DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Shikshak Bharti Documents Verification

Shikshak Bharti Documents Verification

Shikshak Bharti Candidates Documents Verification update circular 

Pavitra Portal Shikshak Bharti TAIT 2022 Candidates Documents Verification

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय,

महाराष्ट्र राज्य, मध्यवती इमारत, डॉ. अॅनी बेझंट मार्ग, पुणे ४११ ००१

दूरध्वनी क्र. ०२०-२६१२०१४१

ई-मेल: educom-mah@mah.gov.in दि.१९/०४/२०२४

जा.क्र. आस्था-क/प्राथ १०६/पदभरती/२०२४/2770

प्रति,

१. आयुक्त, महानगरपालिका, (सर्व)

२. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा (सर्व)

३. शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य) (सर्व) / शिक्षण निरीक्षक (द/उ/प) बृहन्मुंबई

४. मुख्याधिकारी (सर्व) (नगरपालिका/नगर परिषदा)

५. अध्यक्ष/सचिव, संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था (मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेल्या संस्था)

विषय :- शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये "पवित्र प्रणाली" अंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीबाबत व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.


संदर्भ :- १. समक्रमांकांचे पत्र क्र १४०८ दिनांक २५/०२/२०२४


२.मा. उच्च न्यायालय, खंडपीठ ओरंगाचाद येथील याचिका क्रमांक २५३४/२०२४ मधील दिनांक ०७/०३/२०२४ ३. मा. उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर येथील याचिका क. ४५३६/२०२३ मधील आदेश दिनांक ११/०३/२०२४

४. शासन पत्र क्र. संकिर्ण-२०२४/प्र.क्र.१८४/टिएनटी-१ दिनांक १९/०४/२०२४.

🙋

कागदपत्रे पडताळणी संदर्भात आयुक्त शिक्षण यांचे यापूर्वीचे परिपत्रक सुद्धा वाचा वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या/खाजगी व्यवस्थापनांच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील, रात्र शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती "अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२" मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे व शासन तरतुदी/विविध न्यायालयानी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार करण्यात येत आहे.

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

संदर्भाधीन पत्रामध्ये नमूद केलेले शासन निर्णय व शासन पत्रातील तरतुदीनुसार जानेवारी, २०२४ मध्ये पवित्र पोर्टलवर प्राप्त जाहिरातीनुसार उमेदवारांच्या स्वप्रमाणपत्रातील नोंद केलेल्या माहितीच्या आधारे उमेदवारांची त्यांनी नोंदविलेल्या प्राधान्यक्रमानुसार मुलाखतीशिवाय पदभरतीसाठी संबंधित व्यवस्थापनांना पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार दिनांक २५/०२/२०२४ रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांच्या नियुक्तीबाबतची कार्यवाही नियुक्ती प्राधिकारी यांच्यास्तरावर सुरू करण्यात आलेली होती.

दरम्यानच्या कालावधीमध्ये लोकसभा-२०२४ च्या निवडणुकीचो आदर्श आचारसंहिता राज्यात लागू झालो आहे. यास्तव शासनाने पुढील कार्यवाही करण्यास मा. निवडणूक आयोगाकडे परवानगी देण्याबाबत विनंती केली असता संदर्भ क्रमांक ४ अन्वये शासनाने पवित्र पोर्टलमार्फत पहिल्या टप्यामध्ये मुलाखतीशिवाय या प्रकारात निवड झालेल्या ११०८५ उमेदवारांना त्यांच्या शिफारशी झालेल्या ठिकाणच्या त्या त्या जिल्हयातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच त्या जिल्हयातील प्रत्यक्ष मतदानाच्या दिनांकानंतरच्या दिवसापासून नियुक्ती देण्याची कार्यवाही सक्षम प्राधिकाऱ्यांनी करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

यास्तव यापुर्वी संदर्भ क्रमांक १ अन्वये दिलेल्या निर्देशाप्रमाणे मुलाखतीशिवाय या निवड प्रक्रियेतील उमेदवारांना आपल्याशी संबंधित मतदार संघातील प्रत्यक्ष मतदान झाल्यानंतर तात्काळ नियुक्ती देण्याबाबतची नियुक्ती प्राधिकारी म्हणून आपल्यास्तरावरील कार्यवाही करावी. पवित्र पोर्टलवर नोंद केलेल्या माहितीच्या आधारे उमेदवारांची निवडीसाठी शिफारस झालेली आहे यास्तव उमेदवाराची निवड झालेल्या पदासाठी पात्रता असल्याची खात्री करूनच नियुक्ती आदेश देण्याची दक्षता घेण्यात यावी.

पवित्र पोर्टलवर दिलेल्या सुविधेचा वापर करून उमेदवारांच्या रूजू बाबतचा अहवाल पोर्टलवर नोंद करावा व केलेली कार्यवाही आयुक्तालयास अवगत करावी.


(सुरज मांढरे, भा.प्र.से.) 

आयुक्त (शिक्षण) 

महाअष्ट्र राज्य, पुणे-१

प्रत माहिती व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी उप सचिव (टिएनटि-१), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२


महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

दालन क्र४३९.. चौथा मजला, विस्तार इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई०३२ ४००-

Email Id: tnt1.sesd-mh@mah.gov.in

क्रमांक:- संकीर्ण-२०२४/प्र.क्र.१८४/टिएनटि-१

दिनांक : १९ एप्रिल, २०२४.


प्रति,

आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.


विषय :- शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमता चाचणी, २०२२ मधील गुणांकनाच्या आधारे शिक्षक पदभरतीसाठी पवित्र पोर्टल मार्फत निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या शिफारशित जिल्ह्यांमध्ये नियुक्ती आदेश देणेबाबत.


संदर्भ :- सचिव, भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचे cVigil द्वारे प्राप्त पत्र क्र. ४३७/MH-HP/२०२४ (cVigil)/WS-II, दि. १६.०४.२०२४.

महोदय, 

उपरोक्त विषयाबाबतचे सचिव, भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचे cVigil द्वारे प्राप्त संदर्भाधिन पत्र सोबत जोडले आहे.

२. प्रस्तुत प्रकरण भारत निवडणूक आयोगाने दि.१६.०४.२०२४ च्या पत्रान्वये दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने राज्यातील शिक्षक भरती संदर्भात शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमता चाचणी, २०२२ मधील गुणांकनाच्या आधारे पवित्र पोर्टल मार्फत पहिल्या टप्प्यामध्ये मुलाखतीशिवाय या प्रकारात निवड झालेल्या ११,०८५ उमेदवारांना त्यांच्या शिफारशित ठिकाणाच्या त्या-त्या जिल्ह्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच त्या जिल्ह्यातील प्रत्यक्ष मतदानाच्या दिनांकानंतरच्या दिवसापासून नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्याबाबत संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांना आपल्या स्तरावरुन कळविण्यात यावे, ही विनंती.


(द. छ. शिंदे) 

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

👇👇👇👇👇

दिनांक 26 जून 2024 चे परिपत्रक 


शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) २०२२ 'मुलाखतीशिवाय'

शिक्षक पदभरतीचा विकल्प दिलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 'पवित्र प्रणाली' अंतर्गत उर्वरित रिक्त पदांच्या रूपांतरित फेरीतील (Converted Round) निवडयादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीबाबत व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत. 

👉 परिपत्रक पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 👈


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon