्व
४. शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण व उत्तर) मुंबई.
उपसंचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र ,पुणे
जा.क्र. राशैसंप्रपम/कलाक्रीडा/कला उत्सव/२०२४-२५/०४२८४
प्रति,
१. प्राचार्य, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई
२. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
३. शिक्षणाधिकारी (माध्य.) सर्व
४. शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण व उत्तर) मुंबई.
SCHEDULE FOR SUBMISSION OF ENTRIES FOR KALA UTSAV 2024
Level of Competitions
Date of Upload of Google Forms
Last Date for Submission of Google Form
District
15th September 2024
30th September 2024
State
15th October 2024
30th October 2024
National
1st November 2024
15th November 2024
Thiwani (Prof. Jyotsna Tiwari)
Prof. & Head DEAA, NCERT & National Coordinator, Kala Utsav
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon