DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

RTE Admission School Registration Link


महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय डॉ. अॅनी बेझंट मार्ग, मध्यवती इमारत, पुणे-४११००१.

ई-मेल depmahgmail.com

दुरध्वनी: (०२०) २६१२५६९२

जा.क्र./प्राशिसं/पालक सूचना/आरटीई ८०१/२०२४/३१११ प्रति,

१) विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई

२) शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई, म.न.पा.

दिनांक: १५/०४/२०२४.

३) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व,

४) प्रशासन अधिकारी म.न.पा./न.पा. सर्व.

पालकांसाठी सूचना


विषय :- बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत पालकांसाठी सूचना.

Notice to parents regarding RTE 25% online admission process for academic year 2024-25 as per Right of Child to Free and Compulsory Education Act 2009.


संदर्भ :-

१. शासनाचे पत्र क्र. आरटीई-२०१९/प्र.क्र.२५/एसडी-१ दिनांक १३.०२.२०२४

२. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अधिसूचना दिनांक ०९.०२.२०२४

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेबाबत पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्ष पालकांना दिनांक १६.०४.२०२४ पासून लिक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.


Student Admission Portal users Login

LINK

या लिकवर पालकांना आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी नोंदणी करता येईल.

१. शाळा खालील कारणांमुळे आरटीई २५ टक्के प्रवेश नाकारु शकेल याची स्पष्ट कल्पना पालकांना देण्यात यावी व याबाबतची माहिती पोर्टलवर उपलब्ध असावी.-

• अवैध निवासाचा पत्ता

• अवैध जन्मतारखेचा दाखला

• अवैध जातीचे प्रमाणपत्र

• अवैध उत्पन्नाचे प्रमाणपत्र

• अवैध फोटो आयडी

• अवैध दिव्यांग प्रमाणपत्र

• ज्या बालकांनी यापूर्वी आरटीई २५ अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही.

• प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरुन पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास सदरील प्रवेश रह करण्यात येईल. तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज भरावा अनेक अर्ज भरु नयेत. अनेक अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास सदर अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही. अशा पालकांचे अर्ज रह करण्यात येतील याची नोंद घ्यावी.

• भाडेतत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृतच असावा • भाडेकरार हा अर्ज भरण्याच्या दिनांकाचा असावा व त्याचा कालावधी ११ महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा. जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडेकराराची प्रत जोडतील त्यांची कोणत्याही टप्पयावर पडताळणी करण्यात येईल. ज्या ठिकाणचा भाडेकरार दिला असेल त्या ठिकाणी बालक पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्यापालकांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येऊन सदर बालकाचा प्रवेश रद्द करण्यात येईल तसेच प्रवेश आरटीई मधून झाला तरी ही संबधित पालकांनी संपूर्ण फी भरावी लागेल.

• विदयार्थ्यांना निवासस्थानापासून १ किलोमिटरच्या अंतरावर अनुदानित शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा व स्वंयअर्थसहाव्यीत शाळा अशा सर्व प्रकारच्या शाळा असतील, वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना २५ टक्के प्रवेश देताना अनुदानित शाळा, शासकीय शाळा / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा व स्वंयअर्थसहाय्यीत शाळा असा प्रवेशासाठीचा प्राधान्यक्रम असणार आहे. तथापि एखादया पालकांनी प्रथम प्राधान्य म्हणून अनुदानित शाळेऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांची निवड करावयाची असल्यास त्यानुसार त्या पालकास प्रथम प्राधान्य म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा निवडता येईल.

• विदयार्थ्यांच्या निवासस्थानापासून १ किलोमिटरच्या अंतरावर अनुदानित शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा किंवा शासकीय शाळा नसतील व स्वंयअर्थसहाय्यीत शाळा असेल तर अशा परिस्थितीत त्या स्वंयअर्थसहाय्यीत शाळेत मुलांना २५ टक्के अंतर्गत सोडत पदधतीने प्रवेश दिला जाईल.

• अपवादात्मक परिस्थितीत विदयार्थ्यांच्या निवासस्थानापासून १ किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा / स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा व स्वंयअर्थसहाव्यात शाळा नसेल तर विदयार्थ्यांच्या निवासस्थानापासून ३ किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरील शळांमध्ये प्रवेश उपरोक्त प्राधान्याने होतील.

प्रत माहितीस्तव सविनय सादर :

२. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे - १

(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक) शिक्षण संचालनालय, पुणे १

१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई.


🙋

हेही वाचाल


महाराष्ट्र शासन 
प्राथमिक शिक्षण संचालनालय डॉ. अॅनी बेझंट मार्ग, 
मध्यवर्ती इमारत, 
पुणे-४११००१.

ई-मेल depmah2@gmail.com
दुरध्वनी: (०२०) २६१२५६९२
जा.क्र./प्राशिसं/प्र.प्र./आरटीई-५२०/२०२४/३१०९

दिनांक : १५/०४/२०२४.

प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२) शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई, म.न.पा./ शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर/दक्षिण/पश्चिम.
३) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व.
४) गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती, सर्व.
५) प्रशासन अधिकारी म.न.पा./न.पा. सर्व.

🙋

हेही वाचाल 

👆👆👆👆👆

विषय :- सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्याकरीताची प्रक्रिया सुरु करणेबाबत.



उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, दरवर्षी प्रमाणे सुधारित अधिसूचना दिनांक ०९/०२/२०२४ नुसार सन २०२४-२५ या वर्षांची आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येत असून सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियअंतर्गत दिनांक १६/०४/२०२४ ते ३०/०४/२०२४ या कालावधीमध्ये पालकांना प्रवेशाकरीता ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. तरी याबाबत व्यापकस्तरावर मोफत प्रसिद्धी देण्यात यावी.


Student Admission Portal users Login

LINK


(शरद गोसावी) शिक्षण संचालक (प्राथमिक) 
शिक्षण संचालनालय, 
पुणे- १.

प्रत माहितीस्तव सविनय सादर :
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे - १.

प्रत :- तांत्रिक संचालक, एन आय सी पुणे.

यांना प्रत देवून कळविण्यात येते की, उपरोक्त पत्राप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

⏬⏬⏬⏬⏬⏬

Also Read

महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय डॉ. अॅनी बेझंट मार्ग, मध्यवर्ती इमारत, पुणे-४११००१.
दुरध्वनी: (०२०) २६१२५६९२
ई-मेल depmah2@gmail.com

जा.क्र./प्राशिसं/आरटीई ८०१/आरटीई. रजि/२०२४/२३८३

दिनांक :- १८/०३/२०२४

प्रति,
१) शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई, महानगरपालिका.
२) विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई.
३) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व.

विषय :- सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या आर.टी.ई. २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता जिल्हयांतील आरटीई पात्र शाळांचे रजिस्ट्रेशन करणेबाबत.

संदर्भ-

१. शासनाचे पत्र क्र. आरटीई-२०१९/प्र.क्र.२५/एसडी-१ दिनांक १३.०२.२०२४
२. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांची अधिसूचना दिनांक ०९.०२.२०२४
३. संचालनालयाचे पत्र क्र/प्राशिसं/आरटीई ८०१/आरटीई. रजि/२०२४/१८२७, दि ०६/०३/२०२४

उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.

अधिसूचना दिनांक ०९.०२.२०२४ नुसार सुधारित नियम नमूद केलेले आहेत. पात्र शाळांचे रजिस्ट्रेशन दिनांक ६/०३/२०२४ ते दिनांक १८/०३/२०२४ या कालावधीमध्ये करण्याबाबत संचालनालयाचे दिनांक ०६.०३.२४ अन्वये निर्देश देण्यात आलेले होते.

तथापि काही जिल्हयांचे पुर्ण शाळांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन न झाल्यामुळे याव्दारे दिनांक २२.०३.२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तरी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेअंतर्गत पात्र असलेल्या शाळांचे १०० टक्के रजिस्ट्रेशन विहित कालावधीत पूर्ण करण्यात यावी. यापूढे कसल्याही परिस्थीतीत मुदतवाढ दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

(शरद गोसावी)

शिक्षण संचालक 
(प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१.

प्रत माहितीस्तव सविनय सादर :

१) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

२) मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.

प्रत माहिती व योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर वरिष्ठ तांत्रिक संचालक, एनआयसी पुणे.
👇👇👇👇👇
Also Read -

RTE 25% 2024-25 Admission School Registration Link 
महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय डॉ. अॅनी बेझंट मार्ग, मध्यवर्ती इमारत, पुणे-४११००१. ई-मेल depmah7@gmail.com


दुरध्वनी: (०२०) २६१२५६१२

दिनांक :- ०६/०३/२०२४

जा.क्र./प्राशिसं/आरटीई-८०१/आरटीई. रजि/२०२४/१८२७

प्रति,

१) शिक्षणाधिकारी, बृहन्मुंवई, महानगरपालिका.

२) शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर/दक्षिण/पश्चिम,

३) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व.

विषय :- सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या आर.टी.ई. २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता जिल्हयांतील आरटीई पात्र शाळांचे रजिस्ट्रेशन करणेबाबत.

संदर्भ- १. शासनाचे पत्र क्र. आरटीई-२०११/प्र.क्र.२५/ एसडी-१ दिनांक १३.०२.२०२४

२. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांची अधिसूचना दिनांक ०९.०२.२०२४
RTE 25% User Manual
👇


उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार खालील व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलीसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.

Also Read -
RTE Admission बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
👆👆👆👆👆
शासनाच्या संदर्भ क्र.१ च्या पत्रान्वये निर्देश दिलेले आहेत. तसेच त्यासंदर्भात शालेय शिक्षण व क्रोडा विभाग यांची अधिसूचना दिनांक ०९.०२.२०२४ अधिसूचना निर्गमित झालेली असून सदर अधिसूचनेमध्ये सुधारित नियम नमूद केलेले आहेत. त्यानुसार खालील नमूद व्यवस्थापनाच्या पात्र शाळांचे रजिस्ट्रेशन करण्यात यावे.

शाळा व्यवस्थापन

Student Admission Portal users Login

LinK

महानगरपालिका शाळा (Municipal Corporation)

नगरपालिका/नगर/मपंचायत शाळा (Nagar Palila Nagar Parishad Nagar

Panchayat)

कन्टोमेट बोर्ड शाळा (Cantonment Board)

किन्हा परिषद प्राथमिक (Zilla Parishad (Primary)) महानगरपालिका शाळा (मही) (Municipal Corporation (self funded))

जिला परिषद (माजी गाय) (EG)

खाजगी अनुदानित (Private Aided)

स्पर्धापन शा (Self Financed)

पोलिस कल्याणकारी शाळा (विना (Police Welfare (Unaided))

RTE Admission School Registration Link  LINK

त्यानुसार दरवर्षीप्रमाणे सन २०२४-२५ या वर्षांची आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येणार आहे. त्याकरीता आपल्या जिल्हयातील २५ टक्के प्रवेश प्रक्रिया लागू असलेल्या सर्व पात्र शाळांची नोंदणी दिनांक ६/०३/२०२४ ते दिनांक १८/०३/२०२४ या कालावधी मध्ये करण्यात यावी. २५ टक्के प्रवेश प्रक्रिया लागू असलेल्या सर्व पात्र शाळांनी नोंदणी करणे बंधनकारक आहे.
सदर शासनपत्र निर्णय पीडीएफमध्ये डाऊनलोड साठी उपलब्ध 


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon