DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

CM MaziShala SundarShala Prize Amendment

CM MaziShala SundarShala Prize Amendment

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानाच्या पुरस्काराच्या रकमेत सुधारणा करणेबाबत.

शासन निर्णय क्रमांकः मुमंअ २०२३/प्र.क्र.११४/एसडी-६ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालय, मुंबई ४०००३२

दिनांक:- ०७ मार्च, २०२४


----------------------------

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा २०२४ टप्पा दोन शासन निर्णय २७ जूलै २०२४ पीडीएफ मध्ये हवा असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा 

---------------------------


वाचा: १) शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग समक्रमांक दि.३०.११.२०२३.

- २) आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. आशिका/मुमंअ/सुंदर शाळा/२०२३/ईगव्ह-१४३, दि.०३.०३.२०२४.

प्रस्तावना:

संदर्भाधीन शासन निर्णयान्वये राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' हे अभियान राबविण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. यासाठी शासकीय शाळा व अन्य व्यवस्थापनांच्या शाळा याकरीता प्रत्येक स्तरावर खालीलप्रमाणे स्वतंत्र पारितोषिके निश्चित करण्यात आली होती.

(रक्कम रु.लक्ष)

सदर अभियान दि.०१.०१.२०२४ ते दि.१५.०२.२०२४ या कालावधीत संपूर्ण राज्यात राबविण्यात आले. सर्व व्यवस्थापनांच्या व माध्यमांच्या जवळपास ९५% शाळांनी यात सहभाग नोंदविला. या शाळांमधील सुमारे २ कोटी विद्यार्थी विविध उपक्रमात सहभागी झाले. अभियानास भरभरून मिळालेला हा प्रतिसाद निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. सर्व स्तरावरील पारितोषिकाच्या रकमेत सुसूत्रता असावी यासाठी विभाग व राज्यस्तरावरील पारितोषिकांच्या रकमेत अंशतः वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव संदर्भ क्र.२ अन्वये शासनास सादर करण्यात आला आहे. सदर प्रस्तावास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय:-
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या अभियानासाठी संदर्भ क्र.१ अन्वये निश्चित करण्यात आलेल्या राज्यस्तर व विभाग स्तरावरील पारितोषिकांच्या रकमेत खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

२. संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयान्वये अभियानाचा एकूण खर्च रु.८६.७३ कोटी यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. उपरोक्त परि.१ मध्ये दर्शविल्याप्रमाणे राज्यस्तर व विभागस्तरावरील पारितोषिकाच्या रकमेत वाढ केल्यामुळे पारितोषिकांच्या एकूण रक्कम रु.६६.१० कोटी ऐवजी रु.६६.७४ कोटी इतकी झाली आहे. रु.६४.०० लक्ष इतक्या अतिरिक्त वित्तीय भारास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. तथापि अभियानासाठी मंजूर करण्यात आलेल्या मूळ वित्तीय तरतुदीतून हा खर्च भागविण्यात यावा व यासाठी कोणतीही अतिरिक्त तरतूद उपलब्ध करून दिली जाणार नाही या अटीच्या अधीन राहून सदर मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

 या प्रीत्यर्थ होणारा खर्च मागणी क्रमांकई-०२, २२०२, सर्वसाधारण शिक्षण, ०१, प्राथमिक

शिक्षण, १०१, शासकीय प्राथमिक शिक्षण, (००) (०१) राज्यात आदर्श शाळा विकसित करणे (कार्यक्रम) (२२०२ जे ०७२) ५०-इतर खर्च या लेखाशीर्षाखालील सन २०२३-२४ या चालू वित्तीय वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. यासाठी आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रक अधिकारी व लेखाधिकारी, प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

४ सदर शासन निर्णय शासनाच्या सहमतीने व सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने निर्गमित

करण्यात येत आहे.

4. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या स्पर्श करा या संकेत स्थळावर

उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०३०७१७५३२६५२२१ असा आहे. हा शासन निर्णय

डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

सदर शासन  निर्णय पीडीएफमध्ये डाऊनलोडसाठी उपलब्ध 

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon