Divyang Education Long term strategy GR
राज्यातील दिव्यांगांच्या शिक्षणाचे अनुषंगाने दीर्घकालीन धोरण (Long term strategy) निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग
शासन निर्णय क्र. इडीडी-२०२४/प्र.क्र.६१/दि.क.१ ३१, ३२, ३५ ए. मित्तल टॉवर, ए-विंग, तिसरा मजला बॅरिस्टर रजनी पटेल मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१.
दिनांक : ०७ मे, २०२४.
वाचा:-
१) मा. उच्च स्तरीय सचिव समितीच्या दिनांक १६ ऑक्टोबर, २०१८ रोजीच्या सन २०१८ च्या ७ व्या बैठकीचे इतीवृत्त.
२) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र. इडीडी-२०१८/प्र.क्र.१३८/अ.क.१, दि.३ नोव्हेंबर, २०१८.
प्रस्तावना :-
राज्यातील दिव्यांगांच्या शिक्षणाच्या अनुषंगाने दीर्घकालीन धोरण (Long term strategy) निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत उपरोक्त संदर्भाधिन क्र. १ अन्वये देण्यात आलेल्या निदेशांस अनुसरुन समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.
शासन निर्णयः-
मा. उच्चस्तर सचिव समितीने त्यांचे दिनांक १६ ऑक्टोबर, २०१८ रोजीच्या सन २०१८ च्या ७ व्या बैठकीमध्ये दिलेल्या निदेशांस अनुसरुन राज्यातील दिव्यांगांच्या शिक्षणाच्या अनुषंगाने दीर्घकालीन धोरण (Long term strategy) निश्चित करण्यासाठी खालील प्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे.
समिती सदस्य
अ.क्र. पदनाम
१. अ.मु. स./प्र.स/ सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अध्यक्ष
२. अ.मु.स./प्र.स./ सचिव, दिव्यांग कल्याण विभाग सदस्य
३. अ.मु. स/प्र.स/ सचिव, वित्त विभाग सदस्य
४. अ.मु. स./प्र.स./ सचिव, सामान्य प्रशासन विभाग सदस्य
५. अ.मु. स./प्र.स./ सचिव, अल्पसंख्यांक विकास विभाग सदस्य
६. अ.मु. स./प्र.स/ सचिव, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग सदस्य
७. अ.मु. स/प्र.स/ सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग अ.मु. स./प्र.स./ सचिव, विधि व न्याय विभाग
८.आयुक्त, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे सदस्य
९. आयुक्त, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे सदस्य सचिव
११. उपायुक्त, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
१२. उप/सह सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई
२. सदर समितीने राज्यातील दिव्यांगांसाठी चालविण्यात येणाऱ्या विशेष शाळांमध्ये शिकणाऱ्या अंध, मुकबधीर, मतिमंद व अस्थिव्यंग प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा टप्प्या-टप्प्याने सर्वसाधारण शाळेमध्ये समावेश करण्याचे अनुषंगाने दीर्घकालीन धोरण (Long term strategy) निश्चित करावे.
३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकितांक २०२४०५०७१२०३२२३४३५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
(वि. पुं. घोडके)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
प्रति,
१) अ.मु.स./प्र.स./ सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई..
२) अ.मु.स./प्र.स./ सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.,
३) अ.मु.स./प्र.स./ सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई..
४) अ.मु.स./प्र.स./ सचिव, अल्पसंख्यांक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई..
५ ) अ.मु.स./प्र.स./ सचिव, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, मंत्रालय, मुंबई.,
६) अ.मु.स./प्र.स.चिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई..
७) अ.मु.स./प्र.स. सचिव, विधि व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई..
८) आयुक्त, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे..
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon