DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

7th Pay Commission fifth installment GR


शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक)

महाराष्ट्र राज्य, मध्यवर्तीइमारत, पुणे

क्र. शिसंमा/२०२४/टि-७/शालार्थ/सेनि / 3815

दिनांक :-१६/०७/२०२४. 16 JUL 2324

प्रति,

श्री. पवन जोशी, प्रोजेक्ट लिड, शालार्थ सिस्टीम, महाआयटी, मुंबई.

विषय- शालार्थमध्ये टॅब उपलब्ध करून देणेबाबत.
Shalarth tab available for 7th Pay Commission fifth installment July 2024 salary 

संदर्भ- 
१) शासन निर्णय वेपूर-२०१९/प्र.क्र.८/सेवा-९ दि. २०/६/२०२४.

२) शासन पत्र क्र. वेतन १२१९/प्र.क्र.१०५/टिएनटी-३ दि. ११/७/ २०२४.

३) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमापू/शिक्षक-शिक्षकेतर/टि-५/२४-२५/३७४४ दि. ११.७.२०२४.

उपरोक्त विषयी संदर्भिय पत्रास अनुसरून कळविण्यात येते की, संदर्भ क्र. ३ अन्वये पात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचा-याचे माहे जूलै २०२४ चे वेतन सातव्या वेतन आयोगाच्या पाचव्या हप्त्यासह अदा करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहे.

तथापि सेवानिवृत्त कर्मचा-यांनाही सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता अदा करणे आवश्यक आहे. याबाबत वेतन पथक, माध्यमिक कार्यालयाकडून मागणी करण्यात येत आहे. याकरीता सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी शालार्थमध्ये तात्काळ आवश्यक तो टॅब उपलब्ध करून देण्यात यावा.

(डॉ. महेश पालकर)

शिक्षण संचालक

(माध्यमिक व उच्च माध्यमिक)

प्रत- अधीक्षक, वेतन व भनिनि पथक (माध्यमिक) सर्व.

यांना कळविण्यात येते की, संदर्भ क्र. ३ येथील पत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात यावी. तसेच या पत्राप्रमाणे कार्यवाही करावी. तुर्त थकीत देयके/पुनर्मान्यता दिलेली देयके अदा करण्यात येऊ नये.

प्रत- माहितीस्तव सविनय सादर.

१) मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे-१ २) श्रीम. रोहीणी किरवे, कक्ष अधिकारी, टिएनटी-३, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई-३२

प्रत- विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प.सर्व


सातवा वेतन आयोग पाचवा हप्ता अदा करण्यासाठी शालार्थ टॅब उपलब्ध करून देणे बाबत



7th Pay Commission regular fifth installment to be paid along with July 2024 salary

महाराष्ट्र शासन

शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे 

शिसंमापु/शिक्षक-शिक्षकेत्तर/टी-५/२४-२५/३७४४ दिनांक-११/०७/२४ وو

विषय - सातवा वेतन आयोग नियमित पाचवा हप्ता माहे जूलै २०२४ च्या वेतनासोबत अदा करणे बाबत

7th Pay Commission regular fifth installment to be paid along with July 2024 salary

संदर्भ-१. शासन निर्णय वेपूर-२०१९/प्र.क्र.८/ सेवा-९/ दि.२०/०६/२०२४

२. शासन पत्र क्र. वेतन १२१९/प्र.क्र १०५/टिएनटी-३/ दि.११/०७/२०२४

उपरोक्त विषयान्वये राज्य शासकीय व ईतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांना दि.०१ जूलै २०२३ रोजी देय असलेल्या सातवा वेतन आयोग थकबाकीच्या पाचव्या हप्त्याचे प्रदान करणे बाबत शासन निर्णय वित्त विभाग वेपुर/२०१९/प्र.क्र.०८/सेवा-९ दि.२०/०६/२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. त्या नुसार जिल्हा परिषदा, शासन अनुदानित शाळा, सर्व शासन अनुदानित संस्थिा मधील पात्र कर्मचारी तसेच निवृत्ती वेतन धारकांना थकवाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम माहे जून २०२४ च्या वेतन / निवृत्ती वेतनासोबत अदा करावे असे नमूद आहे. तथापि थकबाकीच्या रक्कमेच्या प्रदानासंबधी संदर्भिय शासन निर्णयातील वाचा क्र. ०१ ते ०५ येथिल शासन आदेशातील अन्य ततूदीचे पालन करण्याबाबतही निर्देश देण्यात आले आहेत.

संदर्भिय शासन निर्णयातील संदर्भ क्र.०२ ०३ व ०४ अन्वये ही तरतूद योग्य योग्य त्या फेरफारासह जिल्हा परिषदा व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्थानां लागू राहिल असे नमूद आहे.

माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या स्तरावरून मान्यताप्राप्त १०० टक्के खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सन २०२४-२५ मध्ये ७ वा वेतन आयोग ०५ वा हप्ता अदा करणेसाठी पर्याप्त अनुदान मंजूर करण्यात आले आहे. सद्यास्थितीत मंजूर अनुदानाच्या ४२ टक्के अनुदान माहे जूलै अखेरच्या खर्चासाठी शासन परिपत्रक वित्त विभाग अर्थसं २०२४/प्र.क्र-३४/अर्थ- ०३/दि.०१/०४/२४ नुसार वितरीत करण्यात आले असून प्राप्त अनुदानातून माहे जुलै अखेरपयर्तचे नियमित वेतन अदा करणे क्रमप्राप्त असल्याने नियमित वेतन अदा करणे वावत सूचना देण्यात आल्या आहेत.
Also Read 👇 

७ वा वेतन आयोग ५ वा हप्ता प्रदान
महाराष्ट्र शासन वित्त विभाग
शासन निर्णय क्रमांक : वेपुर-२०१९/प्र.क्र.८/सेवा-९  मुंबई

दिनांक :- २० जून, २०२४



७ वा वेतन आयोग हप्ता व इतर देयके ऑनलाईन पध्दतीने अदा करणे बाबत वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

👆👆👆👆👆
क्षेत्रिय स्तरावरून सन २०२४-२५ मधील खर्चाची बाब निहाय माहिती संकलित करण्यात आली असून त्यानुसार लेखाशिर्ष २२०२०४४२,२२०२०४७८,२२०२३३७९,२२०२०५७६,२२०२०५४९,२२०२०५३१, २२०२०५५८, २२०२०४६९,२२०२०५०२, मध्ये वेतन घेणा-या कर्मचारी यांचे माहे जूलै २०२४ चे वेतन सातवा वेतन आयोग नियमित पाचवा हप्ता व काही कारणास्तव राहिलेला १,२,३,४ था हप्ता सह अदा करणे शक्य असल्याने उपरोक्त लेखाशिर्षमध्ये वेतन घेण्या-या पात्र कर्मचारी यांचे माहे जूलै-२४ चे वेतन सातवा वेतन आयोगाच्या हप्त्यासह उपलब्ध करून दिलेल्या अनुदानातून अदा करण्यात यावे कोणत्याही परिस्थितीत नियमित वेतन प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

लेखाशिर्ष २२०२३३६१,२२०२०५११,२२०२१९०१,२२०२१९४८,२२०२एच९७३ मध्ये प्राप्त अनुदानातून नियमित वेतनाचा खर्च प्राधान्य क्रमाणे भागविणे क्रमप्राप्त असल्याने अनुदान स्थितीनुसार किंवा अनुदान उपलब्धतेनुसार ७ वा वेतन आयोग फरकाच्या हप्त्याबाबत स्वंतत्र सूचना देण्यात येतील.


(दिपक चवणे) 
शिक्षण उपसंचालक (अं. व नि) (माध्यमिक व उच्च माध्यमिक)

प्रत -१. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे-०१ यांना माहितीस्तव सविनय सादर.

२. विभागीय शिक्षण उपसंचालक संबधित सर्व
३. मुख्य लेखा व वित्त अधिकारी संबधित सर्व
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon