DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Child Age fixed for RTE 25 Pct Admission

Child Age fixed for RTE 25 Pct Admission

महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय डॉ. अॅनी बेझंट मार्ग, मध्यवर्ती इमारत, पुणे-४११००१.

दुरध्वनी: (०२०) २६१२५६९२

ई-मेल depmah2@gmail.com

दिनांक:- ०२/०४/२०२४

जा.क्र. प्राशिसं/आरटीई ८०१/प्रवेशप्रक्रीया/२०२३-२४/२९२८

महत्वाचे/अतितात्काळ

प्रति,

१. विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई,

२. शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका,

३. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद सर्व

४. शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी, मनपा/नपा सर्व

विषयः- सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या आर.टी.ई. २५ टक्के प्रवेश, शाळा नोंदणीबाबत

उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना २५ टक्के प्रवेश राखीव ठेवण्याची तरतूद आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९, सुधारित अधिसूचना दिनांक ०९.०२.२०२४ अधिसूचनेचा चुकीचा अर्थ लावून राज्यातील स्वयंअर्थसहाय्यीत शाळा वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना २५ टक्के प्रवेश राखीव ठेवणार नाही तसेच आरटीई २५ टक्के पोर्टलवर शाळा नोदंणी करणार नाही अशी भूमिका घेतल्याचे निदर्शनास आले आहे.

तथापि, ज्या शाळा अदयापपर्यत आरटीई पोर्टलवर २५ टक्के प्रवेशासाठी शाळा नोंदणी केलेली नाही अशा शाळांना आपल्या स्तरावरुन सक्त ताकीद देण्यात यावी. आरटीई २५ टक्के पोर्टलवर आपल्या कार्यक्षेत्रातील पात्र असणाऱ्या शाळा नोंदणी केलेली नसल्यास त्यास वैयक्तीक आपणास जबाबदार धरण्यात येईल. तसेच शासन निर्णय दिनांक १६.०१.२०१८ मधील तरतूदीनुसार शाळा मान्यता काढण्याची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी.
🙋👇👇👇👇👇👇👇



(शरद गोसावी) 
शिक्षण संचालक (प्राथमिक) 
महाराष्ट्र राज्य, 
पुणे-०१.

प्रत माहितीस्तव सविनय सादरः मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे निवडनस्ती-

Also Read -

Age of child fixed for RTE 25 percent Admission

What is age of child for RTE 25 percent admission

वर्ग१ ली प्रवेशा करिता किमान व कमाल वय मर्यादा निश्चित

महाराष्ट्र शासन

प्राथमिक शिक्षण संचालनालय

डॉ. अॅनी बेझंट मार्ग, मध्यवर्ती इमारत,

पुणे-४११००१.

दुरध्वनी: (०२०) २६१२५६९२

ई-मेल depmah2@gmail.com

जा.क्र./प्राशिसं/आरटीई-८०१/२०२४/१४६२

दिनांक : २२/०२/२०२४

प्रति,

श्रीमती आदिती एकबोटे वरिष्ठ तांत्रिक संचालक,

एनआयसी पुणे.

विषय :- सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत.

संदर्भ :- १. शासन निर्णय क्रमांकः आरटीई-२०१८/प्र.क्र.१८०/एस.डी.-१, दिनांक १८/०९/२०२०, २. शासन निर्णय क्रर्मकः आरटीई-२०१९/प्र.क्र.१११/एस.डी.-१

दिनांक २५/०७/२०११.

उपरोक्त संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात आरटीई RTE २५ टक्के शाळा प्रवेशासाठी बालकाचे Child Admission वय Age fixed निश्चित करण्याबाबत खालील प्रमाणे सुचना देण्यात येत आहे. शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक १८/०९/२०२० रोजीच्या श निर्णयान्वये मानीव दिनांक ३१ डिसेंबर करण्यात आला आहे. शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे कमाल वयोमर्यादा नाही. मानिव दिनांक बदलामुळे माहे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ साठी आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी वयोमर्यादा दिनांक डिसेंबर २०२४ अखेर पुढील प्रमाणे राहील.

What is  Limit Admission for grade 1st Central Government Guidlines

सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे वय

अ.क्र

प्रवेशाचा वर्ग

वयोमर्यादा

दि ३१ डिसेंबर २०२४ रोजीचे किमान वय

दि ३१ डिसेंबर २०२४ रोजीचे कमाल वय

१.

प्ले ग्रुप / नर्सरी

१ जुलै २०२० ३१ डिसेंबर २०२१

३ वर्षे

४ वर्ष ५ महिने ३० दिवस

२.

ज्युनियर केजी

१ जुलै २०१९ ३१ डिसेंबर २०२०

४ वर्ष

४ वर्ष ५ महिने ३० दिवस

३.

सिनियर केजी

१ जुलै २०१८ ३१ डिसेंबर २०१९

५ वर्ष

६ वर्ष ५ महिने ३० दिवस

४.

इयत्ता १ ली

१ जुलै २०१७ ३१ डिसेंबर २०१८

६ वर्ष

७ वर्ष ५ महिने ३० दिवस

 

(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक)

नत माहीतीस्तव सविनय सादर :

१) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

२) मा. आयुक्त (शिक्षण) म.रा. पुणे.

शिक्षण संचालनालय, पुणे १.

उपरोक्त परिपत्रक पीडीएफमध्ये डाऊनलोडसाठी उपलब्ध 


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon