DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Eco Clubs for Mission Life Summer Camp


महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय, डॉ. अनी बेझंट मार्ग, मध्यवर्ती इमारत, पुणे

क्र.प्राशिसं/८०२/संकीर्ण/शिक्षण सप्ताह/ प्रति. /२०२४

दिनांक- १९/०७/२०२४

विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग, शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई (उत्तर/दक्षिण/पश्चिम) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) (सर्व जिल्हे) प्रशासन अधिकारी, मनपा/नपा/नप (सर्व)

विषयः- राज्यात दिनांक २२ ते २८ जुलै, २०२४ या कालावधीत "शिक्षण सप्ताह" साजरा करणेबाबत... या अंतर्गत Eco Clubs for Mission Life/School Nutrition Day साजरा करणेबाबतच्या सविस्तर सूचना..........

संदर्भ : १) उप सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांचे कडील कार्यालयीन पत्र जा.क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र. २२८/एस. डी.४, दिनांक-१२ जुलै, २०२४
👆👆👆👆👆👆
२) मा. प्रधान सचिव, यांचे कडील कार्यालयीन पत्र जा.क्र. बैठक-२०२४/प्र.क्र. १६६/एस. डी.४, दिनांक-१६ जुलै, २०२४

३) मा. आयुक्त (शिक्षण) पुणे, यांचे पत्र शिआ/२०२४/संकीर्ण/आस्था-क-माध्य/२०२४/ ४३९१, दि १६.०७.२०२४

४) मा. संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट, पुणे यांचे पत्र क्र रा. शै. सं.प्र.प.म./NEP/शिक्षा सप्ताह/२०२४-२५/०३४५५ दिनांक १६.०७२०२४

५) या कार्यालयाचे समक्रमांक जा.क्र. प्राशिसं८०२/ संकीर्ण/शिक्षण सप्ताह४९१९/२०२४. दि १६.०७.२०२४

६) केंद्र सरकार, नवी दिल्ली (शिक्षण व साक्षरता विभाग) यांच्या सविस्तर सूचना (Concept Note)

७) केंद्र सरकार, नवी दिल्ली (शिक्षण व साक्षरता विभाग) यांच्या दिनांक १८.०७.२०२४ च्या व्हिसीमधील दिलेल्या सूचना

उपरोक्त विषयाबाबतची संदर्भ क्र १ ते ६ ची पत्रे पहावीत व अभ्यासावित. (प्रत संलग्न)

संदर्भ क्र. १ ते ६ पत्रात नमूद केल्याप्रमाणे राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २२ ते २८ जुलै, २०२४ या कालावधीत "शिक्षण सप्ताह" साजरा करणेबाबत पत्रान्वये कळविण्यात आले आहे. शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून, ज्यामध्ये शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे. हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक, घोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा ठरणार आहे.

शिक्षण सप्ताहामध्ये खालील प्रमाणे उपक्रम राबविण्याबाबत संदर्भाधीन पत्रान्वये सूचित करण्यात आलेले आहे.

दिनांक

सोमवार, दि. २२/०७/२०२४

मंगळवार, दि. २३/०७/२०२४

बुधवार, दि. २४/०७/२०२४

गुरुवार, दि. २५/०७/२०२४

शुक्रवार, दि. २६/०७/२०२४

उपक्रम

अध्ययन अध्यापन साहित्य दिवस (TLM Day) (Annexure-1)
मुलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस (FLN Day) (Annexure-2)
क्रीडा दिवस (Sports Day) (Annexure-3)
सांस्कृतिक दिवस (Cultural Day) (Annexure-4)
कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस (Skilling and Digital Initiatives Day)
(Annexure-5a and 5b)
शनिवार, दि. २७/०७/२०२४

मिशन लाईफच्या दृष्टीक्षेपात इको क्लब उपक्रम/शालेय पोषण दिवस (Eco clubs for Mission Life/ School Nutrition Day) (Annexure-6)

रविवार, दि. २८/०७/२०२४
समुदाय सहभाग दिवस (Community Involvement Day (Annexure-7)
या कार्यालयाने संदर्भ क्र ५ अन्वये शिक्षण सप्ताह हा अंगणवाडी केंद्रामध्ये देखील राबविणेबाबत सूचित केलेले आहे. त्याअनुषंगाने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी आपल्या जिल्ह्यातील माहिला व बालविकास विभागाशी संपर्क व समन्वय ठेऊन योजनेची अंगणवाडी केंद्रामध्ये यशस्वीरीत्या अंमलबजावणी होईल याची दक्षता घेण्याबाबतच्या सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या प्रमाणे दिलेल्या कालमर्यादेमध्ये कार्यवाही अपेक्षित आहे.

शिक्ष्ाण संचालक (प्राथिमक) प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे हे शिक्षण सप्ताह कार्यक्रमातील शनिवार दिनांक २७.०७.२०२४ रोजीच्या मिशन लाईफच्या दृष्टीक्षेपात इको क्लब उपक्रम/शालेय पोषण दिवस (Eco clubs for Mission Life/ School Nutrition Day) (Annexure-6) या साठीचे नोडल ऑफीसर आहेत. सदरचे नियोजन हे फक्त दिनांक २७.०७.२०२४ रोजीचे आहे.

राज्यात दिनांक २२ ते २८ जुलै, २०२४ या कालावधीत "शिक्षण सप्ताह" साजरा करणेसाठीच्या उपक्रमांतर्गत Eco Clubs for Mission Life/School Nutrition Day साजरा करणेबाबतच्या सविस्तर सूचना खालीलप्रमाणे आहेत.

परिशिष्ट क्र. ६

शिक्षा सप्ताह, दिवस सहावा वार शनिवार दि. २७/०७/२०२४

Eco clubs for Mission LiFE Day

शाळेमध्ये नवीन इको क्लब स्थापन करणे आणि #Plant4 Mother या अभियान अंतर्गत विद्यार्थी, त्यांची माता आणि धरणीमाता यामधील नाते मजबूत होण्यासाठी शाळेत वृक्षारोपण मोहीम या दोन्ही उपक्रमांचे शनिवार दि.२७/०७/२०२४ रोजी आयोजन करणे.

अ) शाळांमध्ये मिशन लाईफसाठी नवीन इको क्लब स्थापन करण्याबाबतच्या सूचना -

शाळांमधील मिशन लाईफसाठी इको क्लब विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रम आणि प्रकल्प करण्यासाठी सक्षम करतात. हा एक मंच आहे ज्याद्वारे विद्यार्थी त्यांच्या पालकांशी आणि परिसरातील समूहांच्या मदतीने पर्यावरणाला अनुकूल व जबाबदार वतर्नशैलीला प्रोत्साहित करते. इको क्लब हे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील पर्यावरणविषयक संकल्पना आणि कृती जाणून घेण्यास सक्षम करतात. केंद्राच्या निर्देशानुसार राज्यातील ८२३२ शासकीय शाळा व CBSE व इतर व्यवस्थापनाच्या ५३८६ शाळांनी इको क्लबची स्थापना करावी. मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, चर्नीरोड, मुंबई यांनी दिनांक १८.०७.२०२४ च्या आढावा बैठकीमध्ये दिलेल्या सूचनांनुसार राज्यातील सदर योजनेअंतर्गत इको क्लब स्थापन नसलेल्या उर्वरित सर्व शाळांनी सदर योजनेमध्ये भाग घ्यावयाचा आहे.

मिशन लाइफसाठी इको क्लबची स्थापनाः विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जागरूकता वाढवण्यासाठी ज्या शाळांमध्ये इको क्लबची स्थापना केलेली नसेल त्या उर्वरित सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमांच्या शाळांनी मिशन लाइफसाठी इको क्लब स्थापन करावेत. इको क्लब स्थापन करण्यासाठीचा मसुदा सोबत देण्यात आलेला आहे. त्यानुसार सदरचा मसुदा सर्व

माहितीसह इको क्लब पोर्टलवर उपलोड करावा. • नेतृत्व :- शाळेचे मुख्याध्यापक हे मिशन लाईफसाठी इको क्लबचे प्रमुख मार्गदर्शक असतील आणि इको क्लब अंतर्गत सर्व उपक्रमांचे आणि शैक्षणिक प्रगतीची देखरेख करतील.

समन्वयकाची जबाबदारी मिशन लाईफसाठी इको क्लबचे समन्वयक म्हणून कामकाज करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक यांनी शाळेतील एका शिक्षकाची नियुक्ती करावी. या शिक्षकाकडे इको क्लबच्या दैनंदिन कामकाज आणि समन्वयकाची जबाबदारी देण्यात यावी. हे समन्वयक इको क्लबचे प्रकल्प, शैक्षणिक कार्यक्रम आणि सहभागी यांच्या तपशीलवार नोंदी ठेवून नियमितपणे शाळेच्या मुख्याध्यापकांना पुनरावलोकनासाठी सादर करतील.

मिशन लाइफसाठी इको क्लबची रचना-

इको क्लबमध्ये प्रत्येक इयत्तेतील ४-५ विद्यार्थी असतील.

मिशन लाईफसाठी क्लबचे इको अध्यक्ष म्हणून एका विद्यार्थ्यांची नियुक्ती केली जाईल
शाळा व्यवस्थापन समिती (SMC) सदस्य आणि इतर कर्मचारी सदस्यांना इको क्लबच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास आणि त्यांना पाठिंबा देण्यास प्रोत्साहित करावे.

ऊर्जा संवर्धन, जलसंधारण, कचरा व्यवस्थापन इत्यादी विशिष्ट विषयांवर आधारित उपसमित्यांची स्थापना करावी.

इको क्लब अंतर्गत उपक्रमाचा आढावा व नियोजन करण्यासाठी महिन्यातून किमान एका बैठकीचे आयोजन करावे. प्रत्येक

बैठकीचे इतिवृत्त तयार करून सर्व सदस्यांना देण्यात यावे. ब) शाळेमध्ये Eco clubs for Mission LiFE या थीम अंतर्गत #Plant-4Mother अभियान आयोजित करण्यासाठी सूचना -

• वृक्षारोपण मोहिमेचे दि.२७/०७/२०२४ रोजी शाळांनी वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करावे. शालेय परिसर, घर, सार्वजनिक ठिकाणे आणि मोकळ्या जागेत वृक्षारोपण करावे. शक्य झाल्यास जंगलतोड झालेल्या ठिकाणी ही विशेष मोहीम राबविण्यात यावी. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक शाळेने किमान ३५ रोपे/झाडे लावावीत.

विद्यार्थी आणि त्यांच्या मातांचा सक्रिय सहभाग : विद्यार्थी आणि त्यांच्या मातांचे गट करावेत आणि त्या गटामार्फत एकत्रित रोपे लावावीत. यामुळे विद्यार्थी, त्यांची माता आणि आजूबाजूचे पर्यावरण यामधील नाते मजबूत होईल.

नावांचे फलक लावणे : विद्यार्थी आणि त्यांच्या मातांच्या नावांचा फलक त्यांनी लावलेल्या रोपाजवळ लावावा.

रोपाचे संगोपन करण्यासाठी जबाबदारी देणे: विद्यार्थ्यांना त्यांनी लावलेल्या रोपांचे संगोपन करण्यासाठी इको क्लबचे शिक्षक/अध्यक्ष/सदस्यांनी आवश्यक मार्गदर्शन करावे. विद्यार्थ्यांमध्ये रोपाचे संगोपन करण्यासाठी आवश्यक जबाबदारीची जाणीव निर्माण होण्यासाठी त्यांनी लावलेल्या रोपांना पाणी, पोषण आणि प्रतिकूल हवामानापासून संरक्षण मिळेल याची खात्री करावी.

वरील उपक्रमाच्या अनुषंगाने-

१. जिओटॅग केलेले फोटो अपलोड करणे शाळांनी वक्षारोपण मोहिमेचे जिओटंग केलेले फोटो, सहभागी विद्यार्थी आणि

लावलेल्या रोपांची संख्या शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, भारत सरकार यांच्या 
Gateway to Shiksha Saptah events media submission
UDISE Number
School Name
School Managment Name & Code
District
Taluka
First Name
Middle Name
Last Name
Email
Mobile Number
खालील गुगल ट्रॅकर लिंकवर अपलोड करावेत.

👆👆👆👆👆
   👇👇👇👇👇

२. सोशल मीडियावर व्यापक प्रसिद्धी देणे या मोहिमेबद्दल समाजात जाणीवजागृती होण्याच्या व इतरांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शाळांनी या दिवशी घेतलेल्या कार्यक्रमाचे फोटो #Plant4Mother आणि #एक पेड़ माँ के नाम हे हॅशटॅग वापरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करावेत.

शाळेमध्ये Eco clubs for Mission LiFE या थीम अंतर्गत #Plant4Mother अभियान अंतर्गत शनिवार दिनांक २७.०७.२०२४ रोजी शाळांनी किमान ३५ रोपांचे वृक्षारोपण करावयाचे आहे. सदर अभियान यशस्वी करण्यासाठी शाळांनी खालील पध्दतीने प्रत्येक दिवशी कामांचे नियोजन केल्यास सदर अभियान यशस्वी होण्यास मदत होईल. शाळांनी स्थानिक व भौगोलिक परिस्थितीनुसार अभियानाच्या यशस्वीतेसाठी खालील नियोजनामध्ये बदल करण्यास हरकत नाही.

अ.क्र.


वार व दिनांक

शनिवार, दिनांक २०.०७.२०२४

१. इको क्लब स्थापन करणे, त्यासंदर्भात बैठक घेणे.

२. वृक्षारोपणासाठी उपलब्ध जागेवर किमान ३५ खड़े खोदणे

स्थापन केलेल्या इको क्लबचा मसुदा वर विहित लिंकवर अपलोड करणे

रविवार, दिनांक २१.०७.२०२४

सोमवार, दिनांक २२.०७.२०२४

मंगळवार, दिनांक २३.०७.२०२४

थीम

वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची निवड करणे

थीम व अंतर्गत घ्यावयाची कृती

किमान ३५ रोपांचे वृक्षारोपण करण्यासाठी जागेचे व त्यासाठी खड्डयांचे नियोजन करणे.

दिनांक २२.०७.२०२४ ते २५.०७.२०२४ पर्यंत इको क्लब मसुदा अपलोड करणे

रोपांची निवड करताना प्राधान्याने देशी वृक्षांच्या रोपांची स्थानिक व भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन रोपांच्या उपलब्धतेनुसार निवड करणे.
५ बुधवार. दिनांक २४.०७.२०२४

वृक्षारोपण करण्यासाठी विद्यार्थी व संबंधीत माता यांची निवड करणे

गुरुवार, दिनांक २५.०७.२०२४

१. वृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन करणे

२. सदर कार्यक्रमास सोशल मिडियावर व्यापक प्रसिध्दी देणे

शुक्रवार, दिनांक २६.०७.२०२४

वृक्षारोपण करावयाची रोपे व कार्यक्रमासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची उपलब्धतता

शनिवार, दिनांक २७.०७.२०२४

#Plant4Mother अभियानांतर्गत वृक्षारोपण करणे व संबंधीत फोटो अपलोड करणे

६ वृक्षारोपण करण्यासाठी विद्यार्थी व संबंधीत माता यांची निवड करणे व याबाबत संबंधीत माता कल्पना देणे. वृक्षारोपण करण्यासाठी निवड केलेल्या विद्यार्थी व संबंधीत माता यांची नावे दर्शनी भागात प्रसिध्द करणे

दिनांक २७.०७.२०२४ रोजीच्या वृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन करताना स्थानिक लोक प्रतिनिधी, सन्माननीय नागरीक यांना आमंत्रित करणे.

तसेच सदर कार्यक्रमास सोशल मिडियावर व्यापक प्रसिध्दी देणेबाबतची कार्यवाही करणे

वृक्षारोपण करावयाची रोपे व कार्यक्रमासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची उपलब्धतता करुन या वस्तु शाळेत नियोजित पध्दतीने करणे

Eco clubs for Mission LiFE या थीम अंतर्गत #Plant4Mother अभियान अंतर्गत वृक्षारोपण करुन कार्यक्रमांचे जिओटॅग केलेले फोटो आवश्यक माहितीसह गुगल ट्रॅकर लिंकवर अपलोड करावे.

Eco clubs for Mission LiFE या थीम अंतर्गत #Plant4Mother अभियान अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन हे दैनंदिन शालेय कामकाज सांभाळून करावयाचे आहे.

शिक्षण संचालक (प्राथिमक) प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे हे शिक्षण सप्ताह कार्यक्रमातील शनिवार दिनांक २७.०७.२०२४

रोजीच्या मिशन लाईफच्या दृष्टीक्षेपात इको क्लब उपक्रम/शालेय पोषण दिवस (Eco clubs for Mission Life/ School Nutrition Day) (Annexure-6) या साठीचे नोडल ऑफीसर आहेत. सदरचे नियोजन हे फक्त दिनांक २७.०७.२०२४ रोजीचे पूर्वतयारीचे आहे.

शाळांनी नियोजनाप्रमाणे व सूचनांप्रमाणे, शाळेत शिक्षण सप्ताह उपक्रम दिनांक २२.०७.२०२४ ते २८.०७.२०२४ या कालावधीत अन्य वरिष्ठ कार्यालयाच्या नोडल ऑफीसरने दिलेल्या निर्देशानुसार यशस्वीरितीने राबवयाची कार्यवाही करावी.

तरी उपरोक्त प्रमाणे राज्यामध्ये शिक्षण सप्ताहाची यशस्वीरीत्या अंमलबजावणी करण्यासाठी आपण आपल्या स्तरावरून सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व मंडळाच्या, सर्व माध्यमांच्या शाळांना सूचना देण्यात याव्यात. सहपत्र- वरीलप्रमाणे

(शरद गौसावी) शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

इको क्लब फॉर मिशन लाईफसाठी मिशन इको क्लबची स्थापना करण्यासाठी मसुदाः

'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन २०२० नुसार काही विषय, कौशल्ये आणि पर्यावरणानुसार विषयक जनजागृतीबाबत क्षमता विकसन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. ज्यामध्ये पाणी, संसाधन संवर्धन, स्वच्छता इत्यादी बाबी सर्व विद्यार्थ्यांनी शिकल्या पाहिजेत.
त्यानुषंगाने,
आम्ही विद्यार्थी (शाळेचे नाव)- स्थापन करित आहोत. याद्वारे इको क्लब फॉर मिशन लाईफसाठी मिशन इको क्लब

इको क्लब फॉर मिशन लाईफचे प्रमुख- (शाळेचे मुख्याध्यापक) आहेत.

प्रभारी शिक्षक-

( शिक्षकाचे नाव)

इको क्लबचे अध्यक्ष आहेत (विद्यार्थ्यांचे नाव)

इको क्लब फॉर मिशन लाईफसाठी खालीलप्रमाणे सदस्य (प्रत्येक इयत्तेमधून २ सदस्य आहेत)

इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत आम्ही सजगपणे कृत्ती करण्याचा संकल्प करतो की, कार्बन फूट प्रिंट कमी करण्यासाठी योग्य संसाधनांचा अनुभवात्मक अध्ययन प्रक्रियव्दारे जाणीवपूर्वक शिक्षणाच्या माध्यमातून उपयोग करून, शाश्वत विकासासाठी आमच्या क्षमतेने आम्ही स्वतःला तसेच सहकारी विद्यार्थ्यांना आणि समुदायाला पर्यावरण पूरक पद्धतींबद्दल माहिती देण्यासाठी आणि पर्यावरणास जबाबदार वर्तन स्वीकारण्यास वचनबद्ध आहोत. त्या दृष्टीने आम्ही खालील उपक्रम हाती घेणार आहोत:

१. निरोगी जीवनशैली टिकवून ठेवणेः आरोग्यमय जीवनास प्रोत्साहीत करणे आणि शाश्वत विकासासाठी जीवनमान उंचावणे.

२. शाश्वत अन्न प्रणालीचा अवलंब करणे अन्नाची नासाडी कमी करण्यासाठी कृती करणे हरित गृह वायू उत्सर्जन कमी करणे.

३. ई-कचरा कमी करणे: ई कचऱ्याचे संकलन त्याची योग्य विल्हेवाट आणि पुर्नवापरासाठीच्या कार्यपध्दतीबाबत मोहीम राबविणे.

४. कचरा कमी करणे : सर बाबतची कृती करणे, कचरा कमी करणे, पुर्नवापर आणि कचरा पुर्नवापराला प्रोत्साहन.

५. ऊर्जेची बचत : विद्यार्थ्यांना ऊर्जेच्या बचतीबाबत जाणीव करून देणे. ज्यामुळे ऊर्जा बचत करण्यास मदत होईल.

६. पाणी वाचविणेः पाण्याचा कार्यक्षम वापर आणि संवर्धनास प्रोत्साहन देणे सध्याच्या आणि भावी पिढ्यांच्या गरजापूर्ण करण्यासाठी उपाययोजना करणे.

७. प्लास्टिकचा वापर टाळणेः सर्वांसाठी अधिक शाश्वत आणि चांगले भविष्य निर्माण करण्यासाठी सिंगल यूज प्लास्टिक कमी करण्यासाठी कार्यवाही करणे.

स्वाक्षरी-

इको क्लब अध्यक्ष

प्रभारी शिक्षक

मुख्याध्यापक

हे ही वाचा👇
महत्वाचे,

प्रति,
विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व
उपसंचालक,प्रादेशिक विद्या प्राधिकरण,(सर्व),
प्राचार्य,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (सर्व),
शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक,सर्व जिल्हे
 
विषय-  Eco clubs for Mission Life अंतर्गत आयोजित करावयाच्या उन्हाळी शिबिराबाबत....

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार विद्यार्थ्यांमध्ये नैसर्गिक संसाधने यांचे जतन आणि पर्यावरण संवर्धनासाठी जाणीवजागृती विकसित करणे यासाठी  दि.5 जून ते 11 जून, 2024 या कालावधीत Eco Club for Mission Life अंतर्गत  विविध पर्यावरणपूरक शैक्षणिक कृतींचे आयोजन करण्याविषयी केंद्र शासनामार्फत सूचित करण्यात आले आहे.
          
या अनुषंगाने दिवसनिहाय थीम दिलेल्या असून त्या थीमवर आधारित पुढीलप्रमाणे पर्यावरणपूरक शैक्षणिक कृतींचे आयोजन करावयाचे आहे.

      शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये शाळा सुरू झाल्यानंतर या पर्यावरणपूरक शैक्षणिक कृतींचे आयोजन शाळास्तरावर करण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात.तसेच जास्तीत जास्त शाळांनी यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरीत करावे.

दिवस पहिला-
Theme- आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे 
*पर्यावरणपूरक शैक्षणिक कृती*- निसर्ग फेरी आयोजित करणे, स्थानिक परिस्थितीला अनुसरून वृक्षारोपण/वृक्षलागवड करणे, स्थानिक पर्यटन स्थळांना क्षेत्रभेटींचे आयोजन करणे.इ.

दिवस दुसरा
Theme- शाश्वत अन्न प्रक्रिया स्वीकारणे
 *पर्यावरणपूरक शैक्षणिक कृती-* परसबाग तयार करणे,ओला कचरा वापरून तयार केलेले खत किचन गार्डनसाठी वापरणे,भरडधान्य आकर्षक वेशभूषा स्पर्धेसारख्या स्पर्धेचे आयोजन करणे इ.


दिवस तिसरा
Theme-ई- कचरा कमी करणे
पर्यावरणपूरक शैक्षणिक कृती- शाळेमध्ये ई-कचरा संकलन केंद्र तयार करणे,ई-कचऱ्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम याची माहिती देण्यासाठी केंद्र तयार करणे,ई-कचऱ्याची विल्हेवाट लावणे यासाठी अधिकृत संस्थांशी संपर्क करणे इ.

दिवस चौथा
Theme- कचरा कमी करणे
पर्यावरणपूरक शैक्षणिक कृती- स्वच्छता जनजागृती मोहीम आयोजित करणे, शालेय वर्गामध्ये ओला आणि सुका कचरा यासाठी दोन डस्टबीन प्रणाली राबविणे,कचऱ्यापासून कलाकृती निर्मिती स्पर्धा आयोजित करणे,जुने कपडे व खेळणी इ.चे दान करण्यासाठी Donate camp आयोजित करणे इ.
 
दिवस पाचवा
Theme-ऊर्जा बचत करणे
पर्यावरणपूरक शैक्षणिक कृती- शाळेत ऊर्जा समिती स्थापन करणे,अक्षय ऊर्जा स्रोतांवर व्याख्यान आयोजित करणे, ऊर्जा संवर्धनासाठी पोस्टर तयार करणे,सौर ऊर्जा पॅनेलचा शाळेत वापर करणे इ.

दिवस सहावा
Theme- पाण्याची बचत करणे
पर्यावरणपूरक शैक्षणिक कृती- शाळेतील पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे,परिसरातील पाणीसाठ्यांमधील पाण्याची शुध्दता तपासणे,पर्जन्यजल संधारण आणि फायदे याबाबत जाणीवजागृती सत्रांचे आयोजन करणे इ.

*दिवस सातवा
Theme- प्लॅस्टिकचा वापर टाळणे
पर्यावरणपूरक शैक्षणिक कृती- प्लॅस्टिक न वापरण्याबाबत शिक्षक व विद्यार्थी यांनी प्रतिज्ञा घेणे,शाळेच्या परिसरामध्ये प्लॅस्टिक ऑडिट करणे,पोस्टर मेकिंग व वादविवाद आणि घोषवाक्ये स्पर्धांचे आयोजन करणे,पर्यावरणपूरक सवयीचा अवलंब करण्यासाठी जनजागृती मोहीम आयोजन करणे इ.

दिवस आठवा
Theme Tree activity
या थीम अंतर्गत वृक्षारोपण, वृक्ष माझा मित्र या विषयाच्या अनुषंगाने चित्रकला,रांगोळी,पोस्टर तयार करणे,घोषवाक्ये तयार करणे इ.

वरीलप्रमाणे दिवसनिहाय पर्यावरणपूरक शैक्षणिक कृतींचे ( किंवा स्थानिक परिस्थितीला अनुसरून थीम अंतर्गत इतर विविध पर्यावरणपूरक शैक्षणिक कृतीचे) आयोजन *ऑनलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने* शाळेत आयोजित करण्यासाठी प्रोत्साहित करावे. शाळा सुरू झाल्यानंतर वरील उपक्रम शाळेत आयोजित करावेत.पोस्टर तयार करणे,घोषवाक्ये तयार करणे,चित्र काढणे.इ सारख्या कृती घरी करण्यासाठी देऊन शाळेत प्रदर्शन भरवावे.विद्यार्थ्यांना व्हाट्सअँप माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे आणि आवश्यक ती कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी. 

मेरी लाईफ पोर्टल

Eco club अंतर्गत शाळांना 
Eco Club Portal Link


👆 या पोर्टलवर नोंदणी करण्यास आणि फोटो व इतर डिजिटल साहित्य अपलोड करण्यास सूचित करावे.

 शाळेत आयोजित करण्यात आलेल्या शैक्षणिक उपक्रमांचे जिओ टॅग सहित 5 निवडक फोटो आणि 30 सेकंद ते 2 मिनिटांचे व्हिडीओ,वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या इ. 
Google Link


👆 या लिंकवर अपलोड करावेत. 

राहूल रेखावार (भा.प्र.से)
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र, पुणे.

Also Read 👇 

SCERT's Guidelines

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे

व्य.क.रारीसंप्रपम/वि.वि/ECO club/२०२४/०२४६९

२७/०५/२०२४


विषय :- Eco clubs for Mission Life अंतर्गत आयोजित करावयाच्या उन्हाळी शिबिराबाबत....


Regarding the Summer Camp to be Organized Under Eco Clubs for Mission Life


संदर्भ :- १. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र दि.०१/०५/२०२४.

२. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांनी ऑनलाईन बैठकीमध्ये दिलेल्या सूचना दि.२२/०५/२०२४.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार भविष्यात चांगले यशस्वी आणि नवोपक्रमशील नागरिक बनण्यासाठी सर्व शालेय विद्यार्थ्यांमध्ये विशिष्ट कौशल्ये आणि क्षमता विकसित होणे गरजेचे आहे. या कोशल्यामध्ये पाणी व नैसर्गिक संसाधने यांचे जतन, स्वच्छता इ.च्या अनुषंगाने पर्यावरण जाणीवजागृती विकसित करणे ही महत्वाची क्षमता आहे.

समग्र शिक्षा अंतर्गत शाळेतील इको क्लब ही एक योजना असून या उपक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी संवेदनशीलता विकसित करणे, सद्यस्थितीतील पर्यावरणीय समस्या जाणून घेणे. सकारात्मक दृष्टीकोन आणि पर्यावरण संरक्षणाकरिता अभिवृत्ती विकसित करणे या उद्देशाने पर्यावरण पूरक शैक्षणिक कृर्तीचे आयोजन करण्यात येते. सन २०२१ मध्ये COP२६ या हवामान बदल या विषयावर झालेल्या परिषदेमध्ये LIFE (Lifestyle for Environment) ही संकल्पना मांडण्यात आली आहे. मिशन लाईफ ही शाश्वत जीवनशैली पर्यावरण जतन करण्यासाठी उपलब्ध संसाधनाचा योग्य वापर या बाबींना प्रोत्साहन देणारी जागतिक स्तरावरील चळवळ आहे.

उपरोक्त संदर्भिय विषयांन्वये इको क्लब अंतर्गत Eco clubs for Mission Life या थीम वर आधारित शाळेमध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक पर्यावरण दिन दि.५ जून २०२४ रोजी उन्हाळी शिबीर सुरु होईल या दृष्टीने नियोजन करून एकूण सात दिवसांचे उन्हाळी शिबिर आयोजित करावे, एक आठवड्याचे उन्हाळी शिबीर आयोजित करत असताना जागतिक पर्यावरण दिन २०२४ थीम Land restoration, desertification and drought resilience आणि मिशन लाईफ अंतर्गत आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे, शाश्वत अन्नप्रणाली स्वीकारणे, ई-कचरा कमी करणे, कचरा कमी करणे, उर्जा बचत करणे, पाणी बचत करणे आणि प्लास्टिकचा वापर टाळणे या सात थीमवर आधारित शैक्षणिक कृती /उपक्रमांचे नियोजन करावे.

उन्हाळी शिबिरामध्ये घ्यावयाच्या काही मार्गदर्शक ठरतील अशा शैक्षणिक कृती/उपक्रम सोबत जोडलेल्या आहेत. उन्हाळी शिबिराचे आयोजन करताना या शैक्षणिक कृती/उपक्रम सोबतच सौर उर्जासारख्या नवीकरणीय उर्जा स्रोत, स्थानिक परिसंस्थेमधील पाण्याचे स्रोत, पाण्याची शुद्धता तपासणे, पाण्याचे जतन आणि वृक्ष लागवड इ. विषयांना अधिक महत्त्व देण्यात यावे. या शिबिरांना प्रसिद्धी देण्यासाठी शाळेमध्ये पोस्टर, वादविवाद आणि पेंटिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे. पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या पर्यावरणतज्ञ, आणि अशासकीय संस्था यांचे आवश्यकतेनुसार या शिबिरासाठी सहकार्य घेण्यात यावे.

राज्य स्तरावरून विभागीय शिक्षण उपसंचालक यांची विभागीय नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील जास्तीत जास्त शाळापर्यंत उन्हाळी शिबीर आयोजित करणेसाठी विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी तसेच सदर उपक्रमाचा आढावा केंद्र शासन स्तरावरून घेण्यात येणार असल्याने विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी आपल्या विभागातील उन्हाळी शिबीर आयोजित करणाऱ्या जिल्ह्यानिहाय शाळा आणि विद्यार्थ्यांची सांख्यिकीय माहिती/अहवाल प्रस्तुत कार्यालयास पाठवावा.


राहूल रेखावार
संचालक,

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे- ३०


उन्हाळी शिबिर मार्गदर्शक सूचना

शाळेमध्ये उन्हाळी शिबीर आयोजित करण्यासाठी काही सुचविलेल्या कृती
शाळेमध्ये उन्हाळी शिबीर आयोजित करण्यासाठी काही सुचविलेल्या कृती शाळेमध्ये उन्हाळी शिबीर आयोजित करण्यासाठी विद्यार्थ्यांचा स्तर विचारात घेवून

शाळांनी पुढील कृती घ्याव्यात.

आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे

१. विद्यार्थ्यांसाठी परिसरातील स्थळांना / परिसंस्थाना निसर्ग फेरी आयोजित करणे.

२. स्थानिक परिस्थितीला अनुसरून वृक्ष लागवड करणे.

३. स्थानिक पर्यटन स्थळांना क्षेत्रमेटींचे आयोजन करणे,

शाश्वत अन्न प्रक्रिया स्वीकारणे

१. शाळेच्या परिसरामध्ये किचन गार्डन / परसबाग तयार करणे आणि त्याची देखभाल करणे यामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे.

२. शाळेच्या परिसरात पुरेशी जागा उपलब्ध नसेल तर जुन्या बादल्या, बाटल्या यांचा वापर करून उपलब्ध असलेल्या जागेत छोट्या रोपांची लागवड करणे,

३. शाळेच्या उपलब्ध असलेल्या जागेत छोट्या वेलींची लागवड करणे

४. शाळेत तयार होणारा ओला कचरा वापरून तयार केलेले खत किचन गार्डनसाठी वापरावे जेणेकरून रासायनिक खतांचा आणि कीटकनाशक यांचा वापर टाळता येईल.

५. विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक कीटकनाशक तयार करण्यासाठी प्रोत्साहित करणे. उदा. किचन गार्डनसाठी जैव कीटकनाशक.

६. शाळेच्या परिसरामध्ये असलेल्या वनस्पतींपासून मिळणाऱ्या उत्पादितांच्या नोंदी ठेवणे तसेच यातून मिळणारे फळभाज्या आणि इतर उपयोगी पदार्थ शाळेमध्ये पोषण आहार करणेसाठी वापर करणे.

७. विद्यार्थ्यांना आरोग्य चांगले राखण्यासाठी त्यांच्या आहारामध्ये भरडधान्य यासारख्या सुपरफूडचा समावेश करणे हे दाखविण्यासाठी भरडधान्य आकर्षक वेशभूषा

स्पर्धेसारख्या उत्साहवर्धक स्पर्धेचे आयोजन करणे,

८. विद्यार्थ्यांना शाळेमध्ये घेतल्या जाणाऱ्या या पर्यावरण पूरक कृतींचे शाळा आणि समाजामध्ये पुन्हा वापरण्यासाठी प्रेरणा देणे,

ई-कचरा कमी करणे.

१. ई- कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे आणि त्यांचा पुनर्वापर करणे यासाठी ई- कचरा संकलित करणे हा उपक्रम राबविणे,

२. शाळेमध्ये ई-कचरा संकलन केंद्र तयार करून त्या ठिकाणी ई कचरा उदा. जुनी इलेक्टोनिक उपकरणे इ. जमा करणे.

३. शाळांनी संकलित ई-कचऱ्याची संकलनाच्या नोंदी करणे आणि ई-कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे जतन करून ठेवण्यासाठी अधिकृत संस्थांशी संपर्क करणे.

४. शाळांनी ई-कचऱ्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम याविषयी माहिती देण्यासाठी

शैक्षणिक माहिती देणारे बूथ/केंद्र तयार करणे,

• कचरा कमी करणे.

१. विद्यार्थी आणि समाज यांच्या सहाय्याने पर्यावरण विषयक जबाबदारीची जाणीव

होण्यासाठी स्वच्छता जनजागृती मोहीम आयोजित करणे.

२. कचरा विघटन करिता कचऱ्याचे वर्गीकरण करण्यास शिकविणे.

३. सर्व वर्गामध्ये ओला आणि सुका कचरा यासाठी दोन डस्टबिन प्रणाली राबविणे. यामध्ये जर ओला कचरा जास्त प्रमाणात तयार होत नसेल तर ३-४ वर्गासाठी एक डस्टबिन

वापरणे, स्वच्छतागृहामध्ये सॅनिटरी नॅपकीन इ. साठी सॅनिटरी डस्टबिन ठेवणे इ.

४. शाळेमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी कंपोस्ट खड्डा तयार करणे आणि त्यातून तयार झालेल्या खताचा वापर परस बागेसाठी करण्यास प्रोत्साहन देणे.

५. शाळेमध्ये ३२ (कमी करणे, पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरण) याला प्रोत्साहन देण्यासाठी कचऱ्यापासून कलाकृती निर्मिती स्पर्धा आयोजित करणे.

६. जुने कपडे, खेळणी आणि फर्निचर इ. चे दान करण्यासाठी Donate Camp आयोजित करणे. समाजातील गरजूंना या वस्तूंचे वाटप करणे किंवा अशासकीय संस्थांना संकलित केलेल्या वस्तू देणे.

७. कचरा कोठे जातो आणि कचरा कसा वर्गीकरण केला जातो या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांकरिता परिसरातील कचरा वेचणाऱ्या किंवा कचरा विकत घेणाऱ्या छोट्या व्यावसायिकांचे आंतरक्रियात्मक सेशन आयोजित करणे.

उर्जा बचत करणे

१. उर्जा बचत संदर्भात कृती करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे जसे की ट्युब लाईट व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरत नसताना बंद करणे. २. इको क्लब अंतर्गत उर्जा समिती / संघांची स्थापना करणे.

उपकरणे बंद असल्याची खात्री करण्यासाठी पाहणी/ तपासणी करणे

३. शाळेत स्थापन केलेल्या उर्जा समिती/संघांमार्फत शालेय वेळेनंतर सर्व विद्युत

४. दैनंदिन तपासणी करण्यासाठी इको क्लब अंतर्गत उर्जा समिती / संघ सदस्यांचे ड्युटी

हजेरीपत्रक तयार करणे.

५. अशासकीय संस्था, उर्जा विभाग यांच्या सहकार्याने अक्षय उर्जा स्रोतांवर मार्गदर्शन देणारे माहितीवजा सत्रांचे आयोजन करणे.
६. उर्जा संवर्धनाचे पोस्टर, बॅनर आणि इतर प्रकारचे साहित्य तयार करणे आणि जाणीवजागृती निर्माण करण्यासाठी शाळेच्या सूचना फलकावर लावणे.

७. सौर उर्जा पॅनेलचा शाळेत वापर करणे.

पाण्याची बचत करणे

१. शाळेतील पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे. या

अंतर्गत शाळा आणि शाळेच्या परिसरातील फ्लश, नळ आणि पाण्याच्या पाईपलाईनमधील पाणी गळतीची माहिती इको क्लब समिती सदस्य यांना कळविणे.

२. विद्यार्थी आणि शिक्षकांनी परिसरातील पाण्याचे स्रोत किंवा पाणीसाठे मधून संकलित केलेल्या पाण्याची शाळेच्या प्रयोगशाळेत शुद्धता तपासणे.

३. जलसंवर्धनासाठी जाणीवजागृती रॅली आयोजित करणे. विद्यार्थ्याच्या आजी-आजोबा आणि वयस्कर व्यक्तींना यांना शाळेत निमंत्रित करून त्यांनी भूतकाळात अवलंबिलेल्या जल संधारण पद्धती आजच्या परिस्थितीमध्ये पाणी बचतीसाठी कोणत्या प्रकारे वापरता येतील या दृष्टीने संवाद साधणे आणि माहिती मिळविणे.

४. पर्जन्य जल संधारण आणि त्याचे फायदे याबाबत जनजागृती सत्र आयोजित करणे.

प्लास्टिकचा वापर टाळणे

१. प्लास्टिक न वापरण्याबाबत शिक्षक आणि विद्यार्थी यांनी प्रतिज्ञा घेणे.

२. शाळेच्या परिसरामध्ये प्लास्टिक ऑडीट करणे. एकदाच वापर करता येणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंची यादी बनविणे आणि त्यांचा वापर करण्या ऐवजी पर्यावरण पूरक पर्याय शोधणे उदा. प्लास्टिक कप, मग, पाण्याची बाटली वापरण्याऐवजी स्टीलच्या वस्तूंचा वापर करण्यास प्राधान्य देणे.

३. पृथ्वीवरील एकदाच वापर करता येणाऱ्या प्लास्टिकच्या वापरांमुळे होणाऱ्या घातक परिणाम याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी पोस्टर मेकिंग, वादविवाद आणि घोषवाक्ये लेखन, निबंध लेखन इ. चे आयोजन करणे.

४. शाळेच्या सूचना फलकावर निवडक आणि उत्कृष्ट पोस्टर प्रदर्शित करणे.

५. शाळेच्या सूचना फलकावर एकदाच वापर करता येणाऱ्या प्लास्टिकच्या वापरांमुळे होणाऱ्या घातक परिणाम दर्शविणारे पोस्टर आणि इतर दृश्य स्वरुपात माहिती सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे.

६. प्लास्टिक ऐवजी कापडी बॅग वापरणे, एकदाच वापर करता येणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळणे आणि स्थानिक व पर्यावरण पूरक वस्तूंची खरेदी करणे इ. पर्यावरण पूरक सवयींचा समाजामार्फत अवलंब करण्यासाठी जन जागृती मोहीम आयोजित करणे.

उपरोक्त प्रमाणे उन्हाळी शिबीर अंतर्गत दिवसनिहाय एक किंवा एकापेक्षा जास्त कृर्तीचे शाळेत आयोजन करावे आणि जिल्ह्यानिहाय सहभागी शाळा, विद्यार्थी, शिक्षक आणि समाजातील व्यक्ती इ.ची सांख्यिकीय माहिती / अहवाल करण्यासाठी जिल्हा स्तरावर समन्वयक यांची नेमणूक करून त्यांना माहिती संकलनाचे काम द्यावे. सकाळच्या सत्रात वेळापत्रकनुसार एक किंवा एकापेक्षा जास्त उपक्रम घेवून दररोज लिंक वर माहिती अपलोड करण्याची दक्षता घेण्यात यावी. यासाठी दिवसनिहाय कृतींचे आयोजन करताना खालील वेळापत्रकाचा वापर करावा.

उन्हाळी शिबीर आयोजित करण्यासाठी वेळापत्रक

सदर परिपत्रक पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon