DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Gayila Rajya Mata Ghoshit Cow As Mother of Maharashtra State

Gayila Rajya Mata Ghoshit Cow As Mother of Maharashtra State

Gayila Rajya Mata Ghoshit Cow As Mother of Maharashtra State
Gaila Rajyamata Ghoshit Cow Is Mother of Maharashtra State

 Government Declared Cow Is Mother of State

मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने 'गायीला राज्यमाता' म्हणून घोषित केले 
In the cabinet meeting, the state government declared 'cow as the mother of the state'

महाराष्ट्र सरकारने 'गायीला राज्यमाते'चा दर्जा दिला

30 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने 'गायीला राज्यमाता' म्हणून घोषित केले.
वैदिक काळापासून भारतीय संस्कृतीत गाईचे स्थान मानवी आहारात गायीच्या दुधाची उपयुक्तता, आयुर्वेदिक औषध, पंचगव्य उपचार पद्धती आणि सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये गायीचे शेण व गोमूत्राचे महत्त्वाचे स्थान लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला.
गायीला राज्यमाता घोषित करणारे महाराष्ट्र हे देशातील दुसरे राज्य बनले.
• गायीला राज्यमाता घोषित करणारे पहिले राज्य उत्तराखंड (2018)
पशुसंवर्धन विभाग
देशी गायींच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना
राज्यातील गोशाळांमधील देशी गायींच्या पालन-पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय पन्नास रुपये अनुदान योजना राबवण्याचा निर्णज आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने, त्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडून करण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती असेल. २०१९ मधील २० व्या पशू गणनेनुसार देशी गायींची संख्या ४६ लाख १३ हजार ६३२ इतकी कमी असल्याचे आढळून आले आहे. ही संख्या १९व्या पशूगणनेशी तुलना करता २०.६९ टक्क्यांनी कमी झाली आहे.

देशी गायींना "राज्यमाता-गोमाता" घोषीत करण्याबाबत

दिनांक : ३० सप्टेंबर, २०२४.

प्रस्तावना :-
    प्राचीन काळापासून मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये गायीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वैदिक काळापासून गायीचे धार्मिक, वैज्ञानिक व आर्थिक महत्त्व विचारात घेऊन त्यांना "कामधेनू" असे संबोधण्यात येते. राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देशी जातींच्या गायी आढळतात. (उदा. मराठवाडा विभागात देवणी, लालकंधारी, पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार, उत्तर महाराष्ट्रात डांगी तर विदर्भात गवळाऊ.) तथापि, दिवसेंदिवस देशी गायींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे.
    देशी गायीच्या दुधाचे मानवी आहारात पौष्टीकदृष्ट्या अधिक मुल्य आहे. देशी गायींच्या दुधात मानवी शरीर पोषणासाठी महत्त्वाचे अन्नघटक उपलब्ध असल्याने ते पुर्णअन्न आहे. देशी गायींच्या दुधाचे मानवी आहारातील स्थान, आयुर्वेद चिकित्सा पध्दतीत पंचगव्याचा वापर तसेच सेंद्रिय शेती पध्दतीत देशी गायींच्या शेण व गोमुत्राचे महत्व विचारात घेता, देशी गायींच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब ठरत आहे.
उपरोक्त पार्श्वभुमी विचारात घेवून, पशुपालकांना देशी गायींचे पालनपोषण करण्यास प्रेरित करण्याच्या दृष्टीने देशी गायीस "राज्यमाता- गोमाता" घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय : -

देशी गार्गीचे भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून असलेले स्थान, देशी गायींच्या दुधाची मानवी आहारातील उपयुक्तता, आयुर्वेद चिकित्सा पध्दती, पंचगव्य उपचार पध्दती तसेच देशी गायींच्या शेण व गोमुत्राचे सेंद्रिय शेती पध्दतीत असलेले महत्वाचे स्थान विचारात घेवून देशी गायींना यापुढे "राज्यमाता- गोमाता" म्हणून घोषीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०९३०१०३०१७४३०२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,+

देशी गायींना राज्यमाता-गोमाता घोषीत करण्याबाबत Deshi Gayina Rajyamata Gomata GR PDF

(नि. भा. मराळे) 
उप सचिव, महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र शासन कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, शासन निर्णय क्रमांकः पविआ-११२४/प्र.क्र.२४४/पदुम-३ मंत्रालय विस्तार, मुंबई
दिनांक : ३० सप्टेंबर, २०२४.
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon