Std 9th Marathi Santvani Swadhyay MCQs
मराठी कुमारभारती इयत्ता नववी
Marathi Kumarbharti Iytta Nvavi
२. संतवाणी- (अ) जैसा वृक्ष नेणे
संत नागदेव (१२७०-१३५०) वारकरी संप्रदायातील संतकवी. संत नामदेवांची अभंगरचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध, सरळ, साधी आहे. संत नामदेवांनी हिंदीतही रचना केली आहे. पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली. शिखांच्या 'गुरु ग्रंथसाहेब' या ग्रंथात त्यांची एकसष्ट कवने समाविष्ट असून 'भक्त नामेदवजी की मुखबानी' या नावाने ती प्रसिद्ध आहे. संत नामदेवांची अभंगगाथा पुस्तकरूपाने १८९२ मध्ये प्रथम लोकांसमोर आली.
प्रस्तुत अभंगामध्ये संतांना वृक्षाची उपमा देऊन त्यांची महती सांगितली आहे.
खालील कविता लक्षपूर्वक वाचा व प्रश्नमंजुषेत विचारलेल्या प्रश्नांचा योग्य पर्याय निवडा.
जैसा वृक्ष नेणे भान अपमान ।
तैसे ते सज्जन वर्तताती ||१||
येऊनियां पूजा प्राणि जे करिती ।
त्याचें सुख चिर्ती तया नाही ।।२।।
अथवा कोणी प्राणी येऊनि तोडिती।
तया न म्हणती छेदूं नका ।।३।।
जिंदास्तुति सम मानिती जे संत ।
पूर्ण धैर्यवंत साधु ऐसे ।।४।।
नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी ।
तरी जीव शिवा गांठी पडूनि जाय ।।५।।
[सकलसंतगाथा खंड पहिला संत नामदेव महाराजांची अभंगगाथा अभंग क्र. १४७७ ]
संपादक-प्रा. डॉ. र. रा. गोसावी.
SOLVE QUIZ ⏬
SUBMIT QUIZ ⏫
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon