Implementation of Three Benefits Progression Scheme
दिनांक: ११ सप्टेंबर, २०२४.
प्रस्तावना:-
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी राज्यशासकीय सेवा (समावेशन, नियुक्ती आणि सेवेच्या शर्ती), दि.११.०१.२००७ अन्वये नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरीय नगरपरिषद संवर्ग तयार करण्यात आला असून, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम ७५-अ (१) (क) नुसार राज्यस्तरीय नगरपरिषद संवर्ग कर्मचारी हे राज्य शासनाच्या सेवेतील कर्मचारी आहेत. तसेच, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम ७६ अन्वये नगरपरिषदा / नगरपंचायतींच्या आस्थापनेवरील गट-क व गट-ड मधील कर्मचारी हे नगरपरिषदा/ नगरपंचायतींचे कर्मचारी असून, या कर्मचाऱ्यांचे वेतन नगरपरिषदा/ नगरपंचायतींमार्फत अदा केले जाते.
नगरपरिषदा नगरपंचायतींमध्ये १२ वर्ष सेवा पुर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती देण्याची योजना नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या स्तरावर दि.०१.१२.१९९५ अन्वये लागू करण्यात असून, सदर कार्यवाही संचालकांनी महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम ७६ नुसार करण्यात आली होती. तद्नंतर, नगरपरिषद कर्मचाऱ्यांना संदर्भ क्र.१ येथील दि.२७.०९.२०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली आहे.
वित्त विभागाच्या संदर्भ क्र.२ येथील दि.०२.०३.२०१९ अन्वये राज्य शासकीय अधिकारी/ कर्मचाऱ्यांना १०/२०/३० वर्षांनतर अनुज्ञेय ठरणारी तीन लाभाची आश्वासित प्रगती योजना केंद्र शासनाच्या धर्तीवर लागू केली असून, सदर योजना राज्यस्तरीय नगरपरिषद संवर्ग कर्मचारी व नगरपरिषदा / नगरपंचायतींमधील कर्मचाऱ्यांना लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन आदेश:-
राज्यातील राज्यस्तरीय नगरपरिषद संवर्ग कर्मचारी व नगरपरिषदा/ नगरपंचायतींमधील कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या संदर्भ क्र.२ येथील दि.०२.०३.२०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये विहित केलेली तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना खालील अटींच्या अधीन राहून लागू करण्यात मान्यता देण्यात येत आहे:-
१. प्रस्तुत योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात वित्त विभाग, शासन निर्णय दि.०२.०३.२०१९. दि.०१.०२.२०२०, दि.०७.१०.२०२२ व दि.२१.०२.२०२४ मधील तरतूदीप्रमाणे कार्यपध्दती, विहित निकष व अनुज्ञेयता लागू राहतील.
२. सदर सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दि.०१.०१.२०१६ पासून लागू राहिल. तसेच, दि.०१.०१.२०१६ ते या आदेशाच्या दिनांकापर्यंत काल्पनिक वेतननिश्चिती करून प्रत्यक्ष लाभ या आदेशाच्या दिनांकापासून देण्यात यावा. तथापि, थकबाकी अनुज्ञेय असणार नाही.
३. यासाठी येणारा खर्च नगरपरिषदा / नगरपंचायतींच्या स्वउत्पन्नातून भागविण्यात यावा.
सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या 🌐👉 www.maharashtra.gov.in 👈 या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०९१११७३४३६६०२५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने
२. साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
GR pdf Copy Link
(प्रियांका कुलकर्णी-छापवाले)
शासनाच्या उप सचिव
Revised in-service assured progression scheme of three benefits to employees
राज्यस्तरीय नगरपरिषद संवर्ग कर्मचारी व नगरपरिषदा/ नगरपंचायतींमधील कर्मचाऱ्यांना तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणेबाबत.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon