DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

UDISE Plus 2024-25 data collection





WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now


UDISE Plus 2024-25 data collection of information

UDISE Plus 2024-25 data collection mechanism with academic year 

UDISE+ for the year 2024-25 so as to align the data collection mechanism with academic year 

मंत्रालयीन सेवा
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, 
४ था मजला, अनेक्स बिल्डींग, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, 
मंत्रालय,  मुंबई-४०००३२

महत्वाचे / तात्काळ क्रमांक :- संकीर्ण-२०२४/प्र.क्र.४९/एसडी-१

दिनांक :-१६ एप्रिल, २०२४

प्रति,

१. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे

२. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, चर्नी रोड, मुंबई. .

३. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे ४. शिक्षण संचालक (माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.

विषय:- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये UDISE + प्रणालीमध्ये माहिती संकलित करण्या बाबत.

संदर्भ:- सचिव, शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, भारत सरकार यांचे दि.२८.०३.२०२४ रोजीचे अर्धशासकीय पत्र.

महोदय,

उपरोक्त विषयावरील संदर्भाधीन अर्धशासकीय पत्राची प्रत सोबत जोडली आहे.


२. बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ अन्वये स्थानिक प्राधिकरण यांचेमार्फत माहितीचे संकलन आणि माहिती व्यवस्थापन करणे अनिवार्य आहे. आरटीई कायद्यांतर्गत माहिती संकलन आणि शाळांना युनिक यु-डायस कोड देण्यासाठी UDISE + यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.

३. संदर्भाधीन पत्रान्वये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी UDISE + प्रणालीमध्ये माहिती भरण्यासाठी राज्यांना दि.०१.०४.२०२४ पासून पोर्टल उघडण्यात येणार आहे. तसेच दि.३१.०७.२०२४ पर्यंत राज्यांनी माहिती भरुन दि. ३०.०९.२०२४ पर्यंत अंतिम प्रमाणपत्रता (Final Certification) पूर्ण करणे अपेक्षित आहे.

४. नवीन शैक्षणिक धोरण, २०२० मध्ये नमूद केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांची नावनोंदणी व एकूण नोंदणी दर (Gross Enrollment Ratio) १०० टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ओपन स्कुलिंग (NIOS) मध्ये नावनोंदणी केलेल्या १४-ते १७ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी डाटा कॅप्चर फ़ॉरमॅट (Data Capture Format) यंत्रणा विकसित केली असून त्यासंबंधी माहिती NIOS यांचेमार्फत संकलित करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त अनौपचारिकरित्या शिक्षण देणा-या संस्था (UDISE कोडशिवाय) (उदा. खाजगी पूर्व प्राथमिक शाळा, शासनाची मान्यता नसणा-या शाळा तसेच स्वतंत्र कौशल्य केंद्रे) मधील विद्यार्थ्यांच्या नोंदणी व उक्त संस्था यांच्या संदर्भातील माहिती संकलित करण्यासाठी डाटा कॅप्चर फ़ॉरमॅट BRC/CRC मध्ये व्यवस्था करण्यात आली असून त्यासंबंधी दि. २३.०३.२०२३ रोजीच्या पत्रान्वये सूचना देण्यात आल्या आहेत. तथापि ब-याच राज्यांकडून सदर व्यवस्थेचा वापर करण्यात येत नसल्याबाबत आढळून आले आहे. तसेच ब-याच राज्यांनी UDISE २०२३-२४ मधील माहिती अद्यापि संकलित केली नसून Data Duplication व Drop Box Issue यासंदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. सदर प्रकरणी तातडीने कार्यवाही करणे अपेक्षित आहे.


५. केंद्र शासनाच्या उपरोक्त पत्राच्या अनुषंगाने, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये UDISE + प्रणालीवर माहितीचे संकलन योग्यरित्या करुन Data Duplication व Drop Box Issue संदर्भातील कार्यवाही तातडीने करावी. UDISE + प्रणालीमध्ये माहितीचे वेळेत संकलन न झाल्यास आरटीई कायद्याचे उलंघन होत असल्याने सदर प्रकरणी कालमर्यादेत कार्यवाही करण्याबाबत आपल्या स्तरावरुन संदर्भाधीन पत्रात नमूद केल्याप्रमाणे संबंधितांना सूचना देण्यात याव्यात, हि विनंती.

आपला, 
(तुषार महाजन) 
उप सचिव, 
महाराष्ट्र शासन
संजय कुमार, भा.प्र.से सचिव 
Sanjay Kumar, IAS Secretary




सत्यमेव जयते
भारत सरकार शिक्षा मंत्रालय स्कूल शिक्षा और साक्षरता विभाग 
Government of India Ministry of Education Department of School Education & Literacy 

28th March, 2024

D.O.No. 23-2/2024-Stats

Dear Additional Chilf Sentary/Pomcipal Serdzry / Serdang, I am writing to you in connection with opening of the portal for next round of UDISE+ for the year 2024-25 so as to align the data collection mechanism with academic year itself.

2. The portal for data entry of UDISE 2024-25 will be opened for States/UTs on 1" April, 2024. It is expected that State/UT will complete the data entry by 31st July, 2024 and complete the final certification within two months i.e., 30th September, 2024. W.e.f 2024-25. UDISE+ portal will also have an added facility of Student's Attendance and Teacher's Registry which will facilitate State/UT for monitoring student's attendance and teacher's deployment more effectively.

3. To enhance the coverage of enrolment and achieve 100% Gross Enrolment Ratio (GER) as envisaged in NEP 2020, a Data Capture Format (DCF) to capture enrolment data in the age group 14 to 17 years of students enrolled in National Institute of Open Schooling (NIOS) has been designed in consultation with NIOS and data being filled by NIOS centres in 2024-25. Moreover, to capture the enrolment data of institutions imparting non-formal education (without UDISE code) viz., private pre-primary schools, unrecognised schools, standalone skill centre, a provision was made in DCF at BRC/CRC level to fill the summary data of such institutions. This was already informed vide D.O. Letter No. 23-7/2022-Stats dated 23.03.2023. A copy of the letter is attached for reference. However, many State/UT are not utilising this facility properly and need to look into it.

4. As you are aware that as per the provisions of RTE Act, it is mandatory on the part of the local authorities to maintain the data and record in prescribed performa. To meet the requirement of RTE Act, UDISE has been developed to maintains data and provide unique UDISE+ Code to schools to meet the requirement of RTE provisions. Thus, non-submission of data in time in UDISE+ is leading to violation of RTE Act.

5. I have also been informed that inspite of several reminders/ correspondences, some State/UT are yet to complete the UDISE+ 2023-24 and complete clearance of duplicate data and Drop Box issue. This needs to be addressed without any further delay.

6. In the light of the above, I request you to sensitise the state machinery to start data collection to meet deadline. I am attaching Data Capture Format (DCF) of 2024-25 with a request to take immediate action to start filling the data in portal.


Best Wishes,

Yours sincerely,

228/3/2024.

(Sanjay Kumart

Enclosure : As above


Additional Chief Secretary/Principal Secretary/Secretary (School Education), All States and UTs.

124 सी विंग, शास्त्री भवन, नई दिल्ली-110001

124 'C' Wing, Shastri Bhawan, New Delhi-110001 Telephone: +91-11-23382587, +91-11-23381104 Fax: +91-11-23387589 E-mail: secy.sel@nic.in
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon