DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Private Schools Regs 1981 Amendments GR

Private Schools Regs 1981 Amendments


 Private Schools Employees Regulations 1981 Amendments GR / Circular

महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्यमध्यवती इमारतको. ओनी बेहाट मार्गपुणे ४११ ००१

जा.क्र. : शिसंमा -२०२४/अधिसूचना/सेवारोष्ठता/दी-४/1320

दिनांक : ७.३.२०२४
११

12 MAR 2024


प्रति,

१) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद (सर्व)
३) शिक्षण निरीक्षक, (पश्चिम दक्षिण/उत्तर.) बृहन्मुंबई

विषय : महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शती) विनियमन अधिनियम १९७७महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील अनुसूची फ परिच्छेद २ मध्ये केलेल्या दुरुस्तीबाबत.

संदर्भ : १) महाराष्ट्र शासन राजपत्रअसाधारण भाग चार-बदि. २५ मार्च २०२३असाधारण क्रमांक १९. शालेय शिक्षण विभागदि. २४ मार्च २०२३ अन्वये प्रसिद्ध केलेली अधिसूचना,
२) या कार्यालयाचे परिपत्रक क्र.१८४७दि.१३.४.२०२३ व क्र.४४३०दि.२९.८.२०२३. 
३) सचिवपदवीधर डी.एड. कला क्रीडा शिक्षक-शिक्षकेतर संघपुणे यांचे दि.६.२.२०२४ चे पत्र. (प्राप्त दि.२०.२.२०२४.)
४) शासन पत्र क्र.संकीर्ण-२०२४/प्र.क्र.३९/टिएनटी-१दि.१.२.२०२४.

    उपरोक्त विषयाचे अनुषंगाने संदर्भातील अ.क्र. १ चे अधिसूचनेनुसार महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम १९७७महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील अनुसूची फ परिच्छेद २ मध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे.
    २/- सदर सूचनेस अनुसरुन संचालनालयाचे संदर्भ क्र.२ वरील दि.१३.४.२०२३ व २९.८.२०२३ च्या परिपत्रकान्वये शासन अधिसूचनेत दिलेल्या तरतूदी आणि सर्व टिपा/तळटिपा यांच्या आधारे शिक्षकांची सेवाजेष्ठता निश्चित करण्याची कार्यवाही करणेबाबत आपल्या विभागातील/जिल्हयातील शाळांना कळविण्यात यावे. जेथे सेवाजेष्ठतेबाबत वाद निर्माण होतो अशा प्रकरणात शिक्षणाधिकारी यांनी तक्रारीच्या अनुषंगाने सुनावण्या घेऊन अद्ययावत शासन निर्णयअधिसूचना दि.२५.३.२०२३ प्रमाणे नियमानुसार कार्यवाही करावी. शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या सेवाजेष्ठतेच्या निर्णय प्रकरणी अपिल झाल्यास विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी दि.२५.३.२०२३ नुसार नियमसंगत उचित कार्यवाही दक्षतेने पार पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रकरणी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या संचालनालयास सादर करण्यासही कळविण्यात आले आहे. तथापि अद्यापि आपल्या स्तरावरुन करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल या संचालनालयास प्राप्त झालेला नाही.


    प्रकरणी संदर्भ क्र.३ वरील संघटनेच्या पत्रान्वये मा. उच्च न्यायालयमुंबई येथील याचिका क्र.११२४३/२०२३ मधोल दि.७.९.२०२३ रोजीच्या आदेशाचा योग्य अर्थ न काढल्याने संस्थाचालकानी बी. एड. नियुक्त शिक्षकांना प्रथम प्राधान्य देत जेष्ठता याद्या तयार केल्या व या चुकीच्या सेवाजेष्ठता याद्यांनुसार असलेल्या पदोन्नतीस मान्यता देण्यात येत असल्याचे त्यांच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याचिका क्र.११२४३/२०२३ मधील दि.१८.१.२०२४ च्या अंतरिम आदेशानुसार स्पष्ट करण्यात आले आहे कीसेवाजेष्ठता याद्या ह्या दि.२४.३.२०२३ च्या राजपत्रानुसार असाव्यात. सदर राजपत्र डावलून दिलेल्या पदोन्नती मान्यता या न्यायालयीन अंतिम निर्णयाच्या अधीन राहणार आहेत. त्यामुळे चुकीच्या पदोन्नती प्रस्तावांना मान्यता देऊ नयेत असे स्पष्ट निर्देश आहेत.
    तसेच प्रकरणी शासनाचे संदर्भ क्र.४ वरील पत्रान्वये मा. उच्च न्यायालयाच्या दि.१८.१.२०२४ च्या आदेशाच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
    उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेऊन शासनाच्या दि.२४.३.२०२३ च्या अधिसूचनेतील तरतूदी यांच्या आधारेच शिक्षकांची सेवाजेष्ठता निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात यावीतसेच उच्च न्यायालयाच्या दि.१८.१.२०२४ च्या आदेशाच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी.
Private Schools Regs 1981 Amendments
(संपत सुर्यवंशी)
शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्यपुणे-१.
११/३/२०२४

उपरोक्त परिपत्रक पीडीएफमध्ये डाऊनलोडसाठी उपलब्ध 

Maharashtra Private Schools Employees (Conditions of Service) Regulation Act 1977, regarding amendments made in paragraph 2 of Schedule F to the Maharashtra Private Schools Employees (Conditions of Service) Regulations 1981
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon