DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Drawing Grade Exam 2024 RESULTS Link


Elementary and Intermediate Drawing Grade Examination 2024
 RESULTS 
शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईग ग्रेड परीक्षा २०२४ 

निकाल जाहीर 

दिनांक २५ सप्टेंबर, २०२४ ते २७ सप्टेंबर, २०२४ या कालावधीमध्ये शासकीय रेखाकला परीक्षेचे इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा आयोजन करण्यात आले होते. सदर परीक्षेचा निकाल व गुणवत्ता यादी पाहण्यासाठी खालिल लिंकला स्पर्श करा 

१ इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा निकाल दिनांक - दि.१०.०१.२०२४ दुपारी १.००

एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षा दि.१३.०१.२०२४ दुपारी १.००

२ प्रमाणपत्र - सहभागी शाळेंना लॉगइनवरून ३ वेळा डाऊनलोड करता येईल. केंद्रांना ३ वेळा डाऊनलोड करता येईल.

३ दुय्यम निकालत्रक - केंद्रांना ३ वेळा डाऊनलोड करता येईल.

४ निकाल पडताळणी - ऑनलाईन पध्दतीने केंद्र प्रमुखांच्या लॉगइनवरुन अर्ज करता येईल. दिनांक ३१.०१.२०२५ पर्यंत (प्रत्येकी रु.६०/- प्रमाणे पडताळणी शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरणे.)

५ प्रमाणपत्र दुरुस्ती - ऑनलाईन नाव नोंदणी करताना विद्यार्थ्यांच्या सर्वसाधारण नोंदवहीतील नोंदी प्रमाणे / माध्यमिक शालांत प्रमाणपत्रावरील नावाप्रमाणे अचूक नाव नोंदणी करताना विद्यार्थ्यांच्या नावामध्ये त्रुटी झाली असल्यास त्रुटींच्या दुरुस्तीकरिता ऑनलाईन पध्दतीने केंद्र प्रमुखांच्या लॉगइनवरुन दिनांक ३१.०१.२०२५ पर्यंतच प्रति विद्यार्थी (महाराष्ट्र) रु.१००/-व (महाराष्ट्राबाहेरील रु.२००/-) प्रमाणे दुरुस्ती शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरणा करता येईल.

आपल्या केंद्रावरील सहभागी शाळांचे तसेच खाजगी परीक्षार्थ्यांचे निकाल दिनांक १०.०१.२०२५ व दिनांक १३.०१.२०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन पध्दतीने प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे तसेच प्रमाणपत्र ऑनलाईन पध्दतीने मिळणार असल्याबाबतची माहिती सहभागी शाळांना / सर्व संबंधितांना कळविण्यात यावे.

विहीत कालावधीमध्ये प्रमाणपत्र व दुय्यम निकालपत्रक डाऊनलोड करुन निकालपत्रानुसार प्रमाणपत्र बरोबर असल्याची खातरजमा केंद्र प्रमुखांनी करुन संबंधितास वितरीत करण्यात यावे. डाऊनलोड केलेली प्रमाणपत्रे जतन करुन ठेवावीत. व संबंधितांना मागणीनुसार उपलब्ध करुन देण्यात यावीत. डाऊन लोड केलेली प्रमाणपत्रे व दुय्यम निकालपत्रके जतन करुन ठेवण्याची जबाबदारी केंद्रप्रमुखाची राहील. केंद्र प्रमुखांनी प्रमाणपत्राची सॉफ्ट कॉपी जतन करुन ठेवावी व सहभागी शाळा तसेच विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्याची सर्वस्वी जबाबदारी केंद्र प्रमुखांची राहील याची नोंद घेण्यात यावी.


 (विनोद दांडगे)
संचालक, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई.

निकाल दिनांक १०.०१.२०२५ रोजी दुपारी १.०० वाजता
RESULT LINK

Intermediate Grade Exam Topper List
Published On : 10-01-2025 New

Intermediate Grade Exam Merit List
Published On : 10-01-2025 New

Elementary Drawing Grade Examination 2024
Result Declure / Out
Result 
एलिमेंटरी ड्रॉईग ग्रेड परीक्षा २०२४ 
निकाल दिनांक १३.०१.२०२५ रोजी दुपारी १.०० वाजता
निकाल जाहीर 
Elementry Grade Exam Topper List
Published On : 13-01-2025

Elementry Grade Exam Merit List
Published On : 13-01-2025
 
⏬ ⏬ ⏬ ⏬ ⏬ 


 



महाराष्ट्र शासन 
उच्च व तंत्र शिक्षण विभाग
कला संचालनालय, 
महाराष्ट्र राज्य,
रार प्र.बी. कला महाविद्यालय आवार, कॉ.दा.नी. मार्ग, 
मुंबई- ४००००१ दुरमानी क्र.२२६२०२३१/३२
क्रमांक - किलोने/२०२४/चार/रख

परिपत्रक

दिनांक १९ जानेवारी, २०२४

शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईग ग्रेड परीक्षा २०२३ निकाल जाहीर करणेबाबत.

कला संचालनालयाच्या दिनांक १२.०७.२०२३ रोजीच्या परिपत्रकानुसार दिनांक ०४ ऑक्टोबर, २०२३ ते ०७ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीमध्ये शासकीय रेखाकला परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. सदर परीक्षेचा निकाल व गुणवत्ता यादी 



    या संकेतस्थळावर खालील प्रमाणे प्ररिकद करण्यात येणार आहे, तसेच प्रमाणपत्र व दुय्यम निकालपत्रक वाक्तनलोड करणे /निकाल पडताळणी / ऑनलाईन नाव नोंदणी करताना विद्यार्थ्यांच्या नावामध्ये त्रुटी असल्यास नाधातील त्रुटींची दुरुस्ती करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा तपशील खालील प्रमाणे.

तपशील निकाल दिनांक
इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा


तपशील निकाल दिनांक
एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षा


२ प्रमाणपत्र - सहभागी शाळेना लॉगइनवरून ३ वेळा डाऊनलोड
                  केंद्रांना ३ वेळा डाऊनलोड करता येईल.

३ दुय्यम निकालपत्रक - केंद्रांना ३ वेळा डाऊनलोड करता येईल. 

४ निकाल पडताळणी  -ऑनावाईन पध्दतीने केंद्र प्रमुखांच्या लॉगइनवरून अर्ज करता येईल. 
                           दिनांक २२.०२.२०२४ पर्यंत प्रत्येकी रु.६०/- प्रमाणे पडताळणी शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरणे

५ प्रमाणपत्र दुरुस्ती - ऑनलाईन नाव नोंदणी करताना विद्याथ्यर्थ्यांच्या नावामध्ये त्रुटी असल्यास त्रुटींच्या दुरुस्तीकरिता ऑनलाईन पध्दतीने केंद्रप्रमुखांच्या लॉगइनवरून दिनांक २२.०२.२०२५ पर्यंत अर्ज करता येईल. (प्रमाणपत्र दुरुस्ती करिता प्रति विद्यार्थी (महाराष्ट्र) रु.१००/- व (महाराष्ट्राबाहेरील) रु.२००/- प्रमाणे दुरुस्ती शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरणे।

    आपल्या केंद्रावरील सहभागी शाळांचे तसेच खाजगी परीक्षार्थ्यांचे निकाल दिनांक ३१.०१.२०२४ व दिनांक ०५.०२.२०२४ रोजी दुपारी १२.०० वाजता ऑनलाईन पध्दतीने प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे तसेच प्रमाणपत्र ऑनलाईन पध्दतीने मिळणार असल्याबाबतची माहिती सहभागी शाळांना / सर्व संबंधितांना कळविण्यात यावे.
    विहीत कालावधीमध्ये प्रमाणपत्र व दुय्यम निकालपत्रक डाऊनलोड करुन निकालपत्रानुसार प्रमाणपत्र बरोबर असल्याची खातरजमा केंद्रप्रमुलांनी करुन संबंधितास वितरीत करण्यात यावे.
    डाऊनलोड केलेली प्रमाणपत्रे जतन करुन ठेवावीत, व संबंधितांना मागणीनुसार उपलब्ध करुन देण्यात यावीत, डाऊन लोड केलेली प्रमाणपत्रे व दुय्यम निकालपत्रके जतन करुन ठेवण्याची जबाबदारी केंद्रप्रमुखाची राहील, केंद्र प्रमुखांनी प्रमाणपत्राची सॉफ्ट कॉपी जतन करुन ठेवावी व सहभागी शाळा तसेच विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार उपलब्ध करुन देण्याची सर्वस्वी जबाबदारी केंद्र प्रमुखांची राहील.


(ना.म.वाघमोडे)
परीक्षा नियंत्रक,
कला संचालनालय, 
महाराष्ट्र राज्य, 
मुंबई.

प्रति, 
केंद्र प्रमुख, शासकीय रेखाकला परीक्षा (सर्व)
त्यांना कळविण्यात येते की, सदर परिपत्रक सहभागी शाळेच्या सर्व मुख्याध्यापक/आचार्य संबंधित विद्यार्थी व पालक यांच्या निदर्शनास आणावे.

प्रत माहिती व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित.
१) आयुक्त्रशिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.
२) शिक्षण संचालक, (माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे.
३) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व).
४) अध्यक्ष/सचिव, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे. 
५) निरीक्षक, चित्रकला व शिल्प, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
६) सहायक निरीक्षक, चित्रकला व शिल्प विभागीय कार्यालय, नागपूर/औरंगाबाद.
७) शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हापरिषद (सर्व)
८) शिक्षणनिरीक्षक, बृहन्मुंबई दक्षिण/उत्तर पश्चिम 
९) निवड नस्ती.

हे ही वाचाल 

महाराष्ट्र शासन 
उच्च व तंत्र शिक्षण विभाग
कला संचालनालय, 
महाराष्ट्र राज्य,

सर ज.जी. कला महाविद्यालय आवार, डॉ.दा. नौ.मार्ग, 
मुंबई- ४०० ००१. 
दुरध्वनी क्र.२२६२०२३१/३२
Website: www.doe.maharashtra.gov.in Email: directorateofart@gmail.com/directorateofart@gmail.com
क्रमांक - डिओओ/२०२३-२४/चार/ ०१०

प्रति,
दिनांक 8 JAN 2024
अध्यक्ष / सचिव,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,
पुणे - ४११००४.

विषय :- शासकीय रेखाकला (इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२३. निकालाबाबत.

संदर्भ :- 
१) उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्रमांक एडीआर-२०१४/प्र.क्र.२१८/तांशि-६, दिनांक १६ फेब्रुवारी २०१५.
२) शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रिडा विभाग संकीर्ण २०१६/प्र.क्र.२०२/एसडी-२, दिनांक २४.११.२०१७ व समक्रमांकाचे दि. २०.१२.२०१७ रोजीचे शासन शुध्दीपत्र.
    उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या संदर्भीय क्रमांक १ वरील शासन निर्णयानुसार कला संचालनालयामार्फत शासकीय रेखाकला परीक्षेच्या पुर्नरचित अभ्यासक्रमास शासन मान्यता देण्यात आली असून सदर अभ्यासक्रमानुसार २०१५ पासून शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षांचे आयोजन करण्यात येते. सदर परीक्षा ऐच्छिक असून विद्यार्थ्यांना एकावर्षी एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड या दोहोंपैकी फक्त एकाच परीक्षेला बसता येते.
    शालेय स्तरावरील इयत्ता ७ वी ते १२ वी पर्यंतचे नियमित विद्यार्थी सबंधित विद्यालयामार्फत परीक्षा केंद्रावर सदर परीक्षेस प्रविष्ठ होतात. जे विद्यार्थी शालेय स्तरावर सदर परीक्षेस प्रविष्ठ झाले नाहीत असे उमेदवार बहिस्थ विद्यार्थी म्हणून शासकीय रेखाकला परीक्षेस प्रविष्ठ होतात. चालू शैक्षणिक वर्षात शासकीय रेखाकला परीक्षा २०२३ करीता सुमारे एकूण ८.४० लाख विद्यार्थीची नावनोंद करण्यात आली आहेत.
    संदर्भिय क्र. २ वरील शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार इयत्ता १० वी मधील विद्यार्थाना सवलतीचे गुण दिले जात असल्यामुळे शासकीय रेखाकला परीक्षेस दरवर्षी विद्यार्थ्यांचा सहभाग
वाढत आहे. उत्तरपत्रीकाचे मुल्यमापन करीता शालेय शिक्षण विभागातील अनुभवी अर्हताप्राप्त (Art Teacher Diploma) कला शिक्षकांची नियुक्ती केली जाते. शालेय शिक्षण विभागात सद्यस्थितीत नियमित कला शिक्षक पद रिक्त झाल्या नंतर कला शिक्षक पद भरती होत नसल्याचे समजते. त्यामुळे उपलब्ध असलेल्या अनुभवी कला शिक्षक यांची नियुक्ती करुन लाखो विद्यार्थाचे मुल्यमापन करावे लागले आहे.
    निकालाचे काम पूर्ण झाल्यानंतर निकालाचे कंपेअरींग करण्याकरिता व इतर तदनुषंगीक बाबींकरिता लागणारा कालावधी लक्षात घेता तसेच ऑनलाईन निकाल जाहीर करुन त्याच दिवशी ऑनलाईन प्रमाणपत्र वितरीत करण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी करिता लागणारा संभाव्य कालावधी लक्षात घेता शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२३ चा निकाल जानेवारी २०२४ अखेर जाहीर करण्यात येईल.

🔊 निकालाची अद्यावत माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येण्यासाठी
👇 👇
      For Next Update
   FOLLOW WEBSITE



▶️ SUBSCRIBE YOUTUBE CHANNEL 



 For Google News -



🥏Join Our Social Media Group



©️®️
    शासकीय रेखाकला परीक्षा २०२२ किंवा तत्पूर्वी ELEMENTARY DRAWING GRADE परीक्षा उत्तीर्ण झालेले व शासकीय रेखाकला परीक्षा (INTERMEDIATE DRAWING GRADE) २०२३ उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना उपरोक्त संदर्भिय क्र.२ वरील शासन निर्णयानुसार सवलतीच्या गुणांचा लाभ मिळण्याकरीता राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मंडळाकडून प्रस्ताव स्विकृती करिता सर्व संबंधित शाळांना मुदतवाढ देण्याबाबत आपल्या स्तरावर राज्यातील सर्व विभागीय मंडळांना कळविण्यात यावे ही विनंती.

शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२३ बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी
👇👇👇👇👇


(राजीव मिश्रा)
कला संचालक,
कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य,

मुंबई.

प्रत :- माहिती व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित.
१) मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.
२) सर्व शिक्षणाधिकारी (माध्यमिक).
३) सर्व शिक्षण निरिक्षक, बृहन्मुंबई (पूर्व/पश्चिम/उत्तर).
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon