Z P school allowed to rent for marriage
ZP School Permission for Marriage on Rent
जिल्हा परिषद शाळा लग्नासाठी भाड्याने देण्यास परवानगी
Zilla Parishad school allowed to rent for marriage
प्रति
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद,
अमरावती अकोला/यवतमाळ बुलढाणा वाशिम
विषय:- दिर्घकालीन सुटयामध्ये शालय परिसर व इमारत क्रिडांगण लग्न समारंभासाठी आपले स्तरावर परवाना देणेबाबत.
जि.प. अखत्यारीतील शालेय इमारत, परिसर व क्रीडांगण फक्त शैक्षणिक कामासाठीच उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने या कार्यालयाचे पत्र क्र. विकास/सशिअ/५१४/२०११ दिनांक वापरासाठी परवानगी देण्यात यावी. इतर अशैक्षणिक (उदा. लग्न, संगीत, नृत्य कार्यक्रम राजकीय सभा) प्रयोजनाकरीता मागनी करणा-या व्यक्ती अथवा संस्था यांना जि.प व माजी शासकीय शाळा इमारत, शाळा परिसर व क्रिडांगण यांचा वापर करण्याची परवानगी देण्यात येऊ नये असे कळविण्यात आले होते.
तथापी ग्रामीण भागात लग्न कार्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नसल्याची बाब लक्षात घेता व याबाबत विविध स्तरावरुन आलेल्या विनंत्या विचारात घेता दिर्घकालीन सुटीच्या कालावधीत (दिवाळी व उन्हाळी सुटया) सांस्कृतिक कार्यक्रम (लग्न समारंभ) साठी गशक्षणाधिकारी व स्थानिक शालेय व्यवस्थापन समितीच्या पूर्व परवानगीने आवश क दर आकारुन शालय इमारत, शालेय परिसर व क्रिडागण उपलब्ध करुन देण्याची परवानगी देण्यात यावी.
ग्रामीण भागातील लोकसंख्येनुसार दर आकारण्यात यावे.
१. लोकसंख्या २००० पर्यंत किमान रु. १०००/- दर
२. लोकसंख्या २००० ते ५००० पर्यंत किमान रु. २०००/- दर
३. लोकसंख्या ५००० चे वर किमान रु. ३०००/- दर
सदरचे दर हे मागणी नुसार व परिस्थितीनुसार वाढविणेस शालेय व्यवस्थापन समितीस मान्यत देण्यात येत आहे.
सदरच्या शाळा /क्रिडागणे वापः अंतर संपुर्णपणे स्वच्छ करून देण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहिल. अशा प्रकारे संपूर्णपणे स्वच्छता करुन न दिल्यास सदरची व्यक्ती दंडास व शासकीय इमारतीस नुकसान केल्याबद्दल गुन्हा नोंदविण्यास पात्र राहील, अशा प्रकारची लेखी जाणीव सद व्यक्तीला देण्यात येवून सदरची अट लेखी स्वरुपात मान्य असली तरच संबंधित व्यक्तीस सदरच्य शाळा / क्रिडागणे वरीलप्रमाणे किमान भाडे आकारुन वापरास देण्यात यावीत.
सदरच्या शाळा सदर कार्यक्रम संपल्यानंतर तातडीने स्वच्छ करुन घेण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक यांची राहील. तसेच गाळेच्या इमारतीस अथवा क्रिडागणास कोणत्याही प्रकारची हानं पोहचणार नाही याचीही जबाबदारी मुख्याध्यापक यांची राहील. अशी हानी पोहचल्यास याबाबतच्य दूरस्तीचा किंवा अनुशंगिक खर्च संबंधित व्यक्तीकडुन भरपाई करुन घेण्याची जबाबदारी मुख्याध्यापक यांची राहील.
आयुक्त
अमरावती विभाग अमरावती करिता
प्रत:
१. मा. अध्यक्ष, प्रा. नरेंद्र खंडजल्हा कालदमाय बुलडाणा यांना माहितीस्तव.
२. मा. अध्यक्ष, जि.प. अमरावती यांना माहितीस्तव.
विभागीय आयुक्त यांचे कार्यालय, अमरावती विभाग, अमरावती
दिनांक :- ३० मार्च, २०११
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon