DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

kvs Online Admission Registration Link




kvs Online Admission Link
Kendriya Vidyalaya Admission Open 

केंद्रीय विद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया सुरू

देशभरातील केंद्रीय विद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या प्रवेशांसाठी केंद्रीय विद्यालय संघटनेने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार बालवाटिका (पूर्वप्राथमिक) ते दहावीपर्यंतच्या प्रवेशासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत १५ एप्रिल आहे.

केंद्रीय विद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय विद्यालय संघटनेमार्फत राबवली जाते.

त्यानुसार केंद्रीय विद्यालयांतील बालवाटिका १, बालवाटिका २ आणि बालवाटिका-३ या वर्गांसह इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.

दुसरी ते दहावीच्या वर्गांसाठी जागा रिक्त असल्यास प्रवेश दिला जाणार आहे. बालवाटिका १मध्ये प्रवेशासाठी ३१ मार्च २०२४ रोजी विद्यार्थ्यांचे वय तीन वर्षांपेक्षा कमी आणि पाच वर्षांपेक्षा जास्त नसावे, बालवाटिका २मध्ये प्रवेशासाठी ३१ मार्च २०२४ रोजी विद्यार्थ्यांचे वय चार वर्षांपेक्षा कमी आणि पाच वर्षांपेक्षा जास्त नसावे.

प्रवेश प्रक्रिये संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी किंवा प्रवेशाची नोंदणी करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला स्पर्श करा आणि आपली नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करा

⏬⏬⏬⏬⏬⏬⏬


👆👆👆👆👆👆👆
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon