DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Other Backward Class Lists Include Castes GR

Other Backward Class Lists Include Castes GR

राज्य मागासवर्ग आयोगाने शासनास सादर केलेल्या अहवाल क्रमांक-५८ मधील शिफारशींनुसार महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग यादींमध्ये जाती समाविष्ट करण्याबाबत.

दिनांक :- २४ सप्टेंबर, २०२४.

प्रस्तावना :-
महाराष्ट्र राज्याच्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती / भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील जातीच्या यादीमध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार वाचा येथे नमूद क्रमांक-१ व २ च्या शासन निर्णयांन्वये काही नवीन जातींचा अंतर्भाव करुन / वगळून यादी अद्ययावत केलेली आहे.

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग यांनी शासनास अहवाल क्रमांक-५८ सादर करुन, त्याद्वारे "तिलोरी कुणबी", "तिल्लोरी कुणबी", "ति. कुणबी" या पोटजातींचा महाराष्ट्र शासनाच्या "इतर मागासवर्ग" यादीतील अ.क्र.८३ येथे कुणबी, पोट जाती लेवा कुणबी, लेवा पाटील, लेवा पाटीदार, मराठा कुणबी, कुणबी मराठा यांच्यापुढे तिलोरी कुणबी, तिल्लोरी कुणबी, ति. कुणबी या जातीचा समावेश करण्याबाबत शिफारस केली आहे. त्यानुषंगाने मा. मंत्रीमंडळाने सदर शिफारस मान्य केली असून सदर मान्यता विचारात घेता, महाराष्ट्र राज्याच्या इतर मागासवर्ग प्रवर्गाच्या यादीमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

राज्य मागासवर्ग आयोगाने शासनास सादर केलेल्या अहवाल क्रमांक-५८ मधील शिफारशीनुसार विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या दि.२५.०६.२००८ व दि.०४.०६.२०१९ रोजीच्या शासन निर्णयांन्वये अंतिम करण्यात आलेल्या जाती / तत्सम जातीच्या यादीत बदल करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
०२. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने अहवाल क्रमांक-५८ मध्ये प्र.क्र.१९६/२०२२ अन्वये "तिलोरी कुणबी", "तिल्लोरी कुणबी", "ति. कुणबी" या पोटजातींचा महाराष्ट्र शासनाच्या "इतर मागासवर्ग" यादीतील अ.क्र.८३ येथे कुणबी, पोट जाती लेवा कुणबी, लेवा पाटील, लेवा पाटीदार, मराठा कुणबी, कुणबी मराठा
यांच्यापुढे तिलोरी कुणबी, तिल्लोरी कुणबी, ति. कुणबी या पोटजातीचा समावेश करण्याबाबत सखोल पडताळणीअंती शासनास अभिप्राय सादर केले आहेत. सदर प्रकरणांबाबतची वस्तुस्थिती व गुणवत्ता विचारात घेऊन खालील तक्त्यात नमूदप्रमाणे शासन मान्यता देण्यात येत आहे:-

आयोगाचा प्र.क्र. - प्र.क्र.१९६/२०२२
जातीचे नाव - तिलोरी कुणबी, तिल्लोरी कुणबी, ति. कुणबी.
शासनाचा निर्णय - आयोगाच्या शिफारसीनुसार "तिलोरी कुणबी", "तिल्लोरी कुणबी", "ति. कुणबी" या पोटजातींचा महाराष्ट्र शासनाच्या "इतर मागासवर्ग" यादीतील अ.क्र.८३ येथे कुणबी, पोट जाती लेवा कुणबी, लेवा पाटील, लेवा पाटीदार, मराठा कुणबी, कुणबी मराठा यांच्यापुढे तिलोरी कुणबी, तिल्लोरी कुणबी, ति. कुणबी या पोटजातीचा समावेश करण्यात येत आहे.

०३. सदर शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेले बदल हे शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून लागू होतील.

०४. सदरहू शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला असून, त्याचा संकेताक २०२४०९२४१६३८३१३६३४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

GR pdf Copy Link 

(र. रा. पेटकर) 
उप सचिव, महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग शासन निर्णय क्रमांक- आयोग-२०२४/प्र.क्र.२३२/मावक
मंत्रालय, मुंबई
वाचा :
१) शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्रमांक: सीबीसी-१०/२००८/प्र.क्र.२३५/ मावक-५, दि.२५.०६.२००८
२) शासन निर्णय, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग, क्रमांक: सीबीसी-२०१९/प्र.क्र.७२/मावक, दि.०४.०६.२०१९
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon