DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Shikshaketar Karmachari Sanch Manyata GR

Shikshaketar Karmachari Sanch Manyata GR

महाराष्ट्र शासन

शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक)

महाराष्ट्र राज्य, मध्यवती इमारत, डॉनी बेझंट मार्ग, पुणे

जा.क्र. शिसंमा/संच मान्यता/शिक्षकेतर/टि-8/2023-24/4682

दिनांक: 28.08.2024

प्रति, 

शिक्षण निरिक्षक, बृहन्मुंबई (उत्तर/दक्षिण/पश्चिम) शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्व)

विषय: सन 2023-24 शिक्षकेतर कर्मचारी संच मान्यता...

संदर्भ :- 

शासन पत्र क्रमांक न्यायाप्र/2023/प्र.क्र.30/टिएनटी-2, दि.28.06.2024 वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

    उपरोक्त विषयाबाबत संदर्भिय शासन पत्र दि.28.06.2024 अन्वये प्राप्त निर्देशानुसार दि.30.09.2023 रोजी नोंद असलेल्या आधार प्रमाणित विद्यार्थी संख्या विचारात घेवून दि. 28.01.2019 च्या सुधारित आकृतीबंधानुसार एकूण मंजूर पदांच्या मर्यादेत व जिल्हानिहाय अनुज्ञेय होणाऱ्या पदांच्या मर्यादेत संस्थांना पदे अनुज्ञेय करुन सन 2023-24 च्या शिक्षकेतर कर्मचा-यांची संच मान्यता शिक्षणाधिकारी लॉगिनला उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

    सदर संच मान्यता दि. 28.01.2019 च्या सुधारित आकृतीबंधानुसार एकूण मंजूर पदांच्या मर्यादेत व जिल्हानिहाय अनुज्ञेय होणाऱ्या पदांची पडताळणी जादा पदे मंजूर होत असलेल्या करुन निर्गमित कराव्यात. शासन निर्णय दि.२८.०१.२०१९ च्या आकृतीबंधानुसार शिक्षकेतर पदांची संच मान्यता दि.३०.०९.२०२३ रोजी नोंदलेली व संच मान्यता निर्गमित केल्याच्या दिनांकाअखेर - आधार वैध विद्यार्थी संख्येच्या आधारे निर्गमित करतांना अनुज्ञेय होणारी पदे मूळ पायाभूत पदांपेक्षा अधिक होत असेल तर अशा पदांच्या मंजूरीची कार्यवाही शासनाच्या पूर्व परवानगीने करावी. शासन निर्णय क्र. एसएसएन-२०१५/प्र.क्र.१२/टीएनटी-२, दि.०७.०३.२०१९ च्या प्रपत्र व मधील कार्यपध्दती अटी व शर्तीनुसार रिक्त पदे प्रथम समायोजनाने भरण्याची कार्यवाही करावी. समायोजन पूर्ण झाल्याशिवाय अशी मंजूर व अनुज्ञेय पदे भरता येणार नाही

    सन २०२३-२४ च्या शिक्षकेतर संच मान्यता दि.३०.०९.२०२३ रोजीच्या पटावरील अनुदानित व अर्शतः अनुदानित आधार वेध विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्यात आली असून सदरची अनुज्ञेय पदे पूर्वलक्षी प्रभावाने देय ठरणार नाही. याची नोंद घ्यावी.

सदरचे परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास या ओळीला स्पर्श करून डाऊनलोड करू शकता 

(संपत सूर्यवंशी)

शिक्षण संचालक, 

(माध्यमिक व उच्च माध्यमिक)

हे ही वाचा 👇 

महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दालन क्र. ४३६, मंत्रालय विस्तार भवन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई-

क. न्यायाप्र/२०२३/प्र.क्र.३०/टिएनटी-२

दिनांक :- २८.०६.२०२४

प्रति,

शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.

विषय:- शिक्षकेतर कर्मचारी संचमान्यतेबाबत.

संदर्भ :- 

१) शासनाचे समक्रमांकीत दि.२१.०२.२०२४ रोजीचे पत्र.

२) आपले पत्र जा क्र. शिसंमा/२०२३-२४/टि-८/संचमान्यता/२२१७, दि.१९.०४.२०२४.

३) आपले पत्र जा क्र. शिसंमा/२०२३-२४/टि-८/संचमान्यता/२२९६, दि.२५.०४.२०२४

    राज्यातील सर्व खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित माध्यमिक/उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शासन निर्णय दि.२८.०१.२०१९ अन्वये निश्चित केलेल्या सुधारित आकृतीबंधानुसार व त्यानुसार व्यपगत होणारी पदे, अतिरिक्त ठरणारी पदे, त्या पदावरील कार्यरत कर्मचारी यांच्यासंदर्भात करावयाच्या कार्यवाही संदर्भात दि.०७.०३.२०१९ च्या शासन निर्णयान्वये विहीत केलेल्या कार्यपध्दतीनुसार शिक्षकेतर पदांच्या संचमान्यता व त्याअनुषंगाने इतर आवश्यक कार्यवाही करण्याबाबत आपणास संदर्भाधीन पत्र क्र.१ अन्वये कळविण्यात आले आहे.

    प्रस्तुत प्रकरणी आपल्या संदर्भाधीन क्र.२ व ३ पत्राच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, ३० सप्टेंबर, २०२३ ची ऑनलाईन आधार प्रमाणित विद्यार्थी संख्या विचारात घेवुन, दि.२८.०१.२०१९ च्या आकृतीबंधानुसार एकूण मंजूर पदांच्या मर्यादेत व जिल्हानिहाय अनुज्ञेय होणाऱ्या पदांच्या मर्यादेत संस्थांना पदे अनुज्ञेय करुन सन २०२३-२४ च्या शिक्षकेतर संचमान्यता तात्काळ कराव्यात. तसेच, आकृतीबंधानुसार व्यपगत होणारी पदे, अतिरिक्त ठरणारी पदे, त्या पदावरील कार्यरत कर्मचारी यांच्यासंदर्भात शासन निर्णय दि.०७.०३.२०१९ अन्वये विहीत केलेल्या कार्यपध्दतीनुसार कार्यवाही करावी.

प्रत माहिती तथा आवश्यक कार्यवाहीसाठी:- आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.

परिपत्रक पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

(विशाल लोहार) 

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon