DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Government Decision Dated 07 Feb 2023 Regarding Inclusion of Condition Regarding the Posts of Teachers

GR Dt 07 Feb 2023 Condition Include For Teachers Posts

https://www.dnyanyatritantrasnehi.com/2024/06/gr-7-feb-2023-condition-include-for-tr.html

GR Dt 07 Feb 2023 include condition regarding the posts of teachers

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण  व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
क्रमाक- उमातू-२०२२/प्र.क्र. २१,४/एसएम-५
दिनांक ०४.०६.२०२४

प्रति,
आयुक्त, शिक्षण महाराष्ट्र राज्य, 
पुणे

विषय :- शासन निर्णय दि.०७.०२.२०२३ मध्ये शिक्षक पदांसंदर्भात अट समाविष्ट करण्याबाबत 

संदर्भ : 
१) शासन निर्णय क्र. प्रशातु-२०२२/प्र.क्र २६४/एसएम-५ दि.०७.०२.२०२३.
२) आपले पत्र क्र. शिआका/२०२४/कमचि पटसंख्या निश्चिती/आस्था क माध्य / १५३० दि.०१.०३.२०२४.

महोदय,
उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधीन शासन निर्णयानुसार अतिरिक्त शाखा / तुकडीची पटसंख्या ८० वरुन १२० करताना आदेशात पुढील अटीचा समावेश करावा, असे सूचित करण्यात येत आहे:-

"अतिरिक्त शाखा / तुकडी मधील विद्यार्थी संख्या ८० वरुन १२० इतकी वाढविल्यामुळे संबंधीत अतिरिक्त शाखा / तुकडीवर वाढीव शिक्षक/ शिक्षकेतर पदे मंजूर होणार नाहीत."


(कविता तोंडे)
कक्ष अधिकारी, 
महाराष्ट्र शासन

⏬⏬⏬⏬⏬⏬


Government decision dated 07.02.2023 regarding inclusion of condition regarding the posts of teachers
Regarding inclusion of condition regarding teacher posts in Government Decision
Inclusion of condition regarding teacher posts in GR 7July 2023

महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, २०१२ मधील तरतुदीनुसार नवीन मान्यता प्राप्त संपूर्णतः स्वयंअर्थसहाय्यित तत्वावरील कार्यरत कनिष्ठ महाविद्यालये वगळता अन्य कनिष्ठ महाविद्यालयांमधील अतिरिक्त शाखा/ तुकडी करिता पटसंख्या निश्चित करण्याबाबत...

महाराष्ट्र शासन 
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः प्राशातु-२०२२/प्र.क्र.२६४/एसएम-५ हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई-३२ 
दिनांक: ०७ फेब्रुवारी, २०२३

१. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांका एसएससी-१०७६/४१९/XX-XXI 
दि.०६.०५.१९७६

२. शासनपत्र, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांकः एचएससी-१७००/(३१०१/००) उमाशि-१ 
दि.२१.०९.२०००

प्रस्तावना:

उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालये यांना अतिरिक्त जादा तुकडया मंजूर करण्याची कार्यपध्दती संदर्भ क्र.१ येथील आदेशान्वये व संदर्भ क्र.२ येथील पत्रान्वये विहित करण्यात आलेली आहे. संदर्भ क्र.२ च्या पत्रानुसार इयत्ता ११ वी चे वर्ग माध्यमिक शाळांना जोडलेले असल्यास ८० विदयार्थ्यांची १ (एक) तुकडी व वरिष्ठ महाविद्यालयांना जोडलेले असल्यास १२० विदयार्थ्यांची १ (एक) तुकडी हे सुत्र तुकड्यांचा प्रस्ताव पाठविताना अवलंबविण्यात यावे, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. तथापि सद्यस्थितीत सर्वं उच्च / कनिष्ठ महाविद्यालयांना ८० विदयार्थ्यांकरिता एक अतिरिक्त तुकडी प्रस्तावित करण्यात येत आहे. त्यामुळे एका तुकडीत १२० विदयार्थ्यांची बसविण्याची क्षमता असताना देखील सरसकट ८० विदयार्थ्यांची एक तुकडी मंजूर करण्यात येत आहे, ही बाब निदर्शनास येत असल्याने, संदर्भाधीन पत्रांन्वये दिलेल्या सूचनांचे पालन करण्याकरिता पुढीलप्रमाणे पटसंख्या निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :
महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, २०१२ मधील तरतुदीनुसार नवीन मान्यता प्राप्त संपूर्णतः स्वयंअर्थसहाय्यित तत्वावरील कार्यरत कनिष्ठ महाविद्यालये वगळता अन्य कनिष्ठ महाविद्यालयांमधील अतिरिक्त शाखा/तुकडीस मान्यता प्रदान करण्याबाबत खालीलप्रमाणे निकष विहित करण्यात येत आहे:-
१) यापूर्वी मान्यता प्रदान केलेल्या तुकड्यांची विदयार्थी क्षमता ८० वरुन १२० विदयार्थी इतकी वाढविण्याबाबत प्रस्ताव प्राप्त झाल्यास संबंधित संस्थेमधील संबंधित तुकडीमध्ये तसेच शाळेमध्ये १२० विदयार्थी शिकविण्याच्या अनुषंगाने आवश्यक सर्व भौतिक सुविधा आहेत किंवा कसे याची संबंधित शिक्षणाधिकारी यांनी स्वतः प्रत्यक्ष भेट देऊन खात्री करावी व त्यानुसार प्रस्ताव मान्यतेसाठी संबंधित उपसंचालक यांच्यामार्फत विहित कार्यपध्दतीनुसार आयुक्त (शिक्षण) यांना सादर करावेत. या प्रकरणांपुरते अंतिम मान्यता प्रदान करण्याचे अधिकार आयुक्त (शिक्षण) यांना प्रदान करण्यात येत आहे.

    तुकडी मान्यतेबाबत प्राप्त नवीन प्रस्ताव केवळ १२० विदयार्थी संख्येच्या क्षमतेसह मान्यतेसाठी सादर करण्यात यावे. तसेच या प्रस्तावांबाबत संबंधित तुकडीमध्ये तसेच शाळांमध्ये १२० विदयार्थी शिकविण्याच्या अनुषंगाने आवश्यक सर्व भौतिक सुविधा आहेत किंवा कसे याची संबंधित शिक्षणाधिकारी यांनी स्वतः प्रत्यक्ष तपासणी करुन खात्री करावी व त्यानुसार प्रस्ताव मान्यतेसाठी विहित कार्यपध्दतीनुसार शासनास सादर करावा. ज्या शाळांमध्ये १२० विदयार्थी शिकविण्याकरिता आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध नाहीत, अशी संबंधित शिक्षणाधिकारी यांची प्रत्यक्ष तपासणी अंती खात्री पटली असल्यास, असे प्रस्ताव शासनास सादर करण्याची आवश्यकता नाही.

या प्रस्तावांकरिता संदर्भ क्र.२ येथील पत्रातील इयत्ता ११ वी चे वर्ग माध्यमिक शाळांना जोडलेले असल्यास ८० विद्याथ्यांची १ (एक) तुकडी व वरिष्ठ महाविद्यालयांना जोडलेल्या असल्यास १२० विद्यार्थ्यांची १ (एक) तुकडी हे सूत्र तुकड्यांचा प्रस्ताव सादर करताना विचारात घ्यावे, ही अट लागू राहणार नाही.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध
करण्यात आला असून त्याचा सांकेताक क्रमांक २०२३०२०७१६००१६४४२१ असा आहे. हा आदेश डिजीटल
स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(कविता तोंडे)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon