DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

SEBC Caste Non Creamy Layer Certificate Issue Guideline Circular

महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम, २०२४ च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावयाचे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना ...

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक बीसीसी-२०२४/प्र.क्र. ७५/आरक्षण-५ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२ दिनांक - ५ जुलै, २०२४

संदर्भ-

१. सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र. बीसीसी-२०२४/प्र.क्र.७५/आरक्षण-३, दि.११ मार्च २०२४.

२. सामान्य प्रशासन विभाग, शासन शुद्धीपत्रक क्र. बीसीसी-२०२४/प्र.क्र.७५/आरक्षण-३, दि.१५ मार्च २०२४.

३. सामान्य प्रशासन विभाग, शासन शुद्धीपत्रक क्र. बीसीसी-२०२४/प्र.क्र.७५/आरक्षण-५,

दि. २८ जून २०२४. ४. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम, २०२४

शासन परिपत्रक -

महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण

अधिनियम, २०२४ दिनांक २६.०२.२०२४ पासून राज्यात अंमलात आला असून याअन्वये राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील व पदांवरील सरळसेवांमधील नियुक्तीसाठी व

शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी १० टक्के आरक्षण विहित करण्यात आलेले आहे. २. उपरोक्त संदर्भ क्र. २ अन्वये संदर्भ क्र. १ येथील शासन परिपत्रकासोबतचे "परिशिष्ट-

अ" रद्द करून "सुधारीत परिशिष्ट-अ नुसार महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम, २०२४ च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावयाचे जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या होत्या.

३. तद्नंतर, शासनाने संदर्भ क्र.३ येथील दि. २८.०६.२०२४ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग प्रवर्गाच्या उमेदवारांच्या सोयीसाठी जात प्रमाणपत्र (परिशिष्ट अ) व नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र (परिशिष्ट ब) स्वतंत्र पद्धतीने देण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. तथापि, संदर्भ क्र. २ अन्वये यापूर्वी निर्गमित परिशिष्ट अ मधील जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र या सदराखाली निर्गमित केलेली प्रमाणपत्रे ही महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम, २०२४ अस्तित्वात आल्यानंतर निर्गमित झालेली असल्याने सदर सर्व प्रमाणपत्रे यापुढेही वैध राहतील.

शासन परिपत्रक क्रमांका बीसीसी-२०२४/प्र.क्र. ७५/आरक्षण-५

४. सध्या राज्यात मोठया प्रमाणात होत असलेल्या नोकर भरती तसेच शैक्षणिक प्रवेश प्रक्रियां दरम्यान अशाप्रकारे जिल्हास्तरावर प्रमाणपत्र देण्यास अटकाव झाल्यास त्याचा

विपरीत परिणाम होण्याची व न्यायालयीन प्रकरणे उद्भवण्याची शक्यता आहे. सदर बाब विचारात घेता यापुढे संबंधित सक्षम प्राधिकारी, सर्व विभागीय आयुक्त/ जिल्हाधिकारी/सर्व

निवासी उप जिल्हाधिकारी/सर्व तालुका दंडाधिकारी तथा तहसिलदार यांनी एसईबीसी

प्रवर्गातील उमेदवार / विद्यार्थी यांना संदर्भ क्र.३ सोबत जोडलेल्या परिशिष्ट "अ" व परिशिष्ट

"ब" मधील नमुन्यात विहीत मुदतीत प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्याबाबत आवश्यक कार्यवाही तातडीने करावी.

५. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०२४०७०८१५१९४६१७०७ असा आहे.
 हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(खालिद बी अरब) सह सचिव, महारष्ट्र शासन


महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम, २०२४ च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावयाचे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना ...

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन शुद्धीपत्रक क्रमांक बीसीसी-२०२४/प्र.क्र. ७५/आरक्षण-५, मंत्रालय, मुंबई

दिनांक-२८ जून, २०२४

संदर्भ-

१. सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र. बीसीसी-२०२४/प्र.क्र.७५/आरक्षण-३ दि.११ मार्च २०२४.

२. सामान्य प्रशासन विभाग, शासन शुद्धीपत्रक क्र.बीसीसी-२०२४/प्र.क्र.७५/आरक्षण-३ दि.१५ मार्च २०२४.

शासन शुद्धीपत्रक-

संदर्भीय क्र. १ येथील शासन परिपत्रकातील परिशिष्ट-अ तसेच संदर्भीय क्र. २ येथील शासन शुद्धीपत्रक क्र. बीसीसी-२०२४/प्र.क्र. ७५/आरक्षण-३ दिनांक १५ मार्च २०२४ रद्द करण्यात येत असून, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग प्रवर्गाकरीता जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र देण्यासाठी याद्वारे सुधारीत परिशिष्ट-अ व परिशिष्ट-ब स्वतंत्र पृष्ठांवर विहित करण्यात येत आहे.

२. सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०२४०६२८१७५११०३००७ असा आहे. हे शुद्धीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.


(खालिद बी. अरब) 
सह सचिव, महारष्ट्र शासन


शासन शुद्धीपत्रक क्रमांक- बीसीसी-२०२४/प्र.क्र. ७५/आरक्षण-५ दि. २८ जून २०२४ चे सहपत्र

परिशिष्ट-अ

Form of Certificate to be issued to Socially and Educationally Backward Class persons belonging to the State of Maharashtra.

Documents verified:-

(1)

(2)

(3)

(4)

CASTE CERTIFICATE

This is to certify/that Shri/Shrimati/Kumari of Village/Town*in District/Division*-- Son/Daughter of ---- of the State of Maharashtra belongs to the---Caste under the Government Resolution Social Justice & Special Assistance Department No.- dated 15th July, 2014 as amended from time to time and Section 2 (1) (j) and Section (3) of The Maharashtra State Reservation for Socially and Educationally Backward Classes Act, 2024 as a Socially and Educationally Backward Class.

2. Shri/Shrimati/Kumari and/or his/her family ordinarily reside (s) in village/Town-of-district/division of the State of Maharashtra.



शासन शुद्धीपत्रक क्रमांक- बीसीसी-२०२४/प्र.क्र. ७५/आरक्षण-५ दि. २८ जून २०२४ चे सहपत्र

परिशिष्ट-ब

NON-CREAMY LAYER CERTIFICATE

This is to certify that Shri/Smt./Kum. --does not belong to the persons/sections (Creamy-layer) mentioned in the Government of Maharashtra Gazette, Extra- Ordinary, Part VIII, dated 26th February, 2024, Maharashtra State Reservation for Socially and Educationally Backward Classes Act, 2024 and instructions and guidelines laid down in the Government Resolution Social Justice, Cultural Affairs, Sports and Special Assistance Department No.CBC-10/2001/Pra. Kra. 120/Mavak-5, dated 1 November, 2001, CBC- 1094/Pra. Kra.86/Mavak-5, dated 16th June, 1994, CBC-1094/Pra. Kra.86/Mavak-5, dated 5th June, 1997 and Government Resolution No.CBC- 10/2001/Pra. Kra. 111/Mavak-5, dated 29th May, 2003 and Government Resolution No. VJNT-2014/C.R.118/VJNT-1, dated 31 July, 2014.

This Certificate is valid for the period year from the date of issue.

Signature

Designation

-----------

(With Seal of the Office)

Place:--

Dated:-

Please delete the words which are not applicable

Note:- The term "ordinarily reside(s)" used here will have the same meaning as in Section 20 of the Representation of the Peoples Act, 1950.


Also Read 👇 

SEBC Caste Non Creamy Layer Certificate Issue Guideline

SEBC Caste Certificate Non Creamy Layer Certificate Issue Guideline



महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम, २०२४ च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावयाचे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना ...

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक बीसीसी-२०२४/प्र.क्र. ७५/आरक्षण-३ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२ दिनांक - ११ मार्च, २०२४

संदर्भ-

१) शासन परिपत्रक, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्र. सीबीसी २०१२/प्र.क्र.१८२/विजाभज १, दि. २५ मार्च, २०१३.

२) शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्रमांक: व्हीजेएनटी- २०१४/प्र.क्र.११८/व्हिजेएनटी-१, दि.३१ जुलै, २०१४

३) शासन निर्णय, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र. सीबीसी- १०/२००८/प्र.क्र. ६९७/ विजाभज दि. १६ डिसेंबर २०१७

४) महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम, २०२४ (सन २०२४ चा महाराष्ट्र अधियमन क्रमांक १६)

प्रस्तावना -

महाराष्ट्र राज्य विधानमंडळाने दिनांक २० फेब्रुवारी, २०२४ रोजी विशेष अधिवेशन घेऊन महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम, २०२४ एकमताने संमत केला आहे. मा. राज्यपाल महोदयांच्या मान्यतेने दिनांक २६ फेब्रुवारी, २०२४ रोजी सदर अधिनियम अंमलात आला आहे. सदर अधिनियमाच्या कलम ५ अन्वये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशामध्ये तसेच राज्याच्या लोकसेवांमधील शासकीय व निमशासकीय सेवेत सरळसेवा भरतीच्या पदांमध्ये १० टक्के आरक्षण विहित करण्यात आले आहे.

सन २०१८ चा एसईबीसी आरक्षण अधिनियम निरसित झाल्याने व सद्यःस्थितीत जात प्रमाणपत्र तसेच नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्राप्त होणेबाबत राज्यातील विविध स्तरावरून तसेच विभागीय आयुक्त/जिल्हाधिकारी/ तहसिल कार्यालय यांच्याकडून एसईबीसी वर्गास लागू झालेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्याची विनंती शासनास करण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने सदर प्रकरणी खालीलप्रमाणे सर्वंकष सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.

परिपत्रक -


१. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम, २०२४ च्या कलम १२ मध्ये जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीबाबत सविस्तर नमूद केलेले आहे. सबब, मराठा समाजास सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणून जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, २००० आणि महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) नियम, २०१२ यांच्या तरतुदी आवश्यक फेरफारांसह लागू असतील.

२. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम, २०२४ अंतर्गत मराठा समाजास जातीची प्रमाणपत्रे सक्षम प्राधिकाऱ्यांकडून मिळण्यास पुराव्या अभावी विलंब होतो किंवा जातीचे प्रमाणपत्र देणे किंवा नाकारणे याबाबत कोणताही निर्णय न घेता दिर्घकाळ प्रकरणे प्रलंबित राहतात. त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी अर्जदाराच्या जातीबाबत परिपूर्ण अभ्यास करुन निर्णय घ्यावा व निर्णय घेण्यास टाळाटाळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

Also Read –

महाराष्ट्र शासन 

सामान्य प्रशासन विभाग 

मा. न्यायमूर्ती श्री. संदीप शिंदे (निवृत्त) मुंबई

प्रति,

दिनांक : ०४.०३.२०२४

जिल्हाधिकारी,

सर्व.

विषय : कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याबाबत सूचना

अधिक माहितीसाठी व  परिपत्रक डाऊनलोडसाठी उपलब्ध त्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 

 

.

३. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम, २०२४ अंतर्गत मराठा समाजास जात प्रमाणपत्र अथवा जात वैधता प्रमाणपत्राकरीता महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) नियम, २०१२ मध्ये विहित केलेल्या आवश्यक पुराव्यांसह अर्जदाराने यथास्थिती सक्षम प्राधिकारी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांचेकडे अर्ज करणे आवश्यक आहे. सदर प्रमाणपत्रांकरीता अर्जदाराने उपलब्ध कागदपत्रांसह अर्ज केल्यास त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार सक्षम प्राधिकारी यांचा असल्याने सदर अर्ज संबंधित कार्यालयातील निम्नस्तरावरील कर्मचाऱ्यांकडून नाकारण्यात येऊ नये.

४. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम, २०२४ च्या कलम ५ (२) मध्ये एसईबीसी वर्गाच्या आरक्षणाच्या प्रयोजनांसाठी "उन्नत व प्रगत" (नॉन क्रिमिलेअर) गटाचे तत्व लागू असेल असे नमूद आहे.

याबाबत शासन परिपत्रक, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दि. २५ मार्च, २०१३ अन्वये विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गामधील उन्नत व प्रगत व्यक्ती/ गट याकरीता नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्रदानासाठी समग्र सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे संदर्भाधीन क्र. ३ येथील शासन निर्णय दि. १६ डिसेंबर, २०१७ अन्वये विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गामधील उन्नत व प्रगत व्यक्ती/ गट याकरीता नॉन क्रिमिलेअर साठी उत्पन्न मर्यादा रु. ८ लक्ष इतकी करण्यात आली आहे. याबाबतचे नियम एसईबीसी वर्गास (मराठा समाजास) लागू राहतील.

५. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम, २०२४ अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) नागरिकांच्या वर्गाच्या प्रगतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरीता जागांच्या आरक्षणासाठी आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांच्या आणि पदाच्या आरक्षणासाठी आणि तत्संबंधित किंवा तद्नुषंगिक बाबींची तरतुद करण्यासाठी अधिनियमातील अनुच्छेद ५ (२) अन्वये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) (मराठा समाजास) वर्गाला राखीव जागाच्या प्रयोजनाकरीता आरक्षणाच्या प्रयोजनासाठी उन्नत व प्रगत गटाचे तत्व लागू असेल आणि ज्या व्यक्ती,उन्नत व प्रगत गटात मोडत नसतील फक्त अशा व्यक्तींनाच या अधिनियमाखालील आरक्षण उपलब्ध असेल.

६. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) नागरिकांच्या वर्गाकरीता जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र तसेच याकरीता मानीव दिनांक हा इतर मागासवर्ग प्रवर्गाप्रमाणे असल्याने नॉन क्रिमिलेअर संदर्भातील कार्यपध्दती संदर्भाधीन क्र.१ येथील शासन परिपत्रक दि.२५ मार्च, २०१३ प्रमाणे लागू राहील. तसेच संदर्भाधीन क्र.३ येथील शासन निर्णय दि. १६ डिसेंबर, २०१७ अन्वये लागू करण्यात आलेली नॉन क्रिमिलेअरची आर्थिक मर्यादा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) (मराठा समाजास) वर्गासही लागू राहील. तसेच संदर्भाधीन क्र.२ अन्वये विहित केलेल्या जात प्रमाणपत्र व नॉनक्रिलेअर प्रमाणपत्रात आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या असून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गाकरीता प्रमाणपत्राचा नमूना सदर शासन परिपत्रका सोबतच्या परिशिष्ट (अ) प्रमाणे राहील.

७. सदर शासन परिपत्रक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि इतर मागास व बहुजन कल्याण विभाग यांच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

८. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या स्पर्श करा   या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०२४०३१११४४१५७९७०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(खालिद बी. अरब) सह सचिव, महाराष्ट्र शासन

उपरोक्त परिपत्रक डाऊनलोडसाठी उपलब्ध 

 
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon