Baloch Marathi Movie Shalet Dakhavine GR
सीमेपार
लढलेल्या मराठयांची विजयगाथा असलेल्या “बलोच" हा मराठी चित्रपट
राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना दाखविण्यास परवानगी देण्याबाबत. |
महाराष्ट्र
शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०२३/प्र.क्र.
४३/प्रशिक्षण मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२. तारीख: ०९ ऑक्टोबर,
२०२३ |
वाचा १.
श्री. प्रकाश जनार्दन पवार, विश्वगुंज पिक्चर्स, पुणे यांचे दि. २६.०६.२०२३ चे निवेदन. २.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. संकीर्ण-२०२०/प्र.क्र.२५/प्रशिक्षण,
दि. ०५.०३.२०२० चे पत्र ३.
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र.
पुणे यांचे पत्र क्र.जा.क्र. राशैसंवप्रपम/प्रमा/बलोचचिपट अहवाल/२०२३-२४/४१०४
दि.०४.०९.२०२३ |
शासन
निर्णय Baloch Marathi Movie Shalet Dakhavine GR श्री प्रकाश जनार्दन पवार, विश्वगुंज
पिक्चर्स, पुणे यांनी "बलोच" हा मराठी चित्रपट
राज्यातील शाळांमधून दाखविण्यास परवानगी देण्याची संदर्भाधीन दिनांक २३/०६/२०२३
च्या पत्रान्वये विनंती केलेली आहे. त्यानुसार सदर्भ क्र ३ येथील पत्रान्वये
नमुद कार्यवाहीकरिता गठीत परिक्षण समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. सीमेपार
लढलेल्या मराठ्यांच्या असीम धैर्याचा, शौर्याचा आणि
कर्तृत्वाचा रणसंग्राम, “बलोच" हा ऐतिहासिकदृष्टया
चांगल्याप्रकारे मांडणीद्वारे निर्मित केलेला मराठी चित्रपट असून, राज्यातील शाळांमध्ये दाखविल्यास इतिहासात सीमेपार लढलेल्या मराठयांची
विजयगाथा या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनुभवता येणार आहे. सदर मराठी चित्रपटास
राज्यातील शाळांमधील विद्यार्थी/ विद्यार्थीनींना दाखविण्यास खालील अटी व
शर्तीच्या अधीन राहून शैक्षणिक वर्ष सन २०२३ २४ या एक वर्षापुरती परवानगी
देण्यात येत आहे. |
अटी:- १)
" बलोच" हा चित्रपट राज्यातील शाळांमधील फक्त १० वर्ष वयोगटापुढील
विद्यार्थ्यांनाच दाखविण्यास परवानगी देण्यात येत आहे. २)
सदर चित्रपट पाहण्याची कोणत्याही विद्यार्थ्यांना सक्ती करण्यात येणार नाही. ३)
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात कोणताही अडथळा येणार नाही याची योग्य
ती दक्षता घेण्यात यावी. ४)
या शासन परवानगीच्या आधारे सदर चित्रपट दाखविण्याबाबत इतर दुसऱ्या कोणत्याही
संस्थेबरोबर निर्माता,
विश्वगुंज पिक्चर्स, पुणे यांना करार करता
येणार नाही किंवा प्रतिनिधी नेमता येणार नाही व तशी परवानगी त्यांना राहणार
नाही. 4)
सदरहू चित्रपट पहाण्यास इच्छुक विद्यार्थ्याकडून रुपये २०/-
(रुपये वीस फक्त) पेक्षा जास्त शुल्क आकारता येणार नाही. |
६)
हा चित्रपट शाळांमधून दाखविताना कोणत्याही प्रकारचा वाद उद्धभवल्यास किंवा
तक्रारी प्राप्त झाल्यास सदर संस्थेस दिलेली परवानगी तात्काळ रद्द करण्यात येईल. (७) सदर चित्रपट दाखविण्याची परवानगी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ एक वर्ष
पुरतीच मर्यादित राहील. सदर शासन निर्णय pdf Download करण्यासाठी खालील वर टिचकी मारा / करा कक्ष
अधिकारी,
महाराष्ट्र शासन. |
पुढील
अद्यावत माहिती तुमच्या पर्यंत येण्यासाठी आपल्या समज माध्यमात सामील व्हा |
|
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon