Free education for all till class 10th
इयत्ता १० वी पर्यंत सर्वांना मोफत शिक्षण
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य १७, डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे-४११ ००१.
दूरध्वनीक्रमांक :-०२०/२६१२६७२६/२६१२३५१५
जा.क्र./शिसंयो/यो-१-३०२/१० वी पर्यंत सर्वांना मो.शि.शै.स./कार्यपध्दती / 01127
प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२) शिक्षणाधिकारी (योजना), जिल्हा परिषद, सर्व
३) शिक्षणाधिकारी (योजना), मुंबई
E-mail Id:- directoradult1@gmail.com
दिनांक :- ०६.०५.२०२४
विषयः इयत्ता १० वी पर्यंत सर्वांना मोफत शिक्षण लेखाशिर्ष-२२०२३०५६ या योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याची व अनुदान मागणीची कार्यपध्दती.
सोबतः -
१) सदर शैक्षणिक सवलत योजनेचा लाभ मिळण्यासाठी पालकांनी मुख्याध्यापक/प्राचार्य यांचेकडे करावयाच्या अर्जाचा नमूना
प्रपत्र-१
२) शिक्षण संस्थेच्या प्रमुखांनी / मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी
भरावयाचा नमूनाः प्रपत्र-२
३) शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी संबंधित जिल्हयाचे शिक्षणाधिकारी (योजना) यांचे कार्यालयात सादर करावयाचा मागणीचा नमूना प्रपत्रः-३
४) मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी शिक्षणाधिकारी (योजना) जि.प.
यांचेकडे सादर करावयाचा बिल फॉर्म नमूना प्रपत्र-४
५) राज्यातील अशासकीय माध्यमिक शाळांतील, उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना तसेच शासकीय अध्यापक महाविद्यलयातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिक्षण सर्व स्तरावर (इ. १ ली ते पदव्युत्तर स्तर) विहित दराने अर्थसहाय. २) प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना सर्व स्तरावर (इ. १ ली ते पदव्युतर स्तर) विहित दराने अर्थसहाय. फ्लो चार्ट (कार्यपध्दती) प्रपत्र-५
६) शिक्षणाधिकारी (योजना) जि.प. यांनी चारमाही अंदाजपत्रकावेळी अनुदान मागणी सादर करावयाचे नमूने -प्रपत्र-अ, ब, क, ड, ई
सोबतः - विहित नमूने जोडले आहेत.
Palkar (डॉ.
महेश पालकर)
शिक्षण संचालक शिक्षण संचालनालय, (योजना) महाराष्ट्र राज्य पुणे-१
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon