Amendment of CM Mazi Ladki Bahin Scheme GR
Amendment of Chief Minister Mazi Ladki Bahin Scheme Online Application App Link
महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग. शासन निर्णय क्रमांक- मबावि २०२४/प्र.क्र.९६/कार्या-२, नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०००३२
दिनांक:-०३ जुलै, २०२४.
संदर्भ:- महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्र. मबावि २०२४/प्र.क्र.९६/कार्या-२,
दि.२८.०६.२०२४.
प्रस्तावना :-
ब) समिती:-
"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" या योजनेचे संनियत्रंण व आढावा घेण्याकरिता राज्यस्तरावर व जिल्हास्तर समिती गठीत करण्यात आली आहे. सदर जिल्हास्तर समितीमध्ये जिल्हाधिकारी हे सदर समितीचे अध्यक्ष आहे. सदर समितीमध्ये अंशतः बदल करुन संबंधित जिल्हयाचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तर समिती गठीत करण्यात येत आहे.
जिल्हास्तर समिती:-
अ.क्र. पदनाम समितीमधील पदनाम
१ संबंधित जिल्हयाचे पालकमंत्री अध्यक्ष
२ संबंधित जिल्हयाचे मंत्री सह अध्यक्ष
३ संबंधित सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य
४ संबंधित पोलिस अधिक्षक सदस्य
५ जिल्हा सह आयुक्त नगर प्रशासन सदस्य
६ जिल्हयातील महानगरपालिकाचे आयुक्त किंवा त्यांचे प्रतिनिधी (उप आयुक्त दर्जापेक्षा कमी सदस्य नसावे.)
७ संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी सदस्य
८ जिल्हयातील नगरपरिषदांचे मुख्याधिकारी सदस्य
९ संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प सदस्य
१० संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सदस्य
११ संबंधित जिल्हाधिकारी सदस्य सचिव
सदर समितीची बैठक दरमहा तसेच आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात यावी. सदर समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे राहील:-
(१) सदर योजनेची देखरेख व संनियंत्रण करणे.
(२) सदर योजनेच्या अंमलबजावणीबाबत नियमित आढावा घेणे.
(३) सदर योजनेसाठी उपलब्ध तरतूद व खर्च याबाबतचा आढावा घेवून आवश्यक निधीची मागणी राज्यस्तरीय समितीकडे सादर करणे.
(४) कालबध्द पध्दतीने पात्र लाभार्थीची यादी अंतिम करणे व सदर योजनेपासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेणे.
क) तालुकास्तर समितीः-
तालुका स्तरावर खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे:-
अ.क्र.
पदनाम
समितीमधील पदनाम
१ शासकीय सदस्य अध्यक्ष
२ मुख्याधिकारी, नगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायत सदस्य
३ गट विकास अधिकारी सदस्य
४ सहायक आयुक्त/सहायक अधिकारी, समाज कल्याण सदस्य
५ सहाय्यक प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सदस्य
६ बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) (ज्येष्ठतम) सदस्य
७ एक अंगणवाडी पर्यवेक्षिका (बा.वि.प्र. यांच्या मान्यतेने) सदस्य
८ संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) सदस्य
९ दोन अशासकीय सदस्य सदस्य
१० संबंधित तहसिलदार सदस्य सचिव
सदर समितीमध्ये ३ अशासकीय सदस्य असतील. त्यामधील एक अध्यक्ष राहतील. सदर समितीच्या
अध्यक्षांची व इतर २ अशासकीय सदस्याची निवड सदर जिल्हयांच्या पालकमंत्री यांच्यामार्फत करण्यात येईल.
सदर समितीची बैठक दरमहा तसेच आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात यावी. सदर समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे राहील:-
(१) सदर योजनेची देखरेख व संनियंत्रण करणे.
(२) सदर योजनेच्या अंमलबजावणीबाबत नियमित आढावा घेणे.
(३) सदर योजनेपासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेणे.
(४) ग्रामीण स्तरावर प्राप्त झालेल्या अर्ज, त्यांची छाननी /तपासणी करणे, सदर अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी करणे.
ड) योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालमर्यादाः-
उपरोक्त कालावधीनंतर या मोहिमेतंर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाहीसंदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील, याबाबत खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे:-
"सदर योजनेत आता दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि.०१ जुलै, २०२४ पासून दरमहा रु.१,५००/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. या मोहिमेतंर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाहीसंदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील."
इ) प्रोत्साहन भत्ताः-
सदर योजनेतंर्गत मोबाईल अॅपव्दारे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी सेविका यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिध्द झाल्यावर, एकूण पात्र लाभार्थ्याचे अर्ज सादर केल्याप्रमाणे प्रति पात्र लाभार्थी रु.५०/- याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल.
२. सदर शासन निर्णय दि.०२.०७.२०२४ रोजीच्या मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे.
३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२४०७०३१३३५११३००० असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
Apply Ladki Bahin Scheme
लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची संपूर्ण माहिती आपण आता जाणून घेणार आहोत अर्जदार महिलांनी नाव, पत्ता, वैवाहिक स्थिती… माहिती भरावी लागणार
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जात महिलेला तिचं नाव, पत्ता, वैवाहिक माहिती, बँक अकाउंटसह अनेक गोष्टींची माहिती द्यावी लागणार आहे. संबंधित माहिती भरल्यानंतर तो फॉर्म महिलांना आपल्या जवळील अंगणवाडी केंद्रांमध्ये जमा करायचा आहे.
महाराष्ट्र सरकारकडून राज्यभरातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून केली जाणार आहे. ज्या कुटुंबांचं वार्षिक आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशाच कुटुंबातील महिलांना योयोजनेचा लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने पाच एकर पेक्षा जास्त जमीन असणाऱ्यांना कुटुंबातील महिलांनादेखील या योजनेचा लाभ देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यातील कोट्यवधी महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार आहे. फक्त शासकीय सेवेत कर्मचारी असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ही योजना १ जुलै २०२४ पासून सुरु झाली आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आता महिलांची राज्यभरातील सेतू कार्यालये, तहसील कार्यालये इथे गर्दी होताना दिसत आहे. ही गर्दी पाहता राज्य सरकारने अर्ज दाखल करण्याची तारीख वाढवली आहे. महिला ३१ ऑगस्टपर्यंत या योजनेचा लाभ मिळावा यासाठी अर्ज दाखल करु शकणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज नेमका कसा आहे? या अर्जात नेमक्या कोणकोणत्या गोष्टी भरायच्या आहेत, याची माहिती आता आपण बघूयात
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जात महिलेला तिचं नाव, पत्ता, वैवाहिक माहिती, बँक अकाउंटसह अनेक गोष्टींची माहिती द्यावी लागणार आहे. संबंधित माहिती भरल्यानंतर तो फॉर्म महिलांना आपल्या जवळील अंगणवाडी केंद्रांमध्ये जमा करायचा आहे. याशिवाय ऑनलाईनदेखील हा फॉर्म भरता येणार आहे.
अर्जामध्ये काय-काय विचारण्यात येतं?
महिलेचे संपूर्ण नाव-
महिलेचे लग्नापूर्वीचे नाव
महिलेचे लग्नानंतरचे नाव
जन्म दिनांक: दिनांक/ महिना/वर्ष-
अर्जदाराचा संपूर्ण पत्ता-
जन्माचे ठिकाण –
जिल्हा-
गाव/शहर
ग्रामपंचायत/ नगरपंचायत/ नगरपालिका-
पिनकोड
मोबाईल क्रमांक-
आधार क्रमांक-
शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात देणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का? होय/नाही. असल्यास, दरमहा रु.
वैवाहिक स्थिती विवाहित/ घटस्फोटीत/ विधवा/ परितत्क्या/ निराधार
अर्जदाराचे बैंक खाते असलेल्या बैंकेया तपशील-
बँकेचे पूर्ण नाव –
बँक खाते धारकाये नाग
बँक खाते क्रमाक
IFSC कोड
आपला आधार क्रमांक बैंक खात्याला जोडले आहे काय? होय किंवा नाही
१) अंगणवाडी सेविका
२) अंगणवाडी मदतनीस
३) पर्यवेधिका
४) ग्रामसेवक
५) वार्ड अधिकारी
६) सेतू सुविधा केंद्र
६) सामान्य महिला
सर्व कागदपत्रांच्या प्रती सादर/Upload करण्यात यावी,
त्यासाठी प्ले स्टोअर मधून ॲप डाऊनलोड करावे ॲप ची लिंक देण्यात येत आहे
१) आधार कार्ड
२) अधिवात/जन्म प्रमाणपत्र
३) उत्पन्न प्रमाणपत्र
४) अर्जदाराने हमीपत्र
५) बँक पासबुक
६) अर्जदार फोटो
ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वरून ॲप डाऊनलोड करावे त्या ॲपची लिंक उपलब्ध 👉 ॲप डाऊनलोड करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon