विद्याप्रवेश कृतिपुस्तिका २०२४-२५ SCERT मार्फत प्रसिद्ध
* विद्याप्रवेश विद्यार्थी कृतिपुस्तिका २०२४-२५ - मराठी माध्यम
* विद्याप्रवेश शिक्षक मार्गदर्शिका २०२४-२५ - मराठी माध्यम
* विद्याप्रवेश विद्यार्थी कृतिपुस्तिका २०२४-२५ - उर्दू माध्यम
* विद्याप्रवेश शिक्षक मार्गदर्शिका २०२४-२५ - उर्दू माध्यम
विद्याप्रवेश कृतिपुस्तिका २०२४-२५ लिंक
विद्याप्रवेश कृतिपुस्तिका २०२४-२५
अनु. क्र. विषय/माध्यम डाउनलोड
1. विद्याप्रवेश विद्यार्थी कृतिपुस्तिका २०२४-२५ - मराठी माध्यम
2. विद्याप्रवेश शिक्षक मार्गदर्शिका २०२४-२५ - मराठी माध्यम
3. विद्याप्रवेश विद्यार्थी कृतिपुस्तिका २०२४-२५ - उर्दू माध्यम
4. विद्याप्रवेश शिक्षक मार्गदर्शिका २०२४-२५ - उर्दू माध्यम
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र ७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे ४११०३०
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
संपर्क क्रमांक (०२०) २४४७ ६९३८
E-mail: marathilangdept@maa.ac.in
जा.क्र.राशैसंप्रप/मभावि/विप्र.अं/२२६२/२०२३
दिनांक: १९/५/२०२३
प्रति, शिक्षण संचालक (प्राथमिक) शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
विषय - निपुण भारत अभियान अंतर्गत सन २०२३-२४ मध्ये इयत्ता पहिली विद्याप्रवेश : शाळापूर्व तयारी कार्यक्रमाची सर्व प्राथमिक शाळांमध्ये अंमलबजावणी करणे बाबत ..
संदर्भ.-
१. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP)-२०२० सार्थक टास्क क्र.५१,५२
२. भारत सरकारच्या National Initiative For Proficiency In Reading with Understanding and Numeracy (NIPUN BHARAT) अंतर्गत मार्गदर्शक सूचना.
४. महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, यांचे शासन परिपत्रक क्र.संकीर्ण २०२३ /प्र.क्र.१०५/ एस डी-४, दि.२० एप्रिल २०२३
उपरोक्त संदर्भ १ व २ नुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत केंद्र शासनामार्फत 'निपुण भारत अभियान' राष्ट्रीय व राज्य स्तरावर सुरु करण्यात आले आह. यामध्ये वय वर्षे ३ ते ९ वयोगटातील बालकांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान (Foundational Literacy & Numeracy (FLN) यावर विशेष भर देण्यात आलेला आहे. या अभियान अंतर्गत तसेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP)-२०२० सार्थक टास्क क्र. ५१,५२ नुसार इयत्ता पहिली मधील विद्यार्थ्यांसाठी सन २०२३-२४ मध्ये 'विद्याप्रवेश' या शाळापूर्व तयारी कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे प्रस्तावित आहे.
१. इयत्ता पहिली, विद्या प्रवेश शाळापूर्व तयारी कार्यक्रम अंमलबजावणी :
इयत्ता पहिलीच्या वर्गात विद्यार्थी प्रवेशित होणेपूर्वी पायाभूत क्षमता योग्य प्रमाणात विकसित झालेल्या असल्यास विद्यार्थ्यांच्या पुढील इयत्तानिहाय क्षमता अधिक जलद गतीने विकसित होतात. या अनुषंगाने इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय वातावरणाशी जुळवून घेणे सहजसुलभ व्हावे व त्यांच्या वयानुरूप आणि विकासाच्या दृष्टीने योग्य प्रारंभिक शिक्षण अनुभव देणे, यासाठी विविध खेळ, कृती, उपक्रमाचे आयोजन शाळांमध्ये होणे आवश्यक आहे. यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस तीन महिने म्हणजेच १२ आठवडे/६० दिवस) कालावधीत असणारे खेळ व कृती यांवर आधारीत विद्याप्रवेशः शाळापूर्व तयारी कार्यक्रम सर्व शाळांमध्ये सन २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षात राबविण्यात आलेला आहे. याही वर्षी म्हणजे २०२३-२४ मध्ये विद्या प्रवेश कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात यावी.
संदर्भ क्रमांक ३ नुसार राज्यातील शाळा शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये विदर्भ वगळता सर्व विभागातील शाळा १५ जून व विदर्भ विभागातील शाळा ३० जून रोजी अशा दोन टप्यात सुरु होणार आहेत. त्यानुसार विद्या प्रवेश : शाळापूर्व तयारी कार्यक्रम इयत्ता पहिली पुढील कालावधीत राज्यातील सर्व
शाळांमध्ये घेण्यात यावा.
अ.नं.
१.
विदर्भ वगळता इतर ठिकाणी
विदर्भात
३ जुलै २०२३ ते २३ सप्टेंबर २०२३
१९ जून २०२३ ते ९सप्टेंबर २०२३
२. शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक साहित्य
सदर कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संदर्भ क्रमांक ३ नुसार परिषदेमार्फत इयत्ता पहिलीच्या विद्याथ्यांसाठी 'विद्यार्थी कृतिपुस्तिका आणि इयत्ता पहिलीच्या वर्गास अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी 'शिक्षक मार्गदर्शिका विकसित करण्यात आलेली आहे. सदर साहित्य फक्त शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळातील मराठी व उर्दू माध्यमाच्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांसाठी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये समग्र शिक्षा अंतर्गत मोफत वितरीत करण्यात येत आहे. इतर शाळांच्यासाठी सदर साहित्य PDF स्वरुपात परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे.
३.. शिक्षकांचे उद्बोधन
सन २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षात विद्याप्रवेश कार्यकमाची अंमलबजावणी करताना राज्यातील शिक्षकांचे व पर्यवेक्षीय यंत्रणेचे online पद्धतीने उद्बोधन करण्यात आले होते सदर उद्बोधन परिषदेच्या Youtube chanal वर उपलब्ध आहे . सन २०२३-२४ साठी शिक्षकांना सदर सत्राची Youtube chanal लिक देऊन हे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात यावे. तसेच प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (सर्व)
2
यांनी या कार्यक्रमासाठी आपल्या अधिनस्त संस्थेतील अधिकारी, व तज्ज्ञांमार्फत जिल्हास्तरीय यंत्रणेचे व शिक्षकांचे आवश्यकतेनुसार उद्बोधन व मार्गदर्शन करावे.
> विद्याप्रवेश कार्यकम
उद्बोधन Youtube chanal लिक-
https://www.youtube.com/watch?v=VA9irGeUTmo
५. कार्यक्रमाचे सनियंत्रण व अनुधावन
विद्याप्रवेश कार्यक्रमाचे अंमलबजावणी शाळा स्तरावर प्रभावीपणे होण्यासाठी या कार्यक्रमाचे सनियंत्रण प्रभावीपणे होणे आवश्यक आहे. हे सनियंत्रण आपल्या मार्फत आपल्या अधिनस्त यंत्रणेद्वारे म्हणजेच जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व तालुकास्तरीय गटशिक्षणाधिकारी तसेच केंद्रप्रमुख या यंत्रणेमार्फत प्रभावीपणे करण्यात यावे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी या कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय समन्वयासाठी आपल्या कार्यालयातील निपुण भारत अभियानचे नोडल ऑफिसर यांना यासंदर्भात जबाबदारी देण्यात यावी. सदर नोडल ऑफिसर यांनी या कार्यक्रमाच्या अंमलबजावणी कालावधीत दरमहा (जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर) आढावा घेऊन त्याचा अहवाल पत्रा सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात आपल्या स्तरावर प्राप्त करावा. सदर एकत्रित अहवाल राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथामिक शिक्षण परिषद, मुंबई व प्रस्तुत कार्यालयास आपल्या मार्फत विनाविलंब सदर करावा. संबधीत कार्यालयामार्फत सदर अहवाल केंद्र शासनाकडे सादर केला जातो. त्यामुळे राज्याचा वेळेत अहवाल सादर होईल याची दक्षता घेण्यात यावी.
६. मार्गदर्शक सूचना
वरील कालावधीत हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी पुढील मार्गदर्शक सूचनांचा अवलंब
करावा
१. सदर कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी परिषदेमार्फत इयत्ता पहिलीच्या वर्गास अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी 'शिक्षक मार्गदर्शिका विकसित करण्यात आलेली आहे. सदर शिक्षक मार्गदर्शिकेतील सूचनांनुसार शाळा व वर्ग स्तरावर कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी तसेच त्यानुसार विद्यार्थी कृतिपुस्तिकेचा वापर करण्यात यावा.
२. कार्यक्रम कालावधीत वर्गस्तरावर घ्यावयाच्या दिवसनिहाय कृती शिक्षक मार्गदर्शिकेत दिलेल्या आहेत. त्याच क्रमाने सर्व कृती घेण्यात याव्यात सदर कालावधीत सुटी आल्यास पुढील दिवशी नियोजित कृती घेण्यात याव्यात कोणताही दिवस वगळू नये. वर दिलेला राज्यस्तरावरील कालावधी हा लवचिक असून स्थानिक परिस्थितीनुसार शाळानिहाय सर्व ६० दिवसांच्या कृती व कालावधी कटाक्षाने पूर्ण करावा.
२. प्रथम सत्रामध्ये विद्याप्रवेश कार्यक्रमाच्या अंमलबजावणीनंतर उर्वरित कालावधीमध्ये इयत्ता पहिलीच्या विहित मुख्य अभ्यासक्रमाचे अध्यापन करावे इयत्ता पहिलीचे प्रथम सत्रातील आकारिक व संकलित मूल्यमापन करताना जेवढा अभ्यासक्रम सदर सत्रात पूर्ण झाला असेल त्यावर आधारित करण्यात यावे.
३. क्षेत्रीय अधिकारी यांनी शाळा भेटीच्या वेळी या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुयोग्य पद्धतीने होत आहे का? याची पडताळणी करावी व आवश्यक तेथे शिक्षकांना मार्गदर्शन करावे. तसेच माहेवार मागणीप्रमाणे अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करावा.
तरी वरीलप्रमाणे आपल्या स्तरावरून विद्याप्रवेश कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत आपल्या अधिनस्त यंत्रणेला योग्य ते निर्देश देऊन सनियंत्रण करावे.
(कौस्तुभ दिवेगावकर, भा.प्र.से.)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
प्रत माहितीस्तव सविनय सादर :
१) मा. सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
२) मा.आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
३) मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई.
प्रत माहिती व योग्य त्या कार्यवाहीस्तव
१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व).
२. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (RAA), सर्व.
३. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (सर्व),
४. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई,
५. शिक्षणाधिकारी (प्राथ.), जिल्हा परिषद, (सर्व)
६. शिक्षण निरीक्षक, मुंबई (दक्षिण, उत्तर, पश्चिम),
७. प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा.(सर्व)
८. गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, (सर्व)
९. मुख्याध्यापक, प्राथमिक शाळा, (सर्व)
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon