Thakit Vetan Deyake Online In Shalarth
शिक्षण संचालनालय
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, मध्यवर्तीइमारत, पुणे
क्र. शिसंमा/२०२३/टि-७/शालार्थ/थकीत /ऑनलाईन / ६७६६
दिनांक: २४/१२/२०२४.
01 JAN 2025
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प. सर्व
३. शिक्षण निरीक्षक, मुंबई (उत्तर/दक्षिण/पश्चिम)
४. अधीक्षक, वेतन व भनिनि पथक (माध्यमिक)
विषय- सन २०२४-२५ मध्ये ऑनलाईन प्राप्त थकीत देयके पडताळणी करून प्रशासकीय मान्यतेसाठी शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत.
संदर्भ- १) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/२०२४/टि-७/शालार्थ/थकीत /ऑनलाईन/५०४७
दि. ११/९/२०२४
२) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/२०२४/टि-७/शालार्थ/थकीत /ऑनलाईन/मुदतवाढ/५१८६
दि. २५/९/२०२४.
उपरोक्त विषयी व संदर्भान्वये सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शी संबंधित सर्व थकीत देयके संबंधित शाळांनी दि. १५/१०/२०२४ पर्यंत शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत निर्देश देण्यात आले होते.
तथापि त्यानंतर शिक्षणाधिकारी/अधीक्षक, वेतन व भनिनि पथक (माध्यमिक) सर्व आणि विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व यांनी त्यांचे स्तरावर ऑनलाईन प्राप्त थकीत देयकाची ऑनलाईन पडताळणी करून संचालनालयास ऑनलाईन सादर करणे अपेक्षित होते. परंतू अद्यापही अधीक्षक, वेतन पथक (माध्यमिक) आणि विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व स्तरावर मोठ्या प्रमाणावर थकीत देयके प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. ही बाब प्रशासकीयदृष्ट्या योग्य नाही.
Also Read 👇
Medical Bill TAB Open वैद्यकीय देयके ऑनलाईन अदा करण्याची परवानगी
सबब अधीक्षक, वेतन व भनिनि पथक (माध्यमिक) सर्व आणि विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व यांना थकीत देयके नियमानुसार पडताळणी करून ऑनलाईन सादर करण्यासाठी खालीलप्रमाणे कालमर्यादा निश्चित करून देण्यात येत आहे.
अ.क्र.
तपशिल
१अधीक्षक, वेतन पथक (माध्यमिक) सर्व यांनी शाळांकडून प्राप्त थकीत देयके विभागीय शिक्षण उपसंचालक, संबंधित यांना सादर करावयाचा अंतिम दिनांक.
विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व यांनी वेतन पथक यांचेकडून प्राप्त थकीत देयके पडताळणी करून ऑनलाईन सादर करण्याचा अंतिम दिनांक २०/०१/२०२५
सन २०२४-२५ थकीत देयके ऑनलाईन सादर करणे.
दि. १०/०१/२०२५ पर्यंत
दि. २०/०१/२०२५
तरी वरील तक्त्यामध्ये नमूद दिनांकापर्यंत शालार्थ प्रणालीमध्ये प्राप्त ऑनलाईन थकीत देयके पडताळणी करून ऑनलाईन संचालनालयास सादर करावी. तसेच क्षेत्रिय समितीचा सर्व सदस्यांचा संयुक्त स्वाक्षरीचे विहित नमुन्यातील
विवरणपत्र क्रमांक १, २, व ३ ची हार्ड कॉपी संचालनालयास सादर करावी. तसेच न्यायालयीन प्रकरणाशी संबंधित थकीत देयक प्रस्तावासोबत विधी अधिकारी यांचे स्वाक्षरीसह न्यायालयीन प्रकरणाबाबतचे विहित नमुन्यातील विवरणपत्र, घटनाक्रम व इतर आवश्यक कागदपत्रासह हार्ड कॉपी सादर करावी. त्यानंतर सन २०२४-२५ मध्ये ऑनलाईन प्राप्त थकीत देयके स्विकारली जाणार नाही. व त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी.
(संपत सुर्यवंशी)
Circular pdf copy link
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
प्रत- माहितीस्तव सविनय सादर.
१. मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य पुणे-१
२. श्रीम. रोहीणी किरवे, कक्ष अधिकारी, टिएनटी-३, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई
Alas Read -
शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, मध्यवतीइमारत,पुणे
दिनांक : ७/१०/२०२४. 07 OCT 2024
क्र. शिसंमा/२०२४/टी-७/ शालार्थ/थकीत/ऑनलाईन / मुदतवाढ / ५५०२
प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, संबंधित सर्व.
२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जि.प. संबंधित सर्व.
३) शिक्षण निरीक्षक, (उत्तर/दक्षिण/पश्चिम), मुंबई.
४) अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक) संबंधित सर्व,
विषयः- शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यास मुदतवाढ देणेबाबत.
संदर्भ-
१) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/२०२४/टी-७/शालार्थ/थकीत/ऑनलाईन/५०४७ दि. ११/९/२०२४.
२) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/२०२४/टी-७/शालार्थ/थकीत/ऑनलाईन/मुदतवाढ/५१८६ दि. २५/९/२०२४.
उपरोक्त विषयी संदर्भ क्र. १ अन्वये सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्यासाठी दि. २५/९/२०२४ पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. तसेच संदर्भ क्र. २ अन्वये शाळांना थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्यासाठी दि ०५/१०/२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती. तथापि अद्यापही काही शाळेतील कर्मचा-यांचे थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यात आलेली नाही त्यामुळे वेतन पथक (माध्यमिक) कार्यालयाकडून थकीत देयके ऑनलाईन सादर करणेबाबत मुदतवाढ देणेबाबत विनंती केलेली आहे.
हेही वाचाल
उक्त प्रकरणी क्षेत्रिय कार्यालयाकडून करण्यात आलेली मागणी तसेच शालार्थ प्रणालीमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीचा विचार करता डिडिओ-१ (मुख्याध्यापक) स्तरावरून थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी दि. १५/१०/२०२४ अखेर अंतिम मुदत राहील. त्यानंतर सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार नाही. याची नोंद घ्यावी.
३) याबाबत संबंधित शाळांना आपल्या स्तरावरून स्पष्ट सूचना देण्यात याव्यात.
४) तसेच ऑनलाईन प्राप्त थकीत देयके शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प./अधीक्षक, वेतन पथक (माध्यमिक) सर्व यांनी शासन निकषानुसार पडताळणी करून विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे ऑनलाईन फॉरवर्ड करावे. तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यांचेकडे ऑनलाईन प्राप्त थकीत देयके शासन निकषानुसार तपासून पडताळणी करून पात्र थकीत देयके संचालनालयाकडे ऑनलाईन फॉरवर्ड करण्याची कार्यवाही करावी.
(संपत सुर्यवंशी)
शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
प्रत- श्री. पवन जोशी, प्रोजेक्ट लिड, शालार्थ सिस्टीम, महाआयटी, मुंबई यांना उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की, शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सादर करण्याचा टॅब/सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा. व सदरची प्रणाली सुरळीतपणे सुरू राहील याची दक्षता घ्यावी. तसेच तांत्रिक अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी.
प्रत- माहितीस्तव सबिनय सादर.
१) मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे-१
२) श्रीम. रोहीणी किरवे, कक्ष अधिकारी, टिएनटी-३, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई
Also Read 👇
शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य,पुणे
दिनांक :- २४/०९/२०२४.
25 SEP 2024
क्र. शिसंमा/२०२४/टी-७/शालार्थ/थकीत /ऑनलाईन/मुदतवाढ / 5186 प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, संबंधित सर्व.
२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जि.प. संबंधित सर्व.
३) शिक्षण निरीक्षक, (उत्तर/दक्षिण/पश्चिम), मुंबई.
४) अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक) संबंधित सर्व,
विषयः- शालार्थ प्रणालीमध्ये धकीत देयके ऑनलाईन सादर करण्यास मुदतवाढ देणेबाबत.
संदर्भ-
१) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/२०२४/टी-७/शालार्थ/थकीत/ऑनलाईन/५०४७ दि. ११/९/२०२४
२) श्री. शिवाजी खांडेकर, सरकार्यवाह, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ यांचे निवेदन क्र. ४१/२०२४ दि. २०/९/२०२४.
३) श्री. के. एस. ढोमसे, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक, संयुक्त महामंडळ, पुणे यांचे ईमेलवर प्राप्त निवेदन क्र. ७२/२०२४-२५ दि. २४/९/२०२४
४) अधीक्षक, वेतन व भ.नि.नि. पथक (माध्यमिक) लातूर यांचे पत्र क्र. वेप/माध्य/ला/आस्था/ २०२४/७८२ दि. २४/९/२०२४.
५) अधीक्षक, वेतन व भ.नि.नि. पथक (माध्यमिक) वर्षा, सातारा, अमरावती, यांचे ईमेलद्वारे प्राप्त झालेले पत्र.
उपरोक्त विषयी संदर्भ क्र. १ अन्वये सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची चकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्यासाठी दि. २५/९/२०२४ पर्यंत मुदत देण्यात आलेली होती.
तथापि सध्या शालार्थ वेतन प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणीमुळे शाळांना थकीत देयके ऑनलाईन सादर करणे शक्य नाही.
तसेच शालार्थ प्रणाली बंद असल्याने थकीत देयके ऑनलाईन फॉरवर्ड करण्यास किमान एक महिन्याची मुदतवाढ मिळणेबाबत संदर्भ क्र. २ व ३ अन्वये विनंती करण्यात आलेली आहे. तसेच काही वेतन पथक (माध्यमिक) कार्यालयाकडूनही शालार्थ प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणीमुळे थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यास मुदतवाढ मिळणेबाबत विनंती केलेली आहे.
उपरोक्त बस्तुस्थितीचा विचार करता डिडिओ-१ (मुख्याध्यापक) स्तरावरून थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी दि. ५/१०/२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यानंतर सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी थकीत देयके ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार नाही. याची नोंद घ्यावी.
शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
प्रत- श्री. पवन जोशी, प्रोजेक्ट लिड, शालार्थ सिस्टीम, महाआयटी, मुंबई यांना उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की, शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सादर करण्याकरीता आलेल्या तांत्रिक अडचणीचे तात्काळ निराकरण करावे. तथापि थकीत देयके ऑनलाईन सादर करण्याचा टेंब/सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा. व सदरची प्रणाली सुरळीतपणे सुरू राहील याची दक्षता घ्यावी.
प्रत माहितीस्तव सविनय सादर.
) मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे
१ २) श्रीम. रोहीणी किरवे, कक्ष अधिकारी, टिएनटी-३, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई
Also Read 👇
शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे
क्र. शिसंमा/२०२४/टी-७ / शालार्थ/थकीत/ऑनलाईन / 5047
दिनांक :- ०४/०९/२०२४.11 SEP 2024
महत्वाचे परिपत्रक
विषयः- थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणे बाबत. सन २०२४-२५
उपरोक्त विषयास अनुसरून संदर्भाकित शासन निर्णयानुसार थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीनेच सादर करणेबाबत शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सुविधा विकसित करण्यात आली असून त्याअनुषंगाने थकीत वेतन देयकाची माहिती शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आणि सदरचे थकीत देयकास ऑनलाईन प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत दिलेल्या सूचना खालीलप्रमाणे आहेत.
अ.क्र.१ तपशिल
संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांनी प्रलंबित वेतन अनुदानाची देयके योग्य ती तपासणी/पडताळणी करून सदर दाव्यांना मंजूरी घेण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये आपल्या लॉगीन वरून थकीत देयकाची माहिती भरावी. तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक, अधीक्षक, वेतन पथक (माध्यमिक) संबंधित सर्व यांचेकडून आजअखेर संचालनालयास ऑफलाईन सादर केलेल्या नवीन/पुनर्मान्यतेची तसेच न्यायालयीन प्रकरणाची थकीत देयके ऑनलाईन सादर करावीत. सन २०२४-२५ मध्ये संचालनालयाकडून प्रशासकीय मान्यता मिळालेली परंतू कोषागारात सादर न केलेली देयके पुनश्च ऑनलाईन पद्धतीने सादर करावीत.
प्रलंबित सर्व थकीत देयकाची माहिती दिलेल्या तारखेपर्यंत शालार्थमध्ये ऑनलाईन भरण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाची राहील.
अधीक्षक, वेतन पथक (माध्यमिक) व संबंधित शिक्षणाधिकारी यांनी त्यांच्याकडे ऑनलाईन प्राप्त झालेली थकीत वेतन अनुदानाची देयके नियमानुसार योग्य ती तपासणी व पडताळणी करून सदर दाव्यांना ऑनलाईन मंजूरीकरीता संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे सादर करणे. तथापि
ऑफलाईन प्रस्तावासोबत पुढील कागदपत्रे सादर करावीत. १. थकीत देयक प्रशासकीय मान्यता संदर्भ आदेश (वैयक्तिक मान्यता/वरिष्ठश्रेणी/न्यायालयीन आदेश/अनुदानाअभावी थकीत देयके इत्यादी)
२. विहित नमुन्यातील संयुक्त स्वाक्षरीचे विवरणपत्र- सोचत प्रपत्र आहे. उपरोक्त अ.क्र. १ च्या अनुषंगाने संबंधित सर्व शाळांना सूचना देण्यात याव्यात.
विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यांच्याकडे ऑनलाईन प्राप्त झालेली थकीत वेतन अनुदानाची देयके नियमानुसार योग्य ती तपासणी व पडताळणी करून सदर दाव्यांना ऑनलाईन मंजूरीकरीता संबंधित संचालकांकडे सादर करणे. तसेच उपरोक्त अ.क्र. १ च्या अनुषंगाने संबंधित सर्व शाळांना सूचना देण्यात याव्यात.
तथापि ऑफलाईन प्रस्तावासोबत पुढील कागदपत्रे सादर करावीत. १. विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे मंजूरीस्तव शिफारसपत्र
२. थकीत देयक प्रशासकीय मान्यता संदर्भ आदेश (वैयक्तिक मान्यता/वरिष्ठश्रेणी/न्यायालयीन आदेश/अनुदानाअभावी थकीत देयके इत्यादी)
३. विहित नमुन्यातील संयुक्त स्वाक्षरीचे विवरणपत्र सोबत प्रपत्र आहे.
४. न्यायालयीन प्रकरणाचे प्रस्ताव संचालनालयाचे न्यायालयीन प्रकरणा बाबतचे परिपत्रक दि. ६/१/२०२३ नुसार सादर करावे.
उपरोक्त अ.क्र. १ च्या अनुषंगाने संबंधित सर्व शाळांना सूचना देण्यात याव्यात.
विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडून ऑनलाईन प्राप्त झालेली प्रलंबित वेतन अनुदानाची देयके योग्य ती तपासणी व पडताळणी करून सदर दाव्यांना शासन निर्णय दि. १५/७/२०१७ मधील सुचनांनुसार ऑनलाईन प्रशासकीय मंजूरी संबंधित शिक्षण संचालक यांनी देणे
प्रत्येक संचालनालय स्तरावरून शा.नि. दि. १५.०७.२०१७ मधील सुचनानुसार प्रशासकीय मंजूरी दिलेल्या दाव्यांची लेखाशीर्षनिहाय पुरवणी मागणी/पुनर्विनियोजन/सुधारित अंदाजाच्या माध्यमातून शासनाकडून निधी उपलब्धतेबाबतचे मागणी प्रस्ताव प्रस्तावित करणे.
वरीलप्रमाणे लेखाशीर्षनिहाय निधी उपलब्धतेनुसार अनुक्रमांक ४ मध्ये नमूद प्रशासकीय मान्यता नुसार, संबंधित सर्व प्रशासकीय आदेश क्रमांक व दिनांक नमूद करून स्वतंत्रपणे निधी वितरण आदेश वितरीत करणे.
थकीत देयकाच्या प्रकारानुसार अपलोड करावयाच्या कागदपत्रांची यादी तपशिल खालीलप्रमाणे आहे.
देयकाचा प्रकार
आवश्यक कागदपत्रे
१. पदोन्नती
शिक्षणाधिकारी यांचा आदेश व लेखाधिकारी यांचे वेतननिश्चिती पडताळणी आदेश
२. वेतनवाढ
मुख्याध्यापकाचा आदेश
३. निवडश्रेणी
- शिक्षणाधिकारी यांचा मान्यता आदेश
४. वरिष्ठ वेतन श्रेणी
लेखाधिकारी यांचे वेतन निश्चिती पडताळणी
५. शिक्षण सेवक मानधन
आदेश. क्र. व दिनांक
शिक्षाधिकाये। 12थ उस मान्यता आदेश
५. महागाई भत्ता फरक
शासन निर्णय/मुख्याध्यापक यांचे पत्र
६. सहाव्या वेतन आयोग फरक
मुख्याध्यापक यांचे पत्र.
७. निलंबन/बडतर्फ कालावधीतील फरक
संस्था आदेश, देयक दुबार
आहरित केले नसल्याबाबतचे
मुख्याध्यापक यांचे हमीपत्र
८. न्यायालयीन प्रकरणे
- विहित नमुन्यातील न्यायालयीन
घटनाक्रम, याचिका, दाखल केलेले प्रतिक्ष्मपत्त्रः
प्रकरणाचे प्रपत्र, न्यायालयाचा निकाल,९. पवित्रद्वारे नियुक्ती असल्यास संस्थेचा आदेश व रूजू अहवालाची प्रत
१०. नियामित वेतनमणी फरक- 1 टी- अ । शिउस मान्यता व वेतनभिश्चिती प्रत वरील कागदपत्रासोबतच विहित नमुन्यातील संयुक्त स्वाक्षरीचे विवरणपत्र अपलोड करावेत.
शासनास सादर करण्यात येणारी सहा वर्षावरील कालावधीचे थकीत देयकाचा प्रस्ताव विवरणपत्र- ३ मध्ये सादर करावे. सदर प्रस्तावासोबत तपासणीसुचीनुसार सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने प्रस्ताव सादर करावा. डिडिओ-१ (मुख्याध्यापक) स्तरावरून थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी दि. २५/९/२०२४ पर्यंत सुविधा उपलब्ध राहील त्यानंतर सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी थकीत देयके सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार नाही.
वरीलप्रमाणे दिलेल्या नियोजनानुसार थकीत देयकांसाठी निधी उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने आपल्या स्तरावरून दिलेली कालमर्यादा पाळल्यास दि. १५/७/२०१७ च्या शासन निर्णयातील परिच्छेद २ मधील सूचनांनुसार कार्यवाही करणे सोईचे होईल. व पर्यायाने चालू आर्थिक वर्षातील मंजूर असलेल्या तरतूदी मधून नियमित वेतनाचा खर्च नियमितपणे भागविणे सुकर होईल. तसेच थकीत वेतनासाठी तरतूद उपलब्ध करून देणे बाबत कार्यवाही करता येईल. वर नमूद कालमर्यादा सर्वच स्तरावर तंतोतंत पाळली जाईल याची दक्षता घ्यावी. सविस्तर माहितीसाठी शालार्थमध्ये User manual पहावे.
(संपत सुर्यवंशी)
शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
संदर्भ- १) शासन निर्णय क्र. संकीर्ण २४१५/ (३४/१५)/अर्थसंकल्प, दिनांक १५/७/२०१७
२) शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्र. अंदाज-२०१/थकीत वेतन/२०२१/३०७० दि. ०४/०८/२०२१.
३) दि. ६/६/२०२४ रोजीच्या बैठकीमध्ये दिलेले निर्देश. ४) दि. ३/९/२०२४ रोजीच्या बैठकीमध्ये दिलेले निर्देश.
प्रति,
१) विभागीयशिक्षण उपसंचालक, (सर्व).
२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जि.प. (सर्व).
३) शिक्षण निरीक्षक, (उत्तर/दक्षिण/पश्चिम) मुंबई.
४) अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, (माध्यमिक) (सर्व).
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon