DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

CCRT Training Registration Link सी सी आर टी कार्यशाळा नामनिर्देशनाबाबत शिक्षक नोंदणी लिंक


CCRT Training Registration Link सी सी आर टी कार्यशाळा नामनिर्देशनाबाबत शिक्षक नोंदणी लिंक



जा.क्र./राशैसंप्रपम/कला-क्रीडा/CCRT/२०२६/

दिनांकः /०६/२०२६



संदर्भ -
- १. श्री राजीव कुमार, निदेशक, CCRT, नवी दिल्ली यांचा प्राप्त मेल सीसीआरटी/१३०११/१/२०२६ दि. ०४ मे, २०२६

२. Dr. Sandeep Sharma, Deputy Director (Training), Deputy, Centre for Cultural Resources and Training, Govt. of India, New Delhi - ११००७५ यांचा प्राप्त मेल दि.१९.०५.२०२६

३. Sh. Ashutosh, Deputy Director-Training-II (Workshop), Centre for Cultural Resources and Training, Govt. of India, New Delhi - ११००७५ यांचा प्राप्त मेल दि.२२.०५.२०२६

उपरोक्त संदर्भीय विषयानुसार आपणास कळविण्यात येते की, CCRT (Centre for Cultural Resources and Training) मार्फत वर्षभर सेवांतर्गत शिक्षक व अध्यापकाचार्य (Teacher Educators) यांच्यासाठी दिल्ली, हैद्राबाद, उदयपुर, दामोह, नागपूर व गुवाहाटी येथील केंद्रांवर प्रशिक्षण/कार्यशाळा/ अभिमुखता (Orientation) कोर्सेस आयोजित केले जातात. या कार्यशाळांमध्ये सहभागी शिक्षकांना आपल्या समृद्ध कलात्मक व सांस्कृतिक वारशाची ओळख करून दिली जाते. शिक्षण प्रक्रियेत विविध कलात्मक व सांस्कृतिक अभिव्यक्तींचा समावेश कसा करावा याची संकल्पना सहभागी शिक्षकांना या कोर्समधून दिली जाते.

CCRT मार्फत जून ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत सेवांतर्गत शिक्षकांसाठी प्रशिक्षण/कार्यशाळा/ अभिमुखता (Orientation) कोर्सेस करण्यात येणार आहेत. सोबत दिलेल्या लिंकमध्ये प्रशिक्षणाची माहिती देण्यात आलेली असून आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यात यावे. नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षणाबाबत स्वतंत्रपणे या कार्यालयामार्फत अवगत करण्यात येईल. प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम अशा क्रमाने तसेच सर्व जिल्ह्यांना प्राधान्य मिळेल अशा पद्धतीने शिक्षकांना नामनिर्देशित करण्यात येईल. सदरील लिंकवरच फेब्रुवारी २०२७ अखेरपर्यतचे कोर्सेस उपलब्ध होणार आहेत. दर दोन महिन्यांनी सदर लिंक अपडेट केली जाईल. सदरील लिंकवर नोंदणी करण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील शिक्षकांना अवगत करण्यात यावे, तसेच उपरोक्त लिंकचा जास्तीत जास्त प्रसार व प्रचार करण्यात यावा.



सोबत - नावनोंदणी लिंक 



उपसंचालक
सामाजिक शास्त्र, कला व क्रीडा विभाग
CCRT Training Registration Link सी सी आर टी कार्यशाळा नामनिर्देशनाबाबत शिक्षक नोंदणी लिंक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,, महाराष्ट्र, पुणे

प्रत माहितीस्तव सविनय सादर

१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंबई.

२. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र, पुणे

प्रति,

१. विभागीय शिक्षण उपसंचालक, (सर्व)

२. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, (सर्व)

३. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (सर्व)

४. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई.

५. शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्व)

६. शिक्षण निरीक्षक, (पश्चिम, दक्षिण, उत्तर), मुंबई.

७. प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा.(सर्व)


ALSO READ 👇 

Center for Cultural Resources and Training NEW DELHI 


महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र ७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे - ४११०३०.

जा.क्र. मराशैसंप्रप/कला क्रीडा/सी सी आर टी / २०२३-२४/०2608

दि. २१ मे २०२४ 282021

प्रति,

१. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई.

२. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व

विषय: सी.सी.आर.टी. प्रशिक्षणासाठी शिक्षक नोंदणी करणेबाबत... संदर्भ-राहुलकुमार, उपसंचालक, सांस्कृतिक स्रोत व प्रशिक्षण केंद्र (CCRT), नवी दिल्ली यांचे पत्र क्र. सी सी आर टी / १३०११/१/२०२४/दि.१६ मे २०२४

उपरोक्त विषयानुसार, सी. सी. आर. टी. (CCRT-Center For Cultural Resources & Training) नवी दिल्ली, यांच्या मार्फत जून २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत दरमहा शिक्षकांसाठी प्रत्यक्ष (Offline) प्रशिक्षणांचे आयोजन केले जात आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छुक असणारे शिक्षक आपली नोंदणी खालील लिंकवर पुढील महिन्याच्या प्रशिक्षणासाठी करू शकतात.



नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर

शिक्षकांना प्रशिक्षणाबाबत स्वतंत्रपणे या कार्यालयामार्फत अवगत करण्यात येईल. प्रथम नोंदणी

करणाऱ्यास प्रथम अशा क्रमाने तसेच सर्व जिल्ह्यांना प्राधान्य मिळेल अशा पद्धतीने शिक्षकांना

नामनिर्देशित करण्यात येईल. सदरील नोंदणी करण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील शिक्षकांना अवगत

करण्यात यावे. तसेच उपरोक्त लिंकचा जास्तीत जास्त प्रसार व प्रचार करण्यात यावा.

(डॉ. माधुरी सावरकर) 

उपसंचालक, कला क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, 
पुणे ३०

प्रत माहिती व उचित कार्यवाहीस्तव :

• शिक्षणाधिकारी, प्राथमिक, सर्व जिल्हे.

• शिक्षणाधिकारी, माध्यमिक, सर्व जिल्हे.

शिक्षकांसाठी सूचना 
१.एका महिन्यामध्ये एकाच प्रशिक्षणासाठी लिंक भरावी. दोन प्रशिक्षणांसाठी लिंक भरल्यास प्रशिक्षणासाठी अपात्र ठरविले जाईल.
२.एका वर्षामध्ये एकदाच प्रशिक्षणासाठी जाता येईल. म्हणजेच एका वर्षात एकदा प्रशिक्षणास जाऊन आल्यावर परत लिंक भरू नये.
३. मुख्याध्यापकांनी लिंक भरू नये. तसेच ५२ वर्षाच्या वरील शिक्षकांनी लिंक भरू नये.
४. प्रशिक्षणासाठी आवश्यक इयत्ता खाली दिलेल्या यादीत बघून मगच लिंक भरावी.
५. वेगळी इयत्ता असेल म्हणून किंवा वय जास्त असल्यामुळे सी. सी. आर. टी. नवी दिल्ली प्रशिक्षणास हजर करून न घेतल्यास परिषदेची जबाबदारी राहणार नाही. 

Training Programs to be organized during June 2024-25

1. Role of Puppetry in Education in line with NEP 2020 Dt. 19th June to 3rd July 2024



2.Role of Puppetry in Education in line with NEP 2020 Dt. 20th June to 4th July 2024   

3. Orientation Course in line with NEP 2020 Dt. 20th June to 10th July 2024
4. Integrating Craft Skills in School Education Dt. 25th June to 4th July 2024
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon