DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

PM POSHAN Funds Disbursed for Egg Banana

महाराष्ट्र शासन

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना (स्वतंत्र कथा) प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र पुणे 

दि. १४/०८/२०२४.

जा. क्र. प्राशिसं/पीएमपोषण/अंडी/२०२४/०५५०९

प्रति,

१. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका

२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व

विषय : प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अंडी/केळी या पदार्थाचा लाभ देणे बाबत.

संदर्भ:- 

१. शालेय शिक्षण विभाग शा.नि. शापोआ-२०२३/प्र.क्र. ९२/एस.डी.३ दि. ०७.११.२०२३.

२. शालेय शिक्षण विभाग शा.नि. शापोआ-२०२३/प्र.क्र. ९२/एस.डी.३ दि. २०.१२.२०२३. ३. शालेय शिक्षण विभाग शा.नि. शापोआ-२०२३/प्र.क्र.९२/एस.डी.३ दि. ११.०६.२०२४.

४. शालेय शिक्षण विभाग शा.नि. शापोआ-२०२३/प्र. क्र. ९२/एस.डी.३ दि. १४.०८.२०२४.

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अनुदानित शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. प्रस्तुत योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार इ.१ ली ते इ.५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक व १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त तसेच, इ. ६ वी ते इ.८ वीच्या विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक व २० ग्रॅम प्रथिनेयुक्त मध्यान्ह भोजन देण्यात येते. सद्यस्थितीत शासन निर्णय दि. ११ जुन, २०२४ अन्वये त्रिस्तरीय पाककृतीच्या स्वरुपात पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. अंड्यांमधील पौष्टिक मूल्यांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत पोषण आहारामध्ये अंड्यांचा समावेश करण्याचा निर्णय शासनाने संदर्भ १ अन्वये घेतलेला आहे. अंड्यामध्ये उच्च प्रतिचे प्रथिने, उष्मांक, जीवनसत्त्चे, लोह, कॅल्शियम, कार्बोहायड्रेड असल्याने पोषण आहारात अंड्यांचा समावेश केल्यास विद्यार्थ्यांची वाढ चांगल्या प्रकारे होवून त्यांची रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यास मदत होऊ शकेल. त्याअनुषंगाने संदर्भ ४ च्या शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांच्या आरोग्य विकासाकरीता नियमित आहारासोबत अंडी/केळी अथवा स्थानिक फळे उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत प्रस्तुत उपक्रमाच्या अंमलबजावणीकरीता खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

१. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत पाककृतीमध्ये सुधारणा करण्यात येऊन विद्यार्थ्यांना अधिक चांगला आहार उपलब्ध होणेच्या उद्देशाने त्रिस्तरीय पाककृती उपलब्ध करुन देण्याचा निर्णय शासनाने संदर्भ ३ अन्वये घेतलेला आहे. याअंतर्गत दोन आठवड्यातील प्रत्येक दिवसांकरीता वेगवेगळ्या पाककृतींची शिफारस करण्यात आलेली आहे.

२. त्रिस्तरीय पाककृतीअंतर्गत निर्धारित करण्यात आलेल्या पाककृतींमध्ये दोन आठवड्यातून एक दिवस अंडी (अंडा पुलाव या स्वरुपात) विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन द्यावयाचा आहे. शासन निर्णय दि. १४.०८.२०२४ मध्ये दिलेल्या निर्देशानुसार पुढील दहा आठवड्याकरीता विद्यार्थ्यांना अंडी उपलब्ध करुन देण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.

३. खालील तक्त्यामध्ये नमूद केलेनुसार पुढील दहा आठवड्याकरीता अंडी (अंडा पुलाव या स्वरुपात) योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन द्यावयाची आहेत.योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन

अंडी उपलब्ध करुन देण्याकरीता अनुज्ञेय (दिवस)

महिना

ऑगस्ट, २०२४ २ दिवस

सप्टेंबर, २०२४ २ दिवस

ऑक्टोबर, २०२४ २ दिवस

नोव्हेंबर, २०२४ २ दिवस

डिसेबर, २०२४ २ दिवस

एकूण

१० दिवस

४. जिल्हा परिषदेने निश्चित केलेल्या त्रिस्तरीय पाककृतीप्रमाणे दोन आठवड्यातील एक दिवस अंडी या पदार्थांचा लाभ अंडा पुलाव या स्वरुपात विद्यार्थ्यांना द्यावयाचा आहे तसेच तसेच जे विद्यार्थी अंडी खात नाहीत अशा विद्यार्थ्यांना अंडी ऐवजी निर्धारित करण्यात आलेल्या दराच्या मर्यादेमध्ये केळी अथवा स्थानिक फळ उपलब्ध करून देण्यात यावे.

५. सद्यस्थितीतील अंड्यांचा बाजारभाव विचारत घेता, एका अंड्यासाठी रु.५/- इतका निधी चार आठवड्यांकरीता अग्रीम स्वरुपात शाळांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तथापि अंडी व केळी करीता शाळांना निधी उपलब्ध होईपर्यंत शाळांनी इंधन व भाजीपाल्याकरीता अग्रीम स्वरुपात शाळास्तरावर उपलब्ध असलेल्या निधीमधून सदरचा खर्च भागवाया.

६. शासन निर्णय दि. २० डिसेंबर, २०२३ मधील तरतूदीनुसार नैशनल एग्ज को-ऑर्डिनेशन कमिटी यांचेडील संबंधित महिन्यातील सरासरी वरानुसार निश्चित करुन फरकांची रक्कम शाळांना उपलब्ध करुन देण्यात येईल व त्याकरीता आवश्यक अनुदान जिल्ह्यांना उपलब्ध करुन देण्यात येईल.

७. सदर उपक्रम ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापन समितीमार्फत तसेच, नागरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत आहार पुरविणाऱ्या यंत्रणेमार्फत राबविण्यात यावा.

८. ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापन समितीने स्थानिक बाजारपेठेतून अंडी खरेदी करुन जिल्हा परिषदेने निश्चित केलेल्या दिवशी विद्यार्थ्यांना अंडा पुलाव या स्वरुपात सदर पदार्थाचा लाभ द्यावा.

९. प्रस्तुत उपक्रमाकरीता जिल्ह्यातील योजनेस पात्र सर्व शाळांमधील विद्यार्थी संख्या विचारात घेऊन संचालनालयाकडे त्वरीत चार आठवड्यांकरीता अनुदान मागणी करणेत यावी., संचालनालयाकडून अनुदान प्राप्त होताच, नियमानुसार आवश्यक कार्यवाही करून अग्रीम स्वरुपात चार आठवड्यांकरीताचा निधी संबंधित शाळा व्यवस्थापन समितीच्या बैंक खात्यावर त्वरीत वर्ग होईल, याची दक्षता सर्व जिल्ह्यांनी घ्यावी.

१०. केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीतंर्गत येणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना संबंधित शाळेसाठी निश्चित केलेल्या अक्ष शिजविणाऱ्या यंत्रणामार्फत अंडा पुलाव या स्वरुपात अंडी या पदार्थाचा लाभ देण्यात यावा. तसेच जे विद्यार्थी अंडी खात नाहीत अशा विद्यार्थ्यांना अंडी ऐवजी निर्धारित करण्यात आलेल्या दराच्या मर्यादेमध्ये केळी अथवा स्थानिक फळ उपलब्ध करून देण्यात यावे.

११. ग्रामीण भागामध्ये सदरप्रमाणे विद्यार्थ्यांना दिलेल्या लाभाची माहिती संबंधित शाळेतील मुख्याध्यापक यांच्याकडून प्रमाणित करुन घेण्यात यावी. सदर माहितीची केंद्रप्रमुख यांचेकडून प्रमाणित करुन तालुका कार्यालयाकडे संकलित करण्यात यावी.

१२. गटशिक्षणाधिकारी/अधीक्षक (पीएमपोषण) यांनी शाळांना भेटी देऊन अंडी उपलब्धतेची खात्री करावी तसेच तालुक्यातील सर्व केंद्राची माहिती संकलित व प्रमाणित करुन जिल्हा कार्यालयास सादर करावी. जिल्हा कार्यालयाने तालुक्यांमार्फत अचूक माहिती व प्रमाणपत्र प्राप्त झालेनंतरच पुढील महिन्यांकरीताचा निधी संबंधित तालुक्यातील शाळांच्या खाती वर्ग करावा.

१३. महापालिका/नगरपालिका स्तरावर केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीतंर्गत शाळांना भेटी देऊन तसेच अंडी/फळे यांच्या खरेदीच्या देयकांची शिक्षणाधिकारी (प्राथ) यांनी यादृच्छिक पध्दतीने तपासणी करुन सदरचा लाभ विद्यार्थ्यांना मिळत असलेबाबत मुख्याध्यापक यांचेकडून खातरजमा करून घ्यावी व प्रशासन अधिकारी (नपा व मनपा) यांचेकडून सदर माहिती प्रमाणित करुन घ्यावी. प्रत्येक महिन्यानंतर सदर माहितीची पडताळणी करून संबंधित अन्न शिजविणाऱ्या यंत्रणांना अंडी फळे यांच्या देयकांची अदायगी करावी,

१४ . शाळांनी नियमित उपस्थितीची नोंद एमडीएम पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने नोंदविणे आवश्यक

राहील. अंडी / केळी याचा निर्धारित दिवशी विद्यार्थ्यांना लाभ दिला परंतु सदर दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती एमडीएम पोर्टलवर नोंदविली नसल्यास, सदर दिवसाकरीता वितरीत केलेल्या अंडी/फळे याकरीताचे अनुदान अनुज्ञेय होणार नाही, याची स्पष्ट सूचना सर्व केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांना व शाळांना करून देण्यात यावी.

१५. अंडी/फळांचा लाभ शाळास्तरावर नियमितपणे निर्देशित केलेनुसार व जिल्ह्यांनी निश्चित केलेल्या पाककृतीतील दिवशी विद्यार्थ्यांना उपलब्ध होत असलेबाबतची खातरजमा क्षेत्रीय स्तरावरील सर्व अधिका-यांनी शाळा भेटी दरम्यान करणेबाबत सूचना देण्यात याव्यात.

१६. शाळास्तरावर प्रस्तुत उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी उक्त प्रमाणे आवश्यक सूचना देण्यात येत आहेत. तथापि आवश्यकता असल्यास याव्यतिरिक्त अधिकचे निर्देश शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी लेखी स्वरुपात सर्व शाळांकरीता निर्गमित करावेत. सदरचे निर्देश ग्रामीण व नागरी भागातील सर्व शाळा व संस्थांकरीता लागू राहतील.

१७. शाळास्तरावरुन राबविण्यात येत असलेल्या प्रस्तुत उपक्रमाबाबत आवश्यक ती जनजागृती विविध प्रसार व प्रचार माध्यमाद्वारे करण्यात यावी. उदा. सामाजिक प्रसार माध्यमे, शिक्षकांचे विविध ब्लॉग, विविध संकेतस्थळे इ.

परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास ते आवडीला स्पर्श करा 

शिक्षण संचालक (प्राथमिक) 

महाराष्ट्र राज्य, पुणे

Also Read 👇 

महाराष्ट्र शासन

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना (स्वतंत्र कथा) प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य लाल देऊळ समोर, जॉ. आंबेडकर मार्ग, पुणे

दि. १४/०८/२०२४.

जा. क्र. प्राशिसं/पीएमपोषण/अंडी/२०२४/०५५०९

प्रति,

१. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका

२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व

विषय : प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अंडी/केळी या पदार्थाचा लाभ देणे बाबत.

संदर्भ :- १. शालेय शिक्षण विभाग शा.नि. शापोआ-२०२३/प्र.क्र. ९२/एस.डी.३ दि. ०७.११.२०२३.

२. शालेय शिक्षण विभाग शा.नि. शापोआ-२०२३/प्र.क्र. ९२/एस.डी.३ दि. २०.१२.२०२३. ३. शालेय शिक्षण विभाग शा.नि. शापोआ-२०२३/प्र.क्र.९२/एस.डी.३ दि. ११.०६.२०२४.

४. शालेय शिक्षण विभाग शा.नि. शापोआ-२०२३/प्र. क्र. ९२/एस.डी.३ दि. १४.०८.२०२४.

      केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अनुदानित शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. प्रस्तुत योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार इ.१ ली ते इ.५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक व १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त तसेच, इ. ६ वी ते इ.८ वीच्या विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक व २० ग्रॅम प्रथिनेयुक्त मध्यान्ह भोजन देण्यात येते. सद्यस्थितीत शासन निर्णय दि. ११ जुन, २०२४ अन्वये त्रिस्तरीय पाककृतीच्या स्वरुपात पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. अंड्यांमधील पौष्टिक मूल्यांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत पोषण आहारामध्ये अंड्यांचा समावेश करण्याचा निर्णय शासनाने संदर्भ १ अन्वये घेतलेला आहे. अंड्यामध्ये उच्च प्रतिचे प्रथिने, उष्मांक, जीवनसत्त्चे, लोह, कॅल्शियम, कार्बोहायड्रेड असल्याने पोषण आहारात अंड्यांचा समावेश केल्यास विद्यार्थ्यांची वाढ चांगल्या प्रकारे होवून त्यांची रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यास मदत होऊ शकेल. त्याअनुषंगाने संदर्भ ४ च्या शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांच्या आरोग्य विकासाकरीता नियमित आहारासोबत अंडी/केळी अथवा स्थानिक फळे उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत प्रस्तुत उपक्रमाच्या अंमलबजावणीकरीता खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

१. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत पाककृतीमध्ये सुधारणा करण्यात येऊन विद्यार्थ्यांना अधिक चांगला आहार उपलब्ध होणेच्या उद्देशाने त्रिस्तरीय पाककृती उपलब्ध करुन देण्याचा निर्णय शासनाने संदर्भ ३ अन्वये घेतलेला आहे. याअंतर्गत दोन आठवड्यातील प्रत्येक दिवसांकरीता वेगवेगळ्या पाककृतींची शिफारस करण्यात आलेली आहे.

२. त्रिस्तरीय पाककृतीअंतर्गत निर्धारित करण्यात आलेल्या पाककृतींमध्ये दोन आठवड्यातून एक दिवस अंडी (अंडा पुलाव या स्वरुपात) विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन द्यावयाचा आहे. शासन निर्णय दि. १४.०८.२०२४ मध्ये दिलेल्या निर्देशानुसार पुढील दहा आठवड्याकरीता विद्यार्थ्यांना अंडी उपलब्ध करुन देण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.

३. खालील तक्त्यामध्ये नमूद केलेनुसार पुढील दहा आठवड्याकरीता अंडी (अंडा पुलाव या स्वरुपात) योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन द्यावयाची आहेत.योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन अंडी उपलब्ध करुन देण्याकरीता अनुज्ञेय (दिवस)

महिना

ऑगस्ट, २०२४

२ दिवस

२ दिवस

२ दिवस

सप्टेंबर, २०२४

ऑक्टोबर, २०२४

नोव्हेंबर, २०२४

२ दिवस

२. दिवस

डिसेबर, २०२४

एकूण

१० दिवस

४. जिल्हा परिषदेने निश्चित केलेल्या त्रिस्तरीय पाककृतीप्रमाणे दोन आठवड्यातील एक दिवस अंडी या पदार्थांचा लाभ अंडा पुलाव या स्वरुपात विद्यार्थ्यांना द्यावयाचा आहे तसेच तसेच जे विद्यार्थी अंडी खात नाहीत अशा विद्यार्थ्यांना अंडी ऐवजी निर्धारित करण्यात आलेल्या दराच्या मर्यादेमध्ये केळी अथवा स्थानिक फळ उपलब्ध करून देण्यात यावे.

५. सद्यस्थितीतील अंड्यांचा बाजारभाव विचारत घेता, एका अंड्यासाठी रु.५/- इतका निधी चार आठवड्यांकरीता अग्रीम स्वरुपात शाळांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तथापि अंडी व केळी करीता शाळांना निधी उपलब्ध होईपर्यंत शाळांनी इंधन व भाजीपाल्याकरीता अग्रीम स्वरुपात शाळास्तरावर उपलब्ध असलेल्या निधीमधून सदरचा खर्च भागवाया.

६. शासन निर्णय दि. २० डिसेंबर, २०२३ मधील तरतूदीनुसार नैशनल एग्ज को-ऑर्डिनेशन कमिटी यांचेडील संबंधित महिन्यातील सरासरी वरानुसार निश्चित करुन फरकांची रक्कम शाळांना उपलब्ध करुन देण्यात येईल व त्याकरीता आवश्यक अनुदान जिल्ह्यांना उपलब्ध करुन देण्यात येईल.

७. सदर उपक्रम ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापन समितीमार्फत तसेच, नागरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत आहार पुरविणाऱ्या यंत्रणेमार्फत राबविण्यात यावा.

८. ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापन समितीने स्थानिक बाजारपेठेतून अंडी खरेदी करुन जिल्हा परिषदेने निश्चित केलेल्या दिवशी विद्यार्थ्यांना अंडा पुलाव या स्वरुपात सदर पदार्थाचा लाभ द्यावा.

९. प्रस्तुत उपक्रमाकरीता जिल्ह्यातील योजनेस पात्र सर्व शाळांमधील विद्यार्थी संख्या विचारात घेऊन संचालनालयाकडे त्वरीत चार आठवड्यांकरीता अनुदान मागणी करणेत यावी., संचालनालयाकडून अनुदान प्राप्त होताच, नियमानुसार आवश्यक कार्यवाही करून अग्रीम स्वरुपात चार आठवड्यांकरीताचा निधी संबंधित शाळा व्यवस्थापन समितीच्या बैंक खात्यावर त्वरीत वर्ग होईल, याची दक्षता सर्व जिल्ह्यांनी घ्यावी.

१०. केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीतंर्गत येणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना संबंधित शाळेसाठी निश्चित केलेल्या अक्ष शिजविणाऱ्या यंत्रणामार्फत अंडा पुलाव या स्वरुपात अंडी या पदार्थाचा लाभ देण्यात यावा. तसेच जे विद्यार्थी अंडी खात नाहीत अशा विद्यार्थ्यांना अंडी ऐवजी निर्धारित करण्यात आलेल्या दराच्या मर्यादेमध्ये केळी अथवा स्थानिक फळ उपलब्ध करून देण्यात यावे.

११. ग्रामीण भागामध्ये सदरप्रमाणे विद्यार्थ्यांना दिलेल्या लाभाची माहिती संबंधित शाळेतील मुख्याध्यापक यांच्याकडून प्रमाणित करुन घेण्यात यावी. सदर माहितीची केंद्रप्रमुख यांचेकडून प्रमाणित करुन तालुका कार्यालयाकडे संकलित करण्यात यावी.

१२. गटशिक्षणाधिकारी/अधीक्षक (पीएमपोषण) यांनी शाळांना भेटी देऊन अंडी उपलब्धतेची खात्री करावी तसेच तालुक्यातील सर्व केंद्राची माहिती संकलित व प्रमाणित करुन जिल्हा कार्यालयास सादर करावी. जिल्हा कार्यालयाने तालुक्यांमार्फत अचूक माहिती व प्रमाणपत्र प्राप्त झालेनंतरच पुढील महिन्यांकरीताचा निधी संबंधित तालुक्यातील शाळांच्या खाती वर्ग करावा.

१३. महापालिका/नगरपालिका स्तरावर केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीतंर्गत शाळांना भेटी देऊन तसेच अंडी/फळे यांच्या खरेदीच्या देयकांची शिक्षणाधिकारी (प्राथ) यांनी यादृच्छिक पध्दतीने तपासणी करुन सदरचा लाभ विद्यार्थ्यांना मिळत असलेबाबत मुख्याध्यापक यांचेकडून खातरजमा करून घ्यावी व प्रशासन अधिकारी (नपा व मनपा) यांचेकडून सदर माहिती प्रमाणित करुन घ्यावी. प्रत्येक महिन्यानंतर सदर माहितीची पडताळणी करून संबंधित अन्न शिजविणाऱ्या यंत्रणांना अंडी फळे यांच्या देयकांची अदायगी करावी,

१४ . शाळांनी नियमित उपस्थितीची नोंद एमडीएम पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने नोंदविणे आवश्यक

राहील. अंडी / केळी याचा निर्धारित दिवशी विद्यार्थ्यांना लाभ दिला परंतु सदर दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती एमडीएम पोर्टलवर नोंदविली नसल्यास, सदर दिवसाकरीता वितरीत केलेल्या अंडी/फळे याकरीताचे अनुदान अनुज्ञेय होणार नाही, याची स्पष्ट सूचना सर्व केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांना व शाळांना करून देण्यात यावी.

१५. अंडी/फळांचा लाभ शाळास्तरावर नियमितपणे निर्देशित केलेनुसार व जिल्ह्यांनी निश्चित केलेल्या पाककृतीतील दिवशी विद्यार्थ्यांना उपलब्ध होत असलेबाबतची खातरजमा क्षेत्रीय स्तरावरील सर्व अधिका-यांनी शाळा भेटी दरम्यान करणेबाबत सूचना देण्यात याव्यात.

१६. शाळास्तरावर प्रस्तुत उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी उक्त प्रमाणे आवश्यक सूचना देण्यात येत आहेत. तथापि आवश्यकता असल्यास याव्यतिरिक्त अधिकचे निर्देश शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी लेखी स्वरुपात सर्व शाळांकरीता निर्गमित करावेत. सदरचे निर्देश ग्रामीण व नागरी भागातील सर्व शाळा व संस्थांकरीता लागू राहतील.

१७. शाळास्तरावरुन राबविण्यात येत असलेल्या प्रस्तुत उपक्रमाबाबत आवश्यक ती जनजागृती विविध प्रसार व प्रचार माध्यमाद्वारे करण्यात यावी. उदा. सामाजिक प्रसार माध्यमे, शिक्षकांचे विविध ब्लॉग, विविध संकेतस्थळे इ.

शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे

Also Read 👇 

Funds disbursed for egg/banana benefit under Pradhan Mantri Poshan Shakti Nirman (PM-POSHAN) scheme

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN) योजनेतंर्गत अंडी/केळीचा लाभ देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत...

दिनांक: १४ ऑगस्ट, २०२४

प्रस्तावना :-

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील तसेच, शासन अनुदानित शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाचा लाभ देण्यात येतो. प्रस्तुत योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार इ.१ ली ते इ.५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक व १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त तसेच, इ.६ वी ते इ.८ वीच्या विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक व २० ग्रॅम प्रथिनेयुक्त मध्यान्ह भोजन

देण्यात येते. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षांमध्ये योजनेंतर्गत पात्र असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना योजनेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत नियमित आहाराव्यतिरिक्त २३ आठवड्यांकरीता आठवड्यातून एक दिवस अंडी तसेच, अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना केळी अथवा स्थानिक फळ देण्याचा निर्णय दि.०७ नोव्हेंबर, २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला होता. त्यानुषंगाने सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना अंडी अथवा केळी यांचा लाभ देण्यासाठी आवश्यक निधी संबंधित शाळांना वितरीत करण्यात आला होता. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्येदेखील १० आठवड्यांकरीता विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस अंडी तसेच, जे विद्यार्थी अंडी खात नाहीत अशा विद्यार्थ्यांना केळी अथवा स्थानिक फळ उपलब्ध करुन देण्यासाठी रु.५००० लक्ष इतका निधी वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव नियोजन विभागामार्फत वित्त विभागास सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावास मिळालेल्या मान्यतेनुसार विद्यार्थ्यांना अंडी व केळी या पदार्थाचा लाभ देण्याकरिता आवश्यक निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णयः-

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतंर्गत सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये पात्र विद्यार्थ्यांना आठवडयातून एक दिवस याप्रमाणे १० आठवड्यांकरीता अंड्यांचा तसेच, जे विद्यार्थी अंडी खात नाहीत अशा विद्यार्थ्यांना केळी अथवा स्थानिक फळ यांचा लाभ देण्यासाठी सर्वसाधारण घटकांतर्गत राज्य हिस्स्याच्या तरतुदीमधून रु.५००० लक्ष (रुपये पन्नास कोटी फक्त) इत्तका निधी वितरीत व खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

लेखाशिर्ष

मागणी क्रमांक ई-२,२२०२, सर्वसाधारण शिक्षण, ०१- प्राथमिक शिक्षण, (०१) (१६) प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण (पीएम-पोषण) (राज्य हिस्सा) (कार्यक्रम) ३१, सहायक अनुदाने (वेतनेत्तर) (२२०२ ३८१५)

सन २०२४-२५ मधील अर्थसंकल्पित तरतूद रु.६०००० लक्ष

एकूण रु.६०००० लक्ष

या शासन निर्णयान्वये वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत असलेला निधी रु.५००० लक्ष

एकूण रु.५००० लक्ष

👇👇👇👇👇

👆👆👆👆👆

२. सदर योजनेंतर्गत उपरोक्तप्रमाणे वितरित केलेल्या निधीमधून सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना आठवडयातून एक दिवस याप्रमाणे १० आठवड्यांकरीता अंडी/केळी यांचा लाभ देण्यासाठी रु.५/- प्रति विद्यार्थी अशी मर्यादा निश्चित करण्यात येत आहे. तथापि, अंडयाचे दर शासन निर्णय दि.२० डिसेंबर, २०२३ मधील तरतुदीनुसार शिक्षण संचालक (प्राथ.) यांनी वेळोवेळी सुधारित करावेत.

३. सदर योजनेंतर्गत पात्र असणाऱ्या नागरी व ग्रामीण भागातील सर्व शाळांनी विद्यार्थ्यांची उपस्थिती नियमितपणे एमडीएम पोर्टलवर नोंदविणे आवश्यक आहे.

४. सदर योजनेंतर्गत नागरी भागातील केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत अंडी/केळी यांचा लाभ विद्यार्थ्यांना दिल्याचे प्रमाणपत्र संबंधित मुख्याध्यापकामार्फत घेण्यात यावे. तसेच, सदर प्रमाणपत्राशिवाय संबंधित संस्थांची अंडी/केळीबाबतची देयके अदा करण्यात येऊ नयेत.

५. केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीबाबत अंडी व केळी यांच्या खरेदीच्या देयकाची यादृच्छिक पध्दतीने संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथ.) व शिक्षण संचालक (प्राथ) यांच्या कार्यालयामार्फत पडताळणी करण्यात यावी.

६. ग्रामीण भागामध्ये अंडी केळी यांचा विद्यार्थ्यांना लाभ दिल्याबाबत संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीसह प्रमाणपत्र केंद्र प्रमुख यांच्याकडे सादर करावे. केंद्र प्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त सर्व शाळांना अंडी व फळे यांचा लाभ दिल्याची खात्री करुन त्यानुसार प्रमाणपत्र गटशिक्षणाधिकारी/अधिक्षक (शापोआ) यांच्याकडे सादर करावे. संबंधित गटशिक्षणाधिकारी/अधिक्षक (शापोआ) यांनी तालुक्यातील सर्व केंद्र प्रमुखाच्या प्राप्त अहवालाच्या आधारे तालुक्यातील सर्व शाळांना योजनेचा लाभ दिल्याचे प्रमाणित करुन तसा अहवाल संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांच्याकडे सादर करणे आवश्यक राहील.

७. शाळा स्तरावर प्रस्तुत उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक त्या सविस्तर सूचना शिक्षण संचालक (प्राथ) यांच्या स्तरावरून सर्व शिक्षणाधिकारी (प्राथ) तसेच, सर्व संबंधितांना देण्यात याव्यात.

८. सदर शासन निर्णय नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्र.२६६/१४७१, दि.२६/०६/२०२४ तसेच, वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्र.७४०/व्यय-५, दि.०९/०७/२०२४ अन्वये दिलेल्या सहमतीस अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.

९. प्रस्तुत निधीच्या उपयोजनाकरीता आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रण अधिकारी तसेच, राज्य समन्वय अधिकारी, प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, स्वतंत्र कक्ष, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

१०. सदर निधी केंद्र व राज्य शासनने वेळोवळी दिलेले निर्देश/आदेश/शासन निर्णय/परिपत्रक/सूचना यांना अनुसरुन विहित कालावधीत खर्च करण्याची तसेच, याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करण्याची दक्षता शिक्षण संचालक (प्राथ.) महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी घेण्यात यावी.

११. प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०८१४१५३८३८११२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(प्रमोद पाटील)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 
शासन निर्णय क्रमांकः शापोआ-२०२३/प्र.क्र.९२/एस.डी. मुंबई

१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ-२०२२/प्र.क्र.१११/एस.डी.३. दि.१५ मे. २०२३.
२) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ-२०२३/प्र.क्र.१८४/एस.डी.३. दि.१८ डिसेंबर, २०२३.
३) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ-२०२३/प्र.क्र.९२/एस.डी.३. दि. २० डिसेंबर, २०२३
४) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ-२०२३/प्र.क्र.१८४/एस.डी.३. दि.१६ फेब्रुवारी, २०२४.
५ ) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ-२०२३/प्र.क्र.१८४/एस.डी.३. दि.२२ मार्च, २०२४.
६) वित्त विभागाचे परिपत्रक क्र. अर्थसं २०२४/प्र.क्र.३४/अर्थ-३. दि.०१ एप्रिल, २०२४.
७) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ-२०२३/प्र.क्र.९२/एस.डी.३. दि.०८ मे, २०२४.
८) वित्त विभागाचे परिपत्रक क्र. अर्थसं २०२४/प्र.क्र.८०/अर्थ-३. दि.२५ जुलै, २०२४.
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon