DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Dnyanjyoti Savitribai Phule AadharYojana

Dnyanjyoti Savitribai Phule AadharYojana

इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी " ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना " साठी निकष व अटी लागू करणेबाबत.

महाराष्ट्र शासन


इतर मागास बहुजन कल्याण विभाग, शासन निर्णय क्रमांक : वगृयो-२०२२/प्र.क्र.११/योजना-५ हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई-४०००३२.

दिनांक : ११ मार्च, २०२४

वाचा :-

१) इमाव, सावशैमाप्र, विजाभज आणि विमाप्र कल्याण विभाग, शासन निर्णय क्रमांक : इमाव-२०१६/प्र.क्र.५८/विजाभज १, दिनांक ३०/१/२०१९

२) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक :आवगृ-२०१६/प्र.क्र.८७/का-१२, दिनांक २७/११/२०१८.

३) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक बीसीएच-२०१६ प्र.क्र.२९३/शिक्षण-२, दिनांक ०६/०१/२०१७.

४) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक बीसीएच-२०१८/ प्र.क्र.३१९/शिक्षण-२, दिनांक २१/१२/२०१८

५) इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग शासन निर्णय क्र. धवगृ-२०१९/ प्र.क्र.१२६/मावक, दि.०६/०९/२०१९

६) इतर मागास बहुजन कल्याण विभाग शासन निर्णय क्र. वगृयो-२०२२/प्र.क्र.११ / योजना- ५. दि.१३/१२/२०२३

प्रस्तावना :-

आदिवासी विकास विभागाची स्वयंम योजना व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वाधार योजनेच्या धर्तीवर इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता निर्वाह भत्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले / घेणारे भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति जिल्हा ६०० या प्रमाणे एकूण २१,६०० विद्यार्थ्यांकरिता "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना" राबविण्यास संदर्भिय दि.१३.१२.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

तथापि, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी निकष व इतर अटी-शर्ती ठरविण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता निर्वाह भत्त्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले / घेणारे भटक्या जमाती- क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना" राबविण्यास आवश्यक निकष व इतर अटी- शर्तीस या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

🙋

हे ही वाचाल

इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना लागू करणेबाबत.

दिनांक : १३ डिसेंबर, २०२३

संपूर्ण शासन निर्णय वाचण्यासाठी किंवा पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध त्यासाठी य ओळीला स्पर्श करा

०२. सदर "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना" राबविण्यासाठी निकष व इतर अटी-शर्ती खालीलप्रमाणे आहेत:-
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी संबंधित जिल्हयातील सहायक संचालक (इतर मागास बहुजन कल्याण) यांचेकडे ऑनलाईन / ऑफलाईन अर्ज सादर करतील. सहायक संचालक (इतर मागास बहुजन कल्याण) हे अर्जाची छाननी करतील आणि पात्र लाभार्थ्यांना जवळचे मागासवर्गीय मुला/ मुलींचे वसतिगृहाचे गृहपाल यांचेशी संलग्न (attach) करतील.
२.१ मुलभूत पात्रता
१. विद्यार्थी वसतीगृह प्रवेशास पात्र असावा.
२. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
३. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचा जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक असेल.
४. अनाथ प्रवर्गामधून अर्ज करणा-या विद्यार्थ्यांना महिला व बालकल्याण विभागाकडील सक्षम प्राधिका-याचे अनाथ प्रमाणपत्र आनिवार्य आहे.
५. दिव्यांग प्रवर्गामधून अर्ज करणा-या विद्यार्थ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांचे ४०% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
६. विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख पेक्षा जास्त नसावे. तसेच केंद्र शासनामार्फत ज्या ज्या वेळी मॅट्रीकेत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल, त्यानुसार या योजनेसाठी पालकाची वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहील.
६.विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख पेक्षा जास्त नसावे. तसेच केंद्र शासनामार्फत
ज्या ज्या वेळी मॅट्रीकेत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल, त्यानुसार या योजनेसाठी
पालकाची वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहील. विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक आपले राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक राहील. ७.
८. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या/तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा.
२.२ शैक्षणिक निकष
१. सदरचा विद्यार्थी १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा.
२. व्यवसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांस सदर
योजनेसाठी अर्ज करताना किमान ६० टक्के किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन/ CGPAचे गुण असणे आवश्यक राहील.
३. व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार त्या संबंधित प्रवर्गातून प्रवेश देण्यात येतील. यासाठी इयत्ता १२ वी च्या गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाईल.
४. सदर योजनेतंर्गत एकूण प्रवेश संख्येच्या ७०% जागा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व ३०% जागा बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतील.
५. निवडलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यत लाभास पात्र राहील.
६. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, अखिल भारतीय वैद्यकीय परिषद, भारतीय फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, राज्य शासन किंवा तत्सम संस्था इ. मार्फत मान्यताप्राप्त महाविद्यालयात / संस्थेमध्ये व मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यास प्रवेश मिळालेला असावा.
७. एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
८. योजनेंतर्गत लाभ मिळण्याकरिता विद्यार्थ्याची महाविद्यालयीन उपस्थिती किमान ७५% असावी. तथापि, एखाद्या विद्यार्थ्याच्या उपस्थितीबाबत शंका निर्माण झाल्यास संबंधित महाविद्यालयामध्ये पृष्ठ ६ पैकी २
विद्यार्थ्याच्या उपस्थितीबाबत शहानिशा करून विद्यार्थ्यास देय असलेली रक्कम अदा करण्याबाबत संबंधित सहायक संचालक (इतर मागास बहुजन कल्याण) कार्यालयाकडून योग्य तो निर्णय घेण्यात यावा.
९. निवड करण्यात आलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील. मात्र विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी त्या त्या अभ्यासक्रमाच्या परिक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
२.३ इतर निकष
१. योजनेचा लाभ १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यास देण्यात येईल. तथापि एका विद्यार्थ्यास जास्तीत जास्त ५ वर्षे सदर योजनेचा लाभ घेता येईल. परंतु, इंजीनिअरिंग / वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी सदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त ६ वर्षे अनुज्ञेय असेल.
२. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय ३० वर्षापेक्षा अधिक नसावे.
३. अभ्यासक्रमाच्या मध्यावधी कालावधीत प्रवेश घेतलेला विद्यार्थी ही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत लाभास पात्र असेल.
४. शिक्षणात खंड पडलेला विद्यार्थी आधार योजनेंतर्गत लाभास पात्र असेल. तथापि, सदर विद्यार्थी योजनेंतर्गत निश्चित केलेल्या वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाचा नसावा.
 
५. सदर योजनेस पात्र विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास, अनुत्तीर्ण कालावधीमध्ये योजनेंतर्गत लाभ देण्यात येणार नाही. उत्तीर्ण झाल्यानंतर असा विद्यार्थी लाभास पुढे पात्र राहील. तथापि, उपरोक्त ५ वर्षाचा कालावधी विचारात घेताना उत्तीर्ण व अनुत्तीर्ण असे दोन्ही कालावधींची गणना करण्यात येईल.
६. सदर योजनेतंर्गत सन २०२४-२५ करिता प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या १५० विद्यार्थ्यांना, द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या १५० विद्यार्थ्यांना, तृतीय वर्षात प्रवेश घेतलेल्या १५० विद्यार्थ्यांना व चतुर्थ वर्षात प्रवेश घेतलेल्या १५० विद्यार्थी अशा रितीने प्रति जिल्हा ६०० विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येईल. तद्नंतर सन २०२५-२६ पासून व्यवसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात रिक्त असलेल्या जागांवर प्रवेश देय राहिल. ज्या पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यांस पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षास प्रवेश देय आहे त्याच पदवी अभ्यासक्रमास द्वितीय वर्षाकरिता प्रवेश देय राहील. उर्वरीत सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रथम वर्षात प्रवेश देय राहील. त्यासाठी त्या त्या वेळी स्वतंत्रपणे जिल्हा सहायक संचालक (इतर मागास बहुजन कल्याण) यांच्याकडे शासन परिपत्रक क्र.वगृयो-२०२३/प्र.क्र.१२/योजना-५, दि.१३.०३.२०२३ मधील विहित नमुन्यात प्रवेशासाठी अर्ज करावा लागेल.
७. विद्यार्थ्यास इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या, आदिवासी विकास विभागाच्या, सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वसतीगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसावा. तसेच, ज्या विद्यार्थ्यांस इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ अनुज्ञेय आहे त्यास सदर योजनेचा लाभ अनुज्ञेय नसेल.
८. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा.
९. विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांनी सदर योजनेमध्ये फसवणूक केल्याचे आढळल्यास संबंधित विद्यार्थी व शैक्षणिक संस्था कायदेशीर कारवाईस पात्र राहतील. तसेच योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्याने शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न करता लाभ घेणे, शिक्षण न घेता नोकरी / व्यवसाय करुन या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यावर देखील असा विद्यार्थी कारवाईस पात्र राहील व दिलेल्या रकमेची व्याजासह वसुली करण्यात येईल.
पृष्ठ ६ पैकी ३
पुढील उर्वरित शासन निर्णय वाचण्यासाठी किंवा पीडीएफमध्ये डाऊनलोडसाठी उपलब्ध 


Regarding implementation of criteria and conditions for Gyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana for higher education students belonging to Other Backward Classes, Exempt Castes and Nomadic Tribes, and Special Backward Classes


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon