सेवानिवृत्ती उपदान / मृत्यु उपदानाची कमाल मर्यादा रु.१४ लक्ष वरुन रु.२० लक्ष करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन वित्त विभाग
शासन निर्णय क्रमांक: सेनिवे-२०२२/प्र.क्र.८५/सेवा-४ मुंबई
दिनांक : १०.१०.२०२४.
संदर्भ : शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक सेनिवे-२०१९/प्र.क्र.५८/सेवा-४, दि.०१.०३.२०१९.
प्रस्तावना :
महाराष्ट्र शासनाने उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णयान्वये दि.०१.०१.२०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्ती उपदानाची कमाल मर्यादा रु.१४ लक्ष तसेच दि.०१.०१.२०१६ पासून मृत्यु उपदानाची कमाल मर्यादा रु.१४ लक्ष करण्यात आली आहे.
२. केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना सेवानिवृत्ती उपदान / मृत्यु उपदानाची कमाल मर्यादा रु.१४ लाखावरुन रु.२० लाख करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. ३. मा. मुख्यमंत्री यांचेसमवेत राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी संघटनेच्या सर्व संबंधित पदाधिकाऱ्यांच्या दि.०४.०९.२०२४ रोजी घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये दि.०१.०९.२०२४ पासून उपदानाची कमाल मर्यादा रु.२० लाख करण्याबाबत सहमती झाली आहे.
शासन निर्णय :
दिनांक ०१.०९.२०२४ पासून सेवानिवृत्ती उपदान / मृत्यु उपदानाची कमाल मर्यादा रु.१४ लक्ष वरुन रु.२० लक्ष पर्यंत वाढविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.
२. शासन असाही आदेश देत आहे की, ज्यांना निवृत्तिवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषित्तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये आणि कृषि विद्यापीठे यामधील निवृत्तिवेतनधारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारांसह लागू राहतील.
३. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक पाच) च्या कलम २४८ च्या परंतुकान्वये प्रदान केलेले अधिकार आणि त्यासंबंधीचे इतर सर्व अधिकार यांचा वापर करुन शासन असाही आदेश देत आहे की, वरील निर्णय जिल्हा परिषदाचे निवृत्तिवेतनधारक यांनाही लागू राहतील.
४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक २०२४१०१०१३०३२७९२०२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
५. सदर शासन निर्णयाची इंग्रजी प्रत सोबत जोडली आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
(मनिषा यु. कामटे)
शासनाचे उप सचिव.
प्रति,
१) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई.
To Increase the maximum limit of Retirement Gratuity / Death Gratuity from Rs.१४ lakhs to Rs.२० lakhs.
GOVERNMENT OF MAHARASHTRA Finance Department
Government Resolution No.: PEN-२०२२/C.R.८५/SER-४
Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Marg, Mantralaya, Mumbai- ४०००३२.
Date: १०.१०.२०२४
Reference: Government Resolution, Finance Department No.PEN-२०१९/८.२.५८/ SER-४, dated ०१.०३.२०१९.
Preface
Government of Maharashtra has fixed the maximum limit of retirement gratuity to Rs.१४ lakhs for the employees who retired after ०१.०१.२०१६ and the maximum limit of death gratuity from ०१.०१.२०१६ has been fixed to Rs.१४ lakhs..
२. As per the Central Government, the matter of increasing the maximum limit of retirement gratuity/death gratuity to pensioners / family pensioners in the state from Rs.१४ lakh to Rs.२० lakh is under the consideration of the government.
३. In the meeting held on ०४.०९.२०२४ of all the concerned office bearers of the State Government Officers / Staff Association along with the Hon'ble Chief Minister, it has been agreed to raise the maximum limit of gratuity to Rs.२० lakh from ०१.०९.२०२४.
Government Resolution:
Government has decided to raise the ceiling on the maximum amount of Retirement Gratuity and Death Gratuity from १४.०० lakhs to Rs.२०,०० lakhs with effect from ०१.०९.२०२४.
२. Government is pleased to direct that the above decision should mutatis mutandis apply with necessary changes to those pensioners of Recognized and Aided Educational Institutions, Non Agriculture Universities and affiliated Non-Governmental Colleges and Agricultural Universities, etc. to whom pension scheme is made applicable.
३. In exercise of the powers conferred by the proviso under Section २४८ of Maharashtra Zilla Parishad and Panchayat Samitis Act of १९६१ (Maharashtra Act number Five of १९६२) and of all other powers enabling it on that behalf, Government is further pleased to decide that above decision shall be applied to the pensioners including family pensioners of Zilla Parishads.
४. This Government Resolution is available on the website of Government of Maharashtra i.e. 🌐👉www.maharashtra.gov.in👈 and its computer code number is २०२४१०१०१३०३२७९२०१०. This order has been signed digitally.
By order and in the name of Governor of Maharashtra
(Manisha Y.Kamte)
Deputy Secretary to Government.
Also Read 👇
आज सोमवारी (दि. ३० सप्टेंबर २०२४) मंत्रिमंडळ बैठकीत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची आणखी एक मागणी मान्य. सेवानिवृत्ती उपदान (Gratuety) कमाल मर्यादा वाढविण्यात आलेली आहे.
कमाल मर्यादा रु. १४ लाखावरुन रु. २० लाख करण्यात आलेली आहे.
वित्त विभाग
सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदानाची मर्यादा वाढवून २० लाख
राज्यातील निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्तीधारकांना सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदानाची मर्यादा १४ लाखांवरून वाढवून २० लाख रुपये करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या निर्णयाची अंमलबजावणी १ सप्टेंबर २०२४ पासून करण्यात येईल. ज्यांना निवृत्ती वेतन योजना आहे, अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न अशासकीय महाविद्यालये आणि कृषी विद्यापीठ यातील निवृत्ती वेतनधारकांना हा निर्णय लागू राहील.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon