Partition Horrors Remembrance Day
14 August Partition Horrors Remembrance Day
१४ ऑगस्ट हा दिवस "Partition Horrors Remembrance Day"
("फाळणीच्या भीषण आठवणींचे स्मरण करण्यासाठी स्मृती दिन") म्हणून साजरा करणे बाबत.
उपरोक्त संदर्भिय विषयानुसार १५ ऑगस्ट २०२१ रोजी माननीय पंतप्रधान यांनी आपल्या भाषणात लाल किल्ल्यावर १४ ऑगस्ट हा दिवस" फाळणीच्या भीषण आठवणींचे स्मरण करण्यासाठी स्मृती दिन " म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते. या स्मृती दिनाचा उद्देश लाखो फाळणीग्रस्त नागरिकांच्या व्यथा,दुःख आणि वेदना प्रकाशात आणणे, तसेच ज्या विस्थापनामुळे हजारोंचे प्राण गेले अशा लोकसंख्येच्या सर्वात मोठ्या विस्थापनाच्या स्मृतींना उजाळा देणे हा आहे. दरवर्षी १४ ऑगस्ट रोजी सर्व शाळांमध्ये विविध उपक्रम आयोजित केले जातात या वर्षी फाळणीग्रस्त लोकांच्या भावनांना उजाळा देण्यासाठी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) या संस्थेच्या वतीने एका नाटकाची संहिता तयार करण्यात आली आहे. फाळणीच्या घटना, त्याचा हजारोंच्या जीवनावर झालेला विपरीत परिणाम, सदर घटनेचे महत्व आदी बाबींविषयी विद्यार्थ्यांना शिक्षित करणे, व त्यांच्यामध्ये जागरुकता निर्माण करणे हा या नाटकाच्या संहितेचा उद्देश आहे. नाटकाची संहिता डाऊनलोड करण्याची लिंक पुढीलप्रमाणे आहे.
लिंक
सदर संहिता ही सूचक असून शाळांना त्यांच्या परिस्थितीनुसार उचित बदल करता येईल. तसेच शाळांना काही सर्जनशील बदल सुद्धा करता येईल. या संदर्भात आपण आपले अधिनस्त क्षेत्रीय यंत्रणा संस्था व क्षेत्रीय अधिकारी यांना "फाळणीच्या भीषण आठवणींचे स्मरण करण्यासाठी स्मृती दिन" या दिनाबाबत अवगत करावे. तसेच सदर नाटकाच्या संहितेची हिंदी व इंग्रजी प्रत व त्याची लिंक ही सर्व शाळांपर्यंत पोहोचेल या दृष्टीने सदर क्षेत्रीय यंत्रणा व अधिकारी यांना उचित सूचना निर्गमित कराव्यात, तसेच सदर संहितेचा स्थानिक भाषेमध्ये अनुवाद करण्याची बाब ही सूचित करण्यात यावी.
Also Read -
Baloch Marathi Movie Shalet Dakhavine GR
लिंक
प्रदर्शनाचे आयोजनाबरोबरच सदर विषयाच्या अनुषंगाने चर्चा, वादविवाद सारख्या लहान कार्यक्रमांचे आयोजनही करता येईल. आणि स्थानिक माध्यमांना सदर कार्यक्रमास आमंत्रित करता येईल. हा उपक्रम कार्यान्वित करण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व क्षेत्रीय अधिकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांना उपरोक्त प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थां आणि शिक्षण अधिकारी यांनी आपल्या स्तरावरून सूचित करावे.
तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमधील अधिव्याख्याता यांनी सदर कार्यक्रमाचा अहवाल म्हणजे घेतलेले उपक्रम, सहभागी शाळा संख्या, सहभागी विद्यार्थी संख्या, सहभागी शिक्षक संख्या, अशा स्वरूपात परिषदेतील सामाजिक शास्त्र विभागाच्या 📧LINK या ईमेलवर दि. २० ऑगस्ट २०२४ पर्यंत सादर करावा. अधिक माहितीसाठी संदर्भिय पत्राचे अवलोकन करावे. सोबत - संदर्भीय पत्र व नाटकाच्या संहिता
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र ७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे - ४११०३०.
संदर्भ -१. D.O. No. १७-३२/२०२४-Coord, शालेय्य शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांचेकडील पत्र दि. ०९/०८/२०२४
जा.क्र. मराशैसंप्रप/सा. शास्त्र/फाळणी दिन/२०२४/03815 दि. १३ ऑगस्ट २०२४
प्रति,
१. विभागीय शिक्षण व उपसंचालक, सर्व विभाग, २. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, सर्व,
३. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व).
४. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्व)
५. शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण, उत्तर)
६. प्रशासन अधिकारी, (मनपा. नपा) सर्व,
७. शिक्षणप्रमुख (मनपा)
राष्ट्रीय नाट्य विद्यालय
फाळणी : एक शोकांतिका
लेखकः डॉ. प्रकाश झा
फाळणीः एक शोकांतिका
लेखकः डॉ. प्रकाश झा
दृश्यः एक कार्यक्रम चालू आहे...
गाणेः
आओ बच्चों तुम्हें दिखाएँ झाँकी हिंदुस्तान की... इस मिट्टी से तिलक करो, यह धरती है बलिदान की...
वंदे मातरम... वंदे मातरम...
आओ बच्चो तुम्हें दिखाएँ झाँकी हिंदुस्तान की.... इस मिट्टी से तिलक करो, यह धरती है बलिदान की...
वंदे मातरम... वंदे मातरम...
मुलगा : आजोबा... आजोबा तुम्ही ऐकलं, हे लोक किती छान गात आहेत ते।
आजोबा वंदे मातरम... वंदे मातरम... शब्दच असे आहेत की असं वाटते वारंवार गातच रहावं, वारंवार ऐकतच रहावं.
मुलगाः
काय हो आजोबा, ही 'फाळणीची शोकांतिका म्हणजे काय?
आजोबाः अरे वेड्या तुला फाळणीचा अर्थ माहित नाही? जर फाळणीचा अर्थच माहित नसेल तर तुला शोकांतिकेचा अर्थ कसा समजणार?
मुलांनो.. हा आपला देश आधी खूप मोठा होता. पण नंतर त्याची फाळणी झाली.
मुनगाः म्हणजे वाटणी ना?
आजोबाः हो, वाटणी झाली. पण वाटणी... आणि फाळणी यात फरक असतो...
म्हणजे असं, समजातुझ्याकडे दहा टॉफी आहेत. त्या तुला आपापसात वाटायच्या आहेत. कसे वाटणार? दोघं मिळूनपाच पाच अशा वाटून घेणार... आणि समजा तुझ्याकडे एकच टॉफी आहे... मग काय करणार?
मी तिचे तोडून दोन भाग करीन.
मुलगाः
आजोबाः बाळा, तोडणं.... तिचे तुकडे तुकडे करणं... हीच फाळणी असते. आणि यामुळे जे दुःख होतं... जो त्रास होतो ती म्हणजे शोकांतिका.
मुलगा: आजोबा, फाळणी म्हणजे काय, हे मला कळलं... पण ही शोकांतिका... फाळणी... शोकांतिका...
आजोबाः चल सांगतो.
गाणे :
आओ बच्चों तुम्हें दिखाएँ झाँकी हिंदुस्तान की....
इस मिट्टी से तिलक करो, यह धरती है बलिदान की...
वंदे मातरम... वंदे मातरम...
आओ बच्चो तुम्हें दिखाएँ झाँकी हिंदुस्तान की... इस मिट्टी से तिलक करो, यह धरती है बलिदान की... वंदे मातरम... वंदे मातरम...
मुलगाः आजोबा... आम्हाला व्यवस्थित सांगा ना... ही फाळणी कशी झाली होती...?
आजोबाः सांगतो... सांगतो... फाळणीविषयी... आपल्या देशाच्या फाळणीविषयी सांगतो... लक्ष देऊन ऐका... फाळणीविषयी इतिहासकारांचे जे दृष्टीकोन आहेत, ते काळजीपूर्वक ऐका.... लक्षपूर्वक ऐका आणि समजून घ्यायचा प्रयत्न करा...
गाणेः
है प्रीत जहाँ की रील सदा है प्रीत जहाँ की रीत सदा मैं गौल वहाँ के गाला हूँ भारत का रहने वाला हूँ भारत की बात सुनाता हूँ। है प्रीत जहाँ की रीत सदा
सूत्रधार 1: अखंड भारताची फाळणी ही अभूतपूर्व मानवी स्थलांतर आणि असहाय्यतेमुळे कराव्या लागणाऱ्यापलायनाची करुण गाथा आहे.
निवेदक 2: यागायेमध्ये लाखो लोक पूर्णपणे वेगळ्या वातावरणात अनोळखी लोकांमध्ये नवीन निवारा शोधत होते.
सूत्रधार 1: ही श्रद्धा आणि धर्म यावर आधारित हिंसक फाळणीची कथा आहे. त्याबरोबरच ती यागोष्टीचीही कथा आहे की...
सूत्रधार 2: एका जीवन शैलीचं आणि वर्षानुवर्षाच्या सहअस्तित्वाचे युग अचानक आणि नाट्यमयरित्या कशा प्रकारे संपलं.
सूत्रधार 1: सुमारे साठ लाख हिंदू, शीख आणि इतर संप्रदायांचे लोक ज्या भागातून निघून आले. तो भाग नंतर पश्चिम पाकिस्तान बनला.
सूत्रधार 2: पासष्ठ लाख मुस्लिमलोक पंजाब, दिल्ली इत्यादी भारतीय भागांतून पश्चिम पाकिस्तानात स्थलांतरित झाले.
बंगालमधून पश्चिम बंगालमध्ये आले. हाच पूर्व बंगाल नंतर पूर्व पाकिस्तान बनला.
सूत्रधार 1: वीस लाख हिंदू आणि इतर संप्रदायांचे लोक पूर्व
सूत्रधार 2: 1950 मध्ये आणखी वीस लाख हिंदूआणि इतर संप्रदायांचे
लोक पश्चिम बंगालमध्ये आले.
सूत्रधार 1: दहा लाख मुस्लिम पश्चिम बंगालमधून पूर्व पाकिस्तानात गेले.
सूत्रधार 2: या शोकांतिकेत मरण पावलेल्या लोकांची संख्या सुमारे पाच
लाख सांगितली जाते.
सूत्रधार 1: पण हा आकडा पाच ते दहा लाखांच्या घरात असण्याचा
अंदाज आहे.
गाणेः
आँखों से बहते, यह दर्द की धार्र आँखों से बहते, यह दर्द की धारे छूटी हुई जिंदगी, खोईहुई यारें। छूटी हुई जिंदगी, खोई हुई यारे। आँखों से बहते, यह दर्द की धारे आँखों से बहते, यह दर्द की धारे छूटी हुई जिंदगी, खोई हुई यारें। छूटी हुई जिंदगी, खोई हुई चारें।
मुलगाः आजोबा... या लोकांचं घरदार सर्व काही हिसकावून घेतलं गेलं. मला तर हे ऐकूनच भीती वाटू लागली आहे.
आजोबाः भीतीदायक गोष्ट आहेच ही बाळा... पण जरा कल्पना कर,
त्यावेळी जे लोक होते, त्यांच्यावर काय काय प्रसंग गुदरला असेल?
मुलगाः आजोबा... त्यावेळी माझ्यासारखी मुलंही असतील ना...
त्यांचं काय झालं असेल?
आजोबाः होय... तुझ्यासारखी लाखो मुलं होती. त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी ते दृश्य पाहिलं होतं, आणि ते दृश्य आठवून आजही त्यांच्या अंगावर शहारे उभे राहतात...
मुलगाः आम्हालाआणखी काही सांगा ना आजोबा...
आजोबाः सांगतो, तर मुलांनो ऐका....
गाणे: देखो ये बंगाल यहाँ का, हर चप्पा हरियाला है यहाँ का बच्चा-बच्चा अपने देश पे मरने वाला है आओ बच्चों तुम्हें दिखाएँ झाँकी हिंदुस्तान की.... इस मिट्टी से तिलक करो, यह धरती है बलिदान की... वंदे मातरम... वंदे मातरम.... वंदे मातरम... वंदे मातरम....
मुले : शिक्षकः गुड मॉर्निंग सर... गुड मॉर्निंग... प्लीजसिट डाऊन....
मुले : सर... ऐका ना... तुम्ही फाळणीविषयी काहीतरी सांगत होता... तुम्ही म्हणाला होता की बरंच काही गमावलंय... आता पुढचं सांगा ना, फाळणीचं काय झालं...
शिक्षकः 20 फेब्रुवारी 1947 रोजी, ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेंट अॅटली यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये घोषणा केली....
मुलगाः सर... पुढचं मी सांगू... मलासुद्धा माहित आहे....
शिक्षकः बरं... सांग...
मुलगा 1: तर मित्रांनो... सरकारने 30 जून 1948 च्या आधी.... शिक्षकः अरे पूनम... तिथून कुठं... इथं येऊन सांग ना सर्वांना.... T
मुलगा 2: बरं सर...
तर मित्रांनो... सरकारने 30 जून 1948 च्या आधी... सत्तेचे हस्तांतरण करून भारत सोडून जायचा निर्णय घेतला होता.
मुलगा 3: सर मी...
शिक्षकः हो, सांग...
मुलगा 4: तसंपाहतालॉर्ड माउंटबॅटन यांच्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया एक वर्ष आधीच पूर्ण केली गेली होती.
मुलगा 5: होय सर... लॉर्ड माउंटबॅटन है 31 मे 1947 रोजी
लंडनमधून सत्तेच्या हस्तांतरणाची मंजूरी घेऊन नवी दिल्लीला परतले होते.
मुलगा 6: मलाही आठवलं... 02 जून 1947 रोजी झालेल्या ऐतिहासिक बैठकीत फाळणीच्या योजनेवर ढोबळ मानाने सहमती झाली होती.
मुलगा 7: होय सर... भारताच्या फाळणी करण्याचा निर्णय एका अटीसारखा होता. भारतासारख्या देशाची फाळणी धार्मिक आधारावर व्हावी, या गोष्टीला मोठ्या प्रमाणात विरोध झाला.
मुलगा 1: ज्यांना या फाळणीत स्वतःचे हित आणि उज्ज्वल भविष्य दिसत होते, केवळ तेच नेते या फाळणीसाठी मानसिकदृष्ट्या तयार होते. असे म्हणतात.
शिक्षकः अरे वा मुलांनो... तुम्हाला बरंच काही माहित आहे.... आता पुढचा तास सुरू करण्यापूर्वी आपण एक छोटा-सा ब्रेक घेऊया...
सर्व मुले : ठीक आहे सर...
गाणेः वंदे मातरम... वंदे मातरम...
वंदे मातरम... वंदे मातरम...
वंदे मातरम... वंदे मातरम...
वंदे मातरम... वंदे मातरम...
सूत्रधार 1: दादा, फाळणीविषयी तुझं काय मत आहे?
सूत्रधार 2: भाऊ, फाळणीला प्रोत्साहन दिल्याने समाजात सुधारणा होईल. वेगवेगळ्या समुदायाच्या लोकांना आपापले अधिकार मिळतील,
सूत्रधार 1: नाही, नाही. फाळणीमुळे असं काहीही होणार नाही. अरेएकतेमुळेच समाजाचा विकास होऊशकतो. आपण सर्वांना एक होऊन समृद्धीच्या मार्गाने पुढे गेलं पाहिजे.
सूत्रधार 2 :
तुझं म्हणणं चांगलं आहे. पण फाळणीमुळेच शक्य होतं, ही वास्तविकता आहे.
सूत्रधार 1 : नाही, नाही... आपण सर्वांनी मिळून आपल्या देशाला प्रगतीच्या वाटेने पुढे घेऊन गेलं पाहिजे. आणि फाळणीची शोकांतिका नष्ट केली पाहिजे.
सूत्रधार 2 : तुला काय वाटतं... आपण सर्व मिळून हा संदेश आत्मसात करू शकू?
सूत्रधार 1 :
का नाही... यासाठी आपणा सर्वाना एकजूट व्हावं लागेल. आणि ही एकात्मताच आपला वारसा आहे. तिचे जतन करावेच लागेल.
सूत्रधार 2 :
ठीक आहे, पण अखंड भारताच्या फाळणीच्या वेळी ते तर सांग... काय झालं होतं,
सूत्रधार 1 :
याविषयी तर तेच लोक सांगतील, ज्यांनी ते भोगलं आहे...
वंदे मातरम... वंदे मातरम...
वंदे मातरम... वंदे मातरम...
वंदे मातरम... वंदे मातरम...
वंदे मातरम... वंदे मातर...
मुलेः
10
गुड आफ्टरनून सर...
शिक्षक 2
: गुड आफ्टरनून... प्लीज सिट डाऊन... हाँ आता पुढचं बोलू... आता पुढचं ऐका... ऐका... 9 जून 1947 रोजी नवी दिल्लीतील इम्पीरियल हॉटेलमध्ये ऑल इंडिया मुस्लिम लीगची बैठक झाली.
मुलगा 1 : सर... सर... त्याच्या पुढचं मी सांगू...
शिक्षकः अरे पूनम, तुला तर सगळं काही माहित आहे... छान, तसंही ज्ञान हे दिल्याने आणखी वाढत असतं... सांग... सांग...
मुलगा 1: मित्रांनो... तिथं फाळणीच्या मागणीचा प्रस्ताव जवळपास सर्वानुमते मंजूर झाला.
मुलगा 2 : त्यात फाळणीच्या बाजूने 300 आणि विरोधात फक्त 10 मते पडली.
आजोबाः
1946 आणि 1947 मध्ये भारताच्या वेगवेगळ्या भागांना हादरवून सोडणाऱ्या जातीय हिंसाचाराची व्याप्ती आणि क्रूरता याबद्दल अनेक पुस्तकांमध्ये तपशीलवार लिहिलं गेलं आहे. तो 4 मार्च 1947 चा दिवस होता. हिंदू आणि शीखांच्या मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला.
सूत्रधार 2 : 06 मार्चच्या सकाळपर्यंत पहाता पहाता, अमृतसर, जालंधर, रावळपिंडी, मुलतान आणि सियालकोटसह पंजाबमधील सर्व शहरे दंगलीच्या आगीने घेरली गेली.
सूत्रधार 1 :
पंजाबच्या तुलनेत बंगालमध्ये अनेक दशके सुरु असलेले स्थलांतर आणि पुनर्वसनाचे स्वरूप वेगळंच होते.
सूत्रधार 2 : बंगालचे लोक तर खूपच दुर्दैवी होते...
सूत्रधार 1 : का?
सूत्रधार 2 : कारण... बंगालच्या लोकांना एकदा नव्हे तर दोन-दोन वेळा स्थलांतर करावं लागलं होतं.
सूत्रधार 1 :
दोन... दोन... वेळा...
सूत्रधार 2 : जावं लागलं. एकदा त्यांना आपली घरंदारं सोडून पूर्व पाकिस्तानात
सूत्रधार 1 : यावं लागलं... आणिपुन्हा त्यांना तिथून पळून पश्चिम बंगालमध्ये
सूत्रधार 2 : भाऊ... तिथल्या अधिकाऱ्यांना फाळणीमुळे उद्भवलेल्या संकटाची तीव्रता लक्षात आलीच नाही....
सूत्रधार 1 : हजारो हिंदू कुटुंबे ढाका आणि आसपासच्या भागातून पळून सियालदह येथे पोहोचली...
सूत्रधार 2 :
इतक्या सहजासहजी पोहोचली नाही... वाटेत एकेका स्त्रीचे दागिने बळजबरीने हिसकावून घेतले गेले... त्यांचा विविध प्रकारे छळ केला गेला...
12
सूत्रधार 1 :
मुली, स्त्रिया, वृद्ध यांना अमानुषपणे वागणूक दिली
गेली...
सूत्रधार 2 : स्त्रिया असोत, मुले असोत, वा वृद्ध असोत... सर्वांशी गैरवर्तन केलं गेलं...
सूत्रधार 1 : होय, हे खरं आहे... फाळणीच्या वेळी स्त्रियांचं खूप जास्त नुकसान झालं.
सूत्रधार 2 : लाखो कुटुंबे नातेवाईकांपासून कायमची दुरावली.
सूत्रधार 1: एवढेच नव्हे, तर तिथे ट्रेनमध्ये लोक जिवंत चढले होते, आणि इथं येता येता ते मृतदेह झाले होते...
(मुलगा रडू लागतो.)
आजोबाः रडू नकोस बाळा... शांत हो...
मुलगाः आजोबा, ढाक्याहून आलेल्या त्या निर्वासितांचे काय झाले? त्यांचं सर्वकाही लुटलं गेलं होतं ना...
आजोबाः तीसुद्धा एक अजब कहाणी आहे बाळा... म्हणतात ना न
घर का ना घाट का...
आजोबाः ती लोकं आपापली घरंदारं सोडून इथं आली... आणि इथंही ती निर्वासित म्हणून गणली गेली...
मुलगाः असं का...?
आँखों से बहते, यह दर्द की धारें
आँर्खा से बहते, यह दर्द की धारे छूटी हुई जिंदगी, खोई हुई यारें। फूटी हुई जिंदगी, खोई हुई यारें।
पात्र 3: पूर्व पाकिस्तानातून इतके लोक बंगालमध्ये आले की कोणाच्याही घरात एक इंचही जागा उरली नाही... आपल्या नातेवाईकांसाठी....
पात्र 4: पश्चिम बंगाल सरकारने चगाव, नारायण गंज, बारीसाल आणि चांदपूर येथील निर्वासित कलकत्त्याला नेण्यासाठी पंधरा स्टीमरची व्यवस्था केली.
पात्र 3: पूर्व पाकिस्तानातील लोकांनी जलमार्गाने स्थलांतर केले होते... अनेक बोटी... पाण्यात बुडाल्या... काही दिवसांनी, पाण्यावर फक्त मृतदेहच तरंगत होते...
पात्र 3+4: असं काय खास होतं आमच्या हिश्श्याच्या जमिनीत... ज्याच्यासाठी आमचं सर्वकाही हिसकावून घेतलं गेलं...
पात्र 3: बंगाल, पंजाब, गुजरात, सिंध, सगळीकडे फाळणीची आग पेटली.
पात्र 4: सिंध प्रांतातील लोक निर्वासित होऊन येथे आले, पण... सिंध प्रांत आपल्याला नाही मिळाला...
सूत्रधार 1: सिंध प्रांतामुळे आठवलं, बहुतेक सिंधी कुटुंबे राजस्थानात गेली.
(एक सिंधी कुटुंब म्हणून)
सिंधी पुरुषः फाळणीनंतर पाकिस्तानातून लाखो निर्वासित भारतात आले. आणि राजस्थान अशा राज्यांपैकी एक आहे जिथे मोठ्या प्रमाणात निर्वासित आले.
सिंधी स्त्रीः राजस्थानमध्ये आमच्यासारख्या निर्वासितांसाठी मदत आणि पुनर्वसनाची व्यवस्था करणं हे फार मोठं आव्हान होतं.
सिंधी पुरुषः आमच्या येण्याने राजस्थानच्या सांस्कृतिक जडणघडणीतही बदल झाला. आम्ही वेगळे दिसू लागलो. आमची संस्कृती, भाषा, चालीरीती सगळंच बदललं.
सिंधी स्त्रीः सिंधमध्ये माझा मोठा व्यवसाय होता. पण इथं माझ्या मुलांना दोन वेळची भाकरसुद्धा मिळत नव्हती.
सिंधी पुरुषः तिथं माझं सगळं दुकान, घरदार लुटून नेलं.
सिंधी स्त्रीः ती रात्र मी कशी आठवू दादा... जेव्हा मी माझ्या मुलांना
कडेवर घेऊन पळाले होते.
सिंधी पुरुषः
जीव वाचवत पळतापळता कसाबसा राजस्थान
चिकानेरला एका लांबच्या नातेवाईकाच्या घरी पोहोचलो.
सिंधी स्त्रीः आमचे अनेक नातेवाईक वाटेत दुरावले आणि आजतागायत ते आम्हाला दिसले नाहीत. काही लोक झुंझुनूमध्ये राहिले.
सिंधी स्त्रीः ते बिचारे तरी किती दिवस आम्हाला पोसणार? शेवटी वैतागून मला निर्वासित छावणीत यावंच लागलं. एखादं हसतखेळतं कुटुंब, गाव, शहर कसं उध्वस्त होतं हे
आम्हाला विचारा...
(दोघेही किंचाळून रडू लागतात)
आँखों से बहते, यह दर्द की धारै आँखों से बहते, यह दर्द की धारै
छूटी हुई जिंदगीए खोई हुई यारें। छूटी हुई जिंदगी, खोई हुई यारें।
मुलगा: आजोबा... आता मला काही ऐकायचं नाही...
सूत्रधार 1+2 : जिथं आयुष्याची प्रत्येक सकाळ हसतमुखाने आल्हादित
होत असे..
पात्र 3+4 : नाही जास्त वेदना तुझ्या ओझ्याची माझ्या खांद्याला जेव्हा तोलतो मी दहशत, युद्ध आणि क्रूरता....
तिथलं दृश्य पाहून अश्रूचंही रक्तात रूपांतर झालं....
पात्र 1 फाळणीच्या शोकांतिकेत आपले प्राण गमावलेल्या आणि स्थलांतराच्या वेदना सहन करणाऱ्या लाखो भारतीयांना शतशः नमन...
पात्र 2 : आपल्या देशाच्या एकतेचे आणि अखंडतेचे रक्षण करण्यासाठी आपणा सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावे लागतील.
पात्र 3 : फाळणीच्या राजकीय खेळात एका भावाविरुद्ध दुसऱ्या भावाच्या मनात विष कालवलं होतं.
पात्र 4 : या विषामुळे माणूसाने माणसाचा चावा घेतला, माणसाने माणसाला दूर केलं, माणसाने माणूस गमावला. आणि आपल्या अखंड भारताची फाळणी झाली.
सर्वः आपण त्यांना बळी पडायचं नाही...
पात्र 1: भारत देश अखंड ठेवायचा आहे.
सर्वः भारत देश अखंड ठेवायचा आहे.
पात्र 4 : आता कोणत्याही राजकीय भूलथापांना बळी पडायचं नाही.
सर्वः आता कोणत्याही राजकीय भूलथापांना बळी पडायचं नाही.
पात्र 4: अखंडता आणि एकाग्रतेच्या जोरावर आपण आपली भारत माता विकसित करू.
सर्वः आपण आपली भारत माता विकसित करू. होय, चला... आपण सर्व प्रतिज्ञा करू...
भारत माता की जय... भारत माता की जय... वंदे मातरम... वंदे मातरम...
वंदे मातरम... वंदे मातरम... वंदे मातरम... वंदे मातरम... वंदे मातरम... वंदे मातरम...
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon